वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ४/१५ पृ. ३०
  • तुम्हाला आठवते का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला आठवते का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • प्रार्थनेद्वारे देवाच्या जवळ या
    बायबल नेमके काय शिकवते?
  • कमतरता, पाप आणि पश्‍चात्ताप यांची निश्‍चिती करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • तुमच्या प्रार्थना केवढ्या अर्थभरीत आहेत?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • प्रार्थनेला कामाची गरज आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ४/१५ पृ. ३०

तुम्हाला आठवते का?

तुम्ही अलीकडील टेहळणी बुरुज अंक वाचण्याचे मूल्य जाणले का? तर मग, तुम्हाला पुढील प्रश्‍नांची उत्तरे देता येतात का ते पाहा:

◻ आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी येशूचा जन्मदिन का साजरा केला नाही?

द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडियाच्या मते, “एखाद्याचा जन्मदिन साजरा करणे मुर्तिपूजक रुढी आहे, अशी आरंभीच्या ख्रिश्‍चनांची विचारधारणा असल्याने त्यांनी [येशूचा] जन्मदिन साजरा केला नाही.”—१२/१५, पृष्ठ ४.

◻ येशूला प्रार्थना केल्या पाहिजेत का?

नाही, कारण प्रार्थना उपासनेचा एक प्रकार आहे व ती उपासना केवळ सर्वसमर्थ देवालाच दिली पाहिजे. आपल्या सर्व प्रार्थना यहोवा देवाला उद्देशून केल्याने, आपण “हे आमच्या स्वर्गातील पित्या” हे येशूने प्रार्थना करण्यासंबंधी दिलेले मार्गदर्शन स्वीकारल्याचे दर्शवतो. (मत्तय ६:९)—१२/१५, पृष्ठ २५.

◻ हनन्या आणि सप्पीरा यांच्या पातकांशी तुलना करता राजा दाविदाचे पाप गंभीर होते तरीदेखील त्याच्या पातकासाठी विसंगत न्याय का करण्यात आला? (२ शमुवेल ११:२-२४; १२:१-१४; प्रेषितांची कृत्ये ५:१-११)

राजा दावीद शारीरिक कमतरतेमुळे गंभीर पापात पडला. त्याने जे काही केले होते त्याला सामोरे गेल्यावर त्याने पश्‍चात्ताप केला आणि यहोवाने त्याला क्षमा केली तरीदेखील पापाच्या परिणामासह त्याला जिवंत राहावे लागले. ख्रिस्ती मंडळीला फसविण्यासाठी हनन्या आणि सप्पीरा यांनी दांभिकपणे खोटे बोलण्याद्वारे पाप केले आणि अशाप्रकारे ‘पवित्र आत्मा आणि देवाशी लबाडी,’ केली. (प्रेषितांची कृत्ये ५:३, ४) दुष्ट हृदयाचा पुरावा यातून निष्पन्‍न झाला. याच कारणास्तव, त्यांचा अधिक कडकरीतीने न्याय करण्यात आला.—१/१, पृष्ठे २७, २८.

◻ यहोवाची सेवा उल्लसित अंतःकरणाने करण्यास आपल्याला काय मदत करू शकते?

आपल्या आशीर्वादांचा आणि देवाने प्रदान केलेली सेवा करण्याच्या विशेषाधिकारांबद्दल सकारात्मक आणि कृतज्ञतापूर्वक दृष्टिकोन आपण विकसित केला पाहिजे. देवाच्या वचनाचे अनुकरण केल्याने आपण त्याला संतुष्ट करत आहोत याचे आपल्याला केव्हाही विस्मरण होता कामा नये.—१/१५, पृष्ठे १६, १७.

◻ परिणामकारक उत्तेजन देण्यासाठी आपण कोणत्या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?

पहिली गोष्ट म्हणजे, काय म्हणावयाचे यावर विचार करा त्यामुळे तुमचे उत्तेजन स्पष्ट होईल. दुसरी, स्तुती करण्यास पात्र किंवा उभारणी करण्याची आवश्‍यकता असणाऱ्‍यासाठी संधीचा शोध घ्या.—१/१५, पृष्ठ २३.

◻ ‘मोठ्या लोकसमुदायाच्या हातात खजुरीच्या झावळ्या’ का आहेत? (प्रकटीकरण ७:९)

खजुरीच्या झावळ्यांना हालवणे, “मोठा लोकसमुदाय” हर्षाने यहोवाच्या राज्याचा आणि त्याच्या अभिषिक्‍त राजा येशू ख्रिस्ताचा जयजयकार करतो याला सूचित करते. (लेवीय २३:३९, ४०, पाहा.)—२/१, पृष्ठ १७.

◻ ईयोबाच्या पुस्तकामध्ये कोणते महत्त्वपूर्ण धडे पाहावयास मिळतात?

ईयोबाचे पुस्तक समस्या कशा हाताळाव्यात याबद्दलचे मार्गदर्शन आम्हाला करते. परीक्षांचा सामना करत असलेल्यांना कसा सल्ला द्यावा—व कसा देऊ नये—याची विस्मयजनक उदाहरणे ते पुरवते. शिवाय, स्वतः ईयोबाचा अनुभव, आपण जेव्हा प्रतिकूल परिस्थितींमध्ये सापडतो तेव्हा समतोल मार्गाने प्रतिक्रिया दाखवण्यास मदत करू शकते.—२/१५, पृष्ठ २७.

◻ येशूचे चमत्कार आपल्याला काय शिकवतात?

येशूचे चमत्कार देवाचे गौरव करतात आणि देवाचे गौरव करण्यास ख्रिश्‍चनांसाठी एक नमुना प्रस्थापित करतात. (रोमकर १५:६) हे चमत्कार सत्कर्मे करण्यास, उदारता प्रदर्शित करण्यास आणि दया दाखविण्यासाठी उत्तेजन देतात.—३/१, पृष्ठ ८.

◻ नव्यानेच समर्पण केलेल्या उमेदवारांसोबत वडील तयार केलेल्या प्रश्‍नांची उजळणी कोणत्या उद्देशास्तव करतात?

प्रत्येक उमेदवाराला बायबलच्या मूलभूत शिकवणींची पूर्ण समज झाली आहे आणि यहोवाचा साक्षीदार बनण्यामध्ये कशाचा समावेश आहे याची जाणीव आहे अशी खातरी त्यामुळे मिळते.—३/१, पृष्ठ १३.

◻ बायबलमधील प्रार्थना आपल्याला कशाप्रकारे लाभ पोहंचवू शकतात?

शास्त्रवचनीय प्रार्थनांचे जवळून परीक्षण केल्यावर, आपल्यासारख्याच परिस्थितीत म्हटलेल्या प्रार्थना आपण ओळखू शकतो. अशा प्रार्थना शोधणे, वाचणे आणि त्यावर मनन केल्याने देवासोबतचे आपले स्वतःचे दळणवळण समृद्ध होण्यास मदत होईल.—३/१५, पृष्ठे ३, ४.

◻ ईश्‍वरी भय काय आहे?

ते यहोवाबद्दलचे आदरयुक्‍त भय, त्याच्याबद्दल गाढ श्रद्धा व त्यासोबत त्याला निराश करण्याची हितकारक भीती हे आहे. (स्तोत्र ८९:७)—३/१५, पृष्ठ १०.

◻ आपण यहोवाच्या नजरेत मौल्यवान आहोत, हे बायबलमधील कोणत्या तीन मार्गांद्वारे स्पष्ट होते?

बायबल शिकवते की आपल्या प्रत्येकाला देवाच्या नजरेत मूल्य आहे (लूक १२:६, ७); ते हे स्पष्ट करते की, यहोवा आपले मोल जाणतो (मलाखी ३:१६) आणि यहोवाने त्याचे आपल्यावरील प्रेम प्रगट करण्यासाठी काय केले आहे हे देखील बायबल सांगते. (योहान ३:१६)—४/१, पृष्ठे ११, १२, १४.

◻ इब्रीयांस १०:२४, २५ मधील एकत्र येण्याचे शब्द एखाद्या आज्ञेपेक्षाही अधिक का आहेत?

खरेपणाने, कोणत्याही प्रसंगी ख्रिस्ती एकत्र संगतीत येतात तेव्हा—पौलाचे हे शब्द सर्व ख्रिस्ती सभांसाठी एक दैवी प्रेरित दर्जा पुरवतात.—४/१, पृष्ठ १६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा