भयाचा अंत कधी होईल?
खऱ्या सुरक्षिततेचा संबंध, २,००० वर्षांपूर्वी हयात असलेल्या एका मनुष्यासोबत आहे हे ऐकल्याने तुम्हाला आश्चर्य वाटेल का? प्रीतीची गरज असल्याचे दाखवून, येशू ख्रिस्ताने एक उल्लेखनीय दृष्टांत सांगितला: “एक मनुष्य यरुशलेमेहून खाली यरीहोस जात असताना लुटारूंच्या हाती सापडला; त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारहि दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले.” दोन वाटसरुंनी बळी पडलेल्या माणसाकडे पाहून दुर्लक्ष केले असले तरी एका दयाळू शोमरोनी माणसाने त्याला दया दाखवली. परंतु आज, गुन्हेगारीला बळी पडणाऱ्या लोकांची कोण पर्वा करत आहे? आपण भयापासून कोणत्या मुक्ततेची अपेक्षा करू शकतो?—लूक १०:३०-३७.
देवावर विश्वास असल्याचा दावा करत असतानांच, अनेक जण असा विचार करतात की नियम आणि व्यवस्था मात्र मानवाद्वारेच अंमलात आणली जावी. परंतु, तुरुंगवासाच्या कडक शिक्षा किंवा अधिक व उत्तम पगार असलेले पोलिस, हिंसात्मक गुन्हेगारीचा अंत करतील का? काही प्रमाणात प्रामाणिकपणे सुरक्षा पुरवण्याचे प्रयत्न केले असतानाही, नियमाची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी मादक पदार्थांचा दुरुपयोग, संघटित गुन्हेगारी आणि दारिद्र्य यासारख्या गोष्टींना काढून टाकील असे तुम्हाला खरोखरच वाटते का? तरी देखील, धार्मिकतेकरता असलेली आपली भूक आणि तहान व्यर्थ जाणार नाही.—मत्तय ५:६.
स्तोत्र ४६:१ म्हणते: “देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे; तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो.” हे शब्द केवळ एका सुंदर काव्यातील नाहीत ते आपण पाहू या.
तुम्हाला माहीत आहे, की वृत्त माध्यम दररोज मुलकी युद्धात आणि अतिरेक्यांच्या हल्ल्यात अविचारीपणे मारले गेलेल्यांचा अहवाल देते. जगाच्या काही भागांमध्ये, बेवारस युवकांना किंवा प्रत्यक्ष साक्षींना ठार मारण्याची रीत आता सामान्य झाली आहे. जीवन इतक्या हलक्या प्रतीचे का झाले आहे? अशा प्रकारच्या हिंसेची विविध कारणे असली तरी, आपण ज्याकडे दुर्लक्ष करू नये असे एक कारण आहे.
देवाचे वचन, बायबलनुसार, “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) वास्तविक पाहता, येशू ख्रिस्ताने दियाबल सैतानाची ओळख केवळ एक लबाड म्हणूनच नव्हे तर “मनुष्यघातक” म्हणूनही दिली आहे. (योहान ८:४४) विविध मार्गांनी मानवजातीला प्रभावित करून हा शक्तिशाली आत्मिक प्राणी आजच्या हिंसेच्या वाढीला आणखी खत पाणी घालीत आहे. “पृथ्वी व समुद्र ह्यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे,” असे प्रकटीकरण १२:१२ म्हणते. परंतु आनंदाची गोष्ट म्हणजे, “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी” या दुष्ट व्यवस्थीकरणाची जागा घेईल.—२ पेत्र ३:१३.
नव्या जगाच्या या अद्भुत आशेसोबत, आता सध्या आपल्याला कोणती मदत उपलब्ध आहे?
या प्रश्नाचे सकारात्मक उत्तर पाहण्याआधी, हिंसेपासून खरे ख्रिस्ती सुरक्षित राहतील याची, त्यांना देखील शाश्वती नाही या गोष्टीची आपण आठवण ठेवली तर अधिक बरे होईल. प्रेषित पौलाने व्यक्तिगतरीत्या अनुभवलेल्या काही संकटांचे वर्णन केले आहे. तो ‘नद्यावरील संकटे, लुटारुंमुळे आलेली संकटे, त्याच्या स्वतःच्या देशबांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरातली संकटे, रानांतली संकटे, समुद्रावरची संकटे’ यांच्यामधून पार झाला होता. (२ करिंथकर ११:२६) तरी देखील, पौल या सर्व धोक्यांमधून सुरक्षित वाचला होता. आजही असेच आहे; जागृत राहून आपण आपली सर्व कामे शक्य तितक्या सामान्यपणे पूर्ण करू शकतो. याकरता मदतदायी ठरतील अशा काही गोष्टींचा आपण विचार करू या.
कोणी एखादा धोकादायक परिसरात राहत असल्यास, उत्तम आचरण संरक्षण ठरु शकते कारण लोक इतरांना जवळून न्याहाळत असतात. चोर, योजना करून गुन्हे करत असले तरी, अनेक चोर स्वतःला साधारण व्यक्ती समजत असतात. इतर लोक काय करतात त्याची टीका करण्याचे टाळा व ते कशात गोवले आहेत त्यांच्याबद्दल फाजील उत्सुकता बाळगू नका. अशा प्रकारे, तुम्ही तुमच्यावर प्रत्याघात होण्याची शक्यता कमी करत असता. लक्षात ठेवा, कोणी घरात नवी वस्तू आणली आहे किंवा कोण सुटीवर जाणार आहे व त्यामुळे घराबाहेर असतील हे शोधून काढण्याचा चोर नेहमी प्रयत्न करत असतात. यास्तव, इतरांना तुम्ही काय सांगता यामध्ये सुज्ञ असा.
अनेक यहोवाच्या साक्षीदारांना सेवक या नात्याने त्यांच्या नावलौकिकतेने त्यांना उल्लेखनीय प्रमाणात संरक्षण दिल्याचे आढळून आले आहे. जे ख्रिस्ती निःपक्षपातीपणे समाजामधील लोकांना मदत करण्यासाठी स्वतःला उपलब्ध करून देतात अशा ख्रिश्चनांचा बहुतेकवेळा गुन्हेगार आदर करतात असे गुन्हेगारांनी दाखवून दिले आहे. साक्षीदार स्वतः खुनी, चोर किंवा ‘दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करणारे‘ नसल्यामुळे त्यांच्यापासून इतरांना काही धोका नाही.—१ पेत्र ४:१५.
देवाच्या नव्या जगात सुरक्षा
येशू ख्रिस्ताने भाकीत केलेल्या ‘अनीतीच्या वाढीबद्दल’ आपल्याला खेद वाटतो पण चिंतातुर होण्याऐवजी, देव लवकरच या दुष्ट व्यवस्थीकरणाचे निर्मूलन करणार आहे याची आपण खात्री बाळगू शकतो. ‘राज्याच्या या सुवार्तेच्या’ जगव्याप्त प्रचाराचे भाकीत करण्याव्यतिरिक्त येशूने त्याच्या शिष्यांना, “जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल” याची आठवण करून दिली.—मत्तय २४:१२-१४.
आपल्याला विश्वास बसणार नाही इतक्या क्रुरतेने इतरांना लुटणाऱ्यांचा उच्छेद केला जाईल याची आपण खात्री बाळगू शकतो. नीतिसूत्रे २२:२२, २३ म्हणते: “गरीब हा केवळ गरीब आहे म्हणून त्याला नाडू नको. आणि वेशीत विपन्नावर जुलूम करू नको; कारण परमेश्वर [यहोवा, NW] त्यांचा कैवार घेईल आणि त्यास नागविणाऱ्यांचा जीव नागवील.” चोर, खुनी आणि लैंगिकतेचा दुरुपयोग करणाऱ्या अपराध्यांचा यहोवा उच्छेद करील. तसेच, तो अशा गुन्ह्यांना बळी पडलेल्यांकडे दुर्लक्ष करणार नाही. तो त्यांना झालेल्या हानीची भरपाई करील आणि त्यांना त्यांचे आरोग्य पूर्णपणे परत मिळवून देईल.
निश्चितच, ‘वाईटापासून दूर राहून बरे ते करणाऱ्यांना,’ येणाऱ्या मोठ्या संकटातून बचावल्याने किंवा मृतातून पुनरुत्थान झाल्याने सार्वकालिक जीवन प्राप्त होऊ शकेल. “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” (स्तोत्र ३७:२७-२९) येशूच्या खंडणी बलिदानामुळे अशा प्रकारचे फायदे उपलब्ध होतील. (योहान ३:१६) पण, पुनर्स्थापित परादीसमधील जीवन कसे असेल बरे?
देवाच्या राज्यातील जीवन खरोखरच सुखकारक असेल. यहोवा भाकीत करतो: “माझे लोक शांत स्थळी, निर्भय वसतिस्थानात व सुखाश्रमात राहतील.” (यशया ३२:१८) सार्वकालिक जीवन प्राप्त केलेल्या सर्वांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व तदनुसार जमवून घेतलेले असेल. कोणीही दुष्ट किंवा अन्यायी नसेल किंवा अशा प्रकारच्या लोकांना कोणीही भावी बळी पडणार नाही. संदेष्टा मीखा म्हणतो: “ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांस घाबरविणार नाही.” (मीखा ४:४; यहेज्केल ३४:२८) आजच्या धोकादायक शेजारपाजारापासून ही किती विरुद्धतेतील गोष्ट!
[६ पानांवरील चौकट]
दक्ष राहा
अनेक गुन्हेगार, गुन्हेगारीला त्यांचा पेशा करून पूर्ण वेळ कार्य करतात. तुमच्याकडे जरी एकाने बंदूक रोखून धरली असली तरी ते कदाचित दोन किंवा तीन लोकांच्या गटाने काम करत असतील. गुन्हेगार जितका लहान तितकाच तो अधिक घातक असतो हे वाढत्या प्रमाणावर स्पष्ट आहे. तुम्ही जर बळी पडला तर तुम्ही काय करू शकता?
चोराला बेचैन करण्याजोगे काहीही न करता शांत राहा—त्याचा कमअनुभव तुम्हाला ठार मारण्यास कारणीभूत ठरू शकेल. तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांपैकी असल्यास तशी ओळख द्या. तरीसुद्धा, चोराला जे काही पाहिजे ते त्याच्या हवाली करा. तुम्ही उशीर लावल्यास, धोका आणखी वाढतो. नंतर, तुम्हाला प्रवासाच्या भाड्याचे पैसे किंवा ओळखपत्र मागण्यास सुरक्षित वाटू शकेल.
कोण गुन्हेगार आहे हे तुम्ही बहुतेक वेळा सांगू शकत नाही. काही चोर मादक पदार्थांचे व्यसनी किंवा पेशेवाईक असू शकतात व इतरांना केवळ खाण्यासाठी पैसे हवे असतात. कोणत्याही परिस्थितीत, मोठी रक्कम सोबत ठेवू नका. दागिने, सोन्याच्या अंगठ्या किंवा महागडया घड्याळ्यांचे प्रदर्शन करण्याचे टाळा. काहीही भीती न दाखवता नेहमीप्रमाणे रस्त्याने चाला व प्रवास करा. लोकांकडे संशयाने एकटक पाहत राहू नका. रस्त्यावर गोळीबार होत असताना लगेचच जमिनीवर पालथे पडा; वस्त्र नंतर स्वच्छ केली जाऊ शकतात.—रीउ दे झानेइरू येथील भूतपूर्व पोलीस.
[५ पानांवरील चित्रं]
शांत राहा आणि चोराला जे हवे ते द्या. तुम्ही उशीर लावल्यास, धोका आणखी वाढतो