वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 १०/१ पृ. ५-७
  • युद्ध नसलेले जग—केव्हा?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • युद्ध नसलेले जग—केव्हा?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • धर्म—एक मोठा अडथळा
  • धर्माचे भवितव्य
  • अपरिपूर्ण मानवी स्वभाव
  • येशू ख्रिस्त—शांतीचा अधिपती
  • शांती व निर्भयता—कोणत्या उगमा कडून?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • शांती, निर्भयता आणि ‘श्‍वापदाची मूर्ती’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • विफल प्रयत्नांची ५० वर्षे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • देवाकडील शांती केव्हा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 १०/१ पृ. ५-७

युद्ध नसलेले जग—केव्हा?

संयुक्‍त राष्ट्राची सनद ऑक्टोबर २४, १९४५ रोजी अंमलात आली. जागतिक शांतीसाठी मानवांनी बनवलेली ही बहुव्यापी अत्यंत चतुर योजना आहे. मूळचे ५१ सदस्य राष्ट्रांची मिळून बनलेली संयुक्‍त राष्ट्र संघटना, जागतिक इतिहासातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय संघटना बनली. तसेच, पहिल्यांदाच एक आंतरराष्ट्रीय संघटना शांती आणि सुरक्षितता तसेच युद्ध नसलेले जग आणण्याकरता सैन्य बळाला हाताशी धरू शकत होती.

आज, १८५ सदस्य राष्ट्रांचे असलेले संयुक्‍त राष्ट्र पूर्वीपेक्षा अधिक शक्‍तिशाली आहे. तेव्हा, इतिहासातील सर्वात शक्‍तिशाली आंतरराष्ट्रीय संघटना तिचे उदात्त उद्देश पूर्णपणे साध्य करण्यात अपयशी का ठरली बरे?

धर्म—एक मोठा अडथळा

जागतिक घडामोडींमध्ये धर्म निभावत असलेली भूमिका अधिक गुंतागुंत निर्माण करणारी गोष्ट आहे. हे खरे, की जगाच्या प्रमुख धर्मांनी, संयुक्‍त राष्ट्र संघटनेचा आरंभ झाल्यापासून तिला पाठिंबा देण्याची शपथ घेतली आहे. त्याच्या ५० व्या वर्धापन दिवसाचा उल्लेख करून पोप जॉन पॉल दुसरे यांनी, संयुक्‍त राष्ट्र “शांती वाढवणारे व सुरक्षित ठेवणारे सर्वात उत्कृष्ठ साधन” आहे असे म्हटले. जागतिक समाजाचे धार्मिक नेते त्यांच्या विचारांशी सहमत आहेत. पण धर्म आणि सरकारमधील हा चतुर स्नेहसंबंध, धर्म संयुक्‍त राष्ट्रासाठी एक अडथळा व उपद्रव बनला आहे या वास्तविकतेला लपवू शकत नाही.

अनेक शतकांपासून धर्माने राष्ट्रीय द्वेष, युद्ध आणि जातीयसंहार चेतवण्यास किंवा त्यास आधार देण्यास प्रमुख भूमिका निभावली आहे. अलीकडच्या काळांमध्ये धार्मिक कळकळीचा बहाणा करून, शेजाऱ्‍यांनी एकमेकांना ठार मारले आहे. बाल्कन्समध्ये चाललेल्या युद्धासंबंधी “जातीय शुद्धीकरण” ही संज्ञा विस्तृत प्रमाणावर वापरात आली. परंतु, तेथील लोकांमध्ये एकमेकांबद्दल जो हिंसात्मक द्वेष आहे तो जातीवर आधारित नसून धार्मिक संलग्नीकरणावर आधारित होता कारण बहुतेक धर्मांचे मूळ सारखेच आहे. होय, रक्‍ताने न्हाहून निघालेल्या भूतपूर्व युगोस्लाव्हियासाठी धर्मच जबाबदार आहे हे धर्माने कबूल केलेच पाहिजे, पण संयुक्‍त राष्ट्र त्याला थांबवू शकले नाही.

अगदी उचितपणे, कॉलेजमधील धर्माच्या एका प्राध्यापकाने अलीकडेच म्हटले, की “वाढती धार्मिक लढाऊवृत्ती असलेल्या शीतयुद्धोत्तर जगात, धर्म आणि जातीयसंहाराची तपासणी अस्वस्थतेला कारणीभूत ठरत असली तरी अधिक निकडीच्या प्राथमिकतेपैकी एक असेल.” जागतिक शांतीच्या प्रयत्नांमध्ये धर्म कशा प्रकारे अडथळे निर्माण करत आहे या गोष्टीची आज एक नवी जाणीव होत आहे.

संयुक्‍त राष्ट्राच्या १९८१ मधील एका घोषणेत असे म्हटले होते: “जगाच्या काही क्षेत्रांमध्ये असहिष्णुतेच्या आविष्कारांची आणि धर्म किंवा विश्‍वास यांच्याबाबतीत भेदभावांच्या अस्तित्वाची काळजी असल्यामुळे, अशा प्रकारच्या असहिष्णुतेचे आणि आविष्कारांचे लवकरात लवकर उच्चाटन करण्यासाठी तसेच धर्म आणि विश्‍वासाच्या आधारावरील भेदभावांना टाळण्यासाठी व त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी सर्व आवश्‍यक उपाययोजना अंगीकारण्यास दृढनिश्‍चयी.”

त्यांच्या घोषणेच्या सुसंगतेत, संयुक्‍त राष्ट्राने १९९५ हे वर्ष सहिष्णुतेचे वर्ष म्हणून जाहीर केले आहे. वास्तविकपणे बोलायचे झाले तर धर्माने विभाजलेल्या जगात शांती आणि सुरक्षितता साध्य करणे कधी शक्य होईल का?

धर्माचे भवितव्य

बायबलमधील प्रकटीकरणाच्या पुस्तकातील एक भविष्यवाणी याचे उत्तर देते. ते, एका लाक्षणिक ‘मोठ्या कलावंतिणीबद्दल’ बोलते जी ‘राणीप्रमाणे’ विराजमान आहे व “पृथ्वीवरच्या राजांवर राज्य” करते. ती “विलास” करते आणि तिचे संबंध जागतिक सरकारांसोबत आहेत. या सरकारांना ‘किरमिजी रंगाचे श्‍वापद’ असे चित्रित केले आहे, ज्याच्यावर ही कलावंतीण आरामात बसली आहे. (प्रकटीकरण १७:१-५, १८; १८:७) “मोठी बाबेल” असे नाव असलेल्या या शक्‍तिशाली आणि अनैतिक स्त्रीला, मूर्तिपूजक धर्मांचे उगमस्थान प्राचीन बाबेलवरून हे नाव पडले आहे. उचितपणे, आज ती कलावंतीण जगाच्या सर्व धर्मांचे प्रतिनिधीत्व करते, की ज्यांनी सरकारच्या घडामोडींमध्ये लुडबूड केली आहे.

कालांतराने, देव जंगली श्‍वापदाच्या लष्करी घटकांच्या मनांत कार्यहालचाल करण्यासाठी विचार घालील असा तो अहवाल पुढे म्हणतो. ते “कलावंतिणीचा द्वेष करितील, व तिला ओसाड व नग्न करितील, तिचे मांस खातील व तिला अग्नीत जाळून टाकतील.” (प्रकटीकरण १७:१६)a अशा प्रकारे शक्‍तिशाली राष्ट्रांना खोट्या धर्माला काढून टाकण्याची मोहीम हाती घेण्याची युक्‍ती लढवण्याद्वारे स्वतः यहोवा देवाने पुढाकार घेतलेला असेल. ऐषोआरामाची मंदिरे आणि देव्हारे असलेल्या जगव्याप्त धार्मिक व्यवस्था पूर्णपणे नष्ट केल्या जातील. शांती आणि सुरक्षितता स्थापन करताना धार्मिक अडथळा पुन्हा कधी येणार नाही. पण तेव्हा तरी पृथ्वीवर खरी शांती आणि सुरक्षितता असेल का?

अपरिपूर्ण मानवी स्वभाव

धर्माचा समूळ नाश केल्याने युद्ध नसलेले जग आणण्याचा मार्ग खराच मोकळा होऊ शकतो याची काही हमी आहे का? नाही. संयुक्‍त राष्ट्राला उपरोधिक परिस्थितीच्या सामोरे जात राहावे लागेल. एका बाजूला पाहता, लोकांना शांती आणि सुरक्षितता हवी आहे. तरीसुद्धा शांती आणि सुरक्षिततेला खरा धोका तर लोकांकडूनच आहे. द्वेष, गर्व, अहंता, स्वार्थीपणा आणि अज्ञान हे मानवी गुण सर्व संघर्ष आणि युद्धांची मूळ कारणे आहेत.—याकोब ४:१-४.

आपल्या दिवसांमध्ये लोक “स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई-बापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्‍वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली” असे होतील असे बायबलने भाकीत केले.—२ तीमथ्य ३:१-४.

“हे जग सामाजिक आणि नैतिक अरिष्टाने पीडित आहे, पुष्कळ समाजांमध्ये तर हे अरिष्ट अफाट प्रमाणात आहे,” असे महासचिव बुट्रोस बुट्रोस घॅली यांनी कबूल केले. कोणत्याही प्रमाणातील राजनैतिक युक्‍ती अपरिपूर्ण मानवी स्वभावाच्या घातक सवयींचा प्रभावलोप करू शकत नाहीत.—पडताळा उत्पत्ति ८:२१; यिर्मया १७:९.

येशू ख्रिस्त—शांतीचा अधिपती

स्पष्टतः, जागतिक शांती आणण्याचे सामर्थ्य संयुक्‍त राष्ट्रामध्ये नाही. त्याच्या सदस्यांची आणि समर्थकांची कितीही उदात्त ध्येये असली तरी ते सर्व अपरिपूर्ण मानव आहेत. बायबल म्हणते: “मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) शिवाय, देव ताकीद देतो: “अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही.”—स्तोत्र १४६:३.

यहोवा त्याचा पुत्र, “शांतीचा अधिपति” याच्याद्वारे काय साध्य करणार आहे ते बायबल भाकीत करते. यशया ९:६, ७ म्हणते: “आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील; त्याला अद्‌भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपति म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार.”

जगातील राष्ट्रे ५० वर्षांपासून विफल प्रयत्न करून थकली आहेत. फार लवकर ते वेश्‍यासमान धार्मिक संघटनांचा नाश करतील. मग, “राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभु” येशू ख्रिस्त आणि स्वर्गीय योद्ध्‌यांचे त्याचे सैन्य सर्व मानवी सरकारांचा नाश करील व जे देवाच्या सार्वभौमत्वाला नाकारतात त्यांना मृत्युदंड देईल. (प्रकटीकरण १९:११-२१; पडताळा दानीएल २:४४.) अशाप्रकारे यहोवा देव युद्ध नसलेले जग आणील.

[तळटीपा]

a मोठ्या बाबेलबद्दल प्रकटीकरणातील भविष्यवाणीच्या सखोल अभ्यासासाठी वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंकाने १९८८ मध्ये प्रकाशित केलेल्या प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! या पुस्तकाचे ३३ ते ३७ अध्याय पहा.

[७ पानांवरील चौकट]

संयुक्‍त राष्ट्रांबद्दल ख्रिश्‍चनांचा दृष्टिकोन

बायबल भविष्यवाणींमध्ये मानवी सरकारांना बहुधा जंगली श्‍वापदे म्हणून चित्रित केले आहे. (दानीएल ७:६, १२, २३; ८:२०-२२) यास्तव, अनेक दशकांपर्यंत वॉचटावर नियतकालिकाने प्रकटीकरण १३ आणि १७ अध्यायातील जंगली श्‍वापदे आजची जगीक सरकारे असल्याची ओळख दिली आहे. यामध्ये संयुक्‍त राष्ट्राचा देखील समावेश होतो जे प्रकटीकरणाच्या १७ व्या अध्यायातील सात डोकी आणि दहा शिंगे असलेल्या किरमिजी रंगाच्या श्‍वापदाला चित्रित करते.

परंतु, ही शास्त्रवचनीय भूमिका सरकार किंवा त्याच्या अधिकाऱ्‍यांबद्दल कोणत्याही प्रकारचा अनादर दाखवण्यास सूट देत नाही. बायबल स्पष्टपणे म्हणते: “प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन असावे; कारण देवापासून नाही असा अधिकार नाही; जे अधिकार आहेत ते देवाने नेमलेले आहेत, म्हणून जो अधिकाराला आड येतो; तो देवाच्या व्यवस्थेस आड येतो; आणि आड येणारे आपणावर दंड ओढवून घेतील.”—रोमकर १३:१, २.

या कारणामुळे, कडक राजनैतिक तटस्थता दाखवणारे यहोवाचे साक्षीदार मानवी सरकारांमध्ये हस्तक्षेप करत नाहीत. ते कधीही क्रांती भडकावत नाहीत किंवा सविनय कायदेभंगाच्या कृत्यांमध्ये भाग घेत नाहीत. उलट, मानवी समाजामध्ये कायदा आणि व्यवस्था राखण्यासाठी कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारच्या सरकाराची गरज आहे हे ते ओळखतात.—रोमकर १३:१-७; तीत ३:१.

जगाच्या इतर सरकारी मंडळांप्रमाणेच यहोवाचे साक्षीदार संयुक्‍त राष्ट्राकडे पाहतात. संयुक्‍त राष्ट्र देवाच्या संमतीने अस्तित्वात आहे हे ते कबूल करतात. बायबलच्या सुसंगतेत, यहोवाचे साक्षीदार सर्व सरकारांना योग्य आदर देतात व त्यांचे आज्ञापालन करतात, ही आज्ञाधारकता त्यांना देवाविरुद्ध पाप करण्यास लावत नाही तोपर्यंत.—प्रेषितांची कृत्ये ५:२९.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा