संप्रदाय सत्याच्या विसंगतीत असतात तेव्हा
धोका—हे पाणी पिण्यास योग्य नाही. अशा सूचना पाहणे आपल्यासाठी कदाचित सामान्य असेल. अनेक भागांमध्ये आपण काय पितो याबद्दल लोक चौकस आहेत कारण काही पाणी पुरवठे विषारी पदार्थांनी प्रदूषित, “चेटकीणीचे पेय” असे संबोधण्यात आलेल्या पदार्थाने विषारी होत आहेत हे त्यांना माहीत आहे. एक अहवाल म्हणतो, की या प्रदूषणाच्या परिणामस्वरूपात पाणी “जीवनाचा आधार व रक्षक” असण्याऐवजी, “रोगजंतू व . . . रासायनिक दूषक पसरविण्याचे माध्यम” होऊ शकते.—पाण्याचे प्रदूषण (इंग्रजी).
सत्याच्या पाण्याला दूषित करणे
सत्याच्या विसंगतीत असणारे संप्रदाय दूषित पाणी पुरवठ्यांसारखे आहेत. संप्रदाय—एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला देण्यात आलेली माहिती, मते, समजुती किंवा रितीरिवाज—जे वस्तुतः, खोट्या, मार्गभ्रष्ट करणाऱ्या कल्पना व तत्त्वज्ञानरूपी ‘चेटकीणीच्या पेयाने’ दूषित आहेत, यांना आपण प्रांजळपणे धरून राहू शकतो. दूषित पाण्यासारखेच हे सुद्धा अगणित अपाय—आध्यात्मिक अपाय करू शकतात.
आपल्या सांप्रदायिक धार्मिक समजुती बायबलवर आधारित आहेत असे आपणास वाटत असले तरीही आपण सर्वांनी त्यांचे काळजीपूर्वक परीक्षण करण्यास वेळ काढला पाहिजे. मार्टिन ल्यूथर त्याच्या दिवसातील सांप्रदायिक समजुतीला धरून राहिला व त्याने कोपरनिकसचे खंडन केले तेव्हा आपल्याला बायबलचा पाठिंबा आहे याची त्यास खात्री होती हे लक्षात असू द्या. तथापि, ‘मोठ्या मनाने ह्या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी शास्त्रात दररोज शोध’ करणाऱ्या प्राचीन बिरुयातील लोकांचे उत्तम उदाहरण अनुसरण्यात ल्यूथर अपयशी ठरला.—प्रेषितांची कृत्ये १७:१०, ११.
सांप्रदायिक समजुतींमुळे येशूच्या दिवसातील काही यहुद्यांना झालेला अपाय विचारात घ्या. आपले संप्रदाय खरे आहेत असे ते ठामपणे समजत होते. येशूचे शिष्य ते संप्रदाय पाळत नाहीत अशी हरकत त्यांनी घेतली तेव्हा, “तुम्हीहि आपल्या संप्रदायेकरून देवाची आज्ञा का मोडता?,” असा प्रश्न विचारून येशूने त्यास आव्हान केले. (मत्तय १५:१-३) काय चुकले होते? यशया संदेष्ट्याचे शब्द उद्धृत करताना येशूने समस्या ओळखली: “ते व्यर्थ देवाची उपासना करितात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवितात ते असतात मनुष्याचे नियम.” (तिरपे वळण आमचे)—मत्तय १५:९; यशया २९:१३.
होय, देवाकडून असलेल्या सत्यांचे स्थान त्यांनी मनुष्ये किंवा त्याहूनही वाईट म्हणजे पिशाच्च्यांकडून असलेल्या कल्पनांना दिली. उदाहरणार्थ, शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी, (इंग्रजी) खंड १, पृष्ठ ५०६, स्पष्टीकरण देते: “त्या काळातील परूशी असे शिकवत होते की एकदा का कोणी त्याच्या मालकीच्या वस्तू ‘कुर्बान’ किंवा देवाला अर्पित अशी भेटवस्तू म्हणून जाहीर केल्या की मग त्याचे पालक कितीही गरजू असले तरीही, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो या वस्तूंचा उपयोग करू शकत नव्हता. तथापि त्याची इच्छा असल्यास तो स्वतः अशा वस्तूंचा उपयोग त्याला मृत्यू येईपर्यंत करू शकत होता.” सत्याचे पाणी दूषित करणाऱ्या मानवी बुद्धीचे, आध्यात्मिक दृष्टीने यहुद्यांवर वाईट परिणाम झाले. अधिकांश लोकांनी तर अनेक वर्षांपासून अपेक्षित असलेल्या त्यांच्या मशीहाला सुद्धा नाकारले.
ख्रिस्ती धर्मजगत प्रदूषणात भर घालते
येशूच्या मृत्यूनंतर अशाच प्रकारचे आध्यात्मिक नुकसान झाले होते. त्याचे अनुयायी असल्याचा दावा करणाऱ्यांपैकी अनेक जण, नवीन शिकवणुकींसाठी आधाराकरता मौखिक संप्रदायाकडे वळले. मॅकक्लिंटॉक व स्ट्राँग यांच्या बायबलीय, धर्मशास्त्रीय व धर्मोपदेशकीय वाङ्मयाचा ज्ञानकोश (इंग्रजी) या ग्रंथानुसार, काही तथाकथित ख्रिश्चनांची समजूत होती की हा संप्रदाय म्हणजे “प्रथम ख्रिश्चन चर्चनी, प्रेषितांच्या मुखातून ग्रहण केलेल्या सूचना होत्या ज्या प्रेषितांच्या काळातून देण्यात आल्या व त्यांच्या दिवसांपर्यंत शुद्ध स्वरूपात जतन करण्यात आल्या होत्या.”—तिरपे वळण आमचे.
वास्तविकपणे या संप्रदायांपैकी पुष्कळ संप्रदाय म्हणजे अशुद्ध, अयोग्य कल्पना होत्या. ज्ञानकोश स्पष्ट करतो त्याप्रमाणे, हे नवीन तत्त्वज्ञान “केवळ इतर संप्रदायांशी नव्हे, तर त्यांना उपलब्ध असलेल्या प्रेषितांच्या लिखाणांशीच विसंगत होते.” हे अगदीच अनपेक्षित नव्हते. प्रेषित पौलाने ख्रिश्चनांना ताकीद दिली होती: “ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्त्वज्ञान व पोकळ भुलथापा ह्यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या.”—कलस्सैकर २:८.
आजसुद्धा, अनेक सांप्रदायिक समजुती “प्रेषितांच्या लिखाणांशीच विसंगत” आहेत. ख्रिस्ती धर्मजगताने त्रैक्य, नरकाग्नी, मानवी जिवाचे अमरत्व, राष्ट्रवाद व मूर्तिपूजा यांसारख्या अनेक दुरात्मा-प्रेरित कल्पनांनी सत्याचे पाणी विषारी केले आहे.a (१ तीमथ्य ४:१-३) ख्रिस्ती धर्मजगताच्या सांप्रदायिक शिकवणुकी बनल्या, त्या दुरात्मिक शिकवणुकींना बळी पडलेल्या लोकांना जो आध्यात्मिक आजार जडला त्याला इतिहास साक्ष देतो.—पडताळा यशया १:४-७.
सत्याला असे दूषित करणे, वस्तुतः मानवाच्या सुरवातीपासून चालत आले आहे. सैतानाने, लोकांची मने असत्य व फसवणुकींच्या विषाने भरण्याची जी प्रक्रिया एदेन बागेत सुरू केली होती ती पुढे चालवली आहे. (योहान ८:४४; २ करिंथकर ११:३) नोहाच्या दिवसांतील जलप्रलयानंतर मानवी कुटुंब संपूर्ण पृथ्वीवर पसरले तसे दुरात्मा-प्रेरित तत्त्वज्ञान व कल्पनांकरवी मानवी ज्ञानाच्या भांडारांना जे जाणूनबुजून विषारी करण्यात आले त्याला सर्व संस्कृतीचे लोक बळी पडले आहेत.
आध्यात्मिक प्रदूषणाचे परिणाम
अशा प्रकारच्या आध्यात्मिक दूषणामुळे काय नुकसान होऊ शकते? आपण याची तुलना, दूषित पाण्याने आपल्या शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांशी करू शकतो. एक अधिकारी म्हणतो: “जवळजवळ २० कोटी लोक त्वचेवर दूषित पाण्याने होणाऱ्या स्खिसटोसोमियॅसिस (बिलहरझीया) [म्हणजे स्नेल फीवर, ज्यामुळे रक्ताचा अभाव, अस्वस्थता, सामान्यपणे आजारपण व मृत्यूसुद्धा ओढावतो] या रोगाने ग्रस्त आहेत. पन्नास कोटी लोक, अंघोळीसाठी वापरण्यात येणारे पाणी घाणेरडे असल्यामुळे, अंधत्वाचे प्रमुख कारण असलेल्या ट्रॅखोमाने पीडित आहेत. . . . मानव प्राणिमात्रांतील साधारण दोन अरब लोकांना पिण्याचे सुरक्षित पाणी उपलब्ध नाही” (आमचा देश, पृथ्वी ग्रह) (इंग्रजी). कोट्यावधी लोक खोट्या, दुरात्मिक शिकवणुकींनी दूषित झालेल्या संप्रदायांचे पालन केल्यामुळे आध्यात्मिकरित्या कमजोर, अंध व मृत देखील झाले आहेत.—१ करिंथकर १०:२०, २१; २ करिंथकर ४:३, ४.
उदाहरणार्थ, अनेक जण येशू ख्रिस्त व त्याचा पिता, यहोवा देव यांच्या नातेसंबंधाविषयी गोंधळात पाडले गेले आहेत किंवा त्यांना अंध करण्यात आले आहे. ख्रिश्चन असल्याचा दावा करणाऱ्यांपैकी काहींमध्ये देवाचे पवित्र नाव, यहोवा, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतून काढून टाकण्याची रीत बनली. बायबलीय वाङ्मयाचे नियतकालिक (इंग्रजी) यात जॉर्ज हॉवर्ड म्हणतात: “आमच्या मते, चार इब्री वर्ण काढून टाकल्याने, प्राथमिक विदेशी ख्रिश्चनांच्या मनात ‘प्रभू परमेश्वर’ व ‘प्रभू ख्रिस्त’ यांच्या नातेसंबंधाविषयी गोंधळ निर्माण झाला.”
मानवी जीव अमर असल्याचे सांगणाऱ्या अशास्त्रीय संप्रदायामुळे माजलेला गोंधळ, अंधश्रद्धा व भय, या गोष्टीसुद्धा विचारात घ्या. (पडताळा उपदेशक ९:५; यहेज्केल १८:४.) किती लोक पूर्वजांच्या भक्तीच्या दास्यत्वात आहेत किंवा मृत लोक त्यांना अपाय करण्यासाठी परत येतील या भयात वावरत आहेत? या समजुतीने लोकांना, स्वतःचा व इतरांचा जीव घेण्यास प्रोत्साहनसुद्धा दिले आहे.
अनेक जपानी लोकांना वाटते, की मृत्यू होईल तेव्हा त्यांचे विलग झालेले आत्मे पलीकडील जगात जाऊन भेटतील. या कारणास्तव स्वतः आत्महत्या करणाऱ्या काही पालकांना त्यांच्या मुलांनाही मारून टाकणे उत्तम वाटले आहे. जपानी विचारपद्धतींचा इंग्रजी शब्दकोश (इंग्रजी) स्पष्ट करतो: “जपानमध्ये आत्महत्येचे नेहमीच खंडन केले जात नाही, तर ती अनेकदा एखाद्याच्या गंभीर पातकासाठी क्षमा मागण्याची स्वीकरणीय पद्धत समजली जाते . . . कौटुंबिक आत्महत्येसंबंधी सुद्धा सहानुभूतीच्या शब्दांत बोलले जाऊ शकते.”
संप्रदायांचे परीक्षण करा
सांप्रदायिक समजुतींचे व रितीरिवाजांचे आंधळेपणाने अनुकरण करण्यात समाविष्ट असलेल्या धोक्यांचा विचार करता, आपण काय करावयास हवे? पहिल्या शतकाच्या शेवटास, प्रेषित योहानाने सहख्रिश्चनांना पुढील सल्ला दिला: ‘प्रियजनहो, प्रत्येक प्रेरित अभिव्यक्तीचा विश्वास धरू नका, तर त्या अभिव्यक्ती देवापासून आहेत किंवा नाहीत ह्याविषयी त्यांची परीक्षा करा [जशी तुम्ही पाण्याच्या शुद्धतेची परीक्षा कराल तशी] कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात उठले आहेत.’ (१ योहान ४:१; १ थेस्सलनीकाकर ५:२१ देखील पाहा.) एखादा संप्रदाय अपायकारक आहे हे तुम्हाला कसे कळते? तुम्ही बाळगता त्या समजुतींची परीक्षा करण्यासाठी तुम्हाला आधारभूत ग्रंथाची किंवा शुद्धतेच्या विशिष्ट दर्जाची गरज आहे.
बायबल असा एक आधारभूत ग्रंथ आहे. येशू ख्रिस्ताने सांगितले: “तू त्यांना खरेपणात पवित्र कर; तुझा शब्द हाच खरेपण आहे.” (योहान १७:१७, पंडिता रमाबाई भाषांतर) तो असेही म्हणाला: “तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करितील अशी वेळ येत आहे; किंबहुना आलीच आहे.” (योहान ४:२३) देवाच्या प्रेरित वचनाचा उपयोग केल्याने, तुम्ही मानवी व दुरात्मिक तत्त्वज्ञानाच्या दूषित पाण्याऐवजी सत्याच्या शुद्ध पाण्यापर्यंत पोहंचता.—योहान ८:३१, ३२; २ तीमथ्य ३:१६.
लक्षात असू द्या, प्रदूषकांचे फार कमी प्रमाणामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात. काहीवेळा हे परिणाम स्पष्ट होण्यास कित्येक वर्षे लागतात. जागतिक संरक्षण संघाचे माजी अध्यक्ष श्रीदत्त रामफल म्हणतात, “घाणेरडे पाणी जगातील अत्याधिक धोकादायक संहारक बनले आहे. कमीतकमी पंचवीस हजार लोक त्याचा उपयोग केल्याने दररोज मृत्यूमुखी पडतात.” आध्यात्मिकरित्या दूषित असलेले संप्रदाय तर त्याहूनही अधिक धोकादायक आहेत.
तुम्ही अनेक वर्षांपासून पाळत आलेल्या सांप्रदायिक समजुती सत्याच्या विसंगतीत आहेत असे कळून आल्यास त्यातून स्वतःला मोकळे करून घेण्याचे धाडस तुम्हामध्ये आहे का? इशाऱ्यांकडे लक्ष द्या. तुमचे संप्रदाय देवाच्या शुद्ध सत्यवचनाच्या एकवाक्यतेत असल्याची खात्री करून, स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे संरक्षण करा.—स्तोत्र १९:८-११; नीतिसूत्रे १४:१५; प्रेषितांची कृत्ये १७:११.
[तळटीपा]
a अशा शिकवणुकींना बायबलचा कोणताही आधार नाही याच्या पुराव्यासाठी शास्त्रवचनांतून युक्तीवाद करणे (इंग्रजी) पाहा. हे पुस्तक वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी यांनी प्रकाशित केले आहे.
[७ पानांवरील चित्रं]
देवाचे सत्यवचन शुद्ध, निर्मळ पाण्याच्या झऱ्यासारखे आहे