वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ५/१५ पृ. २९-३१
  • तुम्ही एक संतुलित पायनियर आहात का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही एक संतुलित पायनियर आहात का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आध्यात्मिकरित्या दृढ राहा!
  • कौटुंबिक जबाबदाऱ्‍यांमध्ये संतुलन राखणे
  • आर्थिक संतुलन
  • संतुलित असणारे पायनियर खरोखर एक आशीर्वाद
  • पायनियर सेवेचे वरदान
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • पायनियरांना आधार देणे
    आमची राज्य सेवा—१९९२
  • पायनियरिंगमुळे देवासोबतचा आपला नातेसंबंध मजबूत होतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • पायनियर सेवा—तुम्हाला ती जमेल का?
    आमची राज्य सेवा—१९९८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ५/१५ पृ. २९-३१

तुम्ही एक संतुलित पायनियर आहात का?

एक पिता, आपली चिमुकली मुलगी तिची पहिली पावले अडखळत अडखळत टाकते तेव्हा तिला सावरण्यासाठी आपले बाहू पसरून उभा असतो तेव्हा त्याच्या डोळ्यांत आनंद झळकत असतो. ती अचानक कोलमडून पडते तेव्हा पुनः प्रयत्न करण्यास तो तिला उत्तेजन देतो. लवकरच ती आपला तोल सावरेल व तिला ताकदही मिळेल हे तो जाणून असतो.

अशाचप्रकारे, एका नवीन पायनियर सेवकास एक यशस्वी पूर्ण-वेळेचा राज्य उद्‌घोषक होण्याकरता आवश्‍यक असणारे संतुलन राखण्यापूर्वी, त्याला अथवा तिला वेळ आणि उत्तेजनाची गरज असेल. अनेक पायनियर दशकानुदशके आनंदाने सेवा करत आहेत. थोडके असे आहेत जे, त्यांच्या परिस्थितींत अनपेक्षित बदल घडल्यामुळे आपला तोल गमावतात. काही जण तर आपला आनंदही गमावून बसतात. एका देशात, पायनियरींग करण्यास सुरवात करणाऱ्‍यांपैकी २० टक्के जण त्यांच्या पूर्ण-वेळेच्या सेवेच्या पहिल्या दोन वर्षांतच ती थांबवतात. एका पायनियरला या सर्वात आनंदी सेवेतून आपले अंग काढून घेण्यास कोणती गोष्ट कारणीभूत ठरू शकेल बरे? ही पिछेहाट टाळण्याकरता काही करता येण्याजोगे आहे का?

कदाचित, काहींना पूर्ण-वेळेची सेवा सोडण्यास निकृष्ट आरोग्य, आर्थिक गरजा आणि कौटुंबिक जबाबदाऱ्‍या कारणीभूत ठरतील तरी इतरांना नानाविध ख्रिस्ती कर्तव्यांमध्ये योग्य संतुलन राखण्यात अपयशी ठरणे हे एक अडखळण आहे. संतुलनाचा अर्थ, “एक अशी स्थिती ज्यात कोणत्याही एका भागाचे, अवयवाचे, घटकाचे किंवा प्रभावाचे प्रमाण दुसऱ्‍यापेक्षा अधिक नसते किंवा इतरांपेक्षा प्रमाणहीन देखील नसते,” असा होतो.

येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना, प्रचाराचे व शिष्य बनविण्याचे कार्य कसे करायचे होते हे दाखवून दिले. त्याच्या स्वतःच्या सेवेद्वारे त्याने संतुलन कशाप्रकारे राखले जावे हे देखील स्पष्ट केले. “पुदिना, बडीशेप, व जिरे ह्‍यांचा दशांश तुम्ही देता, आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्‍वास ह्‍या तुम्ही सोडल्या आहेत; ह्‍या करावयाच्या होत्या, तरी त्या सोडावयाला पाहिजेत असे नाही,” असे म्हणून येशूने यहुदी धर्म पुढाऱ्‍यांमध्ये संतुलनाची उणीव असल्याचे दर्शविले.—मत्तय २३:२३.

हे तत्त्व खासकरून पायनियर सेवेला आज तितक्याच चांगल्याप्रकारे लागू होते. पायनियरींगसाठी पूर्णपणे तयारी न करता किंवा त्यात ज्या काही गोष्टी गोवल्या आहेत त्याबद्दलचा विचार न करता काहींनी उत्साह आणि चांगल्या हेतूने प्रवृत्त होऊन पायनियरींग हाती घेतली आहे. (लूक १४:२७, २८) इतरजण क्षेत्र सेवेमध्येच इतके गढून गेले आहेत, की ख्रिस्ती विश्‍वासाच्या अन्य महत्त्वपूर्ण पैलूंकडे त्यांनी कानाडोळा केला आहे. हे लोक संतुलन साधून तो कसा टिकवून ठेवू शकतात?

आध्यात्मिकरित्या दृढ राहा!

येशूने त्याच्या आध्यात्मिकतेकडे कदापि दुर्लक्ष केले नाही. त्याचे ऐकण्यासाठी व बरे होण्याकरता त्याकडे येणाऱ्‍या जनसमूहाने त्याच्या वेळेची असामान्य मागणी केली असली तरी चिंतनशील प्रार्थना करण्याकरिता त्याने वेळ काढला. (मार्क १:३५; लूक ६:१२) आज संतुलितपणे पायनियरींग करण्यासाठी, आध्यात्मिकरित्या दृढ राहण्याकरिता सर्व प्रकारच्या तरतुदींचा पुरेपूर फायदा घेण्याची देखील एखाद्याकडून मागणी केली जाते. पौलाने अशाप्रकारे युक्‍तिवाद केला: “तर मग दुसऱ्‍याला शिकविणारा तू स्वतःलाच शिकवीत नाहीस काय?” (रोमकर २:२१) आपला संपूर्ण वेळ इतरांना प्रचार करण्यात घालवून, व्यक्‍तिगत अभ्यास आणि प्रार्थना करण्याकरता पुरेसा वेळ देण्यात हयगय करणे खरोखर चुकीचे असेल.

कुमीकॉ ही दोन दशकांपासून एक पायनियर राहिली आहे. तिला तीन मुले व सत्य न मानणारा पती असूनही, रात्री झोपण्याआधी बायबलचे वाचन व त्याचा अभ्यास करणे उत्तम वेळ आहे, हे तिला अनुभवाद्वारे समजले. अभ्यास करताना ती मुख्यतः त्या मुद्द्‌यांची टिपणी करत असते ज्यांचा ती क्षेत्र सेवेमध्ये वापर करू शकते व ज्यांमुळे आपली दैनिक सेवा आल्हाददायक व मनोरंजक बनवू शकेल. इतर यशस्वी पायनियर, कुटुंबातील इतर सदस्यांच्या आधी जागे होऊन व प्रातःकाळच्या निवांत समयी आध्यात्मिक तजेल्याचा आनंद लुटत असतात. सभांची तयारी करण्याकरिता व अगदी अलीकडील ख्रिस्ती प्रकाशने वाचण्याकरिता तुम्ही कदाचित इतर उचित समय राखला असेल. सेवेतील आनंद टिकवून ठेवण्याची तुमची इच्छा असल्यास व्यक्‍तिगत अभ्यासाची बाब ही घाईघाईने किंवा ज्याची उपेक्षा केली जाऊ शकते अशी एखादी गोष्ट नाही.

कौटुंबिक जबाबदाऱ्‍यांमध्ये संतुलन राखणे

पायनियरींग करणाऱ्‍या पालकांनी हे देखील लक्षात ठेवले पाहिजे, की त्यांच्याकरिता असलेल्या ‘यहोवाच्या इच्छेचा’ अधिकांश भाग, स्वतःच्या कुटुंबाच्या शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक गरजांची काळजी घेणे हा आहे. (इफिसकर ५:१७; ६:१-४; १ तीमथ्य ५:८) काही वेळा तर सत्य मानणाऱ्‍या वैवाहिक सोबत्याला किंवा कौटुंबिक सदस्यांनाही त्यांच्या पत्नीने किंवा आईने, एकदा जर पायनियरींग सुरू केली तर त्यामुळे त्यांच्याकडून त्यांना पुरेसे सांत्वन किंवा आधार मिळणार नाही अशी भीती वाटते. अशा भावनांमुळे पायनियर बनण्याच्या इच्छेला ती इतका उत्साही प्रतिसाद देणार नाही. तथापि, उत्तम योजना व दूरदृष्टी यांमुळे संतुलन राखले जाऊ शकतो.

बहुविध पायनियर कौटुंबिक सदस्य बाहेर गेल्यावर आपले प्रचारकार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. आधी उल्लेख केलेली कुमीकॉ तिच्या कुटुंबाबरोबर न्याहारी करते व सकाळी तिचा पती व तिची मुले बाहेर जातात तेव्हा त्यांना निरोप देते व ते परत येण्याआधी घरी येते. सोमवारच्या दिवशी ती जेवणाचे अनेक पदार्थ आधीच तयार करून ठेवते ज्यामुळे स्वयंपाक घरातच व्यस्त असण्यापेक्षा निश्‍चिंत राहून ती आपल्या कुटुंबासोबत भोजन करू शकते. एका वेळी एकापेक्षा अधिक घरगुती काम करणे, जसे की स्वयंपाकासोबत इतर घरकाम केल्यामुळेही मदत होते. अशाप्रकारे, कुमीकॉला तिच्या मुलांच्या मित्रांना आमंत्रित करून त्यांच्यासाठी खास कार्यक्रम योजण्यासाठीही वेळ मिळतो.

मुले किशोर वयात पदार्पण करतात तेव्हा नवनवीन भावना, आकांक्षा, शंका आणि भीतीने ती भारावून जात असल्यामुळे अशा गोष्टींविरुद्ध यशस्वीरित्या लढा देण्याकरिता बहुतेक वेळा त्यांना त्यांच्या पालकांच्या अवधानाची आवश्‍यकता भासते. याकरता, पायनियर असलेल्या पालकास जागरूक असण्याची व आपल्या आराखड्यात तडजोड करण्याची गरज आहे. तीन मुलांची आई असणाऱ्‍या हिसाको नामक पायनियरचा विचार करा. जगिक शाळकरी सोबत्यांच्या ओढीमुळे तिच्या थोरल्या मुलीमध्ये, ख्रिस्ती सभा आणि क्षेत्र सेवेचा आनंद व उत्साह गमावत असल्याचे चिन्ह दिसू लागले तेव्हा तिने काय केले बरे? सत्य आपलेसे करणे व जगापासून अलिप्तता हाच एक सर्वोत्तम मार्ग असल्याची पूर्णपणे खात्री पटणे, यांची तिच्या मुलीला खरोखर गरज होती.—याकोब ४:४.

हिसाको पुढे असे निवेदन करते: “मी दररोज तिच्याबरोबर अनंतकाल जगू शकाल या पुस्तकातील मूलभूत तत्त्वप्रणालींचा अभ्यास पुन्हा करण्याचे ठरवले. अभ्यासाची वेळ झाली की माझी मुलगी तीव्र पोटदुखी आणि डोकेदुखीबद्दल नेहमी तक्रार करत असल्यामुळे सुरवातीला आम्ही काही मिनिटेच अभ्यास करू शकलो. परंतु, मी मात्र नियमितपणे अभ्यास संचलित केला. काही महिन्यांनंतर तिच्या प्रवृत्तीत खूपच सुधारणा होऊन थोड्याच कालावधीत समर्पण आणि बाप्तिस्म्याप्रत मार्गाक्रमण करण्यास ती सुधारणा कारणीभूत झाली.” सध्या हिसाको तिच्या मुलीबरोबर पूर्ण-वेळेच्या सेवेचा आनंद घेत आहे.

पायनियरींग करणाऱ्‍या वडिलांनी देखील दक्षता बाळगावी की क्षेत्रातील आस्थेवाईक जणांमध्ये व मंडळीतील त्यांची कर्तव्ये हाताळण्यामध्ये त्यांनी इतकेपण गढून जाऊ नये जेणेकरून त्यांच्या वाढत्या मुलांना द्यावयाचा बळकट भावनात्मक आधार व मार्गदर्शन देण्यात ते अपयशी ठरतील. पुरुषाने आपल्या पत्नीवर सोपवावी अशी ही बाब नाही. दीर्घ काळापासून पायनियरींग करत असलेले एक व्यग्र ख्रिस्ती वडील जे लहानसा व्यवसाय चालवतात ते आपल्या चार मुलांबरोबर वैयक्‍तिकरित्या अभ्यास करण्यासाठी वेळ काढतात. (इफिसकर ६:४) याबरोबरच ते आपल्या कुटुंबासह साप्ताहिक सभांची तयारी करतात. संतुलित पायनियर आपल्या कुटुंबाच्या भौतिक व आध्यात्मिक गोष्टींकडे दुर्लक्ष करत नाहीत.

आर्थिक संतुलन

पायनियरांनी संतुलन राखावे असे आणखी एक क्षेत्र म्हणजे दैनिक गरजांबाबत योग्य दृष्टिकोन बाळगणे. येशूच्या उत्तम उदाहरणावरून व सल्ल्यावरून आपण या बाबतीतही पुष्कळ काही शिकू शकतो. भौतिक गोष्टींबाबत अवाजवी चिंता करण्याविरुद्ध त्याने इशारा दिला. याऐवजी त्याने त्याच्या शिष्यांना, राज्याला प्रथमस्थान देण्यास प्रोत्साहन दिले व देव बाकीच्या सृष्टीची काळजी घेतो त्याप्रमाणे त्यांचीही काळजी घेईल असे अभिवचन त्याने दिले. (मत्तय ६:२५-३४) ह्‍या उत्तम सल्ल्याचे पालन केल्याने अनेक पायनियरांना पुष्कळ वर्षांपर्यंत पूर्ण-वेळेच्या सेवेत टिकून राहणे शक्य झाले व “रोजची भाकर” मिळविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यहोवाने आशीर्वादित केले.—मत्तय ६:११.

‘आपला समजूतदारपणा सर्व माणसांस कळावा’ असा सल्ला प्रेषित पेत्राने सहख्रिश्‍चनांना दिला. (फिलिप्पैकर ४:५) खरोखर, समजूतदार असण्यासाठी, आरोग्याची योग्य निगा घेण्याची देखील गरज आहे. इतर जण आपल्या वर्तनाचे निरीक्षण करतात हे माहीत असल्यामुळे संतुलित पायनियर त्यांच्या जीवनक्रमणात व भौतिक गोष्टींबद्दल त्यांच्या प्रवृत्तीत समजूतदारपणा प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतात.—पडताळा १ करिंथकर ४:९.

पायनियर सेवा अंगीकारणाऱ्‍या युवकांनी आपल्या पालकांच्या औदार्याचा अवाजवी फायदा घेण्यापासून जपावे. ते आपल्या पालकांसोबत घरी राहात असल्यास घरकामात भाग घेऊन किंवा ज्यामुळे घर चालवण्यास त्यांना हातभार लावता येईल अशी अर्ध-वेळेची नौकरी करून ते योग्य संतुलन राखू शकतात व गुणग्राहकता प्रदर्शित करू शकतात.—२ थेस्सलनीकाकर ३:१०.

संतुलित असणारे पायनियर खरोखर एक आशीर्वाद

तुम्ही कदाचित योग्य संतुलन राखण्याकरता पराकाष्टा करणारे पायनियर असाल. तर मग, आत्मविश्‍वास बाळगा. एका लहान बालकास आपला तोल सावरायला व चालण्यास शिकायला वेळ लागतो त्याचप्रमाणे पुष्कळ प्रौढ पायनियरांना आपली सर्व कर्तव्ये सांभाळण्यामध्ये समतोल साधण्याकरता वेळ लागला असे ते म्हणतात.

पायनियर ज्या अनेक क्षेत्रांत संतुलन राखण्यासाठी धडपड करत असतात त्यांपैकीची काही क्षेत्रे म्हणजे, व्यक्‍तिगत अभ्यास, कौटुंबिक सदस्यांची काळजी घेणे आणि त्यांच्या भौतिक गरजा तृप्त करणे ही होय. पुष्कळ पायनियर त्यांच्या जबाबदाऱ्‍या उल्लेखनीयरित्या पूर्ण करत असल्याचे अहवाल दाखवतो. ते खरोखर समाजासाठी आशीर्वाद आणि यहोवा व त्याच्या संघटनेसाठी भूषणावह आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा