वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 १/१५ पृ. ३-४
  • आनंदहीन जगात आनंदी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आनंदहीन जगात आनंदी
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ‘चिखलातील खडक’
  • धीट सचोटी रक्षकांचा नात्सी छळातही विजय
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • उल्लसित अंतःकरणाने यहोवाची सेवा करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • यहोवाची सेवा आनंदाने करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • यहोवाविषयीचा आनंद आपला आश्रयदुर्ग आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 १/१५ पृ. ३-४

आनंदहीन जगात आनंदी

“अत्यंत वाईटरुपाने पाहिले, तर हे सैतानाचे शतक आहे,” या शब्दांनी जानेवारी २६, १९९५ च्या द न्यूयॉर्क टाईम्स मधील एका अग्रलेखाने सुरवात केली. “पूर्वीच्या कोणत्याही युगात, वंश, धर्म किंवा वर्ग या कारणांसाठी कोट्यावधी लोकांना ठार मारण्याची इतकी प्रवृत्ती आणि वासना लोकांनी प्रगट केली नव्हती.”

नात्सी संहारकेंद्रांमधील कारावास सहन करणाऱ्‍या निष्पाप लोकांच्या मुक्‍ततेच्या ५० व्या वर्षदिनाने अग्रलेखांना वरीलप्रमाणे लिहिण्यास प्रवृत्त केले. परंतु, त्याचप्रकारची रानटी हत्या आजही आफ्रिका आणि पूर्व युरोपच्या काही भागांमध्ये चालूच आहे.

पूर्वनियोजित कत्तल, जातीय शुद्धीकरण, जातीय हत्या—अशी कोणतीही नावे असली तरीही—या सर्वांमुळे अतिशय दुःख होते. तरीही, अशा हिंसाचारयुक्‍त अशांततेत आनंदाचे कणखर आवाज उठत आहे. उदाहरणार्थ, १९३० च्या दशकामधील जर्मनीकडे आपण पाहू या.

एप्रिल १९३५ पर्यंत, हिटलर आणि त्याच्या नात्सी पार्टीने यहोवाच्या साक्षीदारांना सर्व नागरी सेवा मिळण्यावर बंदी आणण्यात आली. साक्षीदारांनी ख्रिस्ती तटस्थता राखल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली, कारागृहात टाकण्यात आले आणि छळछावण्यांमध्ये पाठवण्यात आले. (योहान १७:१६) ऑगस्ट १९३६ च्या उत्तरार्धात, पुष्कळशा यहोवाच्या साक्षीदारांना अटक करण्यात आली. हजारोंना छळछावण्यांमध्ये पाठवण्यात आले व ते वाचले तर त्यांतील बहुतेकजण तेथेच १९४५ पर्यंत राहिले. परंतु साक्षीदारांना छावण्यांमध्ये जी अमानुष वागणूक दिली त्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया काय होती? ऐकून आश्‍चर्य वाटेल, की त्यांच्या आनंदहीन परिसरात राहत असताना देखील ते त्यांचा आनंद टिकवू शकले.

‘चिखलातील खडक’

क्रिस्टीन किंग नावाच्या एका ब्रिटिश महिला इतिहासकारने छावण्यांत राहिलेल्या एका कॅथलिक स्त्रीची मुलाखत घेतली. डॉ. किंग म्हणाल्या, “तिने एक वाक्यप्रचार वापरला जो मी कधीच विसरू शकले नाही. ती ज्या उबग आणणाऱ्‍या परिस्थितीत राहिली होती त्या जीवनाच्या भयानकतेविषयी तिने अगदी सविस्तरपणे सांगितले. आणि ती म्हणाली, की ती यहोवाच्या साक्षीदारांना देखील ओळखते व ते साक्षीदार चिखलातील खडकासारखे होते. त्या सर्व राडीत ते स्थिर जमिनीसारखे होते. केवळ तेच लोक असे होते जे, पहारेकरी फेऱ्‍या मारत तेव्हा त्यांच्यावर थुंकत नसत. तेच केवळ असे लोक होते ज्यांनी या परिस्थितीला द्वेषाने नव्हे तर प्रीती, आशा आणि एक उद्देश आहे या भावनेने हाताळले.”

यहोवाच्या साक्षीदारांना ‘चिखलामध्ये खडकांसारखे’ होण्यास कशामुळे शक्य झाले? यहोवा देव आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त, यांच्यावरील अचल विश्‍वासामुळे. त्यामुळेच तर त्यांच्या ख्रिस्ती प्रीतीचा आणि आनंदाचा कोंडमारा करण्यासाठी हिटलरचे प्रयत्न अपयशी ठरले.

विश्‍वासाची ही परीक्षा यशस्वीपणे पार पाडल्यानंतर छावण्यातील दोन उत्तरजीवी पाच दशकांनंतर काय आठवून सांगतात ते नीट लक्ष देऊन ऐका. एक महिला म्हणते: “सर्वात क्रूर परिस्थितीत यहोवाठायी माझी प्रीती आणि आभार प्रदर्शित करण्याचा मला असाधारण विशेषाधिकार मिळाला हे जाणून माझा आनंद उचंबळून येतो. असे करण्यासाठी माझ्यावर कोणीही दबाव टाकला नाही! उलट, ज्यांनी आमच्यावर दबाव आणला ते आमचे शत्रू होते व त्यांनी आम्हाला धमक्या देऊन देवापेक्षा हिटलरची आज्ञा मानण्याची बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पण सर्व काही निष्फळ ठरले! मी केवळ आत्ताच आनंदी आहे असे नाही तर कारागृहात असताना देखील चांगला विवेक असल्यामुळे मी आनंदी होते.”—९४ वर्षांच्या मरिया होमबॅक.

आणखी एक साक्षीदार म्हणतो: “कारागृहातील माझ्या दिवसांकडे, मी आभार प्रदर्शनासह आणि आनंदाने पाहतो. हिटलरच्या दडपशाहीखाली तुरुंग आणि छळछावण्यांमध्ये घालवलेली वर्षे कठीण आणि परीक्षांनी ग्रस्त होती. पण मला त्यांना चुकवावयाची इच्छा झाली नसती, कारण त्यांनी मला यहोवावर पूर्णपणे भरवसा ठेवण्यास शिकवले.”—९१ वर्षांचे योहॅन्स नोईबखर.

“यहोवावर पूर्णपणे भरवसा ठेवणे”—हेच यहोवाच्या साक्षीदारांनी अनुभवलेल्या आनंदाचे रहस्य होते. अशा प्रकारे, आनंदहीन जगात राहत असताना देखील ते आनंदी आहेत. त्यांचा आनंद अलीकडील महिन्यांत पार पडलेल्या “आनंदी स्तुतीकर्ते” अधिवेशनात स्पष्ट दिसून आला. या आनंदी मेळाव्यांची आपण संक्षिप्त उजळणी करू या.

[४ पानांवरील चित्रं]

मरिया होमबॅक

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा