‘दावीदाचे घराणे’ सत्य अथवा कल्पित?
दावीद—हा एक तरुण मेंढपाळ मुलगा जो संगीतकार, कवी, सैनिक, संदेष्टा आणि राजा झाला त्याचे बायबलमधील महत्त्वाचे स्थान लगेच जाणवते. त्याच्या नावाचा १,१३८ वेळा उल्लेख करण्यात आला आहे; ‘दावीदाचे घराणे’—अनेकदा दावीदाच्या राजवंशास निर्देशित करणारी अभिव्यक्ती—२५ वेळा वापरण्यात आली आहे. (१ शमुवेल २०:१६) दावीद राजा आणि त्याचा राजवंश केवळ कल्पित होते का? पुरातत्त्वविद्या काय प्रकट करते? गालीलाच्या उत्तरेकडील तेल डान पुरातत्त्वीय उत्खनन क्षेत्रातील एका उल्लेखनीय शोधाने दावीद आणि त्याच्या राजवंशाच्या ऐतिहासिकतेस समर्थन दिल्याचा अहवाल दिला आहे.१२
सन १९९३ या वर्षातील उन्हाळ्यामध्ये, प्राध्यापक अवराम बिरॉन यांच्याद्वारे मार्गदर्शित केलेल्या एका पुरातत्त्वीय गटाने प्राचीन डॅनच्या बाहेरील द्वाराचे क्षेत्र स्वच्छ केले. त्यांना एक फरसबंदी चौक सापडला. जमिनीच्या बाहेर निघालेला एक काळा लाव्हाचा दगड सहज बाजूला सरकवण्यात आला. या दगडास दुपारच्या वेळी सूर्याच्या दिशेने उलटविण्यात आले तेव्हा त्यावरील अक्षरांमध्ये जिवंतपणा आला होता. “अरे! आपल्याला तर एक अभिलेख मिळालाय!” प्राध्यापक बिरॉन उद्गारले.
प्राध्यापक बिरॉन आणि जेरुसलेममधील हिब्रू विद्यापीठातील त्यांचे साथीदार, प्राध्यापक योसेफ नॉव्हे यांनी त्वरित त्या अभिलेखावर वैज्ञानिक अहवाल लिहिला. या अहवालावर आधारित, १९९४ या वर्षाच्या मार्च/एप्रिल बायबलच्या पुरातत्त्वविद्येची उजळणी (इंग्रजी), नियतकालिकामधील एक लेख म्हणतो: “न्यू यॉर्क टाईम्सच्या ठळक बातम्यांमध्ये पुरातत्त्व शोधाचा बहुतेकवेळा उल्लेख येत नाही. (टाईम नियतकालिकाबद्दल सांगण्यासारखे काही नाही) परंतु, मागील उन्हाळ्यात तेल डान येथील शोधाच्या बाबतीत नेमके हेच झाले ही सुंदर टेकडी गालीलाच्या उत्तरेकडील हर्मन पर्वताच्या पायथ्याशी असणाऱ्या जॉर्डन रीव्हरच्या उपनदीच्या काठावर आहे.
“तेथे अवराम बिरॉन आणि त्यांच्या पुरातत्त्वविद्वानांच्या गटाला सा. यु. पू. नवव्या शतकातील एक उल्लेखनीय अभिलेख मिळाला जो ‘दावीदाचे घराणे’ आणि ‘इस्राएलाचा राजा’ या दोघांना निर्देशित करतो. दावीदाचे नाव बायबलच्या बाहेर एखाद्या प्राचीन अभिलेखामध्ये आढळल्याची ही पहिलीच वेळ आहे. हा अभिलेख मात्र कोणत्याही ‘दावीदाचा’ नव्हे तर दावीदाच्या घराण्याचा अर्थात इस्राएलाच्या महान राज्याच्या राजवंशाचा देखील उल्लेख करतो त्यामुळे ही बाब अधिक उल्लेखनीय आहे.
“‘इस्राएलाचा राजा’ ही बायबलमध्ये वारंवार आढळणारी अभिव्यक्ती आहे, विशेषतः राजे या पुस्तकामध्ये. तरी देखील, हा शोध कदाचित बायबल बाहेरील बायबलचा इस्राएलाबद्दलचा सर्वात पुरातन सेमिटीक लीपीमधील संदर्भ असू शकेल. हा अभिलेख जर काही शाबीत करीत असेल, तर तो हे दाखवितो, की काही बुद्धिमान बायबल टिकाकारांच्या दाव्याच्या विरोधात, इस्राएल आणि यहुदा दोन्ही त्या काळातील प्रमुख राज्ये होती.”
कालनिर्धारण अक्षरांचा आकार, दगडाच्या तुकड्याजवळ मिळालेल्या मातीच्या भांड्यांचे विश्लेषण आणि अभिलेखाचा मजकूर यांवर आधारित आहे. या तीन पद्धती एकाच समयाकडे म्हणजे सा. यु. पू. नववी शताब्दी, दावीद राजाच्या शंभर वर्षांपेक्षा थोडासा जास्त काळ यांकडे अंगुली दर्शवितात. तज्ज्ञ विश्वास ठेवतात, की हा अभिलेख ‘इस्राएलाचा राजा’ आणि ‘दावीदाचे घराणे [राजा]’ या दोघांच्या अरामियन शत्रूद्वारे उभारण्यात आलेल्या विजय-स्मारकाचा तुकडा होता. अरामियन लोक, प्रसिद्ध वादळी-देव हादाद याची उपासना करीत असत त्यांचे पूर्वेकडील भागात वास्तव्य होते.
१९९४ या वर्षाच्या उन्हाळ्यात या शिलालेखाचे आणखी दोन तुकडे मिळाले. प्राध्यापक बिरॉन अहवाल देतात: “या दोन तुकड्यांमध्ये अरामियन देव हादाद याचे नाव आहे, त्याचप्रमाणे इस्राएल आणि अरामियन लोकांमध्ये झालेल्या लढाईचा उल्लेख देखील आहे.”
१९९३ मध्ये ज्या प्रमुख भागाचा शोध लावण्यात आला होता त्यात अस्पष्ट दिसणाऱ्या १३ ओळी प्राचीन हिब्रू लीपीमध्ये लिहिलेल्या आहेत. त्यावेळी, टिंबांचा वापर लेखातील शब्दांना विलग करणारे शब्द विभाजक म्हणून करण्यात येत असे. तथापि, “byt” (घराणे), एक टिंब आणि त्याच्यापुढे “dwd” (दावीद) याऐवजी “bytdwd” (रोमन अक्षरांमध्ये अक्षरांतरण करण्यात आले आहे) म्हणजे ‘दावीदाचे घराणे’ असा एक शब्द म्हणून या अक्षरांच्या स्वरूपात लिहिण्यात आला आहे. हे समजण्याजोगे आहे, की “bytdwd” च्या अर्थासंबंधाने अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत.
भाषाशास्त्रज्ञ प्राध्यापक ॲनसन रेनी वर्णन करतात: “योसेफ नॉव्हे आणि अवराम बिरॉन यांनी या लेखाविषयी सविस्तर वर्णन केले नाही, अशा रचनेमधील दोन भागांतील शब्द विभाजकास विशेषतः संधी सर्वश्रुत विशेष नाम असल्यास बहुतेकवेळा काढून टाकले जात असे, हे वाचकांना ठाऊक होते, असा निष्कर्ष त्यांनी काढला हे त्याचे कदाचित कारण असेल. ‘दावीदाचे घराणे’ निश्चितच सा. यु. पू. नवव्या शतकाच्या मध्यांतराच्यावेळी एक विशेष राजकीय आणि भौगोलिक नाम होते.”
आणखी एक पुरातत्त्वीय पुरावा
या शोधानंतर, मशं स्टेला (ज्यास मोआबी पाषाण देखील म्हटले जाते), याचे एक तज्ज्ञ, प्राध्यापक आन्द्रे लमेर यांनी अहवाल दिला, की हे ‘दावीदाच्या घराण्यास’ सुद्धा निर्देशित करते.a १८६८ मध्ये शोध लावण्यात आलेली, मशं स्टेला आणि तेल डान स्टेला यांमध्ये पुष्कळ समानता आढळते. या दोन्ही शिला सा. यु. पू. नवव्या शतकाच्या काळातील आहेत, एकाच द्राव्यिकापासून त्या बनविण्यात आल्या आहेत, त्यांचा आकार सारखा आहे आणि त्यांवरील सिमिटीक लीपीमध्ये पुष्कळ साम्य आढळते.
मशं स्टेलावरील खराब झालेल्या ओळीचे पुन्हा लिखाण करण्याविषयी प्राध्यापक लमेर यांनी लिहिले: “तेल डान याचा शोध लागण्यापूर्वी सुमारे दोन वर्षांआधी, मी असे अनुमान काढले होते, की मशं स्टेलामध्ये ‘दावीदाच्या घराण्याचा’ उल्लेख आढळतो. . . . एक कारण ज्यामुळे त्यावर उल्लेख असणाऱ्या ‘दावीदाच्या घराण्याकडे’ लक्ष दिले गेले नाही ते कदाचित या सत्यतेचे कारण असू शकेल, की मशं स्टेलाचे कधीही एक योग्य एडिटिओ प्रिंकेप्स [पहिली आवृत्ती] नव्हते. मशं शिलेच्या शोधानंतर १२५ वर्षांनी मी नेमके तेच तयार करीत आहे.”
अशा प्रकारची पुरातत्त्वीय माहिती मनोरंजक आहे कारण एक देवदूत, स्वतः येशू, त्याचे शिष्य आणि सामान्य लोक यांनी दावीदाच्या ऐतिहासिकतेची ग्वाही दिली. (मत्तय १:१; १२:३; २१:९; लूक १:३२; प्रेषितांची कृत्ये: २:२९) पुरातत्त्वीय शोध स्पष्टपणे या गोष्टीशी सहमत आहेत, की तो आणि त्याचा राजवंश, ‘दावीदाचे घराणे,’ एक सत्य आहे, हे कोणत्याही प्रकारचे कल्पित नाही.
[३१ पानांवरील चित्रं]
गालीलाच्या उत्तरेकडील, डॅनच्या बायबल शहरात १९९३ मध्ये सापडलेला तेल डानचा एक भागb
[तळटीपा]
a इस्राएल एक्सप्लोरेशन जर्नल यातील एका छायाचित्रावर आधारित रेखाचित्र.
b वॉच टावर संस्थेच्या साहित्याचे वाचक मशं स्टेलाविषयी जाणून आहेत. (पाहा जुलै १, १९९१, चे टेहळणी बुरूज पृष्ठे २६-२७.) तिला पॅरीसमधील लुव्र संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.