वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 १/१५ पृ. २९-३१
  • हनोख—कठीण परिस्थितींत निर्भय

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • हनोख—कठीण परिस्थितींत निर्भय
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • हनोख आणि विश्‍वव्यापी वादविषय
  • देवाने हनोखाला नेले—कसे?
  • भविष्यवाणी पूर्ण होते
  • हनोख अधर्मी जगात देवाबरोबर चालला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • “तो देवाला संतोषवीत असे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१७
  • या वादळी काळात देवासोबत चाला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • तो देवासोबत चालत राहिला
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 १/१५ पृ. २९-३१

हनोख—कठीण परिस्थितींत निर्भय

चांगल्या मनुष्याकरता तो अत्यंत वाईट समय होता. सर्व पृथ्वीवर अभक्‍तपणा बोकाळला होता. मानवजातीच्या नैतिक स्थितीला एकसारखी उतरती कळा लागली होती. खरे तर त्या काळाविषयी लवकरच असे म्हणण्यात येणार होते: “पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनातील येणाऱ्‍या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्‍वराने पाहिले.”—उत्पत्ति ६:५.

हनोख हा आदामाच्या वंशावळीतला सातवा मनुष्य होता आणि स्वतःला इतरांपासून वेगळे करण्याचे धैर्य त्याच्यात होते. परिणामांची तमा न बाळगता तो धार्मिकतेच्या बाजूने ठाम उभा राहिला. हनोखाच्या संदेशामुळे अभक्‍त पापी लोक इतके चिरफडले की त्यांनी त्याची हत्या करण्याची खूणगाठ बांधली परंतु यासर्वातून त्याला केवळ यहोवाच वाचवू शकत होता.—यहूदा १४, १५.

हनोख आणि विश्‍वव्यापी वादविषय

हनोखाच्या जन्माच्या फार पूर्वी सार्वभौमत्वाचा वादविषय उभा राहिला होता. देवाला शासन करण्याचा प्राधिकार होता का? दियाबल सैतानाने प्रत्यक्षात नाही, असे म्हटले. बुद्धिजीवी प्राणी देवाच्या मार्गदर्शनापासून स्वतंत्र झाल्यास ते अधिक चांगल्या प्रकारे कार्य करतील, असे प्रतिपादन दियाबलाने केले. धूर्तपणे लोकांना आपल्या बाजूने घेऊन सैतानाने यहोवाच्या विरोधातील आपल्या खटल्यात दम आणण्याचा प्रयत्न केला. देव-शासनाऐवजी आत्म-शासनाची निवड करण्याद्वारे सैतानाची बाजू घेण्यात ख्यात असणाऱ्‍यांमध्ये आदाम, त्याची पत्नी हव्वा आणि त्यांचा पहिला मुलगा काइन यांचा समावेश होता. पहिल्या मानवी जोडप्याने, देवाने निषिद्ध ठरविलेले फळ खाण्याद्वारे आणि काइनाने आपला धार्मिक भाऊ हाबेल याची हेतुतः हत्या करण्याद्वारे असे केले.—उत्पत्ति ३:४-६; ४:८.

हाबेल यहोवाच्या बाजूने धैर्याने उभा राहिला. हाबेलच्या सचोटीने शुद्ध उपासनेला प्रेरित केल्यामुळे काइन आपला खुनी राग त्याच्यावर व्यक्‍त करत असताना सैतानाला आनंद झाला होता यात कोणतीही शंका नाही. त्या काळापासून, सैतानाने दहशतवादी हत्यार या अर्थाने ‘मरणाच्या भयाचा’ वापर केला आहे. खऱ्‍या देवाची उपासना करण्याचा कल असलेल्या कोणत्याही मनुष्याच्या मनात भितीने थैमान घालावे, अशी त्याची इच्छा आहे.—इब्री लोकांस २:१४, १५; योहान ८:४४; १ योहान ३:१२.

हनोखाच्या जन्म होईपर्यंत सैतानाला असे वाटत होते, की यहोवाच्या सार्वभौमत्वाला मानव उचलून धरणार नाही आणि हे त्याचे मत साधार असल्याचे भासले असावे. हाबेलचा मृत्यू झाला होता आणि त्याच्या विश्‍वासू उदाहरणाचे अनुकरण करण्यात येत नव्हते. तथापि, हनोखाने हे शाबीत केले, की तो याबाबतीत अपवाद होता. एदेन बागेत घडलेल्या घटनेविषयी चांगल्या प्रकारे परिचित असल्यामुळे हनोखाकडे आपल्या विश्‍वासासाठी दृढ आधार होता.a अभिवचनयुक्‍त संतती, सैतानाचा आणि त्याच्या योजनांचा अंत करील, हे दर्शविणाऱ्‍या यहोवाच्या भविष्यवाणीची त्याने किती कदर बाळगली असले!—उत्पत्ति ३:१५.

आपल्यासमोरील सदोदीत असलेल्या आशेमुळे, हाबेलच्या दियाबल-प्रेरित ऐतिहासिक खुनाची हनोखाला दहशत वाटली नाही. उटलपक्षी, जीवनभर धार्मिकतेचा मार्ग अनुसरण्याद्वारे तो यहोवाच्या मार्गाने चालत राहिला. जगिक स्वतंत्रतेचा आत्मा टाळण्याद्वारे हनोखाने स्वतःला या जगापासून वेगळे केले.—उत्पत्ति ५:२३, २४.

शिवाय, दियाबलाची दुष्ट कामे अपेशी होतील असे हनोखाने धैर्याने सांगितले आणि ते स्पष्टही केले. देवाच्या पवित्र आत्म्याच्या किंवा कार्यकारी शक्‍तीच्या प्रभावाने हनोखाने दुष्टाबद्दल अशा प्रकारे भविष्यवाणी केली: “पाहा! सर्वांचा न्यायनिवाडा करावयास, आणि भक्‍तिहीन लोकांनी अभक्‍तीने केलेल्या आपल्या सर्व भक्‍तिहीन कृत्यांवरून आणि ज्या सर्व कठोर गोष्टी भक्‍तिहीन पापी जनांनी त्याच्याविरुद्ध सांगितल्या त्यांवरून, त्या सर्वांस दोषी ठरवावयास प्रभु आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला.”—यहूदा १४, १५.

हनोखाच्या निर्भय घोषणांमुळे इब्री ख्रिश्‍चनांना लिहिताना प्रेषित पौलाने स्वतःचा समावेश, कार्यात विश्‍वासाचे प्रभावी उदाहरण मांडलेल्या ‘साक्षीदारांच्या मोठ्या मेघात’ केला.b (इब्री लोकांस ११:५; १२:१) विश्‍वासाचा मनुष्य या नात्याने हनोखाने ३०० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत सचोटी राखली. (उत्पत्ति ५:२२) हनोखाच्या विश्‍वासूपणामुळे आकाशातील आणि पृथ्वीवरील देवाच्या शत्रूंचे चित्त किती खवळले असावे! हनोखाच्या मार्मिक भविष्यवाणीमुळे सैतानाला आपला राग अनावर झाला परंतु त्याला यहोवाचे संरक्षण होते.

देवाने हनोखाला नेले—कसे?

सैतानाला किंवा त्याच्या पृथ्वीवरील सेवकांना हनोखाला मारण्याची परवानगी यहोवाने दिली नाही. उलटपक्षी, प्रेरित अहवाल सांगतो: “देवाने त्याला नेले.” (उत्पत्ति ५:२४) प्रेषित पौल सर्व गोष्टींचे याप्रकारे वर्णन करतो: “हनोखाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्‍वासाने लोकांतरी नेण्यात आले, आणि तो सापडला नाही: कारण त्याला देवाने लोकांतरी नेले; लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की, तो देवाला संतोषवीत असे.”—इब्री लोकांस ११:५.

“मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून” हनोखाला कशाप्रकारे “लोकांतरी” नेण्यात आले? किंवा आर. ए. नॉक्स यांनी भाषांतरित केल्याप्रमाणे, “मरणाचा अनुभव येऊ न देता” हनोखाला कसे नेण्यात आले? आजारामुळे किंवा त्याच्या शत्रूंच्या हिंसाचारामुळे होणाऱ्‍या यातनामय मृत्यूपासून वाचवून देवाने त्याच्या जीवनाचा शांतिमय शेवट केला. होय, यहोवाने हनोखाचे जीवन त्याच्या ३६५ व्या वर्षी संपुष्टात आणले—समकालीन लोकांच्या तुलनेत तो तरुण होता.

‘हनोखाने देवाला संतोषविले याची साक्ष’ कशा प्रकारे देण्यात आली? त्याच्याकडे कोणता पुरावा होता? ख्रिस्ती मंडळीच्या भविष्यातील आध्यात्मिक परादीसचा दृष्टान्त पाहतेवेळी ज्याप्रकारे प्रेषित पौलाला “उचलून नेण्यात आले” किंवा हलविण्यात आले त्याप्रमाणे देवाने हनोखाला मूर्च्छित केले असावे. (२ करिंथकर १२:३, ४) हनोख देवाला आनंदित करीत होता याची साक्ष अथवा त्याचा पुरावा भवितव्यातील पार्थिव परादीसचा काल्पनिक दृष्टान्त राहिला असेल ज्यामध्ये देवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करणारे सर्व जण राहतील. हनोख कदाचित अशा प्रकारचा तन्मयावस्थेचा दृष्टान्त पाहत असताना देवाने त्याला वेदनारहित मृत्यूद्वारे पुनरुत्थानाच्या दिवसापर्यंत निद्रिस्थ केले असावे. असे दिसते, की मोशेप्रमाणे यहोवाने त्याच्या शरीराची अशा प्रकारे विल्हेवाट लावली की “तो सापडला नाही.”—इब्री लोकांस ११:५; अनुवाद ३४:५, ६; यहूदा ९.

भविष्यवाणी पूर्ण होते

आज यहोवाचे साक्षीदार हनोखाच्या भविष्यवाणीच्या साराची घोषणा करतात. नजीकच्या भविष्यात देव अभक्‍त लोकांचा नाश करील तेव्हा या भविष्यवाणीची पूर्णता कशी होईल, असे ते शास्त्रवचनातून दाखवून देतात. (२ थेस्सलनीकाकर १:६-१०) जगाच्या दृष्टिकोनांपासून आणि उद्दिष्टांपासून त्यांचा संदेश भिन्‍न असल्यामुळे त्यांचा तिटकारा केला जातो. विरोधास तोंड द्यावे लागत असल्याचे त्यांना नवल वाटत नाही कारण येशूने आपल्या अनुयायांना इशारा दिला: “माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करितील.”—मत्तय १०:२२; योहान १७:१४.

तथापि, हनोखाप्रमाणे आजच्या ख्रिश्‍चनांना अशी खात्री देण्यात आली आहे, की कालांतराने त्यांची त्यांच्या शत्रूंपासून सुटका होईल. प्रेषित पेत्राने लिहिले: “भक्‍तिमान लोकांस परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकांस शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते.” (२ पेत्र २:९) समस्या किंवा बिकट परिस्थिती काढणे देवाला कदाचित योग्य वाटेल. कदाचित छळ संपुष्टात येईल. असे झाले नाही तरी आपल्या सेवकांना परीक्षा यशस्वीपणे सहन करता याव्यात म्हणून त्यांतून “निभावण्याचा उपायहि” त्याला ठाऊक आहे. आवश्‍यकता असते तेव्हा यहोवा ‘पराकोटीचे सामर्थ्य’ देखील देतो.—१ करिंथकर १०:१३; २ करिंथकर ४:७.

‘आपला झटून शोध घेणाऱ्‍यांना प्रतिफळ देणारा’ या नात्याने यहोवा आपल्या सेवकांना सार्वकालिक जीवन देऊन आशीर्वादित देखील करील. (इब्री लोकांस ११:६) त्यांतील बहुतेकांसाठी हा आशीर्वाद म्हणजे पार्थिव परादीसवर अनंत जीवन उपभोगणे. यास्तव हनोखाप्रमाणे आपणही देवाचा संदेश निर्भयपणे घोषित करू. असे आपण विश्‍वासानिशी कठीण परिस्थितींतही करू या.

[तळटीपा]

a आदाम ६२२ वर्षांचा असताना हनोखाचा जन्म झाला. आदामाच्या मृत्यूनंतर हनोख सुमारे ५७ वर्षे जिवंत राहिला. यास्तव, त्यांनी आपल्या आयुष्याचा बहुतेक काळ एकाच समयात व्यतीत केला.

b इब्री लोकांस १२:१ येथील ‘साक्षीदार’ हा शब्द मारटीस या ग्रीक शब्दापासून येतो. ग्रीक नव्या करारातून वेस्टचा शब्द अभ्यास (इंग्रजी) यानुसार “एखाद्या इसमाने पाहिले किंवा ऐकले अथवा इतर मार्गाने त्याला जे ठाऊक आहे त्याची साक्ष देणारा अथवा साक्ष देवू शकणारा” असा या शब्दाचा अर्थ होतो. नायजेल टर्नर आपल्या ख्रिस्ती शब्द (इंग्रजी) या पुस्तकात म्हणतात, की या शब्दाचा अर्थ “व्यक्‍तिगत अनुभवाने . . . , तसेच खात्रीने सत्यांविषयी आणि दृष्टिकोनांविषयी” बोलणारा असा होतो.

[३० पानांवरील चौकट]

देवाच्या नावाचे अपवित्रीकरण

हनोखाच्या सुमारे चार शतकांआधी आदामाच्या नातवाचा म्हणजे अनोशचा जन्म झाला. उत्पत्ति ४:२६ (NW) म्हणते: “यहोवाच्या नावाचा धावा करण्याची तेव्हा सुरवात झाली.” देवाच्या नावाचा ‘अपवित्ररीत्या धावा करण्यास सुरवात’ किंवा “अपवित्रीकरणाची सुरवात” अशा प्रकारे हे वचन वाचण्यास हवे, असे काही इब्री भाषेच्या विद्वानांना वाटते. इतिहासातील या काळाचा विचार करता जेरुसलेम टरगम म्हणते: “या पिढीच्या काळात त्यांनी चुकीचे ते करण्यास आणि स्वतःसाठी प्रतिमा बनविण्यास सुरवात केली तसेच त्यांच्या या प्रतिमांना त्यांनी प्रभूच्या वचनाचे नाव ठेवले.”

अनोशच्या काळात सर्वत्र यहोवाच्या नावाचा गैरवापर करण्यात येत होता. हे ईश्‍वरी नाव त्यांनी स्वतःला किंवा अशा लोकांना दिले असावे ज्यांच्याद्वारे ते उपासनेत यहोवाकडे जाण्याचा बहाणा करीत असत. अथवा त्यांनी हे ईश्‍वरी नाव त्यांच्या प्रतिमांना दिले असावे. काही असले तरी दियाबल सैतानाने मानवी वंशाला मूर्तिपूजेच्या पाशात अडकवले हे मात्र नक्की. हनोखाच्या जन्मापर्यंत खऱ्‍या उपासनेचा मागमूसही राहिला नव्हता. हनोखाप्रमाणे सत्याच्या एकवाक्यतेत जीवन जगणाऱ्‍याचा आणि सत्याचा प्रचार करणाऱ्‍याचा तिटकारा करण्यात येत असे आणि त्यामुळे अशा प्रकारचा मनुष्य छळाचे लक्ष्य बनत होता.—पडताळा मत्तय ५:११, १२.

[३१ पानांवरील चौकट]

हनोख स्वर्गात गेला का?

“हनोखाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्‍वासाने लोकांतरी नेण्यात आले.” इब्री लोकांस ११:५ मधील या भागाची काही बायबल भाषांतरे सूचित करतात, की हनोख वास्तविकपणे मेला नाही. उदाहरणार्थ, जेम्स मोफॅट यांचे बायबलचे अभिनव भाषांतर (इंग्रजी) म्हणते: “विश्‍वासामुळे हनोखाला स्वर्गात नेण्यात आले त्यामुळे तो कधीही मेला नाही.”

तथापि, हनोखाच्या दिवसांनंतर सुमारे ३,००० वर्षांनी येशू ख्रिस्ताने म्हटले: “स्वर्गातून उतरलेला (व स्वर्गात असलेला) जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीहि स्वर्गात चढून गेला नाही.” (योहान ३:१३) अभिनव इंग्रजी बायबल (इंग्रजी) म्हणते: “स्वर्गातून उतरलेल्या मनुष्याच्या पुत्राखेरीज कोणी सुद्धा स्वर्गात गेले नाही.” येशूने असे म्हटले तेव्हा त्याचे देखील स्वर्गारोहण झाले नव्हते.—पडताळा लूक ७:२८.

प्रेषित पौल म्हणतो, की हनोख आणि ख्रिस्तपूर्व काळातील इतर साक्षीदार यांनी तयार झालेल्या मोठ्या मेघातील ‘सर्व जण मेले’ आणि “त्यांना अभिवचनानुसार फलप्राप्ति झाली नाही.” (इब्री लोकांस ११:१३, ३९) का? कारण हनोखासहित सर्व मानवांना आदामाद्वारे पापाचा वारसा मिळाला आहे. (स्तोत्र ५१:५; रोमकर ५:१२) येशू ख्रिस्ताचे खंडणी बलिदान हा तारण होण्याचा एकमेव मार्ग आहे. (प्रेषितांची कृत्ये ४:१२; १ योहान २:१, २) हनोखाच्या दिवसांपर्यंत खंडणी देण्यात आलेली नव्हती. यामुळे हनोख स्वर्गात गेला नाही, परंतु या पृथ्वीवर पुनरुत्थित होण्यासाठी तो मृत्यूमध्ये निद्रावस्थेत आहे.—योहान ५:२८, २९.

[२९ पानांवरील चित्राचे श्रेय]

Illustrirte Pracht - Bibel/Heilige Schrift des Alten und Neuen Testaments, nach der deutschen Uebersetzung D. Martin Luther’s यातून घेतलेले

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा