वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 १०/१ पृ. ८-१३
  • तुमच्या कुटुंबात देव प्रथम स्थानी येतो का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमच्या कुटुंबात देव प्रथम स्थानी येतो का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कौटुंबिक विरोधाचा पाश
  • आव्हानाला तोंड देणे
  • संभाव्य समृद्ध प्रतिफळ
  • येशूकडून शिकणे
  • पतींनो, पत्नींनो—ख्रिस्ताचे अनुकरण करा!
  • कौटुंबिक जीवन सुखी बनवण्याचा मंत्र
    बायबल नेमके काय शिकवते?
  • पतींनो—येशूच्या मस्तकपदाला मान द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • विवाहित जोडप्यांकरता सुज्ञ मार्गदर्शन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • कौटुंबिक जीवन यशस्वी करणे
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 १०/१ पृ. ८-१३

तुमच्या कुटुंबात देव प्रथम स्थानी येतो का?

“तू आपला देव परमेश्‍वर [यहोवा, NW] ह्‍याच्यावर संपूर्ण मनाने [अंतःकरणाने, NW] प्रीति कर.”—मार्क १२:२९, ३०.

१. यहोवावर आपण प्रीती करणे किती महत्त्वपूर्ण आहे?

“सर्वात पहिली आज्ञा कोणती?” असे एका शास्त्र्याने येशूला विचारले. येशूने याविषयी आपले स्वतःचे मत सांगण्याऐवजी अनुवाद ६:४, ५ मधील देवाच्या वचनास उद्धृत करून त्याच्या प्रश्‍नाचे उत्तर दिले. त्याने म्हटले: “पहिली ही की, हे इस्राएला, ऐक; आपला देव परमेश्‍वर [यहोवा] ह्‍याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्‍तीने प्रीति कर.”—मार्क १२:२८-३०.

२. (अ) येशूला कोणत्या विरोधाला तोंड द्यावे लागले? (ब) यहोवाला संतुष्ट करण्यास काही वेळा कोणती गोष्ट कठीण बनवते?

२ येशूने संबोधलेल्या पहिल्या—अति महत्त्वपूर्ण—आज्ञेचे पालन करण्यासाठी यहोवाला जे आवडते ते आपण सर्वदा करण्याची आवश्‍यकता आहे. येशूने तसेच केले. त्याच्या मार्गाबद्दल एके प्रसंगी प्रेषित पेत्राने तसेच दुसऱ्‍या प्रसंगी येशूच्या नजिकच्या नातेवाईकांनी आक्षेप घेतला असताना देखील येशूने आज्ञापालन केले. (मत्तय १६:२१-२३; मार्क ३:२१; योहान ८:२९) तुम्हीही अशाच प्रकारच्या परिस्थितीत असल्यास काय? समजा, तुमच्या कौटुंबिक सदस्यांची इच्छा, तुम्ही बायबल अभ्यास आणि यहोवाच्या साक्षीदारांसोबतचा सहवास सोडून द्यावा अशी आहे. अशा वेळी, देव ज्यामुळे संतुष्ट होतो ते करून त्याला तुम्ही प्रथम स्थान द्याल का? त्याची सेवा करण्याचा प्रयत्न करताना कौटुंबिक सदस्यांनी विरोध केला तरी देव प्रथम स्थानी येतो का?

कौटुंबिक विरोधाचा पाश

३. (अ) येशूच्या शिकवणींचा कुटुंबावर कदाचित कसा परिणाम घडू शकेल? (ब) कौटुंबिक सदस्य काहींबद्दल अधिक आपुलकी बाळगत असल्याचे त्यांना कसे दाखवू शकतात?

३ कुटुंबातील एखाद्या सदस्याने येशूच्या शिकवणींचा स्वीकार केल्याने इतर सदस्यांकडून येणाऱ्‍या त्रासाला येशूने क्षुल्लक लेखले नाही. त्याने म्हटले, “मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील.” तथापि, तो दुःखद परिणाम असतानाही कोणाला प्राधान्य द्यावे ते येशूने असे बोलून दाखवून दिले: “जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करितो तो मला योग्य नाही; जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करितो तो मला योग्य नाही.” (मत्तय १०:३४-३७) आपण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शिकवणींचा अवलंब करून देवाला प्रथम स्थान देतो कारण तो “त्याच्या [देवाच्या] तत्त्वाचे प्रतिरूप” आहे.—इब्रीयांस १:३; योहान १४:९.

४. (अ) येशूचा अनुयायी होण्यात काय समाविष्ट असल्याचे त्याने म्हटले? (ब) ख्रिश्‍चनांनी कौटुंबिक सदस्यांचा कोणत्या अर्थाने द्वेष करावा?

४ येशूचे खरे अनुयायी होण्यात वास्तविकपणे कोणत्या गोष्टींचा समावेश होतो याविषयी एके प्रसंगी चर्चा करताना त्याने म्हटले: “जो कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी ह्‍यांचा आणि आपल्या जिवाचाहि द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येत नाही.” (लूक १४:२६) त्याच्या अनुयायांनी खरोखर त्यांच्या कौटुंबिक सदस्यांचा द्वेष करावा असा येशूच्या बोलण्याचा अर्थ नक्कीच नव्हता; कारण त्याने लोकांना शत्रूंवर देखील प्रीती करण्याची आज्ञा दिली होती. (मत्तय ५:४४) उलटपक्षी, येथे येशूच्या बोलण्याचा अर्थ, त्याच्या अनुयायांनी देवापेक्षा कौटुंबिक सदस्यांवर कमी प्रेम करावे असा होता. (पडताळा मत्तय ६:२४.) ही समज अनुसरून, बायबल म्हणते की, लेआ याकोबाची “नावडती” होती पण राहेलीवर त्याने प्रेम केले; याचा अर्थ तो राहेलीवर जितकी प्रीती करत होता तितकी तिची बहीण लेआवर करत नव्हता. (उत्पत्ति २९:३०-३२) येशूने म्हटले, आपला ‘जीव’ किंवा जीवन याचा देखील द्वेष केला पाहिजे किंवा त्याच्यावर यहोवापेक्षा कमी प्रीती केली पाहिजे!

५. सैतान, कौटुंबिक व्यवस्थेचा धूर्तपणे दुरुपयोग कसा करतो?

५ निर्माणकर्ता आणि जीवनदाता म्हणून यहोवा त्याच्या सर्व सेवकांच्या संपूर्ण भक्‍तीच्या पात्रतेचा आहे. (प्रकटीकरण ४:११) प्रेषित पौलाने लिहिले, ‘स्वर्गांतील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते, त्या पित्यासमोर मी गुडघे टेकतो.’ (इफिसकर ३:१४, १५) यहोवाने कौटुंबिक व्यवस्था अशा अद्‌भुत रितीने निर्माण केली आहे ज्यामुळे कौटुंबिक सदस्यांना एकमेकांबद्दल स्वाभाविक आपुलकी असते. (१ राजे ३:२५, २६; १ थेस्सलनीकाकर २:७) तथापि, दियाबल सैतान या स्वाभाविक आपुलकीचा, ज्यामध्ये प्रिय जनांना संतुष्ट करण्याच्या इच्छेचा देखील समावेश होतो त्याचा धूर्तपणे दुरुपयोग करतो. तो कौटुंबिक विरोधाला तीव्र करतो; म्हणून बायबल सत्यासाठी दृढ भूमिका घेऊन या विरोधाला तोंड देण्यास अनेकांना हे एक आव्हानच वाटते.—प्रकटीकरण १२:९, १२.

आव्हानाला तोंड देणे

६, ७. (अ) बायबल अभ्यास आणि ख्रिस्ती सहवास याच्या महत्त्वाची रसिकता बाळगण्यास कौटुंबिक सदस्यांना कसे साहाय्य केले जाऊ शकते? (ब) आपली कौटुंबिक सदस्यांवर खरी प्रीती आहे, हे आपण कसे प्रदर्शित करू शकतो?

६ देवाला संतुष्ट करणे किंवा कौटुंबिक सदस्यांना संतुष्ट करणे या दोन्हींपैकी एकाची निवड करण्याची जबरदस्ती तुम्हावर केल्यास तुम्ही काय कराल? देवाच्या वचनाचा अभ्यास तसेच त्याच्या तत्त्वांचा अवलंब केल्याने कौटुंबिक दुफळी माजत असल्यास ते करण्याची अपेक्षा देव करीत नाही, तुम्ही असा तर्क कराल का? परंतु, याबद्दल विचार करा. तुम्ही नमते घेतले आणि तुमचा बायबल अभ्यास किंवा यहोवाच्या साक्षीदारांसोबत सहवास ठेवण्याचे बंद केल्यास, बायबलचे अचूक ज्ञान ही जीवन-मरणाची बाब असल्याचे तुमच्या प्रिय जनांना कशी समजेल?—योहान १७:३; २ थेस्सलनीकाकर १:६-८.

७ ही परिस्थिती आपण या रीतीने स्पष्ट करू शकतो: कदाचित, कौटुंबिक सदस्याला मद्याची अतिशय हाव आहे. त्याच्या पिण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करणे किंवा सुट देणे त्याच्याकरता खऱ्‍या लाभाचे असेल का? नमते घेऊन आणि त्याच्या समस्येबद्दल काहीही न करता शांती टिकवणे चांगले असेल काय? नाही, धैर्याने त्याच्या क्रोधाला व धमक्यांना तोंड द्यावे लागले तरी त्याने पिण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी त्याला मदत करण्याचा प्रयत्न करणे चांगले असेल, या गोष्टीला तुमची कदाचित सहमती असेल. (नीतिसूत्रे २९:२५) अशा प्रकारे, तुमच्या कौटुंबिक सदस्यांवर तुमचे खरोखर प्रेम असल्यास, बायबलचा अभ्यास करण्याचे थांबवावे म्हणून ते करीत असलेल्या प्रयत्नांमुळे तुम्ही नमते घेणार नाही. (प्रेषितांची कृत्ये ५:२९) दृढ भूमिका घेऊनच, ख्रिस्ताच्या शिकवणींनुसार राहण्याचा अर्थ, तुमचे जीवन आहे याची रसिकता बाळगण्याची मदत तुम्ही त्यांना देऊ शकाल.

८. येशूने विश्‍वासूपणे देवाची इच्छा पूर्ण केल्याच्या वास्तविकतेपासून आपल्याला कसा फायदा होतो?

८ काही वेळा, देवाला प्रथम स्थान देणे अधिक कठीण असू शकते. परंतु, सैतानाने येशूकरता देखील देवाची इच्छा पूर्ण करणे कठीण बनवले हे लक्षात घ्या. तरीही, येशूने माघार घेतली नाही; त्याने आपल्यासाठी वधस्तंभावरील यातना सहन केल्या. “आपला तारणारा येशू ख्रिस्त,” असे बायबल म्हणते. “येशू ख्रिस्त आपणांसाठी मरण पावला.” (तीतास ३:६; १ थेस्सलनीकाकर ५:१०) येशूने विरोधापुढे नमते घेतले नाही याबद्दल आपण ऋणी नाही का? त्याने बलिदानरूपी मृत्यू सहन केला म्हणून आपल्याला, त्याने ओतलेल्या रक्‍तावर विश्‍वास प्रकट केल्याने धार्मिकतेच्या शांतीदायक नवीन जगातील सार्वकालिक जीवनाची आशा आहे.—योहान ३:१६, ३६; प्रकटीकरण २१:३, ४.

संभाव्य समृद्ध प्रतिफळ

९. (अ) ख्रिश्‍चन दुसऱ्‍यांचा बचाव करण्यात कसे भाग घेऊ शकतात? (ब) तीमथ्याची कौटुंबिक परिस्थिती काय होती?

९ तुमचा भाग, इतरांचा तसेच तुमच्या प्रिय नातेवाईकांचा बचाव करण्यामध्ये देखील असू शकतो, याची जाणीव तुम्हाला झाली आहे का? प्रेषित पौलाने तीमथ्याला आर्जवले: “त्यातच [तुला शिकवलेल्या गोष्टींत] टिकून राहा; कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्‍यांचेहि तारण साधिशील.” (तिरपे वळण आमचे.) (१ तीमथ्य ४:१६) तीमथ्याचा ग्रीक पिता ख्रिस्ती विश्‍वासात नसल्यामुळे तीमथ्य विभाजित घरात राहिला. (प्रेषितांची कृत्ये १६:१; २ तीमथ्य १:५; ३:१४) तीमथ्याचा पिता विश्‍वासू बनला की नाही, याबद्दल आम्हाला काही माहीत नसले तरी त्याची पत्नी युनीके व तीमथ्य यांच्या विश्‍वासू वर्तनामुळे तो विश्‍वासू बनण्याची अधिक शक्यता वाढली होती.

१०. ख्रिस्ती विश्‍वासात नसणाऱ्‍या सोबत्यांसाठी ख्रिश्‍चन काय करू शकतात?

१० बायबल सत्याला दृढपणे उंचावून धरलेले पती आणि पत्नी गैरख्रिस्ती असलेल्या त्यांच्या सोबत्यांना विश्‍वासू बनण्यासाठी मदत करून त्यांचा बचाव होण्यास हातभार लावू शकतात, असे शास्रवचने दाखवतात. प्रेषित पौलाने लिहिले: “जर कोणाएका बंधूची पत्नी गैर ख्रिस्ती असली, आणि ती त्याच्याजवळ नांदावयास राजी असली, तर त्याने तिला सोडू नये. आणि ज्या स्त्रीचा पति ख्रिस्तीतर असून तिच्याजवळ राहावयास राजी असेल त्याला तिने सोडू नये. कारण हे पत्नी, तू आपल्या पतीला तारशील किंवा नाही हे तुला काय ठाऊक? हे पते, तू आपल्या पत्नीला तारशील किंवा नाही हे तुलाहि काय ठाऊक?” (१ करिंथकर ७:१२, १३, १६) पत्नींना आपल्या पतींचे तारण कसे करता येऊ शकते, याचे वर्णन प्रेषित पेत्राने देताना असे आर्जवले: “आपल्या पतीच्या अधीन असा; ह्‍यासाठी की, कोणी तुमचे भीडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचनावाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे.”—१ पेत्र ३:१, २.

११, १२. (अ) हजारो ख्रिश्‍चनांना कोणते प्रतिफळ मिळाले आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी त्यांनी काय केले? (ब) विश्‍वासू सहनशीलतेमुळे प्रतिफळ मिळालेल्या एका कौटुंबिक सदस्यांचा अनुभव सांगा.

११ अलीकडील वर्षांत, हजारो जन त्यांच्या साक्षीदार नातेवाईकांच्या ख्रिस्ती कार्याला काही महिनेच नव्हे तर वर्षांपर्यंत विरोध करीत राहिल्यानंतर यहोवाचे साक्षीदार झाले आहेत. दृढ टिकून राहिलेल्या ख्रिश्‍चनांकरता ते केवढे प्रतिफळ तसेच एके काळी विरोध करणाऱ्‍यांसाठी तो केवढा आशीर्वाद! भावना उचंबळून आलेल्या ७४ वर्षांच्या एका ख्रिस्ती वडिलांनी म्हटले: “मी विरोध करत असलेल्या वर्षांमध्ये, माझी पत्नी व मुले सत्याला जडून राहिल्यामुळे मी त्यांचे अनेकदा आभार मानतो.” त्यांनी म्हटले की, मी त्यांना तीन वर्षे हट्टीपणाने नाकारत राहिलो इतकेच नव्हे तर बायबलविषयी काही बोलण्यास पत्नीला अनुमतीही दिली नाही. त्यांनी म्हटले, “तिने माझी मानसिक स्थिती चांगली आहे असे पाहून माझे पाय दाबताना ती मला साक्ष देऊ लागली. मी विरोध करत असताना तिने माघार घेतली नाही, याबद्दल मी किती ऋणी आहे!”

१२ आपल्या कुटुंबाला विरोध करणाऱ्‍या आणखी एका पतीने लिहिले: ‘माझ्या पत्नीला सत्य मिळाल्यामुळे मी तिचा कट्टर शत्रू झालो, मी तिला धमकी दिली आणि प्रत्येक दिवशी आम्ही भांडत असू; मीच नेहमी भांडण काढत असे, असे म्हणू शकतो. परंतु सर्व काही व्यर्थ; माझ्या पत्नीने बायबल सोडले नाही. अशारितीने सत्य, माझी पत्नी व मुलगा यांविरुद्ध रानटी झुंज देण्यात बारा वर्षे निघून गेली. मी त्या दोघांसाठी साक्षात दियाबल होतो.’ सरतेशेवटी हा मनुष्य त्याच्या जीवनाचे परीक्षण करू लागला. त्याने म्हटले, ‘मी किती मनस्तापदायक होतो, हे स्वतः पाहिले. मी बायबल वाचले आणि त्याच्या मार्गदर्शनाच्या मदतीमुळे मी आता बाप्तिस्मा घेतलेला साक्षीदार आहे.’ पत्नीच्या महान प्रतिफळाचा विचार करा, होय विश्‍वासूपणे १२ वर्षे विरोध सहन करून तिने ‘पतीला तारण्यास’ मदत केली!

येशूकडून शिकणे

१३. (अ) येशूच्या जीवनक्रमापासून पती आणि पत्नी कोणता प्रमुख धडा शिकू शकतात? (ब) देवाच्या इच्छेच्या अधीन होण्यास कठीण वाटणाऱ्‍या लोकांना येशूच्या उदाहरणापासून कसा लाभ होऊ शकतो?

१३ पती-पत्नींनी, येशूच्या जीवनापासून शिकण्यासारखा मुख्य धडा, देवाला आज्ञाधारकपणा दाखवणे हा आहे. “जे त्याला आवडते ते मी सर्वदा करितो,” असे येशूने म्हटले. “मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाला पाहतो.” (योहान ५:३०; ८:२९) देवाच्या इच्छेचा विशेषपणे एक पैलू येशूला एकदा अप्रिय वाटला असताना देखील तो आज्ञाधारक होता. त्याने प्रार्थना केली, “तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर.” परंतु लगेच पुढे त्याने म्हटले, “तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” (लूक २२:४२) देवाने आपली इच्छा बदलावी म्हणून येशूने त्याच्याकडे विचारणा केली नाही; त्याच्याबद्दल असलेल्या देवाच्या इच्छेला आज्ञाधारकपणे अधीन होऊन देवावर खरोखर प्रीती असल्याचे त्याने दाखवले. (१ योहान ५:३) जसे येशूने देवाच्या इच्छेला सर्वदा प्रथम स्थान दिले तसेच केवळ सडेपणाच्या जीवनात नव्हे तर वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात असे करणे तितकेच महत्त्वाचे आहे. हे असे का आहे त्याचा जरा विचार करा.

१४. काही ख्रिश्‍चन अयोग्यपणे तर्क कसा करतात?

१४ आधी उद्धृत केल्यानुसार, विश्‍वासू जन देवाला प्रथम स्थान देतात, तेव्हा ते त्यांच्या ख्रिस्ती विश्‍वासात नसणाऱ्‍या सोबत्यांबरोबर राहण्याचा प्रयत्न करतात आणि तारणासाठी पात्र ठरण्यास त्यांना मदत करू शकतात. दोघे सोबती विश्‍वासू असले तरी, त्यांचा विवाह आदर्श असण्यापासून कदाचित दूरच असेल. पापमय प्रवृत्यांमुळे पती-पत्नींमध्ये एकमेकांबद्दल नेहमीच प्रेमळ विचार असत नाहीत. (रोमकर ७:१९, २०; १ करिंथकर ७:२८) काही लोक याही पुढे जातात, घटस्फोटासाठी कोणताही शास्त्रीय आधार नसला तरी दुसऱ्‍या सोबत्याचा शोध करतात. (मत्तय १९:९; इब्रीयांस १३:४) ते असा तर्क करतात की, त्यांच्याकरता हे चांगले आहे, कारण पती पत्नींनी एकत्र राहावे अशी देवाची इच्छा फारच कठीण आहे. (मलाखी २:१६; मत्तय १९:५, ६) देवाच्या विचारांवर मनन करण्याऐवजी मानवी विचारांवर विचार करणे ही आणखी एक बाब आहे, यात प्रश्‍नच नाही.

१५. देवाला प्रथम स्थान देणे संरक्षण का आहे?

१५ देवाला प्रथम स्थान देणे हे कसे सुरक्षिततेचे आहे! असे करणारे विवाहित जोडपे, एकमेकांशी जडून राहील आणि देवाच्या वचनातील सल्ल्याचा अवलंब करून त्यांच्या समस्या सोडवतील. अशा प्रकारे, त्याच्या इच्छेकडे दुर्लक्ष केले जाते तेव्हा होणाऱ्‍या सर्व प्रकारच्या दुःखांना ते टाळतात. (स्तोत्र १९:७-११) ही गोष्ट, घटस्फोट घेण्याच्या बेतात असताना बायबलचा सल्ला अनुसरण्याचे ठरवणाऱ्‍या एका तरुण जोडप्याच्या बाबतीत स्पष्ट दिसते. काही वर्षांनी पत्नीने विवाहातील तिच्या आनंदाबद्दल आठवून सांगताना असे म्हटले: “ही सर्व वर्षे मला माझ्या पतीपासून कदाचित वेगळे राहावे लागण्याच्या शक्यतेचा मी विचार करते तेव्हा, बसून मला रडावेसे वाटते. मग मी यहोवा देवाचे, त्याचा सल्ला आणि मार्गदर्शनाने आम्हाला अशा आनंदी नातेसंबंधात एकत्र आणल्याबद्दल आभार मानते.”

पतींनो, पत्नींनो—ख्रिस्ताचे अनुकरण करा!

१६. येशूने पती पत्नींसाठी कोणते उदाहरण मांडले?

१६ देवाला सर्वदा प्रथम स्थानी ठेवलेल्या येशूने पती-पत्नींसाठी उत्कृष्ट उदाहरण मांडले. त्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्याने ते चांगले करतात. पतींना, ख्रिस्ती मंडळीतील सदस्यांवर येशू ज्या रीतीने प्रेमळ मस्तकपद चालवतो तसेच अनुकरण करण्यास आर्जवले जाते. (इफिसकर ५:२३) ख्रिस्ती पत्नी, येशूने देवाला दाखवलेल्या अधीनतेच्या निर्दोष उदाहरणापासून शिकू शकतात.—१ करिंथकर ११:३.

१७, १८. येशूने पतींकरता कोणत्या मार्गांनी उत्तम उदाहरण मांडले?

१७ बायबल आज्ञा देते: “पतीनों, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली तशी तुम्हीहि आपआपल्या पत्नीवर प्रीति करा; ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले.” (इफिसकर ५:२५) घनिष्ट मित्र असण्याद्वारे येशूने त्याच्या मंडळीच्या अनुयायांबद्दल एका महत्त्वपूर्ण मार्गाने आपले प्रेम प्रदर्शित केले. येशूने म्हटले, “मी तुम्हाला मित्र म्हटले आहे; कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे.” (योहान १५:१५) येशूने आपल्या शिष्यांसोबत बोलण्यात घालविलेला वेळ—त्याने त्यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा केल्या—त्याने त्यांच्यावर भरवसा ठेवला—याचा विचार जरा करा! पतींकरता हे उत्कृष्ट उदाहरण नाही का?

१८ येशूने आपल्या शिष्यांबद्दल खरी आस्था दाखवली आणि त्याला त्यांच्याबद्दल खरी आवड होती. (योहान १३:१) त्याची शिकवण त्यांना समजली नाही तेव्हा त्या बाबींना स्पष्ट करण्यासाठी त्याने सहनशीलतेने खासगीरित्या वेळ काढला. (मत्तय १३:३६-४३) पतींनो, तुमच्या ख्रिस्ती पत्नीचे आध्यात्मिक कल्याण तुमच्याकरता तितकेच महत्त्वाचे आहे का? तुमच्या दोघांच्या मनात आणि अंतःकरणात बायबल सत्य स्पष्ट असल्याची खात्री करण्यासाठी तुम्ही तिच्यासोबत वेळ घालवता का? येशू त्याच्या प्रेषितांसोबत सेवेला गेला; कदाचित वैयक्‍तिकपणे प्रत्येकाला त्याने प्रशिक्षण दिले. घरोघर भेटी देणे आणि बायबल अभ्यास चालवणे, या सेवा तुम्ही तुमच्या पत्नीसोबत करता का?

१९. येशूने प्रेषितांच्या पुनःपुन्हा उद्‌भवणाऱ्‍या कमतरतांच्याबाबतीत ज्या रीतीने व्यवहार केला ते पतींसाठी एक उदाहरण कसे प्रस्तुत करते?

१९ प्रेषितांच्या अपरिपूर्णतांसोबत व्यवहार करताना, येशूने पतींसाठी उत्तम उदाहरण प्रस्तुत केले. प्रेषितांसोबतच्या त्याच्या शेवटच्या भोजन प्रसंगी, त्याला त्यांच्यामध्ये पुनः उद्‌भवलेला स्पर्धेचा आत्मा ओळखता आला. त्याने कठोरपणे त्यांची टीका केली का? नाही, त्याने नम्रपणे प्रत्येकाचे पाय धुतले. (मार्क ९:३३-३७; १०:३५-४५; योहान १३:२-१७) अशी सहनशीलता तुम्ही तुमच्या पत्नीच्या बाबतीत दाखवता का? पुनःपुन्हा घडणाऱ्‍या कमतरतांविषयी तक्रार करण्याऐवजी तुम्ही तुमच्या उदाहरणाद्वारे सहनशीलतेने तिला मदत करण्याचा आणि तिच्या अंतःकरणाप्रत पोहंचण्याचा प्रयत्न करता का? शेवटी प्रेषितांनी जशी प्रतिक्रिया दाखवली तशीच प्रतिक्रिया बहुधा पत्नी देखील अशा प्रेमळ दयेला दाखवील.

२०. ख्रिस्ती पत्नींनी कोणती गोष्ट कधीही विसरू नये आणि त्यांच्याकरता कोणी उदाहरण मांडले?

२० पत्नींनी देखील येशूचा विचार करण्याची गरज आहे; तो “ख्रिस्ताचे मस्तक देव आहे,” हे कधीही विसरला नाही. तो सर्वदा त्याच्या स्वर्गीय पित्याच्या अधीन राहिला. अशाचरितीने, “स्त्रीचे मस्तक पुरूष आहे,” होय, पत्नींनी त्यांचा पती त्यांचे मस्तक असल्याचे कधीही विसरू नये. (१ करिंथकर ११:३; इफिसकर ५:२३) प्रेषित पेत्राने ख्रिस्ती पत्नींना आरंभीच्या काळातील ‘पवित्र स्त्रियांचा,’ विशेषपणे ‘अब्राहामाला धनी म्हणत असलेल्या’ सारा हिचा विचार करण्याविषयी आर्जवले.—१ पेत्र ३:५, ६.

२१. अब्राहाम व साराचा विवाह यशस्वी तर लोट व त्याच्या पत्नीचा विवाह अयशस्वी का झाला?

२१ स्पष्टपणे, तंबुत राहण्यासाठी साराने समृद्ध शहरातील आपले आरामदायक घर सोडले. का बरे? तिने ते राहणीमान पसंत केल्यामुळे का? बहुधा नाही. तिच्या पतीने तिला जाण्यास सांगितल्यामुळे का? अब्राहामाच्या ईश्‍वरी गुणांमुळे साराचे त्याच्यावर प्रेम होते आणि ती त्याचा आदर करत होती, हे याचे कारण होते, यात काही संशय नाही. (उत्पत्ति १८:१२) परंतु, यहोवासाठी असलेले प्रेम आणि देवाच्या मार्गदर्शनाचे अनुकरण करण्याची तिची मनःपूर्वक इच्छा, या प्रमुख कारणामुळे ती आपल्या पतीबरोबर गेली. (उत्पत्ति १२:१) देवाचे आज्ञापालन करण्यात तिला आनंद मिळाला. दुसऱ्‍या बाजुला पाहता, लोटाच्या बायकोने, देवाची इच्छा आचरण्यात कुचराई केली आणि अशा रितीने तिच्या सदोमातील गावात मागे सोडलेल्या गोष्टींकरता तीव्र इच्छा दाखवून मागे पाहिले. (उत्पत्ति १९:१५, २५, २६; लूक १७:३२) तिने देवाची अवज्ञा केल्यामुळे त्या विवाहाचा किती दुःखद शेवट झाला!

२२. (अ) कौटुंबिक सदस्य सुज्ञतेने कोणते आत्मपरीक्षण करतील? (ब) आपण पुढील अभ्यासात कशाचा विचार करणार आहोत?

२२ यास्तव, पती अथवा पत्नी या नात्याने, स्वतःला असे विचारणे महत्त्वपूर्ण आहे, ‘आपल्या कुटुंबात देव प्रथम स्थानी येतो का? देवाने मला दिलेल्या कौटुंबिक भूमिकेला मी खरेपणाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो का? माझ्या सोबत्यावर प्रीती करण्यासाठी मी खरेपणाने प्रयत्न करण्याचा आणि यहोवासोबत त्याचा चांगला नातेसंबंध राखण्यासाठी मदत करतो का?’ बहुतेक कुटुंबात मुले देखील आहेत. पुढे आपण पालकांच्या भूमिका आणि त्या दोघांनी व त्यांच्या मुलांनी देवाला प्रथम स्थान देण्याच्या गरजेचा विचार करू.

तुम्हाला आठवते का?

◻ अनेक कुटुंबासाठी येशूच्या शिकवणींचे काय परिणाम असतील?

◻ हजारो खंबीर ख्रिश्‍चनांना कोणते प्रतिफळ मिळाले?

◻ अनैतिकता आणि घटस्फोट टाळण्यासाठी सोबत्यांना काय मदत करील?

◻ येशूच्या उदाहरणापासून पती काय शिकू शकतात?

◻ पत्नी आनंदी विवाहाला कसा हातभार लावू शकतात?

[१० पानांवरील चित्रं]

साराने तिच्या यशस्वी विवाहासाठी कसा हातभार लावला?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा