वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 १०/१५ पृ. ३२
  • “यहोवाने माझ्या प्रार्थनांचं उत्तर दिलं!”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “यहोवाने माझ्या प्रार्थनांचं उत्तर दिलं!”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 १०/१५ पृ. ३२

“यहोवाने माझ्या प्रार्थनांचं उत्तर दिलं!”

अखिल विश्‍वात यहोवाचे साक्षीदार, देव आणि मानवजातीबद्दल असणाऱ्‍या त्याच्या विलक्षण उद्देशाविषयीचे अचूक ज्ञान प्राप्त करण्याची आवड असलेल्या लोकांसोबत सुमारे ५० लाख गृह बायबल अभ्यास संचालित करत आहेत. यहोवाच्या साक्षीदारांतील मुलांचा देखील या कार्यात भाग आहे. जोएल नामक एका मुलाचेच उदाहरण घ्या. त्याने यहोवास आपल्या समर्पणाचे द्योतक म्हणून वयाच्या नवव्या वर्षी बाप्तिस्मा घेतला. एका वर्षानंतर त्याला हा अनुभव आला:

“सेवेमध्ये मी कॅन्डी नावाच्या एक स्त्रीला भेटलो. मी तिला ‘पहा! मी सर्व नवे करितो’ हे माहितीपत्रक सादर केलं. तिच्याकडे ते आधीच होतं, म्हणून मी तिला तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल पुस्तक सादर केलं. हेही पुस्तक तिच्याकडे आधीच होतं. मग मी विचार केला, की ‘मी तिला बायबल अभ्यास सादर करेन.’ तिने तो स्वीकारला!

“कर्करोगामुळे मरणास टेकलेली कॅन्डीची बहीण तिच्याबरोबर राहायला आली. शिवाय, कॅन्डी परिचारिकेचे प्रशिक्षण घेत होती. म्हणून काही काळाकरता बायबल अभ्यास अर्ध्यातच थांबला. पण माझे आईबाबा आणि मी, तिला किंवा तिचा पती, डीक याला नियतकालिके देऊन तिच्याशी संपर्क ठेवत होतो. तिच्या पतीने आम्हाला सांगितलं की ती नियतकालिके तिच्या उशीजवळ ठेवून रात्रीच्या वेळी वाचत असे.

“काही समयानंतर, कॅन्डीच्या बहिणीचा मृत्यू झाला. आईबाबा आणि मी कॅन्डीबरोबर मृतांच्या स्थितीविषयी बोललो. बायबल अभ्यास पुन्हा एकदा चालू करण्याचा तिने निर्णय घेतला. एका दुसऱ्‍या दिवशी आम्ही डीकला विचारले, की तोही कॅन्डीसोबत अभ्यास करू शकेल का जेणेकरून हा कौटुंबिक अभ्यास होऊ शकेल. त्याला ही कल्पना आवडली. म्हणून आता, माझ्या बाबांबरोबर मी डीक आणि कॅन्डीसोबत अभ्यास करत आहे. ते दोघेही प्रगतीपथावर आहेत व बायबल अभ्यासाबद्दल गुणग्राहकता व्यक्‍त करतात.

“मी, मला एखादा बायबल अभ्यास मिळावा म्हणून यहोवाला प्रार्थना करीत होतो आणि यहोवाने माझ्या प्रार्थनांचं उत्तर दिलं!”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा