उत्तम जीवनाचे अभिवचन दिले आहे
जीवनाला कठीण बनवणाऱ्या समस्यांतून तुम्हाला मुक्त व्हावेसे वाटते का? या नियतकालिकाच्या पहिल्या आणि शेवटल्या पानांवरील चित्रात दाखवल्याप्रमाणे आल्हाददायक जीवन असलेल्या जगात तुम्हाला जगण्यास आवडेल का? ते चित्र जरा निरखून पाहा. लोकांकडे खाण्यासाठी विपुल अन्न आहे. ते खरोखरच त्या स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद लुटतील. प्रत्येकजण आनंदी आहे. वेगवेगळ्या जातीचे लोक एकमेकांसोबत शांतीत आहेत. प्राणी देखील शांतीत आहेत! कोणीही भांडत नाही. कोणीसुद्धा गरीब नाही. कोणीही आजारी नाही. तेथे शोभिवंत परिसर, सुंदर झाडी आणि शुद्ध व निर्मळ पाणी आहे. किती उज्ज्वल दृश्य!
ही पृथ्वी कधी अशी होईल का? होय, ती एक परादीस होईल. (लूक २३:४३) ज्या देवाने पृथ्वी निर्माण केली त्याने, मानव एका परादीस पृथ्वीवर उत्तम जीवनाचा आनंद घेतील असे उद्देशिले आहे. तुम्ही सुद्धा तेथे असू शकाल!
तुम्हाला कोणत्या प्रकारचे जीवन आवडेल?
भवितव्यातील पार्थिव पृथ्वी, आपण आता ज्या जगामध्ये राहत आहोत त्यापासून कशी वेगळी असेल? सध्या, एक अब्जापेक्षा अधिक लोक दररोज उपाशी असतात. परंतु देवाने उद्देशिलेल्या परादीसमध्ये, सर्वांकडे खाण्यासाठी विपुल अन्न असेल. बायबल अभिवचन देते: ‘सेनाधीश यहोवा सर्व राष्ट्रांसाठी मिष्टान्नाची मेजवानी, राखून ठेवलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करील.’ (यशया २५:६) तेथे अन्नाची कमतरता नसेल कारण बायबल म्हणते: ‘भूमीत भरपूर पीक येईल, पर्वतांच्या शिखरांवर ते डोलेल.’—स्तोत्र ७२:१६.
आज, अनेक जण झोपडपट्टीत वास्तव्य करून आहेत, किंवा ते त्यांच्या घराचे भाडे भरण्यासाठी झटत आहेत. इतरांना घरे नसून ते रस्त्यांवरच झोपतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगातील दहा कोटीपेक्षा अधिक मुले बेघर आहेत. परंतु येणाऱ्या परादीसमध्ये, सर्वांना स्वतःच्या मालकीचे घर असेल. देवाचे वचन म्हणते: “ते घरे बांधून त्यात राहतील. द्राक्षांचे मळे लावून त्यांचे फळ खातील.”—यशया ६५:२१.
पुष्कळांना ते जे काम करतात ते आवडत नाही. बहुतेकवेळा ते रक्ताचे पाणी करून कष्ट करतात पण त्याच्या मोबदल्यात त्यांना अपुरा पगार मिळतो. जगामध्ये प्रत्येकी ५ मनुष्यांपैकी १ मनुष्य दरवर्षी, ५०० डॉलरपेक्षा कमी पगारावर जगतो. परंतु येणाऱ्या परादीसमध्ये लोकांना त्यांचे काम आवडेल आणि त्यातून येणारे उत्तम लाभ ते पाहतील. देव अभिवचन देतो: “माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगितील. त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत.”—यशया ६५:२२, २३.
आता, रोगराई आणि आजारपण सगळीकडेच आहे. पुष्कळ लोक अंधळे आहेत. काही बधिर आहेत. इतरांना चालता येत नाही. पण परादीसमध्ये लोक, रोग आणि आजारातून मुक्त होतील. यहोवा म्हणतो: “मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.” (यशया ३३:२४) आधीच विकलांग असलेल्यांसाठी हृदयाला उबदार वाटणारे अभिवचन आहे: “तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्यांचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे [काळवीटाप्रमाणे] उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील.”—यशया ३५:५, ६.
सध्याच्या काळात, कष्ट, यातना आणि दुःख व मृत्यू आहे. परंतु पृथ्वीवरील परादीसमध्ये या सर्व गोष्टी अस्तित्वात राहणार नाहीत. होय, मृत्यू देखील नाहीसा होईल! बायबल म्हणते: “देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:३, ४.
स्पष्टपणे मग, यहोवाने अभिवचन दिलेल्या पार्थिव परादीसचा अर्थ, मानवजातीसाठी उत्तम जीवन असेल. परंतु ते येईल याची आपल्याला खात्री कशी होऊ शकते? ते कधी आणि कसे येईल? तुम्ही तेथे असण्यासाठी काय केले पाहिजे?