वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 १०/१ पृ. ३-५
  • विफल प्रयत्नांची ५० वर्षे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विफल प्रयत्नांची ५० वर्षे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • शांती आणि सुरक्षितता—असाध्य ध्येये
  • प्रसारमाध्यमाचा प्रभाव
  • शांति व निर्भयता—एक आशा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • शांती व निर्भयता—कोणत्या उगमा कडून?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • युद्ध नसलेले जग—केव्हा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • शांतता व निर्भयता—देवाच्या राज्याकडून
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 १०/१ पृ. ३-५

विफल प्रयत्नांची ५० वर्षे

“आम्ही, म्हणजे संयुक्‍त राष्ट्राच्या सदस्यांनी येणाऱ्‍या पिढ्यांना युद्धाच्या अरिष्टापासून वाचवण्याचा ठामनिश्‍चय केला आहे कारण आमच्या जीवनकालात युद्धाने दोन वेळा मानवजातीवर अगण्य दुःख आणले आहे, तसेच मूलभूत मानवी हक्कांवर, मानवी प्रतिष्ठा आणि मूल्यावर, पुरुष आणि महिला तसेच लहान आणि मोठ्या राष्ट्राच्या समान हक्कांवर विश्‍वास आणखी दृढ करण्याचा ठामनिश्‍चय केला, . . .”—संयुक्‍त राष्ट्राच्या सनदीची प्रस्तावना.

ऑक्टोबर २४, १९९५ हा संयुक्‍त राष्ट्राचा ५० वा वर्धापन दिन आहे. सर्व १८५ राष्ट्राचे चालू सदस्य सनदीत व्यक्‍त केलेल्या संघटनेच्या मूळ तत्त्वे आणि ध्येयांना वचनबद्ध आहेत: आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षितता टिकवून ठेवणे; जागतिक शांतीला धमकी देणाऱ्‍या आक्रमिक हल्ल्यांना आवर घालणे; राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध उत्तेजित करणे; वंश, लिंग, भाषा किंवा धर्म यांचा भेदभाव न बाळगता सर्व लोकांच्या मूलभूत स्वातंत्र्याचे रक्षण करणे आणि आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक समस्यांना सोडवताना आंतरराष्ट्रीय सहकार्य साध्य करणे.

गेल्या ५० वर्षांपासून संयुक्‍त राष्ट्र संघटनेने जागतिक शांती आणि सुरक्षा आणण्याचे उल्लेखनीय प्रयत्न केले आहेत. दाव्यानुसार, त्याने तिसरे महायुद्ध टाळले असेल व आण्विक बाँम्बच्या वापरामुळे मानवी जीवनाचा संपूर्ण नाश करण्याची पुनरावृत्ती घडवली नाही. संयुक्‍त राष्ट्राने कोट्यावधी मुलांसाठी अन्‍न आणि औषधे पुरवली आहेत. त्याने अनेक राष्ट्रांमध्ये आरोग्याचे दर्जे सुधारण्यासाठी हातभार लावला आहे आणि इतर गोष्टींमध्ये सुरक्षित पिण्याचे पाणी आणि घातक रोगांविरूद्ध रोगप्रतिबंधक लशी यांसारख्या गोष्टी पुरवल्या आहेत. कोट्यावधी निर्वासितांना धर्मादाय साहाय्य मिळाले आहे.

संयुक्‍त राष्ट्र संघटनेने जे काही साध्य केले त्याच्या मान्यतेत तिला पाच वेळा नोबेल पारितोषिक देण्यात आले. तरीदेखील, आपण अजूनही युद्ध नसलेल्या जगात राहात नाही ही जीवनाची दुःखदायक वास्तविकता आहे.

शांती आणि सुरक्षितता—असाध्य ध्येये

पन्‍नास वर्षांच्या पराकाष्ठेच्या प्रयत्नांनंतरही, शांती आणि सुरक्षितता अद्यापही असाध्य ध्येये आहेत. संयुक्‍त राष्ट्र महासभेच्या अलीकडच्या एका भाषणात अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी अशा शब्दांत त्यांची निराशा व्यक्‍त केली: “हे शतक आशा, संधी आणि संपादनासोबत गंभीर विनाश आणि निराशा यांनी देखील भरलेले आहे.”

१९९४ वर्ष संपले तसे, न्यूयॉर्क टाईम्सने निरीक्षले: “जवळजवळ १५० युद्धे किंवा चकमकी अद्यापही चालू आहेत ज्यामध्ये हजारो लोक मरण पावत आहेत—गणनेनुसार, सैनिकांपेक्षा नागरिकच मरत आहेत—आणि लाखो लोक निर्वासित होत आहेत.” १९४५ पासून सशस्त्र संघर्षामुळे दोन कोटींपेक्षा अधिक लोकांनी आपले जीव गमावले असा संयुक्‍त राष्ट्राच्या जनसंपर्क खात्याने अहवाल दिला. संयुक्‍त राष्ट्रासाठी अमेरिकेची महिला राजदूत मॅडलिन ऑलब्राईट यांनी नोंद केली, की “प्रादेशिक संघर्ष आता अनेक मार्गांनी अधिकच पाशवी होत आहेत.” मानवी हक्कांचा भंग आणि भेदभावांबद्दलच्या बातम्या दररोजच येतात. अनेक राष्ट्रे एकमेकांना मित्रत्वाने वागवण्याऐवजी एकमेकांचे सहन करीत आहेत.

संयुक्‍त राष्ट्राला त्याच्या सद्‌हेतूबद्दल १९८० च्या दशकापर्यंत जवळजवळ अपयश मिळाले आहे असे ब्रिटनचे राजदूत सर डेवीड हॅने यांनी कबूल केले. संयुक्‍त राष्ट्राचे महासचिव बुट्रोस बुट्रोस-घॅली यांनी विलापाने म्हटले, की शांती राखण्याबद्दलच्या कार्यहालचाली संबंधाने सदस्य राष्ट्रांमध्ये वाढती उदासीनता आणि शीण दिसून येतो. सदस्यांपैकी पुष्कळांना “संयुक्‍त राष्ट्र प्राथम्य देण्याजोगा पहिल्या क्रमांकाचा नाही असे वाटते,” असे त्यांनी समारोपात म्हटले.

प्रसारमाध्यमाचा प्रभाव

संयुक्‍त राष्ट्र इतके शक्‍तिशाली असल्याचे दिसत असले तरी, बहुतेकवेळा, राजनीती आणि प्रसारमाध्यम त्याच्या प्रयत्नांना हाणून पाडतात. संयुक्‍त राष्ट्राच्या सदस्यांनी त्याला पाठिंबा दिला नाही तर ते शक्‍तिहीन होईल. पण जनतेच्या मान्यतेविना संयुक्‍त राष्ट्राचे पुष्कळ सदस्य त्याला पाठिंबा देणारच नाहीत. उदाहरणार्थ, वॉल स्ट्रीट जर्नलनुसार, “सोमालिया आणि बॉस्निया येथील प्रेक्षणीय अपयशांमुळे पुष्कळ अमेरिकन लोकांना, संयुक्‍त राष्ट्र ही संघटना केवळ निरर्थक नव्हे तर वास्तविक रीत्या घातक आहे असा विश्‍वास करण्यास भाग पाडले.” जनतेच्या ह्‍या मनोवृत्तीमुळे, संयुक्‍त राष्ट्राला जे आर्थिक साहाय्य दिले जाते ते कमी करण्याचा प्रस्ताव मांडावा असे काही अमेरिकन राजकीय नेत्यांना वाटले.

वृत्त संघटनांना संयुक्‍त राष्ट्राची कडकपणे टीका करण्यास मुळीच लाज वाटत नाही. संयुक्‍त राष्ट्राच्या कार्यांच्या विविध पैलूंचे वर्णन करताना “पूर्णपणे अक्षमता,” “बोजड,” “अकार्यक्षम” आणि “निकामी” अशा प्रकारच्या शब्दांना निःसंकोचपणे वापरले गेले. द वॉशिंग्टन पोस्ट नॅशनल विकली एडीशनने अलीकडेच म्हटले, “संयुक्‍त राष्ट्र मंदगतीची नोकरशाही आहे जी वास्तविक जगासोबत जुळवून घेण्यास झटत आहे.”

रवांडा येथे झालेल्या कत्तलीबद्दल महासचिव बुट्रोस बुट्रोस घॅली यांनी व्यक्‍त केलेली निराशा एका वृत्तपत्राने उद्धृत केली. ते म्हणाले: “हे केवळ संयुक्‍त राष्ट्रासाठीच एक अपयश नाही; तर ते आंतरराष्ट्रीय समाजासाठी एक अपयश आहे आणि आपण सर्वजण या अपयशाला जबाबदार आहोत.” १९९३ मध्ये एका लोकप्रिय विशेष टेलिव्हिजन बातमीने म्हटले, की संयुक्‍त राष्ट्र “शांतीला असलेला सर्वात मोठा धोका—आण्विक शस्त्रांचा फैलाव थांबवण्यात अपयशी ठरले आहे.” एका टीव्ही कार्यक्रमात संयुक्‍त राष्ट्राबद्दल असे म्हणण्यात आले, की त्याचे “बोलणे अनेक दशकांपासून निव्वळ पाल्हाळ लावल्यासारखे आहे.”

अपेक्षाभंगाच्या या सार्वत्रिक भावनेमुळे संयुक्‍त राष्ट्राच्या अधिकाऱ्‍यांना चिंता लागली आहे व त्यांच्या निराशेत आणखी भर पडली आहे. इतकी निराशा असताना देखील, संयुक्‍त राष्ट्राच्या ५० व्या वर्धापनाच्या दिवशी पुष्कळ जणांच्या नवीकृत आशा आहेत व नव्याने सुरवात होण्याची वाट पाहत आहे असे दिसते. संयुक्‍त राष्ट्राच्या चुका कबूल करत असताना अनेकांच्या भावना प्रतिध्वनीत करत महिला राजदूत ऑलब्राईट म्हणाल्या: “आपण गतकाळात काय केले त्याविषयी बोलण्याचे थांबवून, भवितव्यात काय करणार आहोत त्याबद्दल बोलले पाहिजे.”

होय, हे जग कोठे चालले आहे? युद्ध नसलेले जग असेल का? आहे तर, संयुक्‍त राष्ट्र त्यामध्ये कोणती भूमिका निभावेल? शिवाय, तुम्ही देव-भीरू आहात तर स्वतःला विचारले पाहिजे, की ‘यामध्ये देव कोणती भूमिका निभावेल?’

[४ पानांवरील चौकट]

विफल प्रयत्न

युद्ध, दारिद्र्‌य, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार आहे तोपर्यंत शांती आणि सुरक्षितता राहू शकत नाही. संयुक्‍त राष्ट्राने अलीकडेच पुढील आकडेवार माहिती प्रकाशित केली.

युद्धे: “१९८९ आणि १९९२ दरम्यान झालेल्या ८२ सशस्त्र संघर्षांपैकी ७९ देशांतर्गत संघर्ष होते, एका जातीविरुद्ध दुसऱ्‍या जातीचे पुष्कळ संघर्ष होते; मृतकांपैकी ९० टक्के नागरिक होते.”—युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ द पब्लिक इन्फॉर्मेशन (युएनडीपीआय)

शस्त्रे: “४८ देशांमध्ये ९५ पेक्षा अधिक उत्पादक प्रत्येक वर्षी ५ आणि १० दशलक्ष या दरम्यान लष्करी शत्रूंना ठार मारण्यासाठी सुरुंग निर्माण करत आहेत असा अंदाज आयसीआरसी [इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस] लावते.”—युनायटेड नेशन्स हाय कमिश्‍नर फॉर रेफ्यूजिझ (युएनएचसीआर)

“आफ्रिकेमध्ये संपूर्ण १८ देशांमध्ये ३० दशलक्ष सुरुंग इतरत्र पसरलेले आहेत.”—युएनएचसीआर

दारिद्र्‌य: “संपूर्ण जगभरात, प्रत्येक पाच लोकांपैकी एक—सर्व जमेस धरून एक अब्जापेक्षा अधिक—दारिद्र्‌य रेषेखाली जगत आहेत आणि दर वर्षी अंदाजे १३ दशलक्ष ते १८ दशलक्षापर्यंत लोक दारिद्र्‌य संबंधित कारणांमुळे मरतात.”—युएनडीपीआय

गुन्हेगारी: “१९८० च्या दशकांपासून संपूर्ण जगभरात नोंदवलेल्या गुन्ह्यांची सरासरी ५ टक्क्यांनी वाढली आहे; एकट्या अमेरिकेत दरवर्षी ३५ दशलक्ष गुन्हे केले जातात.”—युएनडीपीआय

भ्रष्टाचार: “सार्वजनिक भ्रष्टाचार सर्वसामान्य होत आहे. काही देशांमध्ये, आर्थिक फसवणुकी, त्या देशाच्या वार्षिक एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या १० टक्क्यांच्या किंमतीएवढ्या असल्याचा अंदाज लावला जातो.”—युएनडीपीआय

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा