धार्मिकता राष्ट्राला उन्नत करते
अनेक पावसाळी दिवसांनंतर, पहाटे उठून निरभ्र आकाशात सूर्यप्रकाश पाहणे किती मनोरम वाटते! पृथ्वी प्रफुल्लित करण्यात आली आहे व आता वनस्पती विपुलपणे वाढू शकते. यहोवा देवाने एकदा, धार्मिक शासनाद्वारे येणाऱ्या आशीर्वादांचा दृष्टान्त देण्यासाठी अशा प्रकारच्या चित्राचा उपयोग केला होता. तो राजा दावीदास म्हणाला: “मानवांवर न्यायाने (धार्मिकतेने) राज्य करणारा, देवाचे भय धरून त्यांजवर राज्य करणारा निर्माण होईल. सूर्योदयाच्या प्रभातेसारखा तो उदय पावेल, निरभ्र प्रभातेसारखा तो असेल, पर्जन्यवृष्टीनंतर सूर्यप्रकाशाने जमिनीतून हिरवळ उगवते तसा तो उगवेल.”—२ शमुवेल २३:३, ४.
दाविदाचा पुत्र, राजा शलमोन याच्या धार्मिक शासनादरम्यान देवाचे शब्द खरे ठरले. बायबल अहवाल देते: “दानापासून बैर-शेब्यापर्यंत सारे यहूदी व इस्राएल आपआपली द्राक्षलता व अंजीर वृक्ष ह्यांच्याखाली शलमोनाच्या सर्व कारकीर्दीत निर्भय राहत होते.”—१ राजे ४:२५.
प्राचीन इस्राएल देवाचे निवडलेले राष्ट्र होते. त्याने त्यांस नियम दिले व त्यांस सांगितले की जर त्यांनी त्याची वाणी ऐकली, तर तो त्यांस “पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा उच्च करील.” (अनुवाद २८:१) त्यांना उन्नत करणारी धार्मिकता त्यांची स्वतःची नसून यहोवाची धार्मिकता होती. देवाने त्यांना दिलेले नियम त्यांच्या सभोवती असलेल्या राष्ट्रांच्या नियमांपेक्षा फार वरचढ होते. राष्ट्र या नात्याने, ते त्या सर्व राष्ट्रांसारखेच अपरिपूर्ण होते. या कारणास्तव, इतर राष्ट्रांपेक्षा उन्नत केले जाण्यामध्ये यहोवाचे श्रेष्ठ नियम व या नियमांचे त्यांनी केलेले काटेकोर पालन यांस श्रेय जाते. त्यांनी यहोवाच्या नियमांचे पालन केले तेव्हा त्यांना त्याची कृपादृष्टी व आशीर्वाद प्राप्त झाले. शलमोन राजाने त्याच्या कारकिर्दीत याचा अनुभव घेतला. तो म्हणू शकला: “धार्मिकता राष्ट्राची उन्नति करिते” पण त्याने ताकीद दिली, “पापाने प्रजेची अप्रतिष्ठा होते.”—नीतिसूत्रे १४:३४.
दुःखदपणे, वारंवार घडलेल्या अवज्ञेच्या कृत्यांमुळे, इस्राएल राष्ट्रास नीच पातळीवर आणले गेले. त्यांना राष्ट्रीय मानहानी सहन करावी लागली. हे एका नवीन आध्यात्मिक राष्ट्रासाठी अनुकूल असलेल्या त्यांच्या कायम अव्हेरात परिणीत झाले.—मत्तय २१:४३.
आध्यात्मिक इस्राएल
जन्मतः यहुदी असणारा याकोब, जेरूसलेम येथे ख्रिस्ती नियमन मंडळाच्या एका सभेत, देवाच्या आत्म्याने प्रेरित होऊन म्हणाला, की देवाने ‘परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून त्यांची भेट घेतली.’ (प्रेषितांची कृत्ये १५:१४) प्रेषित पौलाने या नवीन ख्रिस्ती राष्ट्रास “देवाचे इस्राएल” म्हणून संबोधित केले. (गलतीकर ६:१६) त्यांच्या पाचारणाच्या उद्देशासंबंधाने पेत्राने लिहिले: “तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’ देवाचे ‘स्वतःचे लोक’ असे आहा; यासाठी की, ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले ‘त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे.’” (१ पेत्र २:९) देवाचे निवडलेले लोक या नात्याने त्यांना जगात ज्योतीसारखे चमकायचे होते. यहोवाची धार्मिकता त्यांना उंचावणार होती.—फिलिप्पैकर २:१५.
या आध्यात्मिक इस्राएलांची निवड करण्याची तुलना हिऱ्यांच्या खाणकामासोबत केली जाऊ शकते. हिऱ्यांच्या धातुकाचा समृद्ध साठा भूपृष्ठावर आणला जातो तेव्हा, मातीच्या दर ३ टनमागे केवळ १ कॅरेट (२०० मिलीग्रॅम) एवढीच मिळकत होते. एके काळी हिरे गाळण्यासाठी अवलंबिण्यात येणाऱ्या प्रक्रियेत, धातुक पाण्यात मिसळून ते मिश्रण ग्रीस लावलेल्या टेबलांवरून वाहू देणे समाविष्ट होते. हिरे पाण्यास प्रतिकर्षक असतात आणि ते ग्रीसला चिकटून राहात असत व नको असलेले पदार्थ वाहून नेले जात. या टप्प्यात हिरे ओबडधोबड असायचे. परंतु, पैलू पाडण्यात आल्यावर, ते सर्व दिशेने प्रकाश परावर्तित करत.
पाण्यास प्रतिकर्षक असलेले हिरे ज्याप्रकारे त्यांच्या सभोवती असलेल्या पदार्थांचे भाग नसतात तशाच प्रकारे, यहोवाचे लोक जगापासून वेगळे करण्यात आले आहेत. (योहान १७:१६) प्रथम त्यांना प्रकाशात आणण्यात आले तेव्हा कदाचित त्यांच्यामध्ये चमक नसेल. पण यहोवाचे वचन व आत्मा त्यांच्यात एक नवीन व्यक्तिमत्त्व निर्माण करतात व ते या जगात ज्योतीसारखे चमकतात. ते स्वतःच्या धार्मिकतेमुळे नव्हे, तर यहोवाच्या धार्मिकतेमुळे उन्नत करण्यात येतात व ते राज्याच्या सत्याचा महान प्रकाश चोहीकडे परावर्तित करतात.
तथापि, सा. युगाच्या प्रथम शताब्दीपासून, धर्मत्यागाने मंडळ्यांत नकळत प्रवेश केला व त्याने अनेकांना प्रभावित केले. तथाकथित ख्रिश्चन, जगाच्या राष्ट्रांसोबत एकरूप झाले व त्यांना सामावणाऱ्या जगात व त्यांच्यात फरक उरला नाही.
आज आध्यात्मिक इस्राएलांच्या विश्वासू शेषवर्गास यहोवाची कृपादृष्टी पुन्हा प्राप्त झाली आहे. त्यांनी स्वतःला जगापासून वेगळे केले आहे आणि “देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून” स्वतःला शुद्ध केले आहे. (२ करिंथकर ७:१) यहोवाच्या नजरेत शुद्ध व प्रामाणिक असल्यामुळे, ते त्याची धार्मिकता उंचावून धरतात. याने त्यांना जगाच्या इतर राष्ट्रांपेक्षा अनुग्रहाच्या एका उन्नत दर्जावर पोहंचविले आहे. राज्याच्या सुवार्तेच्या त्यांच्या आवेशी प्रचारामुळे, एक मोठा आंतरराष्ट्रीय लोकसमुदाय यहोवाच्या समीप आला आहे व त्याच्या लोकांचा भाग बनला आहे.—प्रकटीकरण ७:९, १०.
जगास फरक दिसतो
जगिक अधिकारी काही वेळेस देवाच्या सेवकांची प्रशंसा करतात. काही काळापूर्वी, दक्षिण आफ्रिकेतील प्रेटोरिया शो ग्राउन्ड्सच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्याने, ही मैदाने त्यांच्या वार्षिक अधिवेशनांसाठी वापरणाऱ्या, सर्व जातींचे लोक असलेल्या, यहोवाच्या साक्षीदारांच्या वर्तणुकीविषयी टिप्पणी केली. इतर गोष्टींसोबतच त्याने असे लिहिले: “सर्वजण शालीन होते व आहेत, लोक एकमेकांशी प्रेमाने बोलतात, मागील काही दिवसांदरम्यान प्रदर्शित करण्यात आलेली मनोवृत्ती—सारे काही तुमच्या संस्थेतील सदस्यांच्या उच्च दर्जाचा व सर्वजण एका आनंदी कुटुंबासारखे एकत्र राहतात या गोष्टीचा पाठपुरावा देते.”
यहोवाचे लोक, केवळ अशा मोठ्या मेळाव्यांमध्ये नव्हे तर त्यांच्या खासगी जीवनांत देखील यहोवाच्या राष्ट्राच्या धार्मिकतेला हातभार लावू शकतात. उदाहरणार्थ, वॉचटावर संस्थेच्या दक्षिण आफ्रिका शाखा दफ्तरास जोहान्सबर्ग येथील एका स्त्रीचे पत्र मिळाले. त्यातील मजकूर असा होता: “मागील आठवडी माझ्या कारच्या छप्परावर माझी पर्स विसरले व मी तशीच कार पुढे नेली. ती पर्स यान स्मट्स ॲव्हेन्यू येथे खाली पडली व तिच्यात असलेल्या वस्तूंसहित ती तुमच्या मंडळीतील मि. आर.—यांनी उचलली व फोन करून नंतर ती मला परत केली. . . . सद्य काळात दुर्लभ होत चाललेल्या या प्रामाणिकतेची मी प्रशंसा करते आणि तुमचे सदस्य काटेकोरपणे पाळतात असे नियम लावून देण्याबद्दल तुमच्या मंडळीची स्तुती करते.”
होय, यहोवाच्या धार्मिक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे, त्याचे लोक जगापेक्षा वेगळे उठून दिसतात. ते यहोवाची धार्मिकता प्रदर्शित करत असल्यामुळे, प्रामाणिक अंतःकरणाचे लोक ख्रिस्ती मंडळीकडे आकर्षित होतात. जे निर्मळ व शुद्ध असते त्याकडे आकर्षित होणे स्वाभाविक आहे. उदाहरणार्थ, एक अनोळखी गृहस्थ, झ्युरीच, स्वित्झर्लंड येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या एका सभेला आला व त्याने मंडळीचा सदस्य बनण्याची इच्छा प्रकट केली. त्याने सांगितले, की त्याच्या बहिणीला अनैतिकतेमुळे बहिष्कृत करण्यात आले होते व तो पुढे म्हणाला की त्याला “दुर्वर्तन सहन न करणाऱ्या” संघटनेचा भाग बनायचे होते. न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडिया सुद्धा कबूल करतो, की यहोवाचे साक्षीदार, “जगातील सर्वात सभ्य समूहांपैकी एक” या नात्याने सुविख्यात आहेत.
एकीकडे धार्मिकता उन्नत करते तर दुसरीकडे पाप एखाद्याच्या नावलौकिकावर लांच्छन आणू शकते, विशेषतः घोर पातक समाजात सर्वज्ञात झाले तर असे होऊ शकते. कधी कधी वैयक्तिक सदस्य गंभीर पाप करतात तेव्हा ख्रिस्ती मंडळीला बदनामी सहन करावी लागते. साहजिकच, अपराध्याला दयाळुपणे म्हणजेच शास्त्रवचनांच्या आधारावर शिस्त लावण्यात आली आहे हे दाखवून मंडळीतील विश्वासू सदस्य मंडळीच्या नावलौकिकाचे रक्षण करू शकतात. जर कोणी पाप करतो व पश्चात्ताप करणार नाही, तर तो मंडळीतून वगळण्यात येईल—बहिष्कृत करण्यात येईल.—१ करिंथकर ५:९-१३.
काहींना बहिष्कृत का करण्यात येते
दर वर्षी हजारो लोक ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत केले जातात तरीसुद्धा, हे जगभरातील जवळजवळ ५० लाख साक्षीदारांचे एक लहानसे प्रमाण आहे. ख्रिस्ती मंडळीतील कोणाहीविरुद्ध अशी कडक कारवाई का केली जावी? इतर बाबींसोबतच, पातकाच्या स्वरूपावर हे अवलंबून असते. परंतु, अपराधी, त्याने केलेल्या पातकाबद्दल खरोखरी पश्चातापी आहे किंवा नाही ही आणखी महत्त्वपूर्ण बाब आहे. जर त्याचे अंतःकरण खरोखरी भग्न झाले असेल, यहोवाविरुद्ध केलेल्या पातकाची क्षमा मागण्यासाठी जर त्याने मनःपूर्वक प्रार्थना केली असेल व मंडळीतील जबाबदार पुरुषांची त्याने मदत घेतली असेल, तर यहोवाची कृपापसंती परत मिळवण्यासाठी व मंडळीतच राहण्यासाठी त्याला मदत दिली जाऊ शकते.—नीतिसूत्रे २८:१३; याकोब ५:१४, १५.
पित्यासोबत एक चांगला, हितकारक नातेसंबंध असलेले मूल, पित्याला दुखावणारे काही करते तेव्हा, दोघांनी तो अमूल्य नातेसंबंध पुन्हा स्थापित करण्यास त्वरा केली पाहिजे. त्याचप्रमाणे आपण यहोवाला आपले जीवन समर्पित करतो तेव्हा त्याच्यासोबत एका अत्यंत मोलवान नातेसंबंधात प्रवेश करतो. या कारणास्तव, त्याला दुखावणारे असे आपल्या हातून काही घडते तेव्हा आपल्या स्वर्गीय पित्यासोबत असलेला तो नातेसंबंध पुन्हा स्थापित करण्यासाठी आपण त्वरित कार्य केले पाहिजे.
बहिष्कृत अवस्थेत असलेल्या काही लोकांनी उधळ्या पुत्राचा दाखला मनावर घेतला आहे ही आनंदाची बाब आहे. या दाखल्यात, पश्चात्तापी असलेला अपराधी त्याचा मार्ग सोडून देतो व देवाला क्षमा मागतो तेव्हा त्याचा परत स्वीकार करण्यास तयार असलेल्या एका मायाळू पित्याशी, यहोवाची तुलना केली आहे. (लूक १५:११-२४) खरा, मनःपूर्वक पश्चात्ताप होणे व वाईट मार्गाचा त्याग करणे, हा यहोवाच्या कृपादृष्टीत व ख्रिस्ती मंडळीत परतण्याचा मार्ग राहिला आहे. त्यांच्या दोषीपणाच्या भाराखाली चिरडल्या गेल्यासारखे वाटणाऱ्या काही पश्चात्तापी अपराध्यांना, पश्चात्ताप करण्याची व ख्रिस्ती मंडळीच्या प्रेमळ वातावरणात परतण्यासाठी पावले उचलण्याची प्रेरणा मिळाली आहे. याप्रकारे त्यांना यशया ५७:१५ येथील यहोवाच्या शब्दांचे मोल कळले आहे.
यहोवाच्या प्रेमळ काळजीत परतण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी, घडलेल्या पापांची क्षमा नाही असे भासविण्याचा सैतान प्रयत्न करतो. परंतु, येशूचे खंडणी यज्ञार्पण पश्चात्ताप करणाऱ्या कोणाच्याही पापांना झाकून टाकण्यास समर्थ आहे—होय, यात ‘सर्व जगाला’, वारशाने मिळालेला पापिष्टपणा सुद्धा समाविष्ट आहे. (१ योहान २:१, २) देवाच्या पवित्र आत्म्याविरुद्ध पाप हे एक प्रकारचे पाप आहे जे खंडणीकरवी झाकता येत नाही. यात देवाच्या आत्म्याच्या कार्याविरुद्ध जाणूनबुजून बंड करणे, उदाहरणार्थ, यहुदा इस्कर्योत तसेच अनेक शास्त्री व परुशी यांचे भयंकर पाप समाविष्ट आहे.—मत्तय १२:२४, ३१, ३२; २३:१३, ३३; योहान १७:१२.
यहोवाच्या धार्मिकतेला उंचावणे
आध्यात्मिक इस्राएलांच्या शेषांना १९१९ या वर्षी यहोवाची कृपापसंती पुन्हा प्राप्त झाली तेव्हापासून, ते त्यांच्या सभोवतीच्या जगापेक्षा अधिकाधिक उन्नत झाले आहेत. हे त्यांच्या स्वतःच्या कोणत्या चांगुलपणामुळे नव्हे तर यहोवाचे नियम व दर्जे यांना स्वेच्छेने अधीन होण्यामुळे झाले आहे. परिणामस्वरूप, ख्रिस्ताची लाखो “दुसरी मेंढरे” आध्यात्मिक इस्राएलाच्या संगतीत निष्ठावान सोबती या नात्याने आणली गेली आहेत. (योहान १०:१६) देवाच्या धार्मिक दर्जांशी तिळमात्र संबंध नसलेल्या जगात हे लोक यहोवाला महिमा व सन्मान आणतात. व्यक्तिमत्त्व (इंग्रजी) या दक्षिण आफ्रिकी नियतकालिकाने एकदा निरीक्षण केल्याप्रमाणे हे आहे: “यहोवाचे साक्षीदार चांगल्या गुणांनी ओतप्रोत भरले आहेत व ते वाईटापासून जवळजवळ स्वतंत्रच आहेत असे वाटते.”
अभक्त जगात हा उन्नत दर्जा कायम राखण्यासाठी, ख्रिस्ती मंडळीतील प्रत्येक सदस्याने यहोवासमोर एक शुद्ध, सात्त्विक जीवन जगले पाहिजे. बायबलमध्ये यहोवाच्या स्वर्गीय संघटनेला शुद्ध गोष्टींद्वारे चित्रित करण्यात आले आहे. तिला, सूर्यतेज पांघरलेली व पायाखाली चंद्र असलेली स्त्री या दृष्टीने पाहण्यात येते. (प्रकटीकरण १२:१) नव्या जेरूसलेमेचे वर्णन, एक देखणी पवित्र नगरी असे करण्यात आले आहे. (प्रकटीकरण २१:२) ख्रिस्ताची वधू म्हणण्यात आलेल्यांतील विश्वासू सदस्यांना, “तेजस्वी व शुद्ध असे तागाचे वस्त्र” दिले जाते. (प्रकटीकरण १९:८) मोठ्या लोकसमुदायापैकी एक असलेल्यांना, ‘शुभ्र झगे परिधान केलेले’ असे पाहण्यात येते. (प्रकटीकरण ७:९) नीतिमत्त्वाकडे कल असलेले लोक एका शुद्ध संघटनेकडे आकर्षित होतात. याउलट, सैतानाची संघटना अशुद्ध आहे. त्याची धार्मिक व्यवस्था एक कळवंतीण म्हणून चित्रित करण्यात आली आहे व पवित्र नगरीच्या बाहेर असलेल्यांचे अस्वच्छ, अशुद्ध असे वर्णन करण्यात आले आहे.—प्रकटीकरण १७:१; २२:१५.
धार्मिकांना सार्वकालिक जीवनाचे अभिवचन देण्यात आले आहे. यहोवाची धार्मिकता उंचावणाऱ्या संघटित लोकांना दुष्ट व्यवस्थीकरणाच्या नाशातून बचावण्याची उज्ज्वल आशा आहे. नीतिसूत्रे १:३३ या वचनात, देव अभिवचन देतो, “जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो, आणि अरिष्टाची भीति नसल्यामुळे स्वस्थ असतो.”
थोर शलमोन, ख्रिस्त येशू, नव्या जगावर धार्मिकतेने, देवाचे भय धरून राज्य करील ते केवढे उल्हासदायक असेल! (२ पेत्र ३:१३) ते निरभ्र आकाश असलेल्या पहाटेच्या सूर्यप्रकाशासारखे असेल. पृथ्वीचे सर्व रहिवाशी सुरक्षित राहतील, प्रत्येक जण जणू आपापल्या द्राक्षलता व अंजीराच्या वृक्षाखाली बसेल. धार्मिक मानवी समाज पृथ्वीला सुंदर बनवेल व विश्वात त्याची हक्काची जागा घेईल ज्याकरवी आपला देव यहोवा याची सर्वकाळ स्तुती होईल.—मीखा ४:३, ४; यशया ६५:१७-१९, २५ देखील पाहा.
[२६ पानांवरील चित्राचे श्रेय]
Garo Nalbandian