वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 १/१५ पृ. २०-२३
  • सांत्वन व प्रोत्साहन पैलूदार रत्ने

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सांत्वन व प्रोत्साहन पैलूदार रत्ने
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देवासोबत वैयक्‍तिक नातेसंबंधाकरवी
  • देवाच्या वचनाच्या वैयक्‍तिक अभ्यासाकरवी
  • मंडळीकरवी
  • ‘विश्‍वासू व बुद्धीमान दासांकरवी’
  • ‘सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • सांत्वन देणाऱ्‍या देवाकडून शिका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • दुःखी जनांना सांत्वन द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • देव आपलं सांत्वन कसं करतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 १/१५ पृ. २०-२३

सांत्वन व प्रोत्साहन पैलूदार रत्ने

आपल्यातील अनेकांना अत्यंत दरिद्री असल्यासारखे वाटण्याचा अनुभव आला असावा. हा दरिद्रीपणा नेहमीच खालावलेल्या आर्थिक स्थितीमुळे नव्हे तर कदाचित खालावलेल्या मनस्थितीमुळे असावा. आपण उद्विग्न, कदाचित अतिशय खिन्‍न देखील होतो. तरीसुद्धा, अशा वेळेस आमच्यासाठी खूप चांगले ठरणारे असे काहीतरी मोलवान असले असावे. ते “रत्न” म्हणजे प्रोत्साहन होय.

बायबलमध्ये “प्रोत्साहन देणे” व “सांत्वन देणे” यांसाठी समान ग्रीक शब्द वापरलेला आहे. दोन्ही शब्द धैर्य, शक्‍ती किंवा उमेद देण्याचा अर्थ ध्वनित करतात. तर मग स्पष्टपणे, जेव्हा आम्हास दुर्बल किंवा खचल्यासारखे वाटते तेव्हा आम्हाला सांत्वन व प्रोत्साहन यांचीच नेमकी गरज असते. ते कोठे मिळू शकतात?

बायबल आम्हास आश्‍वासन देते की यहोवा “सर्व सांत्वनदाता देव” आहे. (२ करिंथकर १:३) “तो आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही” असेही ते आपल्याला सांगते. (प्रेषितांची कृत्ये १७:२७) म्हणजेच, सांत्वन व प्रोत्साहन उपलब्ध आहेत. यहोवा ज्यांकरवी प्रोत्साहन देऊ करतो असे चार सर्वसामान्य क्षेत्र विचारात घेऊ या.

देवासोबत वैयक्‍तिक नातेसंबंधाकरवी

सांत्वनाचा सर्वोत्कृष्ट उगम म्हणजे यहोवा देवासोबत एक वैयक्‍तिक नातेसंबंध होय. असा नातेसंबंध असणे देखील शक्य आहे, हेच केवढे प्रोत्साहक आहे. असा कोणता जगीक अधिकारी आहे जो आपले दूरध्वनी संदेश स्वीकारील किंवा आपल्या समस्यांबद्दल वैयक्‍तिक आस्था दाखवील? यहोवा अशा मानवांपेक्षा असीमपणे अधिक शक्‍तिशाली आहे. तरीसुद्धा तो नम्र आहे—तुच्छ, अपरिपूर्ण मानवांसोबत व्यवहार करण्यास अतिशय आस्थेवाईक आहे. (स्तोत्र १८:३५) यहोवाने आपल्याप्रती प्रेम व्यक्‍त करण्यात पुढाकार सुद्धा घेतला आहे. पहिले योहान ४:१० म्हणते: “प्रीति म्हणावी तर हीच; आपण देवावर प्रीति केली असे नाही, तर त्याने तुम्हाआम्हावर प्रीति केली आणि तुमच्याआमच्या पापांचे प्रायश्‍चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठविले.” एवढेच नव्हे, तर यहोवा आम्हाला प्रेमळपणे त्याच्या पुत्राकडे आकर्षितो.—योहान ६:४४.

तुम्ही यास प्रतिसाद देऊन देवासोबतच्या मैत्रीत सांत्वन मिळविण्याचा प्रयत्न केला आहे का? (पडताळा याकोब २:२३.) उदाहरणार्थ, तुम्हाला एखादा प्रिय, जिवाभावाचा मित्र असल्यास, त्याच्यासोबत तुमच्या चिंता व काळजा, तुमच्या आशा व तुमचा आनंद यांविषयी बोलत काही वेळ एकांतात घालवणे केवढे सुखावणारे असते, नाही का? यहोवा, त्याच्यासोबतही हेच करण्याचे तुम्हास आमंत्रण देतो. प्रार्थनेत तुम्ही किती वेळ त्याच्याशी बोलावे याविषयी तो कोणतेही बंधन घालत नाही—व तो खरोखर ऐकतो. (स्तोत्र ६५:२; १ थेस्सलनीकाकर ५:१७) येशूने नियमितपणे व कळकळीने प्रार्थना केल्या. वास्तविक पाहता, त्याचे १२ प्रेषित निवडण्याआधी, त्याने एक संपूर्ण रात्र प्रार्थनेमध्ये व्यतीत केली.—लूक ६:१२-१६; इब्रीयांस ५:७.

वेळोवेळी, आपल्यापैकी प्रत्येक जण यहोवासोबत एकांतात काही वेळ घालवू शकतो. केवळ खिडकीपाशी शांतपणे बसणे किंवा निवांतपणे फिरायला जाणे हे सुद्धा यहोवाजवळ प्रार्थनेत आपले मन मोकळे करण्यासाठी एक चांगली संधी ठरेल. असे केल्यामुळे प्रचंड दिलासा व सांत्वन प्राप्त होऊ शकेल. मनन करताना, यहोवाच्या एखाद्या सृष्टीकडे पाहिल्यास—मग ते केवळ आकाश असो, काही वृक्ष किंवा पक्षी असोत—त्यात आम्हाला यहोवाचे प्रेम व आम्हाबद्दल असलेल्या काळजीची आठवण करून देणारे काहीतरी सांत्वनदायक गवसेल.—रोमकर १:२०.

देवाच्या वचनाच्या वैयक्‍तिक अभ्यासाकरवी

तथापि, यहोवाचे गुण आम्हासमोर बायबलच्या वैयक्‍तिक अभ्यासाद्वारेच खऱ्‍या अर्थाने उलगडतात. यहोवा, “दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर” असल्याचे बायबल वारंवार दाखवते. (निर्गम ३४:६; नहेम्या ९:१७; स्तोत्र ८६:१५) यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वात, त्याच्या पार्थिव सेवकांना सांत्वन देण्याची इच्छा स्वाभाविकपणे गोवलेली आहे.

याचे उदाहरण म्हणून, यशया ६६:१३ या वचनातील यहोवाच्या शब्दांवर विचार करा: “जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करिते तसे मी तुमचे सांत्वन करीन.” यहोवाने, आईचे तिच्या मुलांबद्दल असलेले प्रेम, स्वार्थ-त्यागी व एकनिष्ठ असावे अशाप्रकारे निर्माण केले. तुम्ही एखाद्या मायाळू प्रेमळ आईला तिच्या दुखापत झालेल्या बाळाला सांत्वन देताना पाहिले असल्यास, यहोवा त्याच्या लोकांना सांत्वना देईल असे तो कोणत्या अर्थाने म्हणतो हे तुम्हास ठाऊक आहे.

अनेक बायबल वृत्तान्त, अशा प्रकारचे सांत्वन कृतीत आलेले दाखवतात. संदेष्टा एलीयास दुष्ट ईजबेल राणीने मृत्यूची धमकी दिली असता, त्याचे धैर्य नाहीसे झाले व तो जीव मुठीत घेऊन पळाला. तो एवढा उद्विग्न होता की रानात एका दिवसाची मजल तो चालून गेला व त्याने पाणी किंवा शिदोरीसुद्धा सोबत घेतलेली नव्हती असे दिसते. व्याकूळ होऊन एलीयाने त्याला मृत्यू यावा असे यहोवाला सांगितले. (१ राजे १९:१-४) यहोवाने त्याच्या संदेष्ट्यास सांत्वन व प्रोत्साहन देण्यासाठी काय केले?

एकाकी, कवडीमोल व घाबरल्यासारखे वाटण्याबद्दल यहोवाने एलीयास खडसावले नाही. त्याउलट, संदेष्ट्याने “शांत, मंद वाणी” ऐकली. (१ राजे १९:१२) तुम्ही १ राजे अध्याय १९ वाचल्यास, यहोवाने कशाप्रकारे एलीयास सांत्वन दिले, त्याचे दुःख कमी केले व त्याचा विश्‍वास बळकट केला हे तुम्हास दिसून येईल. हे सांत्वन केवळ वरकरणी नव्हते. ते थेट एलीयाच्या दुःखित हृदयापर्यंत पोहंचले व त्यामुळे या संदेष्ट्यास चालत राहण्याचे प्रोत्साहन मिळाले. (पडताळा यशया ४०:१, २.) लवकरच तो पुन्हा कामाला लागला.

येशू ख्रिस्तसुद्धा त्याच्या निष्ठावान अनुयायांना अशाच प्रकारे सांत्वन व प्रोत्साहन देतो. वास्तविक पाहता, यशयाने मशीहाविषयी असे भाकीत केले: ‘यहोवाने भग्न हृदयी जनांस पट्टी बांधावी, शोकग्रस्तांचे सांत्वन करावे म्हणून मला पाठविले आहे.’ (यशया ६१:१-३) येशूने त्याच्या जीवनकाळात, हे शब्द त्याला लागू होतात याबद्दल कोणतीही शंका ठेवली नाही. (लूक ४:१७-२१) तुम्हाला सांत्वनाची गरज भासल्यास, दुखावलेल्या व गरजू लोकांसोबत येशूच्या कोमल, प्रेमळ वागणुकीविषयी मनन करा. खरोखर, बायबलचा काळजीपूर्वक अभ्यास, सांत्वन व प्रोत्साहनाचा उत्तम उगम आहे.

मंडळीकरवी

ख्रिस्ती मंडळीत सांत्वन व प्रोत्साहनाच्या रत्नांचे अनेक पैलू चकाकतात. प्रेषित पौल असे लिहिण्यास प्रेरित झाला: “तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा व एकमेकांची उन्‍नती करा.” (१ थेस्सलनीकाकर ५:११) मंडळीच्या सभांमध्ये सांत्वन व प्रोत्साहन कसे मिळू शकेल?

अर्थात, आपण ख्रिस्ती सभांना, प्रामुख्याने “देवाने [यहोवा] शिकविलेले असे” होण्यासाठी व त्याच्याबद्दल तसेच त्याच्या मार्गांबद्दल शिक्षण प्राप्त करण्यासाठी उपस्थित होत असतो. (योहान ६:४५) हे शिक्षण प्रोत्साहन व सांत्वन देण्यासाठी असते. प्रेषितांची कृत्ये १५:३२, या वचनात आपण वाचतो: ‘यहूदा व सीला . . . यांनी पुष्कळ बोलून बंधुजनांना बोध केला व स्थिरावले.’

उद्विग्न असताना एखाद्या ख्रिस्ती सभेला जाण्याचा व घरी परतल्यावर पूर्वीपेक्षा पुष्कळ बरे वाटण्याचा तुम्हाला कधी अनुभव आला आहे का? कदाचित एखाद्या भाषणात, विवेचनात किंवा प्रार्थनेत म्हटलेले काहीतरी तुमच्या अंतःकरणास भिडले असेल व त्याने, तुम्हाला हवे असलेले सांत्वन व प्रोत्साहन पुरविले असेल. यास्तव, ख्रिस्ती सभांपासून अलिप्त राहू नका.—इब्रीयांस १०:२४, २५.

सेवेत व इतर प्रसंगी आपल्या बंधू व भगिनींसोबत सहवास राखल्याने देखील अशाच प्रकारचा परिणाम घडू शकतो. इब्री भाषेत “एकत्र बांधणे” या अर्थाच्या अनेक क्रियापदांचा “बळ” किंवा “बळकट करणे” यांसोबत संदर्भ जोडण्यात आला—बांधल्याने वस्तू बळकट होतात ही त्यामागची कल्पना आहे असे दिसते. हे तत्त्व मंडळीबद्दल खरे आहे. एकमेकांसोबत सहवास राखल्याने आम्हाला सांत्वन, प्रोत्साहन, होय, बळकटी देखील मिळते. तसेच आपण प्रीती, या सर्वाधिक बळकट बंधनात बांधले जातो.—कलस्सैकर ३:१४.

काही वेळेस आपल्या आध्यात्मिक बंधू किंवा भगिनींचा विश्‍वासूपणा आपल्याला प्रोत्साहित करतो. (१ थेस्सलनीकाकर ३:७, ८) तर काही वेळेस त्यांनी दाखविलेले प्रेम. (फिलेमोन ७) आणखी इतर वेळेस, दुसऱ्‍यांशी देवाच्या राज्याबद्दल बोलताना एकत्र मिळून, खांद्याला खांदा लावून काम करणे हेच आपल्याला प्रोत्साहित करते. सेवेच्या बाबतीत तुम्हाला दुर्बल किंवा प्रोत्साहनाची गरज असल्यासारखे वाटत असल्यास, एखाद्या वयस्कर किंवा अधिक अनुभवी राज्य प्रचारकासोबत काम करण्याच्या योजना का करू नयेत? असे केल्याने कदाचित तुम्हाला बरेच सांत्वन मिळू शकेल.—उपदेशक ४:९-१२; फिलिप्पैकर १:२७.

‘विश्‍वासू व बुद्धीमान दासांकरवी’

आपल्या उपासनेचे सांत्वनदायक पैलू कोणाद्वारे आयोजित करण्यात येतात? येशूने आध्यात्मिक भोजन “यथाकाळी खावयास” देण्यासाठी एक वर्ग नेमला ज्यास त्याने ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ ही पदवी बहाल केली. (मत्तय २४:४५) सा. यु. प्रथम शतकात, आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या या ख्रिश्‍चनांचा गट आधीपासूनच कार्यरत होता. जेरूसलेमेतील वडिलांच्या नियमन मंडळाने, मंडळ्यांना शिक्षण व मार्गदर्शनाची पत्रे पाठवली. कोणत्या परिणामासह? अशा एका पत्रास मंडळ्यांनी कशी प्रतिक्रिया दाखवली ते बायबल अहवाल आपल्याला दाखवतात: “त्यांतला बोध (प्रोत्साहन) वाचून त्यांना आनंद झाला.”—प्रेषितांची कृत्ये १५:२३-३१.

त्याचप्रकारे, या शेवटल्या कठीण दिवसांत, विश्‍वासू व बुद्धीमान दास यहोवाच्या लोकांसाठी मोठे सांत्वन व प्रोत्साहन देणारे आध्यात्मिक अन्‍न देत आहे. तुम्ही ते अन्‍न ग्रहण करता का? दास वर्ग संपूर्ण जगभरात उपलब्ध करून देत असलेल्या छापील साहित्यात हे अन्‍न सुलभ आहे. टेहळणी बुरूज व सावध राहा! ही नियतकालिके त्याचप्रमाणे वॉच टावर सोसायटी द्वारे प्रकाशित होणारी पुस्तके, माहितीपत्रके व हस्तपत्रिकांनी असंख्य वाचकांना सांत्वन दिले आहे.

एका प्रवासी पर्यवेक्षकांनी लिहिले: “आपल्या अधिकांश बंधू व भगिनींना चांगले ते करावेसे वाटते, पण ते पुष्कळदा निराशा, भय व आपण स्वतःची मदत करण्यास पूर्णपणे असमर्थ आहोत या भावनेसोबत संघर्ष करीत असतात. आपल्या नियतकालिकांतील लेख अनेकांना त्यांचे जीवन व भावना यांवर पुन्हा एकदा नियंत्रण मिळविण्यास मदत करीत आहेत. त्यासोबतच, हे लेख, वरवरचे प्रोत्साहन देण्यापेक्षा अधिक काही देण्यासाठी वडिलांची मदत देखील करतात.”

विश्‍वासू दास वर्ग देत असलेल्या साहित्याचा पुरेपूर उपयोग करा. कठीण काळ असतो तेव्हा समयोचित नियतकालिके, पुस्तके व इतर प्रकाशने, सांत्वन मिळविण्यास आपली मदत करू शकतात. दुसऱ्‍या बाजूला पाहता, खिन्‍न असलेल्या कोणाला प्रोत्साहन देण्याची तुम्हावर वेळ आली असल्यास, या नियतकालिकांतील शास्त्रवचनीय माहितीचा उपयोग करा. हे लेख, पुष्कळदा अनेक आठवडे किंवा महिने कठीण संशोधन, अभ्यास व प्रार्थना करून अत्यंत काळजीपूर्वक लिहिण्यात येतात. यांतील सल्ला बायबल-आधारित, परीक्षण केलेला व सत्य असतो. खचल्यासारखे वाटत असलेल्या व्यक्‍तीसोबत एकदोन योग्य लेख वाचणे काहींना फार लाभदायक असल्याचे दिसून आले आहे. यामुळे बरेच सांत्वन व प्रोत्साहन मिळू शकते.

तुम्हाला मोलवान रत्न गवसल्यास तुम्ही ते लपवून ठेवाल, की ही धनप्राप्ती औदार्याने इतरांसोबत वाटाल? मंडळीतील तुमच्या बंधू व भगिनींसाठी सांत्वन व प्रोत्साहनाचा उगम होण्याचे ध्येय ठेवा. तुम्ही खाली पाडण्याऐवजी वृद्धी केली, टीका करण्याऐवजी प्रशंसा केली, “तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण” करण्याऐवजी ‘सुशिक्षितांच्या जिव्हेने’ बोलला, तर इतरांच्या जीवनावर तुम्ही प्रभाव पाडू शकाल. (यशया ५०:४; नीतिसूत्रे १२:१८) खरोखर, लोक तुम्हाला सुद्धा रत्न—खरे सांत्वन व प्रोत्साहन यांचा उगम समजतील!

[२० पानांवरील चौकट]

गरजू लोकांसाठी सांत्वन

अनेक लोकांनी, टेहळणी बुरूज किंवा सावध राहा! यातील विशिष्ट लेखांमुळे त्यांचा यहोवासोबतचा नातेसंबंध कसा बळकट झाला आहे यावर विवेचन केले आहे. एका स्त्रीने असे म्हटले: “हा लेख वाचल्यावर मला असे वाटले, की यहोवा त्याच्या सर्व सामर्थ्य व वैभवात माझ्या अगदी जवळ आहे. तो म्हणजे एक खरोखरची व्यक्‍ती आहे असे मला जाणवले.” दुसऱ्‍या एका पत्रात म्हटले होते: “यहोवाकडे पाहण्याच्या आमच्या दृष्टिकोनासंबंधाने आमची अंतःकरणे व मने इतकी नाट्यमयरित्या बदलली आहेत की आम्ही पूर्वी होतो तसे राहिलो नाहीत. जणू आमच्या चष्म्याच्या काचा कोणीतरी स्वच्छ पुसल्या आहेत व आता आम्ही सर्वकाही अगदी स्पष्टपणे पाहू शकतो यासारखे ते आहे.”

काही जण, हे नियतकालिक त्यांना विशिष्ट समस्या किंवा आव्हानांना तोंड देण्यास कशी मदत करतात व त्याकरवी यहोवा त्यांच्यामध्ये वैयक्‍तिक आस्था ठेवतो याबद्दल त्यांना कशी खात्री पटते, ते लिहून कळवतात. एका वाचकाने अशा प्रकारे लिहिले: “यहोवा त्याच्या लोकांची किती काळजी घेतो व त्यांच्यावर किती प्रेम करतो हे पुन्हा एकदा आमच्या दृष्टीस आणल्याबद्दल आपले फार आभार मानते.” जपानमधील एक स्त्री जिचे मूल मरण पावले होते, तिने त्याविषयावर सावध राहा! यात प्रकाशित झालेल्या लेखांबद्दल असे म्हटले: “नियतकालिकाच्या पृष्ठांतून देवाची करूणा जणू ओसंडून वाहत होती व मी खूप रडले. हे लेख, मला कष्टी व एकाकी वाटते तेव्हा मी लगेच वाचू शकेन अशा ठिकाणी ठेवले आहेत.” आणखी एका शोकग्रस्त महिलेने लिहिले: “माझे दुःखाचे काळ सहन करण्यासाठी हवी असलेली शक्‍ती, टेहळणी बुरूज व सावध राहा! लेखांनी व “तुम्हास प्रिय असणाऱ्‍या कोणा व्यक्‍तीचा मृत्यू होतो तेव्हा” (इंग्रजी) या माहितीपत्रकाने दिली.”

पवित्र शास्त्रवचने सांत्वनाचे प्रमुख स्रोत आहेत. (रोमकर १५:४) टेहळणी बुरूज, तसेच त्याच्या जोडीचे नियतकालिक सावध राहा! हे सुद्धा अधिकार म्हणून बायबलशी जडून आहे. याच कारणास्तव, ही नियतकालिके त्यांच्या वाचकांसाठी सांत्वन व प्रोत्साहनाचे स्रोत ठरली आहेत.

[२३ पानांवरील चित्रं]

सर्व सांत्वनदाता देव, प्रार्थना ऐकणारा देखील आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा