वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 १/१५ पृ. ५-९
  • आनंदी स्तुतीकर्ते या नात्याने ते एकत्र आले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आनंदी स्तुतीकर्ते या नात्याने ते एकत्र आले
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ‘यहोवाची स्तुती करा . . . आनंदित असा!’
  • “स्तुतीचा यज्ञ . . . देवाला नित्य अर्पण करावा”
  • “तुम्ही सदा आनंदी व्हा व उल्लास पावा”
  • विश्‍वभर आनंदी स्तुतीकर्ते होण्याकरता वेगळे केलेले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • “आनंदी स्तुतीकर्ते” यहोवाच्या साक्षीदारांचे प्रांतीय अधिवेशन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • देवाच्या वचनानुसार आचरण करणारे आनंदी असतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • “आवेशी राज्य उद्‌घोषक” आनंदित मनाने एकत्र जमतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 १/१५ पृ. ५-९

आनंदी स्तुतीकर्ते या नात्याने ते एकत्र आले

यहोवा देवाचे प्राचीन लोक उपासनेसाठी एकत्र आले तेव्हा त्यांनी ‘केवळ अत्यानंद’ करावा ही आज्ञा त्यांना देण्यात आली होती. (अनुवाद १६:१५) सन १९९५/९६ च्या “आनंदी स्तुतीकर्ते” प्रांतीय अधिवेशनांनी नक्कीच यहोवाच्या साक्षीदारांना आनंदासाठी बळकट कारणे पुरवली आहेत.

अधिवेशनांच्या या शृंखलेस प्रारंभ झाल्यापासून त्यांचा विश्‍वास वाढला आहे. आनंदहीन जगात आनंद कसा मिळवावा हेही त्यांनी दाखवले आहे. आपण एका वेळी अधिवेशनाच्या एका दिवसाची चर्चा करू या.

‘यहोवाची स्तुती करा . . . आनंदित असा!’

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे वरील शीर्षक स्तोत्र १४९:१, २ वर आधारित होते. “आपल्याकडे आनंदाने जयघोष करण्याचे कारण आहे” या भाषणाने यशया ३५ व्या अध्यायातील भविष्यवाणीच्या अवलंबनाचे परीक्षण केले. प्राचीन इस्राएलमध्ये त्या भविष्यवाणीची पूर्णता झाली आणि खासकरून आपल्या दिवसांमध्ये, आध्यात्मिक परादीसमधील समृद्धता आणि स्वास्थ्य यात यहोवाच्या उपासकांचे पुनर्वसन करून, त्या भविष्यवाणीची पूर्णता झाली. अशा प्रकारे, अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्‍यांकडे, आध्यात्मिक परादीसमध्ये आणि जवळ येऊन ठेपलेल्या भौतिक परादीसमध्ये देवाने त्याच्या लोकांसाठी काय उद्देशिले आहे हे जाणून आनंद करण्याचे कारण होते.

“जगव्याप्त आनंदी स्तुतीकर्ते या नात्याने वेगळे केलेले” या मुख्य भाषणाने, ह्‍या जगापासून आपल्याला कोणती गोष्ट वेगळी ठेवते या प्रश्‍नाचे उत्तर दिले. ऐक्याने यहोवाची करत असलेली उपासना आपल्याला वेगळे ठेवते. यहोवाचे साक्षीदार या पृथ्वीवर कोठेही राहत असले तरी त्यांच्या बोलण्यात व शिकवण्यात एकवाक्यता असते. तसेच त्यांना यहोवाच्या पवित्र नामाचे पवित्रीकरण करण्यात आणि त्याच्या राज्याकरवी त्याच्या सार्वभौमत्वाला उंचावण्यात आनंद होतो. परंतु यहोवा त्याच्या उद्देशामध्ये आपल्यालाही एक स्थान मिळण्यास कशा प्रकारे मदत करतो? त्याने आपल्याला त्याच्या पवित्र वचनाचे सत्य दिले आहे. देवाने आपल्याला त्याचा पवित्र आत्मा दिला आहे. त्याने आपल्याला एक जगव्याप्त बंधुत्व व शुद्ध भक्‍तिची व्यवस्था, यांनी आशीर्वादित केले आहे. आपले आंतरराष्ट्रीय कुटुंब यहोवाची सेवा, आनंदाने भरलेल्या अंतःकरणाने करण्यास आपल्याला मदत करते.

“जगापासून अलिप्त आणि निष्कलंक राहणे” या भाषणाने पक्षपातीपणाचे आणि वर्गवारीपणाचे डाग टाळण्याच्या आवश्‍यकतेवर जोर दिला. (याकोब २:५-९) काही जण, गरीब किंवा अडचणीत असलेल्या सहख्रिश्‍चनांकडे दुर्लक्ष करून एकाच पार्श्‍वभूमीच्या किंवा एकच आर्थिक दर्जा असलेल्या लोकांबरोबर मिसळून राहतील. इतरांचा मंडळीमध्ये जबाबदार पदी असलेल्यांची कृपापसंती मिळवण्याकडे कल असेल. ते ही गोष्ट विसरून जातात, की सर्वात महान विशेषाधिकार जो कोणाला मिळू शकतो तो यहोवाचा एक साक्षीदार होणे हा आहे. यास्तव, आपण जगीक प्रवृत्तींचा डाग आपल्यावर लागण्यास तसेच मंडळीतील शांतीचा भंग करण्यास वाव देऊ नये.—२ पेत्र ३:१४.

पुष्कळजण उतावीळपणे विवाह करतात हे “मी विवाहाकरता तयार आहे का?” या भाषणात दाखवण्यात आले. काहीजण घरातील एखाद्या कठीण परिस्थितीमुळे किंवा त्यांचे सवंगडी विवाहबद्ध होत असल्यामुळे विवाह करतात. परंतु विवाह करण्याच्या सबळ कारणांमध्ये, ईश्‍वरशासित ध्येयांचा पाठलाग करण्याची परस्पर इच्छा, खरी प्रीती, साहचर्य आणि सुरक्षिततेची गरज व मुलांचे संगोपन करण्याची इच्छा यांचा समावेश होतो. विवाहाची तयारी करताना आध्यात्मिक प्रशिक्षण महत्त्वपूर्ण आहे. इतर गोष्टींपैकी, नवे मनुष्यत्व धारण करून स्पृहनीय गुण विकसित करण्याची गरज आहे. भावी सोबती यहोवासोबत असलेल्या नातेसंबंधाचा पुरावा सादर करतो व इतरांबरोबर आदराने व्यवहार करतो की नाही हे माहीत करून घेणे देखील सुज्ञतेचे ठरेल. प्रौढ ख्रिश्‍चनांकडून सल्ला मिळवणे देखील सुज्ञतेचे आहे.—नीतिसूत्रे ११:१४.

माहितीने ओतप्रोत भरलेल्या या चर्चेनंतर “स्वतःच्या मुलांबद्दल समाधानी असणारे पालक” असे शीर्षक असलेले आणखी एक भाषण झाले. मुलाचा जन्म झाल्यावर बहुधा आनंदी वातावरण असते. परंतु, मुलांचे संगोपन करण्यात मोठी जबाबदारी आहे. (स्तोत्र १२७:३) म्हणूनच, मुलांना यहोवावर प्रीती करण्यास शिकवणे महत्त्वाचे आहे. मुलांसोबत सतत यहोवाबद्दल बोलून व कुटुंबामध्ये त्याच्या वचनाच्या तत्त्वांना लागू करून पालक असे करू शकतात.

अधिवेशनाचा एक दिवस एका अजब गोष्टीने समाप्त झाला—यहोवाचे साक्षीदार आणि शिक्षण (इंग्रजी) हे नवे माहितीपत्रक प्रकाशित करण्यात आले. ते स्पष्टपणे सांगते, की साक्षीदारांनी “आपल्या युवकांना, शाळेमध्ये त्यांना दिलेल्या नियुक्‍त्‌या त्यांनी परिश्रमाने व गंभीरतेने कराव्यात असे उत्तेजन देतात.” हे प्रकाशन, यहोवाच्या साक्षीदारांनी नायजेरिया, मेक्सिको आणि इतर राष्ट्रांमध्ये अनेक वर्षांपर्यंत चालवलेल्या साक्षरतेच्या वर्गांच्या उल्लेखनीय परिणामांचे देखील स्पष्टीकरण देते. आपण शिक्षणाला पुष्कळ महत्त्व देतो हे शिक्षकांना समजावून सांगण्यास या माहितीपत्रकाने मदत केली पाहिजे.

“स्तुतीचा यज्ञ . . . देवाला नित्य अर्पण करावा”

दुसऱ्‍या दिवसाच्या आधीचा विषय इब्रीयांस १३:१५ वर आधारित होता. सकाळच्या कार्यक्रमात “यहोवाची स्तुती करा, या हाकेस उत्तर देणे” हा परिसंवाद सादर करण्यात आला. या हाकेला उत्तर देण्यास वयाची बाध्यता नाही. स्तोत्र १४८:१२, १३ यहोवाची स्तुती करण्यास तरुण पुरुषांना, कुमारिकांना, वृद्धांना आणि मुलांना आर्जवते. यहोवाचे अनेक आनंदी सेवक त्यांची स्तुती वाढवू शकले आहेत. जगभरात, ६,००,००० पेक्षा अधिक पूर्ण वेळेच्या कार्यात किंवा पायनियर सेवेत भाग घेत आहेत. १५,००० पेक्षा अधिक खास पायनियर कार्यात सामील आहेत आणि १५,००० पेक्षा अधिक लोक बेथेल सेवेत आहेत.

यहोवाच्या सेवकांसाठी निष्ठा महत्त्वपूर्ण आहे हे “यहोवाच्या संघटनेसह विश्‍वासूपणे सेवा करणे” या भाषणाने दाखवून दिले. यहोवाशी निष्ठावंत राहणे याचा अर्थ, भक्‍तिभावाने त्याच्याशी इतके दृढपणे जडून राहणे, की जणू काय ते एका शक्‍तिशाली डिंकाप्रमाणे कार्य करील. निष्ठावान होण्यासाठी, आपल्याला इतर पाहात असोत किंवा नसोत, तरी बायबल आज्ञांचा हेतुपुरस्सरपणे भंग करण्याचे टाळण्याची गरज आहे. त्यासाठी आपण, वॉच टावर संस्थेने पुरवलेल्या टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांमध्ये मिळणाऱ्‍या बायबल शिकवणींचे तसेच इतर आध्यात्मिक अन्‍नाचे समर्थन करण्याची देखील आवश्‍यकता आहे. या भाषणानंतर बाप्तिस्म्याचे भाषण देण्यात आले. बाप्तिस्मा घेणाऱ्‍या उमेदवारांनी यहोवाला त्यांनी केलेल्या समर्पणाचा पुरावा दिला तेव्हा सर्वत्र काय आनंद झाला!

होशेय ४:१-३ मधील शब्द “सद्‌गुण किंवा दुर्गुण—तुम्ही कशाचा पाठलाग करता?” या दुपारच्या भाषणाचा नमुना सादर करतात. सद्‌गुणाविषयी जगाच्या दृष्टिकोनाचा ऱ्‍हास झाला असला, तरी ख्रिश्‍चनांनी नैतिक श्रेष्ठत्वाचा पाठलाग करण्यासाठी “होता होईल तितका प्रयत्न” केला पाहिजे. (२ पेत्र १:५) एखादी व्यक्‍ती कशा प्रकारे विचार करते त्यापासून याची सुरवात होते. त्याचे विचार सद्‌गुणी असले, तर तो शुद्ध, हितकारक आणि उभारणीकारक शब्द बोलेल व इतरांसोबतच्या त्याच्या व्यवहारांमध्ये प्रामाणिक होण्यास झटेल. सद्‌गुणाचा पाठलाग करण्यामध्ये, क्लेश किंवा तणावाचा सामना करणाऱ्‍या सहख्रिश्‍चनाप्रती समजदारी व दया दाखवण्यास झटणे हेही समाविष्ट आहे.—१ थेस्सलनीकाकर ५:१४.

“दियाबलाच्या पाशांपासून दक्ष असा” या आणखी एका भाषणाने ख्रिश्‍चनांना दुरात्मिक प्रभावांची झळ लावून घेण्याविरुद्ध चेतावणी दिली. आजारावरील उपचाराच्या क्षेत्रामध्ये ख्रिश्‍चनांनी, जादूटोणाचा विशेष गुण असलेल्या हिप्नॉटिझमसारख्या [संमोहन विद्या] तंत्रांपासून सावध असले पाहिजे. अन्यथा, इतर व्यक्‍ती त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काय करतात ती त्यांची व्यक्‍तिगत बाब आहे.

दुसरा दिवस एका आनंदी आश्‍चर्याने समाप्त झाला—समर्पण आणि बाप्तिस्म्याप्रत जलद गतीने प्रगती करण्यासाठी प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना मदत करण्यास तयार केलेल्या लहान आकाराच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या १९२ पानी पुस्तकाचे शीर्षक सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान असे आहे. ज्ञान हे पुस्तक, उभारणीकारक मार्गाने सत्य सादर करते. ते अस्वीकृत खोट्या सिद्धांतांना सविस्तरपणे मांडत नाही. भाषेचा अस्खलितपणा आणि तर्कशुद्ध विकासामुळे बायबल अभ्यास चालवण्यास तसेच हृदयाला उबदार करणारे देवाचे ज्ञान समजण्यास लोकांना मदत करण्यासाठी सोपे गेले पाहिजे.

“तुम्ही सदा आनंदी व्हा व उल्लास पावा”

तिसऱ्‍या दिवसाचा विषय, यशया ६५:१८ मधील शब्दांवर आधारित होता. बायबल भविष्यवाणीची पूर्णता, हे दुष्ट व्यवस्थीकरण १९१४ मध्ये त्याच्या शेवटल्या दिवसांमध्ये प्रवेश केल्याचे दर्शवते. म्हणून, “या व्यवस्थीकरणाच्या शेवटच्या काळातील आनंदी स्तुतीकर्ते” या भाषणांच्या परिसंवादाने श्रोत्यांचे लक्ष पूर्णपणे वेधले. कोट्यावधी लोक लोभी आणि हिंसात्मक जगाने कसे प्रभावित झाले आहेत ते वक्‍त्‌यांनी दाखवून दिले. कालांतराने, सैतान ज्या जगाचा शासक आहे त्या जगाचा भाग या नात्याने त्यांचा न्याय करण्यात येईल. तेव्हा, निवड करण्याची हीच वेळ आहे. आपण कोणत्या बाजूने राहू इच्छितो? आपण यहोवाची उपासना व त्याचे सार्वभौमत्व उंचावून धरू इच्छितो, की सैतानाला आवडणाऱ्‍या गोष्टी करून त्याला आपला शासक होण्यास परवानगी देणार आहोत? आपण सर्वांनी निश्‍चितार्थाने यहोवाच्या बाजूने पावित्रा घेतला पाहिजे.

“सनातन राजाची स्तुती करा!” या अधिवेशनाच्या जाहीर भाषणाने उपस्थित असलेल्या सर्वांना विचारासाठी जड अन्‍न दिले. चिरकालाची कल्पना दुर्बल मानवांच्या कल्पनेपलीकडील आहे असे भासत असले, तरी यहोवा ती पूर्णपणे समजू शकतो. “परमेश्‍वर [यहोवा, NW] युगानुयुग राजा आहे,” असे स्तोत्रकर्त्याने गायिले. (स्तोत्र १०:१६) या युगानुयुगाच्या राजाने त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त याच्या द्वारे सर्व मानवजातीकरता चिरकालिक जीवनाचा मार्ग खुला केला आहे. (योहान १७:३) “होय, आपण पापी मानव ईश्‍वरी शिक्षण आणि येशूच्या खंडणी बलिदानावरील विश्‍वासाद्वारे सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकतो,” असे वक्‍त्‌याने म्हटले.

अधिवेशन जसजसे समाप्तीला आले तसे, “यहोवाची प्रतिदिन आनंदाने स्तुती करणे” असे शीर्षक असलेल्या शेवटल्या भाषणाने, उपस्थित असलेल्यांची उभारणी करण्यात आली. संपूर्ण पृथ्वीभरात शिष्य बनवण्याच्या कार्यात होत असलेल्या विकासाचे अहवाल प्राप्त करणे प्रोत्साहनदायक होते. शिवाय अधिवेशनाला उपस्थित असलेले ‘प्रतिदिवशी यहोवाचा धन्यवाद करण्यास आणि सदासर्वकाळ त्याच्या नावाचे स्तवन करण्यास’ प्रवृत्त झाले.—स्तोत्र १४५:२.

अमानुषपणाची अनिर्वचनीय कृत्ये, जगापासून आनंद हिरावून घेतात. तरीदेखील, यहोवावर पूर्ण भरवसा असलेले ईश्‍वरी आनंद बाळगू शकतात. यास्तव, जगव्याप्त बंधुत्व या नात्याने यहोवाचे साक्षीदार स्तोत्र ३५:२७, २८ मधील पुढील शब्दांना पुनः उच्चारतात: “माझ्या न्याय्य पक्षाला अनुकूल असणारे उत्साह व हर्ष पावोत; आपल्या सेवकाच्या कल्याणाने आनंद पावणाऱ्‍या परमेश्‍वराचे गौरव होवो, असे ते सतत म्हणोत. माझी जीभ तुझी न्यायपरायणता गुणगुणत राहील व तुझे स्तवन दिवसभर करील.”

[७ पानांवरील चित्रं]

यहोवाचे साक्षीदार आणि शिक्षण (इंग्रजी) या माहितीपत्रकातून कुटुंबे लाभ मिळवतील

[८ पानांवरील चित्रं]

“सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान” हे नवीन पुस्तक उभारणीकारक मार्गाने बायबलच्या सत्यांना सादर करते

[९ पानांवरील चित्रं]

यहोवाला त्यांनी केलेल्या समर्पणाचे द्योतक म्हणून पुष्कळांनी बाप्तिस्मा घेतला

[९ पानांवरील चित्रं]

“योग्य जनांचा त्यांच्या वृद्धावस्थेत आदर करणे” या नाटकाने अधिवेशनाला उपस्थित असलेल्यांवर सखोल प्रभाव पडला

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा