संप्रदाय सत्याच्या विसंगतीत असावा का?
मार्टिन ल्यूथर यास, त्याचे म्हणणे खरे असल्याची खात्री होती. बायबल आपले समर्थन करते असा त्याचा विश्वास होता. दुसऱ्या बाजुला पाहता, पोलिश खगोलशास्त्रज्ञ कोपरनिकसच्या विचारात, त्याच्या दिवसातील सांप्रदायिक समजूत चुकीची होती.
कोणती समजूत? पृथ्वी विश्वाचे केंद्र असून सर्वकाही तिच्याभोवती फिरते, ही समजूत. कोपरनिकसने, पृथ्वी स्वतःच सूर्याभोवती परिभ्रमण करते हे सत्य होते असे सांगितले. ल्यूथरने, “लोक एका उपटसुंभ फल-ज्योतिषाचे ऐकतात, ज्याने आकाश किंवा आकाशाचे घुमट, तसेच सूर्य व चंद्र नव्हे, तर पृथ्वी परिभ्रमण करते हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला” असे म्हणून त्याचे म्हणणे खोडून काढले. —पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा इतिहास (इंग्रजी).
सांप्रदायिक समजुती व वस्तुस्थितींत म्हणजेच सत्यात, अनेकदा विसंगती आढळली आहे. त्या, लोकांना अपायकारक गोष्टी करावयासही प्रवृत्त करू शकतात.
अर्थात, संप्रदाय नेहमीच सत्याच्या विसंगतीत असतो असा याचा अर्थ होत नाही. खरे तर, प्रेषित पौलाने त्याच्या दिवसातील ख्रिश्चनांना, त्याने दिलेले संप्रदाय पाळत राहण्याचे उत्तेजन दिले: “मी तुम्हाला सांगून ठेवलेले विधि [संप्रदाय] जशाचे तसे दृढ धरून पाळता, ह्याबद्दल मी तुमची वाहवा करितो.”—१ करिंथकर ११:२; २ थेस्सलनीकाकर २:१५; ३:६ देखील पाहा.
पौलाने “विधि” (संप्रदाय) म्हटले तेव्हा त्याचा काय अर्थ होता? शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी), खंड २, पृष्ठ १११८ वर सूचित करते, की “संप्रदाय” यासाठी त्याने वापरलेल्या पॅ·राʹडो·सिस या ग्रीक शब्दाचा अर्थ, “तोंडी किंवा लेखी स्वरूपात कळविण्यात आलेले” असा होतो. इंग्रजी शब्दाचा अर्थ, “पालकांनी अपत्यांस दिलेली किंवा विचार करण्याची वा वागण्याची प्रस्थापित रीत बनलेली माहिती, सिद्धांत अथवा प्रघात”a असा होतो. पौलाने दिलेले संप्रदाय चांगल्या उगमातून आल्यामुळे, ख्रिश्चनांनी त्यांना दृढ धरून पाळणे योग्य होते.
तथापि स्पष्टपणे, संप्रदाय खरा किंवा खोटा, चांगला किंवा वाईट असू शकतो. उदाहरणार्थ, ब्रिटिश तत्त्वज्ञानी बर्ट्रंड रस्सेल, १६ व्या शतकातील कोपरनिकससारख्या लोकांची प्रशंसा करतात ज्यांच्याठायी सांप्रदायिक समजुतींवर वाद घालण्याचा प्रामाणिकपणा व धाडस होते. त्यांनी, “प्राचीन काळापासून समजले जाते ते खोटे असू शकते हे मान्य केले.” आंधळेपणाने संप्रदाय न अनुसरण्यातील सुज्ञता तुम्हालाही दिसते का?—पडताळा मत्तय १५:१-९, १४.
मग, धार्मिक समजुती व रितीरिवाजांविषयी काय? ते योग्य आहेत व अपायकारक नाहीत असे आपण गृहीत धरू शकतो का? आपणास ते कसे जाणता येईल? धार्मिक संप्रदाय खरोखर सत्याच्या विसंगतीत आहेत असे आपणास आढळल्यास आपण काय करावे? पुढील लेख या प्रश्नांचे परीक्षण करील.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी यांनी प्रकाशित केलेले.