वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 १२/१५ पृ. २४-२५
  • “मी यहोवाच्या नजरेत मौल्यवान आहे!”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “मी यहोवाच्या नजरेत मौल्यवान आहे!”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाचं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • तुम्ही देवाच्या नजरेत मौल्यवान आहात!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९९
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—२०००
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 १२/१५ पृ. २४-२५

“मी यहोवाच्या नजरेत मौल्यवान आहे!”

या ‘शेवटल्या दिवसातील कठीण काळात,’ यहोवाचे अनेक विश्‍वासू सेवक, कवडीमोलाच्या भावनांशी एक निरंतर लढा देत, टिकून राहतात. (२ तीमथ्य ३:१) यात काहीच नवल नाही, कारण आपल्यावर कोणाचेही प्रेम नाही, अगदी आपल्या निर्माणकर्त्याचेही नाही असे आपल्याला वाटण्यास भाग पाडणे हा सैतानाच्या ‘डावपेचांपैकी’ एक आहे! (इफिसकर ६:११, तळटीप, NW) योग्यपणे, टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या एप्रिल १, १९९५ या अंकात, “तुम्ही देवाच्या नजरेत मौल्यवान आहात!” व “प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन द्या—कशा प्रकारे?” हे मंडळीच्या अभ्यासासाठी असलेले दोन लेख होते. यहोवा आपल्या प्रयत्नांना खूप मोलवान जाणतो याची आठवण करून देतील अशा प्रकारे हे लेख लिहिण्यात आले होते. आम्हाला प्राप्त झालेली प्रशंसेची विवेचने पुढील प्रमाणे आहेत:

“मी २७ वर्षांपासून यहोवाची साक्षीदार आहे पण आजवर मला कधीही कोणत्या अंकाने असे प्रभावित केले नव्हते. या लेखांनी मला इतका दिलासा दिला—मला रडू आवरले नाही. यहोवाचे माझ्यावर खूप प्रेम आहे असे मला आता वाटते. माझ्या खांद्यावरील मोठे ओझे काढण्यात आले आहे असे मला वाटते.”—सी. एच.

“मी हा अंक एका दिवसात चार वेळा वाचला. आपण कवडीमोल आहोत अशी तुमची समजूत असल्यास तुम्हाला खोटे शिकवले गेले असे या लेखात म्हटलेले मला फार आवडले. मी मेंढपाळकत्त्व व दारोदारच्या प्रचारात या अंकाचा उपयोग करणार आहे.”—एम. पी.

“यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांना देखील, आपण कवडीमोल व अप्रिय आहोत असा विचार करण्यास भाग पाडण्यात सैतानाला कमालीचे यश प्राप्त झाले आहे. यहोवा आपल्यावर अतिशय प्रेम करतो व आपण त्याच्यासाठी करतो त्या सर्व लहानमोठ्या कृतींबद्दल तो गुणग्राहकता बाळगतो याची ‘विश्‍वासू दासाकरवी’ आठवण करून दिली जाणे ही आजपर्यंत माझ्या वाचण्यात आलेली सर्वात उत्तेजनात्मक गोष्ट आहे. या लेखांत तुम्ही उल्लेखिलेल्या भावना मी पुष्कळ वर्षांपासून अनुभवत होते. मी यहोवाच्या प्रेमाच्या लायक आहे असे मला कधीही वाटले नाही व म्हणून मी ते प्रेम कमविण्याच्या हेतूने त्याच्या सेवेत जास्तीतजास्त करण्याचा प्रयत्न केला. पण मी दोषभावना व लज्जेने प्रेरित झाले होते. यामुळे मी सेवेत कितीही तास व्यतीत केले किंवा कितीही लोकांना मदत केली तरीही ते पुरेसे नाही असे मला वाटे. मी केवळ माझ्यातील उणीव लक्षात घेत होते. आता जेव्हा मी प्रेमापोटी यहोवाची सेवा करते तेव्हा मला असे वाटते जणू तो माझ्यावर संतुष्ट आहे व त्याला माझे कौतुक वाटते. यामुळे माझे त्याच्यासाठी असलेले प्रेम अधिकच वाढते व मला आणखीन कार्य करावेसे वाटते. मी करीत असलेल्या यहोवाच्या सेवेतून आता, मला अत्यानंदाचा अनुभव येतो.”—आर. एम.

“हे अतिशय चांगले, अत्यंत उभारणीकारक, खरोखर मी कधीही वाचले नव्हते असे, आमच्या अंतःकरणाला स्पर्श करणारे लेख आहेत! मी ५५ वर्षांपासून टेहळणी बुरूज वाचत आहे व यापूर्वीसुद्धा अनेक उल्लेखनीय अंक होऊन गेले आहेत. पण, आपण ‘कवडीमोल’ व ‘नावडते’ आहोत व यहोवाचे प्रेम ‘कमविण्यासाठी’ कधीच पुरेसे करू शकणार नाही असे आमच्या मनात असलेले कुतर्क, शंका व भीती दूर करण्यासाठी आम्हाला आजवर उपलब्ध झालेल्या सर्वापेक्षा, हा अंक अधिक वरचढ आहे. आपल्या बांधवांना ज्याची अत्यंत गरज आहे ती आध्यात्मिक मदत या टेहळणी बुरूज अंकात आहे. मेंढपाळकत्त्व करीत असताना या लेखांचा वारंवार उपयोग करण्याचा माझा मानस आहे.”—एफ. के.

“हीनपणाच्या किंवा स्वतःबद्दल घृणेच्या भावनांविरुद्धही लढा देणाऱ्‍या आमच्यासारख्या लोकांसाठी, सगळी शक्‍ती एकवटून सत्यात चालत राहणे फार कठीण असते. या लेखाने इतकी सखोल करुणा व समजूतदारपणा प्रतिबिंबित केला की जणू थेट हृदयाला, शामक, जखम भरून काढणारे मलम लावण्यासारखे ते होते. टेहळणी बुरूज यातील असे शब्द वाचणे व यहोवा नक्कीच समजून घेतो हे निःसंशये जाणणे केवढे सांत्वनदायक आहे! यहोवा त्याच्या लोकांना दोषभावना, लज्जा किंवा भय यांद्वारे प्रेरित करीत नाही याची आठवण करून दिल्याबद्दल आभारी आहे. आर्थिक संकटे व आमच्या कुटुंबातील आरोग्यासंबंधी समस्यांमुळे प्रचार कार्यात माझा हिस्सा अलीकडे फारच मर्यादित झाला असला तरीसुद्धा, मी जे काही करण्यास समर्थ आहे ते करण्याद्वारे अजूनही समाधान मिळव. मी जेव्हा प्रेमास माझी भाग पाडणारी शक्‍ती बनू देण्याचा प्रयत्न करते तेव्हा मी सेवेत अधिकच आनंदी असते असे मला जाणवते.”—डी. एम.

‘तुम्ही देवाच्या नजरेत मौल्यवान आहात!’ हा लेख नुकताच वाचून झाला. प्रत्येक परिच्छेद वाचताना माझ्या डोळ्यात पाणी आले. मी प्रेमाचा अभाव असलेल्या कुटुंबातील सदस्य होतो. मला कमी लेखण्यात येत होते, चिरडीस आणले जात होते व माझी थट्टा केली जात होती. यामुळे, कमी वयातच मला कवडीमोल असल्यासारखे वाटले. भूतकाळातील त्या दडलेल्या स्मृती आजही आहेत व मी संकटाचा सामना करतो तेव्हा त्या मला विषण्ण करतात. मी मंडळीचा वडील या नात्याने काम करण्याचे थांबविले, तेव्हा देव, माझे कुटुंब व मंडळीतील माझे बांधव यांच्या नजरेत—मला नेहमीसारखेच अपेशी असल्यासारखे वाटले. या भावना सहजासहजी जात नाहीत परंतु, या समयोचित लेखाने मला थोडेफार संतुलन परत मिळविण्यास मदत केली आहे. त्याने माझ्या दृष्टिकोनास उज्ज्वल बनवले आहे.”—डी. एल.

“‘तुम्ही देवाच्या नजरेत मौल्यवान आहात!’, या लेखाबद्दल आभारी आहे. बालपणात झालेल्या अत्याचारामुळे स्वतःबद्दल उत्पन्‍न झालेल्या तीव्र घृणेच्या व कवडीमोल असल्याच्या खोलवर रुजलेल्या भावनांचा मी सामना करते. ही विपर्यस्त विचारसरणी सैतानाची धूर्त कुयुक्‍ती आहे या दृष्टीने पाहणे निश्‍चितच यथायोग्य आहे. ती एखाद्याच्या जगण्याच्या इच्छेलासुद्धा मारून टाकू शकते. मी अप्रिय आहे या लबाडीचा प्रतिकार करण्यासाठी मी खरोखर दररोज प्रयत्न केले पाहिजेत. हा लेख माझ्याकरता किती महत्त्वपूर्ण आहे याची तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही.”—सी. एफ.

“यहोवा, जबरदस्तीने किंवा दबावामुळे नव्हे तर प्रेमामुळे प्रेरित होऊन केलेल्या कृत्यांची गुणग्राहकता बाळगतो या विचारास, आज बांधव विशेषपणे अनुकूल प्रतिक्रिया दाखवतात. यहोवाचे उत्साहपूर्ण व मायाळू व्यक्‍तिमत्त्व, त्याला त्याच्या लोकांबद्दल वैयक्‍तिकपणे असलेली आस्था व त्यांना मदत करण्यासाठी तो किती प्रेमळपणे तयार असतो याचा विचार करणे तजेलादायक व प्रेरक आहे. यामुळे, ‘तुम्ही देवाच्या नजरेत मौल्यवान आहात!’ हा लेख मिळताच, अनेकांनी प्रशंसा व्यक्‍त केली. यहोवासोबत अधिक जवळचा नातेसंबंध विकसित करण्यास, तो अनेकांसाठी मार्ग मोकळा करून देत आहे असे दिसते. मी व माझी पत्नी, अलीकडील टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या अंकांच्या लेखनशैलीबद्दल व व्यक्‍त करण्यात आलेल्या काळजीबद्दल आमची गुणग्राहकता व्यक्‍त करू इच्छितो. मंडळ्यांना भेटी देताना यातील अनेक मुद्दे उपयोगात आणण्याची आमची योजना आहे.“—एका प्रवासी पर्यवेक्षकाकडून.

“मी ३० वर्षांपासून एक विश्‍वासू वाचक राहि आहे, पण मी कधीही इतके प्रेरक, इतके उभारणीकारक असे काहीच वाचले नव्हते. यातील जोरदार व कुशलपणे उपयोगात आणलेल्या शास्त्रवचनांनी माझ्या स्वतःच्या भावनांमध्ये दडलेल्या लबाडीचे निर्मूलन करण्यास मला मदत केली ज्याकरवी मला यहोवाच्या अधिक जवळ जाता आले. मी अनेक वर्षे दोषभावनेने यहोवाची सेवा केली. मला खंडणी व देवाच्या प्रेमाबद्दल केवळ बौद्धिक समज होती. अशा मर्मभेदक व विचारशील लेखांबद्दल आभारी आहे. मी असे अनेक लेख वाचण्याची आशा कर.”—एम. एस.

“मी २९ वर्षांपासून सत्यात आहे व या सर्व वर्षांत, कोणत्याही लेखाने माझ्या मनात कृतज्ञतेची व उत्कट भावनेची अशी प्रतिक्रिया निर्माण केल्याचे मला आठवत नाही. मला फार प्रेमाने व काळजी घेणाऱ्‍या कुटुंबात लहानाचे मोठे करण्यात आले असले तरीसुद्धा, आपण यहोवाची सेवा करण्याच्या तर दूरच, पण जिवंत राहण्याच्याही लायक आहोत असे मला कधीच वाटले नाही. हा लेख वाचल्यानंतर, मी गुडघे टेकले व हुंदके देत यहोवाचे आभार मानले. मी हा लेख सर्वदा जपून ठेवीन. मी स्वतःकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहीन कारण आता मला समजले आहे, की मी यहोवाच्या नजरेत मौल्यवान आहे.”—डी. बी.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा