कमतरता, पाप आणि पश्चात्ताप यांची निश्चिती करणे
ख्रिस्ती वीट करतात अशी पाप—यहोवाच्या धार्मिक दर्जांपासून उणे पडणे ही गोष्ट आहे. (इब्रीयांस १:९) दुःखदपणे, आपण सर्व वेळोवेळी पाप करतो. आपण सर्व, वारशाने लाभलेली कमतरता आणि अपरिपूर्णता यांच्या विरोधात लढा देतो. तथापि अनेक बाबतीत, आपण केलेली पापे यहोवाला कबूल केली आणि त्यांना पुन्हा न करण्याचा मनःपूर्वक प्रयत्न केल्यास शुद्ध विवेकाने आपण यहोवाकडे जाऊ शकतो. (रोमकर ७:२१-२४; १ योहान १:८, ९; २:१, २) खंडणी यज्ञार्पणाच्या आधारावर आपल्यामध्ये कमतरता असूनही यहोवा आपली पवित्र सेवा स्वीकारतो यासाठी आपण त्याचे आभारी आहोत.
कोणीएक शारीरिक कमतरतेमुळे गंभीर पापामध्ये पडल्यास याकोब ५:१४-१६ मध्ये रेखांकित केलेल्या कार्यपद्धतीच्या एकवाक्यतेत त्याला तत्काळ मेंढपाळकत्वाची भेट देण्याची गरज आहे. “तुम्हापैकी कोणी [आध्यात्मिकरित्या] दुखणाईत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे . . . त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल. तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा.”
यास्तव, समर्पित ख्रिस्ती एखादे बीभत्स पाप करतो तेव्हा यहोवासमोर पाप कबूल करण्यापेक्षा अधिक काही करण्याची आवश्यकता आहे. मंडळीची शुद्धता आणि शांती धोक्यात येत असल्यामुळे वडिलांनी काही खास पावले उचलली पाहिजेत. (मत्तय १८:१५-१७; १ करिंथकर ५:९-११; ६:९, १०) वडिलांना कदाचित हे निश्चित करावे लागेल: ती व्यक्ती पश्चात्तापी आहे का? पाप कशामुळे घडले आहे? कमतरतेच्या असामान्य क्षणाचा हा परिणाम होता का? ते पाप आचरणे होते का? अशा गोष्टींना निश्चित करणे हे नेहमीच सोपे किंवा स्पष्ट नसते तर त्यासाठी अधिक समजबुद्धीची गरज आहे.
तथापि, पातके आणि दुष्ट वर्तणूक आचरत राहिल्यामुळे पाप घडले असल्यास काय? वडिलांची जबाबदारी तेव्हा स्पष्ट आहे. करिंथकर मंडळीमधील गंभीर बाबीची हाताळणी करण्यासाठी मार्गदर्शन करताना, प्रेषित पौल म्हणाला: “त्या दुष्टाला आपल्यामधून घालवून द्या.” (१ करिंथकर ५:१३) दुष्ट लोकांना ख्रिस्ती मंडळीमध्ये कोणतेही स्थान नाही.
कमतरता, दुष्टपणा आणि पश्चात्ताप यांची पारख करणे
कोणीएक पश्चात्ताप करतो हे वडिलांना कसे समजू शकते?a हा सोपा प्रश्न नाही. उदाहरणार्थ, दावीद राजाचा विचार करा. त्याने व्यभिचार आणि त्याचा अवांतर परिणाम म्हणून, खून केला. तरीदेखील, यहोवाने त्याला जिवंत राहण्यास अनुमती दिली. (२ शमुवेल ११:२-२४; १२:१-१४) आत्ता, हनन्या व सप्पीरा यांचा विचार करा. ते होते त्यापेक्षा अधिक उदार असण्याची दांभिकपणाने बतावणी करून खोटेपणाने प्रेषितांना फसविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गंभीर? होय. खून आणि व्यभिचार याप्रमाणे वाईट? क्वचितच! तथापि, हनन्या आणि सप्पीरा यांना त्यांचे जीवन गमवावे लागले.—प्रेषितांची कृत्ये ५:१-११.
असे विसंगत न्याय का? दावीद शारीरिक कमतरतेमुळे गंभीर पापात पडला. त्याने जे काही केले होते त्याला सामोरे गेल्यावर त्याने पश्चात्ताप केला आणि त्याच्या घरातील समस्यांद्वारे त्याला कडक शासन करण्यात आले असतानाही यहोवाने त्याला क्षमा केली. ख्रिस्ती मंडळीला फसविण्यासाठी हनन्या आणि सप्पीरा यांनी दांभिकपणे खोटे बोलण्याद्वारे पाप केले आणि अशाप्रकारे ‘पवित्र आत्मा आणि देवाशी लबाडी,’ केली. दुष्ट हृदयाचा पुरावा यातून निष्पन्न झाला. याच कारणास्तव, त्यांचा अधिक कडकरीतीने न्याय करण्यात आला.
दोन्ही बाबतीत यहोवाने न्याय केला आणि तो हृदय पारखू शकतो त्यामुळे त्याचा न्याय योग्य होता. (नीतीसूत्रे १७:३) मानवी वडील ते करू शकत नाहीत. म्हणूनच गंभीर पाप हे कमतरता वा दुष्टपणा यामुळे आहे किंवा नाही यातील भेद वडील कसे जाणू शकतात?
अर्थातच, प्रत्येक पाप दुष्ट आहे; परंतु सर्वच पापी हे दुष्ट नाहीत. यामुळे, पाप हा एखाद्या व्यक्तीमध्ये असणाऱ्या कमतरतेचा आणि दुसऱ्यामधील दुष्टपणाचा पुरावा असू शकतो. वास्तविकपणे, पाप यामध्ये सामान्यत: पाप करणाऱ्याच्या दोन्ही कमतरता आणि दुष्टपणा यांचे मूल्यमापन गोवलेले आहे. पाप करणारा त्याने जे काही केले आहे त्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो आणि ते करण्यामागील त्याचा उद्देश काय आहे हा निश्चितीकरणाचा एक घटक आहे. तो पश्चात्तापी आत्मा दाखवितो का? हे ओळखण्यासाठी वडिलांना समजबुद्धीची गरज आहे. ते ही समजबुद्धी कशी प्राप्त करू शकतात? प्रेषित पौलाने तीमथ्याला अभिवचन दिले: “मी ज्या गोष्टी बोलतो त्यावर कायम विचार कर आणि प्रभु तुला सर्व गोष्टींमध्ये समजबुद्धी देईल.” (२ तिमथ्य २:७, NW) वडिलांनी नम्रतेने पौलाच्या आणि इतर बायबल लेखकांच्या प्रेरित शब्दांवर “कायम विचार” करत राहिल्यास त्यांना मंडळीमध्ये पाप करणाऱ्याकडे योग्य दृष्टिकोनातून पाहण्यासाठी आवश्यक असणारी समजबुद्धी प्राप्त होईल. तेव्हा त्यांचे निर्णय, स्वतःचे नव्हे तर यहोवाचे विचार प्रतिबिंबीत करतील.—नीतीसूत्रे ११:२; मत्तय १८:१८.
हे कसे केले जाते? बायबल दुष्ट लोकांचे कसे वर्णन करते याचे परीक्षण करणे आणि त्या व्यक्तीशी याचे वर्णन जुळते का ते पाहणे हा एक मार्ग होय.
जबाबदारी स्वीकारणे आणि पश्चात्ताप करणे
आदाम आणि हव्वा हे दुष्टतेच्या मार्गाची निवड करणारे पहिले मानव होते. परिपूर्ण आणि यहोवाच्या नियमांचे पूर्ण ज्ञान असून देखील त्यांनी ईश्वरी सार्वभौमत्वाविरुद्ध बंड केले. त्यांनी जे काही केले ते सांगण्यासाठी यहोवा त्यांच्या सामोरी आला तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया उल्लेखनीय होत्या—आदामाने हव्वेवर आणि हव्वेने सर्पावर आरोप केला! (उत्पत्ती ३:१२, १३) दाविदाच्या सखोल नम्रतेबरोबर याची तुलना करा. घोर पातकांना सामोरे गेल्यावर त्याने जबाबदारीचा स्वीकार केला आणि असे म्हणून क्षमेसाठी याचना केली: “मी परमेश्वराविरुद्ध [यहोवा, NW] पातक केले आहे.”—२ शमुवेल १२:१३; स्तोत्र ५१:४,९, १०.
हे उचित आहे की, वडील गंभीर पातकांच्या गोष्टी हाताळताना विशेषतः प्रौढांच्या संदर्भात या दोन उदाहरणांचा विचार करतात. पाप करणारा—दाविदाप्रमाणे त्याच्या पापाची त्याला खात्री पटवून देण्यात येते तेव्हा—सरळपणे आरोपाचा स्वीकार करतो का? तसेच पश्चात्तापाने यहोवाकडे मदतीसाठी आणि क्षमेसाठी पाहतो का कदाचित इतरांवर दोषारोप करून त्याने जे काही केले आहे ते लपविण्याचा प्रयत्न करतो? हे साहजिकच आहे, की पाप करणाऱ्याची, हे कृत्य त्याने कोणत्या कारणास्तव केले याचे स्पष्टीकरण देण्याची इच्छा असेल आणि वडिलांनी त्याला मदत कशी करावी याचा निर्णय करतेवेळी विचारात घेण्यास आवश्यक असतील अशा काही भूतकाळातील किंवा वर्तमानकाळातील परिस्थिती असू शकतात. (पडताळा होशेय ४:१४.) परंतु त्याने पाप केले आहे आणि तो यहोवासमोर जबाबदार आहे, याचा त्याने स्वीकार केला पाहिजे. लक्षात ठेवा: “परमेश्वर [यहोवा, NW] भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करितो.”—स्तोत्र ३४:१८.
वाईट ते आचरणे
दुष्ट लोकांबद्दल स्तोत्रसंहितेच्या पुस्तकामध्ये अनेक संदर्भ आहेत. व्यक्ती मूलभूतरित्या दुष्ट वा अशक्त आहे किंवा नाही यामधील भेद जाणण्यासाठी अशाप्रकारची शास्रवचने वडिलांना अधिक मदत करू शकतात. उदाहरणार्थ, दाविद राजाच्या प्रेरित प्रार्थनेचा विचार करा: “मनात कपट असून आपल्या शेजाऱ्यांशी स्नेहभावाने बोलणारे असे दुर्जन व दुष्कर्मी ह्यांच्याबरोबर मला ओढून नेऊ नको” (स्तोत्र २८:३) दुष्टांचा “दुष्कर्मी” यांच्या समांतरतेत उल्लेख केला आहे याकडे लक्ष द्या. एखादी व्यक्ती शारीरिक कमतरतेमुळे पाप करते तेव्हा तिला या गोष्टीची जाणीव होता क्षणीच ते करण्याचे थांबविण्याची शक्यता आहे. तरी देखील, काही जे वाईट आहे तेच ‘आचरत’ असल्याने ते त्यांच्या जीवनाचा भाग झाले आहे आणि हा एक दुष्ट हृदयाचा पुरावा होऊ शकतो.
दाविदाने त्याच वचनामध्ये दुष्टपणाच्या आणखी एका लक्षणाचा उल्लेख केला. हनन्या आणि सप्पीरा यांच्याप्रमाणे दुष्ट व्यक्ती तिच्या मुखावाटे उत्तम गोष्टी बोलते परंतु तिच्या हृदयामध्ये वाईट गोष्टी असतात. ती व्यक्ती दांभिक म्हणजेच येशूच्या दिवसातील परूश्यांप्रमाणे जे ‘बाहेरून लोकांना नीतीमान दिसणारे; परंतु आत ढोंगाने व अनीतीने भरलेले’ याप्रमाणे असू शकते. (मत्तय २३:२८; लूक ११:३९) यहोवा दांभिकपणाचा द्वेष करतो. (नीतीसूत्रे ६:१६-१९) कोणी एखादा न्यायदान समितीबरोबर बोलताना त्याचे गंभीर पाप अमान्य करण्यासाठी दांभिकपणे प्रयत्न करतो किंवा पूर्णपणे कबूल करण्यास नकार देऊन केवळ इतरांना अगोदरच माहीत आहे तेवढेच नाईलाजाने स्वीकरतो तेव्हा हा दुष्ट हृदयाचा सबळ पुरावा असू शकतो.
यहोवाची गर्विष्ठपणे उपेक्षा
दुष्ट व्यक्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल स्पष्ट करणाऱ्या इतर गोष्टी स्तोत्र १० मध्ये दाखविल्या आहेत. तेथे आपण वाचतो: “दुर्जनांच्या गर्वामुळे दीन दुःखाने होरपळून जातो; . . . [तो] त्याला [यहोवा, NW] तुच्छ मानितो.” (स्तोत्र १०:२, ३) गर्विष्ठ आणि यहोवाचा अनादर करणाऱ्या समर्पित ख्रिश्चनाकडे आपण कसे पाहतो? अर्थातच, या दुष्ट मानसिक प्रवृत्या आहेत. कमतरतेमुळे पाप करणारी एखादी व्यक्ती तिच्या पापाबद्दल तिला जाणीव झाल्यानंतर किंवा तिचे त्याकडे लक्ष वेधल्यानंतर पश्चात्ताप आणि त्या मार्गापासून अलिप्त होण्याचा परिश्रमपूर्वक प्रयत्न करील. (२ करिंथकर ७:१०, ११) त्याउलट, एखादी व्यक्ती यहोवासाठी मूलभूत अनादर असल्याकारणाने पाप करत असल्यास, तिच्या पापमय मार्गांकडे वारंवार परतण्यापासून तिला कशाने रोखता येईल? नम्रतेच्या आत्म्याने सल्ला देऊनही ती व्यक्ती गर्विष्ठ असल्यास, प्रामाणिक आणि खरेपणाने पश्चात्ताप करण्यासाठी आवश्यक असणारी लीनता ती कशी मिळवू शकते?
दाविदाचे त्याच स्तोत्रामधील त्यानंतरचे शब्द लक्षात घ्या: “देवाला दुर्जन का तुच्छ मानितो? ‘तू झडती घेणार नाहीस,’ असे तो आपल्या मनात का म्हणतो?” (स्तोत्र १०:१३) ख्रिस्ती मंडळीच्या व्यवस्थेमध्ये दुष्ट मनुष्याला बरोबर आणि चूक यातील फरक ठाऊक असतो; तरीदेखील त्याला शिक्षा होणार नाही असा विचार करून चुकीचे करण्यासाठी तो मागेपुढे पाहत नाही. गौप्यस्फोटाचे भय नाही तोपर्यंत तो त्याच्या पापमय प्रवृत्तींना पूर्ण स्वातंत्र देतो. त्याची पातके उघड झाल्यास शिक्षेला टाळण्यासाठी तो योजना करील आणि हे दाविदापेक्षा भिन्न आहे. असा मनुष्य यहोवाचा घोर अनादर करणारा आहे “त्याच्या दृष्टीपुढे देवाचे भय नाही. . . . [तो] वाईटाचा वीट मानीत नाही.”—स्तोत्र ३६:१, ४.
इतरांना क्षती पोहंचविणे
सामान्यपणे, पापामुळे एकापेक्षा अधिक व्यक्तींवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, व्यभिचारी देवाविरुद्ध पाप करतो; त्याची पत्नी आणि मुले त्यास बळी पडतात; त्याची सोबतीण ज्याबरोबर त्याने व्यभिचार केला आहे ती विवाहित असल्यास, तिचे कुटुंब यास बळी पडते आणि तो मंडळीच्या चांगल्या नावाला देखील कलंकित करतो. यासर्वाकडे तो कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो? तो खऱ्या पश्चात्तापाबरोबर मनःपूर्वक खेद प्रगट करतो का? किंवा स्तोत्र ९४ मध्ये वर्णन केलेला आत्मा प्रदर्शित करतो की, “सर्व दुष्कर्मी फुशारकी मारितात; हे परमेश्वरा, [यहोवा, NW] ते तुझ्या लोकांचा चुराडा करितात, तुझ्या वतनाला पीडितात. ते विधवा व उपरी ह्यांचा जीव घेतात, अनाथास ठार मारितात. ते म्हणतात, परमेश्वर [यहोवा, NW] पाहत नाही, याकोबाचा देव लक्ष देत नाही.”?—स्तोत्र ९४:४-७.
संभवतः, मंडळीमध्ये हाताळण्यात येणाऱ्या पातकांमध्ये खून आणि ठार मारणे यांचा समावेश होणार नाही. तरीसुद्धा येथे प्रदर्शित होणार आत्मा—स्वतःच्या लाभासाठी इतरांना यातना देण्यास तयार असलेला आत्मा—वडील पातकाची चौकशी करताना उघड होऊ शकतो. गर्विष्ठपणा हे सुद्धा दुष्ट व्यक्तीचे चिन्ह आहे. (नीतीसूत्रे २१:४) हा, खरा ख्रिस्ती स्वेच्छेने त्याच्या भावासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या आत्म्याच्या अगदी विरोधात आहे.—योहान १५:१२, १३.
ईश्वरी तत्त्वे अंमलात आणणे
नियम बनविणे हा या काही मार्गदर्शक तत्त्वांच्या मागील हेतू नाही. तथापि, खरोखरच वास्तविक काही दुष्ट गोष्टींविषयी यहोवा काय दृष्टिकोन बाळगून आहे याबद्दलची ते कल्पना देतात. पाप केल्याबद्दलची जबाबदारी स्वीकारण्यास नकार आहे का? पाप केलेल्या व्यक्तीने त्या बाबतीत मिळालेल्या आधीच्या सल्ल्याकडे निर्लज्जपणे दुर्लक्ष केले आहे का? घोर पाप आचरण्याची सवय झाली आहे का? पाप करणारी व्यक्ती यहोवाच्या नियमाला निर्लज्जपणे अनादर दाखविते का? तिने पाप लपविण्याचा धूर्तपणे प्रयत्न करण्यासाठी कदाचित इतरांनाही भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे का? (यहूदा ४) पाप प्रकाशात येते तेव्हा हा प्रयत्न अधिक तीव्र होतो का? पाप करणारी व्यक्ती इतरांना आणि यहोवाच्या नावाला क्षती पोहंचविल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते का? तिच्या मानसिकतेबद्दल काय? हितकारक शास्रवचनीय सल्ला दिल्यानंतरही ती व्यक्ती गर्विष्ठ आणि मगरुर आहे का? पाप वारंवार करण्याचे टाळण्यासाठी त्याच्यामध्ये मनस्वी इच्छेची कमी आहे का? पश्चात्तापाच्या बाबतीत असणाऱ्या कमतरतेच्या सबळ बाबी वडिलांच्या निदर्शनास आल्यास करण्यात आलेली पातके ही केवळ शारीरिक कमतरतेमुळे नव्हे तर दुष्टपणामुळे करण्यात आली आहेत या समारोपास ते कदाचित येऊ शकतील.
दुष्ट मनोवृत्ती असणाऱ्या व्यक्तीबरोबर कार्यवाही करताना देखील वडील त्याला धार्मिकतेचा पिच्छा पुरविण्याचे थांबवत नाहीत. (इब्रीयांस ३:१२) दुष्ट व्यक्ती कदाचित पश्चात्ताप आणि परिवर्तन करतील. असे नसते तर “दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे [यहोवा, NW] वळो, म्हणजे तो त्याजवर दया करील; तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील,” असे यहोवाने इस्राएलांना का सांगितले? (यशया ५५:७) कदाचित, न्यायदानाच्या चौकशीच्या दरम्यान वडिलांना त्याची पश्चात्तापी वागणूक आणि आविर्भाव यावरून त्याच्या हृदय परिवर्तनाची स्पष्ट जाणीव होईल.
एखाद्या व्यक्तीला बहिष्कृत करतेवेळी देखील वडील मेंढपाळक या नात्याने तिला यहोवाची कृपापसंती पुन्हा मिळविण्यासाठी मार्ग परिवर्तन आणि पश्चात्ताप करण्यासाठी आर्जवतील. करिंथमधील “दुष्ट मनुष्य” लक्षात ठेवा. स्पष्टतः, त्याने आपला मार्ग पूर्णपणे बदलला आणि नंतर पौलाने त्याची पुनःस्वीकारासाठी शिफारस केली. (२ करिंथकर २:७, ८) मनश्शे राजाचा देखील विचार करा. तो खरोखरच फारच दुष्ट होता; परंतु अखेरीस त्याने पश्चात्ताप केला आणि यहोवाने त्याच्या पश्चात्तापास स्वीकारले.—२ राजे २१:१०-१६; २ इतिहास ३३:९, १३, १९.
हे खरे आहे की, पवित्र आत्म्याच्या विरुद्धतेतील पाप—क्षमा होणार नाही असे आहे. (इब्रीयांस १०:२६, २७) ते पाप कोणी केले हे ठरविणारा केवळ यहोवा आहे. मानवांना हे करण्याचा अधिकार नाही. मंडळीला शुद्ध ठेवणे आणि पश्चात्तापी पापी व्यक्तींना पुर्ववत स्थितीत आणण्यासाठी मदत करणे ही वडिलांची जबाबदारी आहे. त्यांनी असे योग्य समजबुद्धीने व नम्रतेने आणि त्यांच्या निर्णयामध्ये यहोवाच्या बुद्धीला प्रतिबिंबीत केल्यास यहोवा त्यांच्या मेंढपाळकत्वाच्या या पैलूला आशीर्वादित करील.
[तळटीपा]
a अधिक माहितीसाठी टेहळणी बुरुज सप्टेंबर १, १९८१, पृष्ठे २४-६; शास्रवचनांवर सूक्ष्म दृष्टी, खंड २, पृष्ठे ७७२-४ पहा.
[२९ पानांवरील चित्रं]
हनन्या आणि सप्पीरा यांनी पवित्र आत्म्याशी दांभिकपणे लबाडी केली आणि हृदयाचा दुष्टपणा स्पष्ट झाला