वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 ४/१ पृ. १९-२४
  • यहोवाची सेवा आनंदाने करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाची सेवा आनंदाने करणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आनंदाचे प्रसंग
  • यहोवाच्या कामात आनंद
  • आनंद वाढत आहे
  • आनंदात टिकणे
  • टिकणारा आनंद
  • आनंद—देवाकडून मिळवता येणारा गुण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • उल्लसित अंतःकरणाने यहोवाची सेवा करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • यहोवाविषयीचा आनंद आपला आश्रयदुर्ग आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • सुवार्ता सादरता
    आमची राज्य सेवा—१९९१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 ४/१ पृ. १९-२४

यहोवाची सेवा आनंदाने करणे

“हर्षाने यहोवाची सेवा करा. गीत गात त्याच्यापुढे या.”—स्तोत्रसंहिता १००:२.

१, २. (अ) जर्मनीत बर्लिन येथे वंशाभिमान कसा सामोरा आला; पण “हजार वर्षीय साम्राज्य” आपल्या धर्मयुद्धात कितपत टिकले? (ब) १९३६ मध्ये ऑलिम्पिया स्टेडियमवर जुलै १९९० रोजी कोणता वेगळाच प्रसंग अनुभवण्यास मिळाला, आणि तेथे जमलेल्या आंतरराष्ट्रीय गटाचा आनंद कशामध्ये मुळावलेला होता?

ते बर्लिन येथील ऑलिम्पिया स्टेडियमवरील दृश्‍य आहे. चौपन्‍न वर्षांआधी येथे याच स्टेडियमवर मोठा वाद उपस्थित झाला होता जेव्हा नाझी हुकुमशहा ॲडाल्फ हिटलर याने चार सोन्याची पदके मिळवलेल्या एका अमेरिकन काळ्यावर्णीय धावकास दटावले होते. तेव्हा हिटलरच्या “आर्यन श्रेष्ठत्वा”विषयीच्या वंशीय दाव्यास किती जबर तडाखा बसला.a पण आता, जुलै २६, १९९० रोजी ६४ राष्ट्रातून आलेल्या काळे, श्‍वेत, पिवळे वर्णीय लोकांचा ४४,५३२ लोकांचा समुदाय यहोवाच्या साक्षीदारांच्या “शुद्ध वाणी” प्रांतिय अधिवेशनासाठी जमला होता. त्या गुरुवारी दुपारी आनंद किती ओसंडून वाहत होता! बाप्तिस्म्याचे भाषण झाल्यावर १,०१८ लोकांनी “ज्या!” आणि पर एकदा “ज्या!” असे दोनदा म्हणून त्यांनी यहोवा देवास त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी केलेल्या समर्पणाची पुष्टी दिली.

२ या साक्षीदारांना बाप्तिस्म्याच्या स्थळी स्टेडियमवरून जाण्यासाठी १९ मिनिटे लागली. आणि या सर्व काळात त्या प्रचंड क्षेत्रातून आनंदाचा जयघोष उत्साहाने ओसंडत होता. ऑलिम्पिक खेळातील विजेत्यांनी देखील असा हा प्रचंड जल्लोष, जो विविध राष्ट्रातून आलेल्या शेकडो लोकांसाठी करण्यात आला होता तो, स्वतःबाबतीत अनुभवला नसेल. त्या शेकडोंनी जगावर विजय मिळविणारा आपला विश्‍वास जाहीर केला होता. (१ योहान ५:३, ४) त्यांचा आनंद हा या आत्मविश्‍वासावर मुळावलेला आहे की, ख्रिस्ताद्वारे चालविण्यात येणारे देवाचे राज्य हे खरेपणाने मानवजातीवर हजार वर्षांचा वैभवी आशीर्वाद आणणार आहे.—इब्रीयांस ६:१७, १८; प्रकटीकरण २०:६; २१:४, ५.

३. अधिवेशनात जमलेल्या लोकांकरवी कोणते सत्य जोरदारपणे सांगितले गेले व कसे?

३ येथे कसलाही वंशीय किंवा राष्ट्रीय मत्सर नाही, कारण सर्वच जण देवाच्या वचनातील शुद्ध वाणी बोलत आहेत व याद्वारे पेत्राच्या शब्दांची सत्यता आपल्याला समजते की, “देव पक्षपाती नाही हे मला पक्के ठाऊक आहे. तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो, व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.”—प्रे. कृत्ये १०:३५; सफन्या ३:९.

४. अधिवेशनातील बहुतांशी लोक कोणत्या काळात विश्‍वासधारक बनले होते, आणि त्यांच्या प्रार्थनांचे कसे श्रवण करण्यात आले ?

४ बर्लिनमध्ये या अधिवेशनास उपस्थित झालेल्या लोकांचा बराच मोठा भाग नाझी काळात (१९३३-४५) प्रदीर्घ दबावात तसेच पूर्व जर्मनीचा मागोवा घेतलेल्या समाजसत्तावादी काळात विश्‍वासधारक बनला होता. पूर्व जर्मनीत नुकतेच म्हणजे मार्च १४, १९९० मध्ये बंदी कायद्याने उठविण्यात आली. अशाप्रकारे बऱ्‍याच जणांनी ‘फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारले.’ (१ थेस्सलनीकाकर १:६) आता त्यांना यहोवाची सेवा मुक्‍तपणे करता येते आणि त्यांचा आनंदाला पारावार राहिलेला नाही.—पडताळा यशया ५१:११.

आनंदाचे प्रसंग

५. यहोवाने तांबड्या समुद्रापाशी इस्राएलांना जो विजय मिळवून दिला तो कसा साजरा करण्यात आला?

५ पूर्व युरोप व सध्या आफ्रिकेच्या व आशियाच्या काही भागात आमच्या बांधवांची जी मुक्‍तता घडली ती आपल्याला यहोवाने गत काळी ज्या मुक्‍तता घडवून आणल्या त्याचे स्मरण देते. तांबड्या समुद्रापाशी यहोवाने जे अद्‌भुत कृत्य केले त्याची आपल्याला आठवण आहेच. तेव्हा इस्राएलांनी गायिलेले उपकारस्मरणाचे गीत अधिकाधिक आवाजात या शब्दात गाण्यात आले होतेः “हे यहोवा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे? पावित्र्यामुळे वैभवी, स्तवनीय कृत्यांनी भयानक, अद्‌भुते करणारा असा जो तू, त्या तुझ्यासारखा कोण आहे?” (निर्गम १५:११) आजही यहोवा आपल्या लोकांसाठी जे करीत आहे त्यामुळे आम्हाला आनंद होत राहण्याचे कारण नाही का? निश्‍चितपणे आहे.

६. इ. स. पू. ५३७ मध्ये इस्राएलांनी जो आनंदाचा गजर केला होता त्यावरुन आपल्याला काय शिकता येते?

६ इ. स. पूर्वी ५३७ मध्ये इस्राएलाला बाबेलोनी दास्यत्वातून सुटका मिळाली व त्यांची त्यांच्या स्वदेशात पुनर्स्थापना करण्यात आली तेव्हाही आनंदाला पारावार राहिला नाही. यशयाने आधी भाकित केले होते त्यानुसार आता यहोवाच्या राष्ट्राला असे म्हणता येत होतेः “पाहा, देव माझे तारण आहे, मी भाव धरितो, भीत नाही; कारण याह, यहोवा माझ बल व गीत आहे. तो मला तारण झाला आहे.” केवढा हा विजयोत्सव! पण या राष्ट्राला आपला आनंद कसा व्यक्‍त करता येत होता? यशया पुढे म्हणतोः “त्या दिवशी तुम्ही म्हणाल, ‘यहोवाचा धन्यवाद करा, त्याच्या नामाचा जयघोष करा. राष्ट्रांमध्ये त्याची कृत्ये विदीत करा, त्याचे नाम थोर आहे अशी वाखाणणी करा. यहोवापुढे गायन करा, कारण त्याची करणी प्रतापमय आहे.’” ते “आनंदाचा गजर” करून त्याची महत्कृत्ये “सर्व पृथ्वीवर विदीत“ करू शकत होते. हेच आज यहोवाचे मुक्‍त झालेले लोक करीत आहेत.—यशया १२:१-६

यहोवाच्या कामात आनंद

७. १९१९ मध्ये कोणकोणत्या मुक्‍ततांमुळे आनंद झाला?

७ आधुनिक काळात यहोवाच्या सेवकांना जेव्हा १९१९ मध्ये अद्‌भुत मुक्‍तता मिळाली तेव्हापासून त्यांनी आनंदाचा गजर केला. त्या वर्षी मार्च २६ रोजी नियमन मंडळाच्या सदस्यांची अमेरिकेतील तुरुंगातून सुटका झाली. येथे यांना द्रोहाच्या खोट्या आरोपाखाली नऊ महिन्याची शिक्षा करण्यात आली होती. त्यांचे ब्रुकलिन बेथेलमध्ये परत स्वागत करण्यामध्ये केवढा मोठा सोहळा झाला! याचप्रमाणे अभिषिक्‍त शेषांच्या सदस्यांना मोठ्या बाबेलातून, जेथे सैतानाने सर्व जगाला धार्मिक व्यवस्थेमध्ये जाळ्यात अडकवून ठेवले आहे त्यातून आध्यात्मिक रितीने सुटका झाल्याचाही आनंद होत होता.—प्रकटीकरण १७:३-६; १८:२-५.

८. १९१९ मध्ये सीडर पॉईंट ओहायो येथे कोणते आश्‍चर्यकारक प्रकाशन प्रसिद्ध करण्यात आले आणि कार्य करण्याचे कोणते आव्हान प्रस्तुत करण्यात आले?

८ १९१९च्या ऐतिहासिक घडामोडींचा कळस, सप्टेंबर १-८ रोजी सीडर पॉईंट, ओहायो येथे देवाच्या लोकांच्या अधिवेशनात झाला. त्या संमेलनाच्या पाचव्या दिवशी, ज्याचे शिर्षक होते, “सहकारी दिवस,” वॉचटावर संस्थेचे अध्यक्ष, जे. एफ. रदरफोर्ड यांनी ६,००० लोकांच्या समुदायापुढे मोठे थरारक भाषण दिले. “राज्याची घोषणा” हे त्या भाषणाचे शिर्षक होते. प्रकटीकरण १५:२ व यशया ५२:७ ची चर्चा केल्यावर त्यांनी श्रोत्यांना म्हटले की, एक नवे मासिक द गोल्डन एज (सध्याचे अवेक!) दर पंधरवड्याला प्रकाशित होणार व त्याचे वितरण क्षेत्रावर केले जाईल. शेवटी ते म्हणालेः “जे प्रभूला पूर्णपणे निष्ठावंत आहेत; जे निर्भिड आहेत, ज्यांचे अंतःकरण शुद्ध असून जे देवावर आणि प्रभु येशूवर आपल्या पूर्ण मनाने, शक्‍तीने, जिवाने व सर्वस्वाने प्रेम करतात त्यांना या कार्यात आनंद मिळेल. प्रभूला त्याचे मार्गदर्शन व साहाय्यासाठी विचारणा करा की, तो तुम्हाला त्याचा खरा, विश्‍वासू व कार्यक्षम प्रतिनिधी बनवो. मग, आपल्या अंतःकरणात आनंदाचे गीत गाऊन त्याची सेवा करण्यासाठी पुढे व्हा.”

९, १०. यहोवाने वॉचटावर तसेच अवेक! मासिकांच्या प्रकाशनात कशी वृद्धी दिली आहे?

९ ते “आनंदाचे गीत” आता जगभर ऐकण्यात येत आहे! आमच्या कित्येक वाचकांनी अवेक! मासिकाच्या वितरणाला निःसंशये हातभार लावला व ते आता ६४ भाषांत दर अंकाला १,२९,८०,००० इतक्या प्रतींमध्ये मुद्रित होत आहे. आस्थेवाईक लोकांना सत्याप्रत निरविण्यामध्ये हे अवेक! मासिक द वॉचटावर या मासिकाचा सोबती म्हणून आहे. पौर्वात्य देशात मासिक मार्गावर काम करणाऱ्‍या एका पायनियर भगिनीला याचे खरेच आश्‍चर्य वाटले की, जेव्हा ती एका घरमालकीणीला ताजे अंक देण्यासाठी जाई तेव्हा दर वेळी ती ७ डॉलर्सचे अनुदान यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक कार्याला अनुदान म्हणून देत असे—राज्य कार्यासाठी केवढी ही रसिकता!

१० आता वॉचटावर मासिक आपल्या प्रकाशनाच्या ११२ व्या वर्षात आहे व त्याचे मुद्रण १११ भाषांमध्ये दर अंकाला १,५२,९०,००० प्रतींमध्ये होत असून यापैकीच्या ५९ आवृत्त्यांचे जगभरात त्याचवेळी प्रकाशन होत आहे. अभिषिक्‍त शेष एका विश्‍वासू कारभाऱ्‍याप्रमाणे रसिकपूर्ण वाचकांना “यथाकाळी [आध्यात्मिक] अन्‍न” देत आहेत. (लूक १२:४२) १९९० च्या दरम्यान यहोवाच्या साक्षीदारांनी दोन्ही मासिकांच्या एकूण २९,६८,३०९ नव्या वार्षिक वर्गण्या मिळविल्याचे कळवले आहे, ही १९८९ पेक्षा २२.७ ची वाढ आहे.

आनंद वाढत आहे

११. (अ) १९२२ मध्ये सीडर पॉईंट येथे कोणते आव्हान देण्यात आले? (ब) आनंदाचा हा गजर कसा वाढत गेला?

११ सप्टेंबर १९२२ मध्ये पुन्हा देवाच्या लोकांचे सीडर पॉईंट येथे संमेलन झाले तेव्हा आनंद परत एकदा द्विगुणित झाला. यावेळी १०,००० उपस्थित होते व ३६१ जणांचा बाप्तिस्मा झाला. मत्तय ४:१७ वर आधारीत असलेल्या “स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे,” या आपल्या भाषणात ब्रदर रदरफोर्ड यांनी हा आवेशपूर्ण कळस गाठलाः “जगाने हे जाणले पाहिजे की, यहोवा हा देव आहे आणि येशू ख्रिस्त हा राजांचा राजा व प्रभुंचा प्रभू आहे. हा तो सर्वात मोठा दिवस आहे. पाहा, राजा राज्य करीत आहे! तुम्ही त्याची जाहिरात करणारे प्रतिनिधी आहात. या कारणास्तव, राजा व त्याचे राज्य जाहीर करा, जाहीर करा व जाहीर करा.” या अधिवेशनात ज्यांनी आनंदाने टाळ्यांचा गजर केला त्यांची संख्या आता वाढत जाऊन ती १९८९ च्या जगभरातील १,२१० अधिवेशनात ६६,००,००० पेक्षा अधिक झाली व या वर्षी १,२३,६८८ चा बाप्तिस्मा झाला.

१२. (अ) आज देवाचे लोक कोणत्या अवर्णनीय आनंदाचा उपभोग घेत आहेत? (ब) “वरिष्ठ अधिकारी” यांना अधीन राहून यहोवाची सेवा आपल्याला समतोलपणे कशी करता येईल?

१२ यहोवाचे साक्षीदार आपल्या स्वातंत्र्याला बहुमोल रितीने जपतात. याशिवाय त्यांना येशूच्या या शब्दांची आधुनिक पूर्णता बघून आणखी आनंद होतोः “तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हास स्वतंत्र करील.” खोट्या धर्माच्या गूढ गोष्टी व अंधश्रद्धा यांजपासून मुक्‍त होणे ही किती आनंदाची गोष्ट आहे! यहोवा व त्याचा पुत्र यांची ओळख होणे व त्यांचे सहकारी बनून सार्वकालिक जीवनाचे भवितव्य मिळविणे ही जाणीव किती आनंद देणारी आहे! (योहान ८:३२; १७:३; १ करिंथकर ३:९-११) या जगाचे “वरिष्ठ अधिकारी” जेव्हा देवाच्या लोकांच्या, ख्रिस्त वर्चस्वाखालील यहोवाच्या राज्याची वैभवी आशा घोषित करण्याच्या स्वातंत्र्याचे रक्षण करतात तेव्हा त्यांना किती आनंद होतो. ते स्वेच्छेने “कैसराचे ते कैसराला” देतात, पण याचवेळी “देवाचे ते देवाला” ते देत आहेत.—रोमकर १३:१-७; लूक २०:२५.

१३. जाचापासून मुक्‍तता झाल्यावर यहोवाच्या साक्षीदारांनी आपला आनंद कसा व्यक्‍त केला आहे?

१३ तथापि, जर मानवी अधिकाऱ्‍यांनी देवास असलेल्या या बंधनात निर्बंध घालण्याचा प्रयत्न केला तर ते प्रेषितांसारखेच हे उत्तर देतातः “आम्ही मनुष्यापेक्षा देवाला आपला शासक मानून त्याची आज्ञा मानली पाहिजे.” अधिकाऱ्‍यांनी त्या वेळी प्रेषितांना सोडून दिल्यावर ते “आनंद करीत . . . निघून गेले.” हा आनंद त्यांनी कसा व्यक्‍त केला? “दररोज मंदिरात व घरोघर शिकविण्याचे आणि येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही.” (प्रे. कृत्ये ५:२७-३२, ४१, ४२) याचप्रमाणे आधुनिक काळातील यहोवाच्या साक्षीदारांना आपल्या उपाध्यपणात पुढे जाण्याचे अधिक स्वातंत्र्य लाभते तेव्हा तेही आनंद करतात. ज्या ज्या देशात यहोवाने आपला मार्ग उघडून दिला आहे तेथे ते यहोवाचे नाम व ख्रिस्त येशूच्या येणाऱ्‍या राज्याची पूर्ण स्वरुपाची साक्ष देऊन हा आनंद व्यक्‍त करीत आहेत.—पडताळा प्रे. कृत्ये २०:२०, २१, २४; २३:११; २८:१६, २३.

आनंदात टिकणे

१४. आत्म्याचे फळ असणारा हा आनंद शब्दकोषात वर्णन करण्यात आलेल्या आनंदापेक्षा कसा वरचढ आहे?

१४ खऱ्‍या ख्रिश्‍चनांना ज्याचा अनुभव येत असतो तो उत्कट आनंद काय आहे? तो ऑलिम्पिक खेळामध्ये विजेत्याला मिळणाऱ्‍या क्षणिक आनंदापेक्षा अधिक खोलवरचा तसेच अधिक कायम स्वरुपाचा आनंद आहे. तो देवाच्या आत्म्याचे फळ आहे व ते देव “अधिपती म्हणून त्याची आज्ञा मानणाऱ्‍यांना” देत असतो. (प्रे. कृत्ये ५:३२) वेबस्टर यांचा कोश आनंद याविषयी व्याख्या देताना म्हणतो की, तो ‘वरकरणी भासणाऱ्‍या आनंदापेक्षा खोलवर, अधिक दिसून येणारा आणि अधिक प्रदर्शनीय असा आहे.’ ख्रिश्‍चनांसाठी तरी आनंदाचा अधिक खोल अर्थ आहे. तो आमच्या विश्‍वासात मुळावलेला असल्यामुळे तो एक सामर्थ्ययुक्‍त, बळकटी आणणारा गुण आहे. “यहोवाचा आनंद तुमचा आश्रयदुर्ग होय.” (नेहम्या ८:१०) यहोवाचा हा आनंद त्याचे लोक जोपासत असतात व तो दैहिक, जागतिक सुखामध्ये मिळणाऱ्‍या वरकरणी उत्साहापेक्षा अधिक उत्कृष्ट आहे.—गलतीकर ५:१९-२३.

१५. (अ) विश्‍वासू ख्रिश्‍चनांच्या अनुभवामध्ये सहनशीलतेने आनंदासोबत कशी भर घातली? (ब) आनंद राखून ठेवण्याच्या बाबतीत जे बळ देण्याची हमी देतात अशी शास्त्रवचने सांगा.

१५ युक्रेनमधील आमच्या बांधवांचा जरा विचार करा. १९५०शी च्या आरंभाला “वरिष्ठ अधिकारी” याने जेव्हा हजारोंना सैबेरियामध्ये हद्दपार केले तेव्हा यांना मोठा त्रास सहन करावा लागला. नंतर जेव्हा अधिकाऱ्‍याने माफी दिली तेव्हा ते खरेच कृतज्ञ होते. पण सर्वांना आपल्या स्वगृही जाता आले नाही. ते का? कारण त्यांनी जे परिश्रम पूर्वभागात केले होते त्यांनी त्यांना याकोब १:२-४ ची आठवण करून दिली. ते म्हणतेः “माझ्या बंधूनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागले तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हास ठाऊक आहे की, तुमच्या विश्‍वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्‍न होतो.” त्या आनंदी कापणीत ते टिकून राहू इच्छित होते. आणि आता अलिकडील पोलंड येथे भरलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनात अत्यंत पूर्वेच्या पॅसिफिक विभागातून साक्षीदारांचे स्वागत करण्याचा केवढा अनमोल आनंद मिळाला बरे. ही फलप्राप्ती साधण्यासाठी आनंद व सहनशीलता यांनी एकत्र मिळून काम केले. खरेच, आम्ही जर यहोवाच्या सेवेत आनंदाने टिकून राहिलो तर सर्वजण हे म्हणू शकतोः “मी यहोवाच्या ठायी हर्ष पावेन. मला तारण देणाऱ्‍या देवाविषयी मी उल्लास करीन. सेनाधीश प्रभु यहोवा माझे सामर्थ्य आहे.”—हबक्कुक ३:१८, १९; मत्तय ५:११, १२.

१६. यिर्मया तसेच ईयोब यांच्या सुंदर उदाहरणांनी आम्हाला क्षेत्रकार्यात कसे उत्तेजन देण्यास हवे?

१६ परंतु, आम्हाला कठीण अंतःकरणाच्या तसेच विरोध करणाऱ्‍या लोकांना साक्ष देताना आपला आनंद कसा टिकविता येऊ शकेल? हे लक्षात घ्या की, अशा परिस्थितीत असताना देवाच्या संदेष्ट्यांनी आनंदी दृष्टीकोन ठेवला होता. यिर्मयाने परिक्षाप्रसंगात म्हटले होतेः “मला तुझी वचने प्राप्त झाली ती मी सेवन केली; तुझी वचने माझा आनंद, माझ्या जिवाचा उल्लास अशी होती; कारण हे यहोवा, सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी आपणास तुझा म्हणवितो.” (यिर्मया १५:१६) यहोवाच्या नावाने स्वतःला संबोधून घेणे तसेच त्या नावाविषयी इतरांना साक्ष देणे हा किती मोठा हक्क आहे! आमचा व्यक्‍तीगत परिश्रमी अभ्यास तसेच ख्रिस्ती सभांमध्ये आमचा पूर्ण सहभाग आम्हाला सत्यामध्ये पूर्णानंद मिळवीत राहण्याची मदत देतो. हा आमचा आनंद क्षेत्रातील आमची प्रस्तुति तसेच आमच्या राज्य स्मितहास्याने प्रदर्शित होईल. ईयोब अति कठीण परिक्षेत होता तरी त्याने आपल्या विरोध्यांविषयी म्हटलेः “मी त्यांजकडे हास्यवदन करून पाही, पण त्यांना विश्‍वास पटत नसे; त्यांच्याने माझी मुद्रा उतरवत नसे.” (ईयोब २९:२४) याचप्रमाणे जेव्हा आम्हाला विरोध्यांचा सामना करावा लागतो तेव्हा ईयोबाप्रमाणेच आमचीही मुद्रा उतरवू देऊ नये. स्मितहास्य करीत राहा! आमचे स्वरुप आमचा आनंद प्रदर्शित करीत राहो; म्हणजे त्याद्वारे आम्हाला श्रवण करणारे लोक मिळू शकतील.

१७. आनंदासोबत असणारी सहनशीलता कोणते प्रतिफळ देते?

१७ आम्ही आमचे क्षेत्र वेळोवेळी उरकत असताना आमची सहनशीलता व आनंद धार्मिक लोकांवर आपली छाप पाडील आणि आपण त्यांना सादर करीत असणारी वैभवी आशा काय आहे त्याचे परिक्षण करण्यास उत्तेजन देईल. अशा लोकांसोबत नियमित स्वरुपाचा पवित्र शास्त्र अभ्यास चालविणे हे किती आनंदाचे आहे बरे! देवाच्या वचनातील सत्ये हे लोक आपल्या अंतःकरणात बिंबवताना व सरतेशेवटी हेच लोक आपल्या सोबतीत यहोवाच्या कार्यात भाग घेत आहेत हे बघून आम्हाला केवढा आनंद वाटतो बरे! यावेळी, प्रेषित पौलाने त्याच्या काळातील नव्या विश्‍वासधारकांविषयी जे म्हटले तेच आपल्याला म्हणता येईल की, “आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमच्या अभिमानाचा मुगूट काय आहे? आपला प्रभु येशू ह्‍याच्या आगमनसमयी त्याच्यासमोर तुम्हीच आहा ना? तुम्हीच आमचे गौरव व आमचा आनंद आहा.” (१ थेस्सलनीकाकर २:१९, २०) खरेच, नव्या लोकांना देववचनाच्या सत्याकडे निरविणे तसेच त्यांना समर्पण करण्यात व बाप्तिस्मा घेतलेले साक्षीदार बनण्यात मदत करणे हे समाधान व आनंद देते.

टिकणारा आनंद

१८. आजच्या काळातील विविध परिक्षांसोबत आम्हाला सामना देण्यासाठी काय मदतगार ठरू शकेल?

१८ आमच्या दैनंदिन जीवनात आम्हाला बऱ्‍याच वेळेला सहनशीलता राखण्याची हाक येते. शारीरिक आजार, नैराश्‍य, आणि आर्थिक दबाव या त्यापैकीच्या काही गोष्टी होत. अशा परिक्षांसोबत सामना देताना ख्रिश्‍चनाला आपला आनंद कसा टिकविता येईल बरे? हे, समाधान तसेच मार्गदर्शनासाठी देवाच्या वचनाकडे जाऊन साध्य करता येते. स्तोत्रसंहितेचे वाचन किंवा श्रवण करण्याने परिक्षाप्रसंगी बराच तजेला मिळतो. आता दाविदाने दिलेला हा सूज्ञ सल्ला लक्षात घ्याः “तू आपला भार यहोवावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल; नीतीमानाला तो कधीही ढळू देणार नाही.” (स्तोत्रसंहिता ५५:२२) यहोवा खरेपणाने “प्रार्थना ऐकणारा” देव आहे.—स्तोत्रसंहिता ६५:२.

१९. आम्हाला दावीद व पौलाप्रमाणे कोणता आत्मविश्‍वास राखता येईल?

१९ आम्ही कमकुवत मानवप्राणी, समस्यांशी धडपडत असतो; यासाठीच यहोवाची संस्था आपल्या प्रकाशनांच्या माध्यमाने तसेच मंडळीच्या वडीलांकरवी आमचे साहाय्य करण्यासाठी सदा उभी आहे. दावीदाने अगदी उबदारपणे हा सल्ला दिलाः “आपला जीवितक्रम यहोवावर सोपवून दे; त्याच्यावर भार ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील.” तो असे सुद्धा म्हणू शकलाः “मी तरूण होतो व आता म्हातारा झालो; तरी धार्मिक निराश्रित झालेला व त्याची संतति भिकेस लागलेली मी पाहिली नाही.” ख्रिस्ती मंडळीसोबत सहवास राखल्यामुळे आम्हाला हे कळून येते की, “नीतीमानांचे तारण यहोवापासून होते, संकटसमयी तोच त्यांचा दुर्ग आहे.” (स्तोत्रसंहिता ३७:५, २५, ३९) यास्तव, आपण नेहमी पौलाच्या सूचनेचा अवलंब करू या. तो म्हणतोः “आम्ही धैर्य सोडीत नाही. . . . आम्ही दृश्‍य गोष्टींकडे नाही तर अदृश्‍य गोष्टींकडे लक्ष लावतो; कारण दृश्‍य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्‍य गोष्टी तर सार्वकालिक आहेत.”—२ करिंथकर ४:१६-१८.

२०. आम्ही आमच्या विश्‍वासरुपी चक्षुंनी काय बघू शकतो, आणि हे आम्हाला काय उत्तेजन देऊ शकेल?

२० आम्ही आपल्या विश्‍वासरुपी चक्षुंनी यहोवाचे नवे व्यवस्थीकरण अगदी समोर उभे असलेले पाहू शकतो. तेव्हा केवढा अवर्णनीय आनंद व आशीर्वाद मिळेल बरे! (स्तोत्रसंहिता ३७:३४; ७२:१, ७; १४५:१६) त्या वैभवी काळाची तयारी करीत असताना आपण स्तोत्रसंहिता १००:२ मधील शब्दांकडे लक्ष देऊः “हर्षाने यहोवाची सेवा करा. गीत गात त्याच्यापुढे जा.”

[तळटीपा]

a “आर्यन श्रेष्ठत्वा”विषयी कळविताना द न्यू यॉर्क टाईम्सने फेब्रुवारी १७, १९४० च्या अंकात जॉर्जटाऊन विश्‍वविद्यालयाच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या एका कॅथोलिक सभासदाने असे म्हटल्याचे उद्धृत केले की, “त्याने ॲडाल्फ हिटलरला असे म्हणताना ऐकले की, पवित्र रोमी साम्राज्य जे जर्मनीचे साम्राज्य होते, त्याची पुनर्स्थापना झालीच पाहिजे.” तथापि, विल्यम एल. शायरर या इतिहासकारांनी निष्पत्तीची माहिती कळविली आहेः “जानेवारी ३०, १९३३ रोजी जन्मलेल्या तिसऱ्‍या साम्राज्याविषयी हिटलरने ही घमेंड केली की, ते हजार वर्षे टिकेल आणि त्यामुळे नाझी काळात त्याला नेहमी ‘हजार वर्षीय साम्राज्य’ असे उल्लेखित असत. ते केवळ बारा वर्षे व चार महिने टिकले.”

उजळणी

◻ आज कोणता वंशविषयक विजय मिळवल्याचा आनंद दिसून येत आहे?

◻ कशामुळे देवाच्या प्राचीन लोकांनी आनंदाने गीताचे गायन व जयघोष केला?

◻ आधुनिक काळात खऱ्‍या आनंदाची कशी वाढ झालेली आहे?

◻ सहनशीलता व आनंद एकमेकांच्या सोबतीत कसे जातात?

◻ आम्ही आपला आनंद कशाकशामुळे टिकवून ठेवू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा