सर्व ईश्वरी प्रकटीकरणे?
देवाच्या आत्म्याने पवित्र बायबल प्रेरित केले तर मग हा देवाचा आत्मा इतर जण ज्या पुस्तकांना पवित्र म्हणतात अशा पुस्तकांसाठी देखील जबाबदार होऊ शकतो का? (२ तीमथ्य ३:१६) हा प्रश्न (ला सिविल्टा कथोलिका) या इटालियन जेसूट नियतकालिकात विचारण्यात आला होता; हे नियतकालिक “[व्हॅटिकन] सरकारच्या सचिवमंडळाच्या देखरेखीखाली” प्रकाशित झाले होते आणि म्हणून कॅथोलिक क्षेत्रांत त्यास प्रमाणभूत मानले जाते.
जेसूट नियतकालिकाने म्हटले: “पवित्र आत्म्याच्या कार्याद्वारे देवाने वचनाचे बीज यहुद्देत्तर आणि ख्रिश्चनेत्तर संप्रदायाच्या काही पुस्तकांमध्ये देखील टाकले.” जेसूटाच्या मते “पवित्र” पुस्तके जसे, की झोरोस्ट्रियन अवेस्टा किंवा कन्फ्युशियन फोर बुक्स, “मनुष्यांद्वारे पवित्र आत्म्याच्या काहीशा प्रभावाखाली” लिहिण्यात आली आणि यामुळे त्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात ‘ईश्वरी प्रकटीकरण’ आहे.”
तथापि, हा लेख स्पष्टीकरण करतो. “हे पवित्र पूर्ण पुस्तक देवाचे वचन नाही,” तो लेख पुढे म्हणतो, की ही पुस्तके लिहिणाऱ्यांनी कदाचित “अनेकेश्वरवादी किंवा तत्त्वज्ञानी वातावरणाचा अनुभव घेतला असावा” ज्यामध्ये ते हयात होते आणि ज्यात त्यांनी कार्य केले. ला रिपब्लिका या इटालियन वृत्तपत्राचे व्हॅटिकन व्यवहार संवाददाता मारको पोलिटी यांच्या मते, हा विश्वास “कॅथोलिक चर्च आणि महान ऐतिहासिक धर्मांतील पूर्वी निव्वळ अशक्य वाटणाऱ्या संबंधांस शक्य करतो” व पुन्हा एकदा जॉन पॉल दुसरे यांनी १९८६ साली असिसीमध्ये जोराने प्रेरित केलेल्या संमिश्र विश्वासाच्या प्रार्थना सभेप्रमाणे विविध सभांचा आत्मा आणतो.
यहोवा अव्यवस्थेचा आणि संभ्रमाचा देव नाही. (१ करिंथकर १४:३३) म्हणून आपण निश्चितपणे असा निष्कर्ष काढू शकत नाही, की त्याचा पवित्र आत्मा किंवा त्याची कार्यकारी शक्ती त्याच्या वचनाशी अर्थात बायबलशी सुसंगत नसणाऱ्या पुस्तकांतील एखाद्या भागास सुद्धा प्रेरित करील. विविध “धार्मिक परंपरां”मध्ये ख्रिस्ती एकता साधण्याऐवजी प्रेषित पौलाने लिहिले की, ‘एक आशा, एक विश्वास एक प्रभू, एक बाप्तिस्मा’ आहे.—इफिसकर ४:४, ५.
ही ‘एक आशा’ येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यावर अवलंबून आहे. बायबल उचितपणे म्हणते: “तारण दुसऱ्या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेहि नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.” (प्रेषितांची कृत्ये ४:१२) इतर कोणतेही “पवित्र पुस्तक” देवाच्या उद्देशांची पूर्ती करण्यातील प्रमुख भूमिका पार पाडणारा या नात्याने येशूचा उल्लेख करत नाही. आपण देवाचे वचन या अर्थाने बायबलचा स्वीकार केल्यानंतरच तारणासाठी यहोवा देवाच्या प्रेमळ तरतुदीविषयी ते आपल्याला शिकवू शकते.—योहान १७:३; १ थेस्सलनीकाकर २:१३.