वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ३/१ पृ. १४-१८
  • “दररोज” आपल्या समर्पणानुरूप जगणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “दररोज” आपल्या समर्पणानुरूप जगणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • परिपूर्ण उदाहरण
  • ईशारेवजा उदाहरणे
  • मी होईल तितके करतो का?
  • समर्पित—कोणाला?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • यहोवाला केलेले समर्पण आठवणीत ठेवून तुम्ही जगत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • तुम्ही यहोवाला समर्पण का केले पाहिजे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • समर्पण आणि निवडीचे स्वातंत्र्य
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ३/१ पृ. १४-१८

“दररोज” आपल्या समर्पणानुरूप जगणे

“जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.”—लूक ९:२३.

१. ख्रिस्ती या नात्याने आपल्या यशाचे मूल्यमापन करण्याचा एक मार्ग कोणता आहे?

“आपण खरोखरच समर्पित लोक होतो का?” अमेरिकेचे ३५ वे राष्ट्रपती जॉन एफ. केनडी यांच्या मते या प्रश्‍नाचे उत्तर, सरकारी अधिकारावर असलेल्यांच्या यशाचे मूल्यमापन करणारे आहे. ख्रिस्ती सेवक या नात्याने आपण संपादलेल्या यशाचे परीक्षण खोल अर्थसूचकतेने करण्यासाठी हाच प्रश्‍न पुरेसा आहे.

२. “समर्पण” या शब्दाची व्याख्या एक शब्दकोश कशी करतो?

२ तरीपण, समर्पण हे काय आहे? वेबस्टर्स नाईन्थ न्यू कॉलेजिएट डिक्शनरी याची व्याख्या “ईश्‍वराला किंवा एखाद्या पवित्र वापरासाठी समर्पणाची कृती किंवा विधी,” “एखाद्या विशिष्ट उद्देशाला वाहून घेणे किंवा त्यासाठी वेगळे ठेवणे,” “आत्मत्यागाची भक्‍ती” असा करते. जॉन एफ. केनडी यांनी तो शब्द “आत्मत्यागाची भक्‍ती” हा अर्थ व्यक्‍त करण्यासाठी वापरला हे उघड होते. ख्रिश्‍चनासाठी समर्पण हे यापेक्षा अधिक अर्थ राखते.

३. ख्रिस्ती समर्पण म्हणजे काय?

३ येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना म्हटले: “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.” (मत्तय १६:२४) ईश्‍वरी उपयोगासाठी स्वतःला वेगळे ठेवणे याचा अर्थ केवळ रविवारी किंवा कोणा भक्‍तीस्थळाला भेट देताना उपासना करणे असा होत नाही. त्यामध्ये एखाद्याची सबंध जीवनशैली येते. ख्रिस्ती असणे याचा अर्थ येशू ख्रिस्ताने ज्याची सेवा केली त्या यहोवा देवाची, सेवा करताना स्वतःचा त्याग करणे किंवा स्वतःला नाकारणे असा होतो. तसेच, तो ख्रिस्ताचा अनुयायी असल्यामुळे उद्‌भवणाऱ्‍या कोणत्याही त्रासाला सहन करण्याद्वारे स्वतःचा “वधस्तंभ” उचलतो.

परिपूर्ण उदाहरण

४. येशूच्या बाप्तिस्म्याने कशाची सूचकता दिली?

४ यहोवाला स्वतःचे समर्पण करण्यामध्ये कशाचा समावेश असतो ते येशूने पृथ्वीवर असताना दाखवले. त्याच्या मनोभावना अशा होत्या: “यज्ञ व अन्‍नार्पण ह्‍यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले.” मग तो पुढे म्हणाला: “पाहा, हे देवा, (ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेविले आहे) तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.” (इब्रीयांस १०:५-७) समर्पित राष्ट्राचा एक सदस्य असल्यामुळे तो यहोवाला जन्मापासूनच समर्पित होता. तरीदेखील, पृथ्वीवर स्वतःच्या सेवकपणाची सुरवात करताना त्याने स्वतःला यहोवाची इच्छा पूर्ण करण्याकरता सादर करीत आहोत याचे चिन्ह म्हणून बाप्तिस्मा घेतला. त्यामध्ये, त्याने आपले जीवन खंडणी यज्ञार्पण या अर्थी देण्याचे समाविष्ट होते. अशाप्रकारे, यहोवा जे इच्छितो त्याप्रमाणे करण्यासाठी त्याने ख्रिश्‍चनांपुढे एक उदाहरण ठेवले.

५. येशूने भौतिक गोष्टींबद्दल उदाहरणीय दृष्टिकोन कसा प्रदर्शित केला?

५ बाप्तिस्म्यानंतर येशूने असे जीवनाक्रमण आचरले ज्याने शेवटी त्याला यज्ञार्पित मरणाकडे निरवले. तो धनाची प्राप्ती करण्यात किंवा आरामशीर जीवनशैली व्यतीत करण्यात आस्थेवाईक नव्हता. उलटपक्षी, त्याचे जीवन त्याच्या सेवकपणाभोवती केंद्रित होते. त्याने त्याच्या शिष्यांना हा सल्ला दिला की, “पहिल्याने राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा [“झटत राहा,” NW],” व तो स्वतः या शब्दानुरूप जगला. (मत्तय ६:३३) एकदा तर त्याने असेही म्हटले: “खोकडांस बिळे व आकाशातील पाखरांस कोटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही.” (मत्तय ८:२०) आपल्या अनुयायांकडून पैसा उकळता यावा म्हणून त्याला आपले शिक्षण तसे सहज वळवता आले असते. स्वतः एक सुतार असल्यामुळे सुंदर लाकडी सामान बनवून त्याला विकून स्वतःपाशी थोडी चांदीची नाणी शिल्लक ठेवता यावी म्हणून त्याला सेवकपणातून वेळ काढता आला असता. परंतु, त्याने आपल्या कलेचा वापर भौतिक समृद्धता कमविण्यासाठी केला नाही. मग, देवाचे समर्पित सेवक या नात्याने आपण देखील भौतिक गोष्टींबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगण्यात येशूचे अनुकरण करत आहोत का?—मत्तय ६:२४-३४.

६. देवाचे स्व-त्यागी व समर्पित सेवक असण्यामध्ये आपल्याला येशूचे कसे अनुकरण करता येईल?

६ देवाची सेवा प्रधान स्थानी ठेवण्यासाठी येशूने स्वतःच्या आस्थांचा पाठलाग केला नाही. त्याचे जाहीर सेवकपणाच्या साडे तीन वर्षांतील जीवन स्व-त्यागाचे होते. एके प्रसंगी, सबंध दिवस कामात घालवल्यावर, जेवणाससुद्धा उसंत न घेता येशूने “मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे . . . गांजलेले व पांगलेले होते” त्या लोकांना शिकवण्याची स्वेच्छा दाखवली. (मत्तय ९:३६; मार्क ६:३१-३४) तो “चालून चालून दमलेला” होता तरी त्याने सुखार येथील याकोबाच्या झऱ्‍याकडे पाणी भरावयास आलेल्या एका शोमरोनी स्त्रीबरोबर बोलण्यासाठी पुढाकार घेतला. (योहान ४:६, ७, १३-१५) त्याने नेहमी स्वतःचे पाहण्याआधी इतरांचे कल्याण करण्याचा विचार राखला. (योहान ११:५-१५) आपणही देवाची व इतरांची सेवा करण्यासाठी आपल्या स्वेच्छेचा उदारपणे त्याग करून येशूचे अनुकरण करू शकतो. (योहान ६:३८) देवास संतुष्ट करता येण्यासाठी जरूरीचे ते कमीत कमी करण्यापेक्षा काय करता येईल त्याचा विचार केल्यास आपण आपल्या समर्पणानुरूप जगू शकतो.

७. यहोवाला नेहमी सन्मान देण्यामध्ये आपण येशूचे कसे अनुकरण करू शकतो?

७ लोकांची मदत करण्याद्वारे येशू कोणत्याही अर्थाने लोकांचे लक्ष आपणाकडे केंद्रित करण्याचा प्रयत्न करत नव्हता. तो देवाला त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी समर्पित झाला होता. याच कारणामुळे, जे काही केले गेले त्याद्वारे यहोवा, आपला पिता याला गौरव लाभत आहे याची त्याने नेहमी खात्री केली. जेव्हा, एका अधिकाऱ्‍याने “उत्तम” हा शब्द पदवीसारखा वापरून येशूला “उत्तम गुरुजी” असे म्हटले तेव्हा येशूने त्याला “एकावाचून म्हणजे देवावाचून कोणी उत्तम नाही” असे म्हणून त्याची सुधारणूक केली. (लूक १८:१८, १९; योहान ५:१९, ३०) तर मग, आपणसुद्धा येशूप्रमाणेच सन्मान हा स्वतःपासून वळवून तो यहोवाला देतो का?

८. (अ) येशूने समर्पित मनुष्य म्हणून स्वतःला जगापासून कसे वेगळे ठेवले? (ब) आपण त्याचे कसे अनुकरण करावे?

८ पृथ्वीवरील आपल्या समर्पित जीवनाक्रमणामध्ये येशूने, स्वतःला ईश्‍वरी सेवेकरता वेगळे ठेवले होते हे दाखवले. खंडणी यज्ञार्पणाकरता “निष्कलंक व निर्दोष कोकरा” या अर्थाने स्वतःला सादर करता यावे म्हणून येशूने स्वतःला शुद्ध ठेवले. (१ पेत्र १:१९; इब्रीयांस ७:२६) त्याने मोशेच्या नियमशास्त्रात देण्यात आलेले सर्व निर्बंध पाळून नियमशास्त्राची पूर्णता केली. (मत्तय ५:१७; २ करिंथकर १:२०) नैतिकतेच्या बाबतीत त्याने स्वतःच्या शिकवणींनुरूप जीवन व्यतीत केले. (मत्तय ५:२७, २८) कोणालाही त्याच्यावर वाईट हेतू बाळगण्याचा ठपका ठेवता आला नाही. त्याने खरेच “स्वैराचाराचा वीट” मानला. (इब्रीयांस १:९) देवाचे सेवक या अर्थाने आपणही आपले जीवन व आपले हेतू यहोवाच्या दृष्टीने शुद्ध राखण्यात येशूचे अनुकरण करू या.

ईशारेवजा उदाहरणे

९. पौलाने कोणत्या ईशारेवजा उदाहरणाचा उल्लेख केला आणि आपण या उदाहरणाचा का विचार केला पाहिजे?

९ येशूच्या उदाहरणाव्यतिरिक्‍त, इज्राएल लोकांची आणखी दुसरी ईशारेवजा उदाहरणे आहेत. यहोवाने त्यांना जे काही सांगितले होते त्या सर्व गोष्टी ते पाळतील असे सांगितल्यावरही, ते त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यात अपयशी ठरले. (दानीएल ९:११) इज्राएल लोकांवर जे गुदरले त्यापासून काही शिकून घ्यावे असे उत्तेजन पौलाने ख्रिश्‍चनांना दिले. पौलाने करिंथकरांस लिहिलेल्या पहिल्या पत्रात उल्लेखिलेल्या काही घटनांचे आपण परीक्षण करू या आणि आपल्या काळी देवाच्या समर्पित सेवकांना कोणते खाचखळगे टाळावयाचे आहेत ते बघू या.—१ करिंथकर १०:१-६ ११.

१०. (अ) इज्राएल लोकांनी ‘वाईट गोष्टींचा लोभ’ कसा धरला? (ब)  इज्राएल लोकांनी अन्‍नाबद्दल दुसऱ्‍यांदा कुरकूर केली तेव्हा ते अधिकपणे जाब देण्याच्या पात्रतेचे का ठरले आणि या ईशारेवजा उदाहरणाद्वारे आपण काय शिकू शकतो?

१० पौलाने आपल्याला प्रथम, “वाईट गोष्टींचा लोभ” न धरण्याबद्दल ताकीद दिली. (१ करिंथकर १०:६) यामुळे तुम्हाला, इज्राएल लोकांनी केवळ मान्‍नाच खाण्यास मिळण्याबद्दल जी तक्रार केली तो प्रसंग आठवत असेल. तेव्हा यहोवाने त्यांना खाण्यास लावे पाठवले. इज्राएल लोकांनी यहोवाला आपले समर्पण घोषित केले त्याच्या एका वर्षाआधी सीनच्या अरण्यात परत असेच काहीतरी घडले होते. (निर्गम १६:१-३, १२, १३) पण तेव्हा परिस्थिती तशीच नव्हती. यहोवाने पहिल्यांदा त्यांना लावे दिले होते तेव्हा त्यांनी केलेल्या कुरकुरीबद्दल त्याने जाब विचारला नव्हता. पण आता, परिस्थिती वेगळी होती. “ते मांस त्यांच्या तोंडात पडते न पडते, तोच परमेश्‍वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला व त्याने भयंकर पटकीने त्यांचा संहार केला.” (गणना ११:४-६, ३१-३४) पण आता कोणता बदल झाला होता? आता ते एक समर्पित राष्ट्र होते म्हणून त्यांना जाब देण्यास पात्र ठरवण्यात आले होते. यहोवाने सांगितलेल्या सर्व गोष्टींचे पालन करण्याचे वचन देऊनही त्याने केलेल्या तरतूदींबद्दल कदर न दाखवल्यामुळे ते यहोवाविरूद्ध कुरकूरू लागले! आजसुद्धा यहोवाच्या मेजाबद्दल कुरकुरीचा सूर निघत आहे. यहोवाने “विश्‍वासू व बुद्धिमान दास” याच्याद्वारे ज्या आध्यात्मिक तरतूदी पुरवल्या आहेत त्याची कदर बाळगण्यात काहीजण उणे पडत आहेत. (मत्तय २४:४५-४७) तथापि, हे लक्षात घ्या की, आपले समर्पण आपल्याकडून यहोवाने आपल्यासाठी जे काही केले आहे ते कृतज्ञतेने मनात ठेवण्याची, तसेच तो आपल्याला पुरवीत असलेले आध्यात्मिक अन्‍न स्वीकारण्याची अपेक्षा धरते.

११. (अ) इज्राएल लोकांनी यहोवाची उपासना मूर्तिपूजेद्वारे कशी प्रदुषित केली? (ब) आपल्याला देखील एखाद्या प्रकारच्या मूर्तिपूजेचा संसर्ग कसा जडू शकतो?

११ पुढे पौलाने आणखी ताकीद दिली: “त्यांच्यापैकी कित्येक मूर्तिपूजक होते तसे तुम्ही होऊ नका.” (१ करिंथकर १०:७) येथे प्रेषित, इज्राएल लोकांनी सीनाय डोंगरापाशी यहोवासोबत करार केल्यावर लगेच जी वासराची भक्‍ती आचरली तिचा उल्लेख करीत असावा हे उघड आहे. तुम्ही म्हणाल, ‘यहोवाचा समर्पित सेवक या नात्याने मी तर कधी मूर्तिपूजा करणार नाही.’ तथापि, हे लक्षात घ्या की, इज्राएल लोकांच्या दृष्टीने, त्यांनी यहोवाची उपासना करण्याचे सोडून दिले नव्हते; तरीही त्यांनी वासराची भक्‍ती आचरली—ही गोष्ट देवाला वीट आणणारी होती. अशाप्रकारच्या भक्‍तीमध्ये काय काय समाविष्ट होते? लोकांनी वासराभोवती यज्ञार्पणे वाहिली व मग ते “खायलाप्यायला बसले आणि मग उठून खेळू लागले.” (निर्गम ३२:४-६) आपण यहोवाची सेवा करतो असा आजही काहींचा दावा असेल. तरीपण, त्यांचे जीवन मात्र यहोवाच्या भक्‍तीवर नव्हे, तर जगातील करमणूकीच्या गोष्टींवर केंद्रित असेल, व यानंतर ते यहोवाच्या सेवेला यांच्यामध्ये कोठेतरी जागा देत असतील. हे खरे की, हे एखाद्या सोन्याच्या वासरापुढे नतमस्तक होण्याएवढे पराकोटीचे नसेल, पण तात्त्विकदृष्ट्या ते फारसे वेगळे नाही. स्वतःच्या इच्छेला देव बनवणे हे यहोवाला केलेल्या समर्पणानुरूप जगण्यापासून फार दूरवर जाण्याप्रमाणे आहे.—फिलिप्पैकर ३:१९.

१२. इज्राएल लोकांना बालपौराचा जो अनुभव घडला त्यापासून आपण स्वतःचा त्याग करण्याबद्दल काय शिकू शकतो?

१२ पौलाने पुढे जे ईशारेवजा उदाहरण सांगितले त्यामध्ये देखील करमणूकीचा एक प्रकार समाविष्ट होता. “त्यांच्यापैकी कित्येकांनी जारकर्म केले व ते एका दिवसात तेवीस हजार मरून पडले; तेव्हा आपण जारकर्म करू नये.” (१ करिंथकर १०:८) मवाबी स्त्रियांनी सादर केलेल्या अनैतिक सुखोपभोगाने प्रभावीत झाल्यामुळे इज्राएल लोकांना शिट्टीम येथे बालपौराची भक्‍ती करण्याच्या नादी लावण्यात आले. (गणना २५:१-३, ९) यहोवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी स्वतःचा त्याग करताना त्यामध्ये नैतिक शुद्धता राखण्याच्या बाबतीत त्याच्या दर्जांचा स्वीकार करण्याचे समाविष्ट आहे. (मत्तय ५:२७-३०) सध्या खालावत चाललेल्या दर्जाच्या या युगात आपल्याला सर्व प्रकारच्या अनैतिक वागणूकीपासून शुद्ध राहण्याचे आणि बरे काय व वाईट काय ते ठरविण्याच्या यहोवाच्या अधिकाराला अधीन व्हावयाचे स्मरण देण्यात येते.—१ करिंथकर ६:९-११.

१३. फीनहासाचे उदाहरण यहोवास करण्यात आलेल्या समर्पणात कशाचा समावेश आहे ते समजण्यामध्ये आपल्याला कशी मदत देते?

१३ शिट्टीम येथे जारकर्माच्या जाळ्यात बरेच अडकले तरी काहीजण यहोवास केलेल्या राष्ट्रीय समर्पणानुरूप जगले. यांच्यापैकी, फीनहासने उल्लेखनीय आवेश दाखवला. एक इज्राएली अधिकारी एका मिद्यानी स्त्रीला आपल्या डेऱ्‍यात नेत आहे हे पाहताच फीनहासने लगेच एक बरची घेऊन त्या दोघांनाही आरपार भोसकले. यहोवाने मोशेला म्हटले: “फीनहास ह्‍याने . . . माझ्या इर्ष्येने पेटून इज्राएल लोकांवरील माझा संताप दूर केला म्हणून मी आपल्या इर्ष्येने त्यांचा संहार केला नाही.” (गणना २५:११) यहोवाप्रमाणे इर्ष्येने पेटणे—हाच समर्पणाचा अर्थ आहे. यहोवाला केलेल्या समर्पणाने आपल्या अंतःकरणात जी जागा घेतली आहे ती आपल्याला दुसऱ्‍या कशासही देता येणार नाही. यहोवासाठी असणारा आपला आवेश गंभीर स्वरूपाच्या अनैतिकतेला संमती न दाखवता वडिलांना माहिती कळवून मंडळी शुद्ध राखण्यासाठी प्रवृत्त करतो.

१४. (अ) इज्राएल लोकांनी यहोवाची कशी परीक्षा घेतली? (ब)  यहोवास केलेले संपूर्ण समर्पण आपल्याला ‘न खचण्यासाठी’ कशी मदत देते?

१४ पौलाने आणखी एका ईशारा देणाऱ्‍या उदाहरणाचा उल्लेख केला: “त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची [यहोवा, NW] परीक्षा पाहिली आणि ते सापाच्या योगे नाश पावले; तेव्हा आपण प्रभूची परीक्षा पाहू नये.” (१ करिंथकर १०:९) येथे इज्राएल लोक “वाटेत . . . अधीर झाले” व त्यांनी मोशेपुढे देवाविरूद्ध तक्रार केली त्यावेळेची माहिती पौल देत होता. (गणना २१:४) अशी चूक तुमच्याकडून घडते का? तुम्ही यहोवाला समर्पण केले तेव्हा, हर्मगिदोन हे अगदीच जवळ आहे असा तुमचा विचार होता का? तुम्हाला वाटले होते त्यापेक्षा यहोवाचा धीर लांबतच चालला आहे का? हे ध्यानात घ्या की, आपण कोणा विशिष्ट काळापुरते किंवा केवळ हर्मगिदोनापर्यंत यहोवाला स्वतःचे समर्पण केलेले नाही. आपले समर्पण सर्वदा राहते. यास्तव, “चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.”—गलतीकर ६:९.

१५. (अ) इज्राएल लोकांनी कोणाविरूद्ध कुरकूर केली? (ब) यहोवाला केलेले आपले समर्पण ईश्‍वरशासित अधिकाराला आदर दाखवण्यासाठी आपल्याला कशी चालना देते?

१५ शेवटी, यहोवाच्या नियुक्‍त सेवकांविरूद्ध ‘कुरकुर करणारे’ होऊ नये असा ईशारा पौलाने दिला. (१ करिंथकर १०:१०) कनान देशाचा शोध घेण्यासाठी १२ पैकी १० हेरांनी वाईट अहवाल कळवला तेव्हा इज्राएल लोकांनी मोशे व अहरोन यांजविरूद्ध खूप कुरकूर केली. त्यांनी मोशेऐवजी दुसरा कोणी नेता असावा व इजिप्तला परत जावे अशी देखील बोलणी केली. (गणना १४:१-४) आज यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या कार्यसिद्धीद्वारे जे नेतृत्व केले जात आहे त्याला आपण स्वीकारतो का? विश्‍वासू व बुद्धिमान दासाद्वारे पुरविण्यात आलेल्या विपुल अन्‍नाचे मेज बघून, येशू “यथाकाळी खावयास देण्यासाठी” कोणाचा उपयोग करून घेत आहे ते अगदी स्पष्ट दिसत आहे. (मत्तय २४:४५) यहोवाला पूर्ण जिवाचे केलेले समर्पण त्याच्या नियुक्‍त सेवकांबद्दल आपला आदर दाखवावा अशी अपेक्षा धरते. आम्ही आधुनिक काळातील त्या कुरकुर करणाऱ्‍यांसारखे कधीही बनू नये ज्यांनी जगाकडे परत नेण्यासाठी जणू नवा नेता निवडला.

मी होईल तितके करतो का?

१६. देवाचे समर्पित सेवक स्वतःला कोणते प्रश्‍न विचारु शकतात?

१६ यहोवाला केलेले स्वतःचे समर्पण बिनशर्त आहे हे इज्राएल लोकांनी लक्षात ठेवले असते तर ते इतक्या गंभीर चुकीत अडकले नसते. येशू ख्रिस्त अविश्‍वासू इज्राएल लोकांप्रमाणे न होता, स्वतःच्या सर्मपणानुरूप शेवटपर्यंत जगला. ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून आपण त्याच्या पूर्ण जिवाच्या भक्‍तीचे उदाहरण अनुसरतो आणि आपले जीवन “माणसांच्या वासनांप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे” घालवतो. (१ पेत्र ४:२; पडताळा २ करिंथकर ५:१५.) यहोवाची इच्छा अशी आहे की, “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे.” (१ तीमथ्य २:४) त्यासाठीच, अंत येण्याआधी आपल्याला ‘राज्याच्या सुवार्तेचा’ प्रचार करायचा आहे. (मत्तय २४:१४) आपण या सेवेत किती श्रम घेतो? आपण स्वतःला असे विचारु शकतो: ‘मी होईल तितके करतो का?’ (२ तीमथ्य २:१५) परिस्थिती भिन्‍न असतात. “ज्याच्याजवळ जे नाही त्यावर नव्हे; तर ‘जसे असेल’ तेवढ्या प्रमाणात सेवा मिळण्यात यहोवा संतुष्ट असतो.” (२ करिंथकर ८:१२; लूक २१:१-४) एखाद्याचे समर्पण किती गाढ व प्रांजळ आहे त्याबद्दल कोणीही कोणाचा न्यायनिवाडा करू नये. प्रत्येकाने यहोवाबद्दल त्याला स्वतःला किती गाढ भक्‍ती वाटते त्याचे व्यक्‍तीशः परीक्षण करावे. (गलतीकर ६:४) यहोवाबद्दल वाटणाऱ्‍या प्रीतीने आपल्याला हे विचारण्यास प्रवृत्त करावे, ‘मी यहोवाला कसे संतुष्ट करू शकतो?’

१७. भक्‍ती व कदर यात कोणता संबंध आहे? स्पष्ट करा.

१७ यहोवाबद्दल आपल्याला वाटत असलेला भक्‍तीभाव वाढत राहील तशी आपली कदर अधिकाधिक गाढ होत राहील. जपानमध्ये एका १४ वर्षे वयाच्या मुलाने यहोवाला स्वतःचे समर्पण करून त्या समर्पणाला पाण्याच्या बाप्तिस्म्याद्वारे चिन्हांकित केले. नंतर त्याची इच्छा झाली की, उच्च शिक्षण घ्यावे व एक शास्त्रज्ञ बनावे. त्याने पूर्ण वेळेच्या सेवकपणाचा कधीच विचार केला नाही, पण एक समर्पित सेवक या अर्थी त्याची यहोवा व त्याच्या संघटनेला सोडण्याची कधीच इच्छा झाली नाही. आपले ऐहिक ध्येय मिळवण्यासाठी तो विद्यालयीन शिक्षणक्रम घेऊ लागला. तेथे त्याला दिसले की, विद्यालयाच्या पदवीधरांना त्यांचे संपूर्ण जीवन त्यांच्या कारखान्यांना किंवा अभ्यासक्रमाला वाहण्यासाठी जबरदस्ती केली जात आहे. त्याला वाटायला लागले, ‘मी येथे राहून काय करतो? मला त्यांच्या जीवनशैलीचा खराच मागोवा घेता येईल का आणि प्रापंचिक कामाला माझे जीवन समर्पण करता येईल का? मी आधीच यहोवाला समर्पित नाही का?’ आता नव्याने आवड निर्माण होऊन तो नियमित पायनियर बनला. समर्पणाबद्दलची त्याची समज अधिक बळावली व त्याला जेथे त्याची गरज होती तेथे जाण्यासाठी अंतःकरणात दृढनिश्‍चय करण्याची चालना लाभली. तो सेवा प्रशिक्षण प्रशालेला उपस्थित राहिला आणि त्याला परदेशात मिशनरी सेवा करण्याची नियुक्‍ती मिळाली.

१८. (अ) यहोवास आपण केलेल्या समर्पणात किती गोष्टी समाविष्ट आहेत? (ब) यहोवास केलेल्या आमच्या समर्पणापासून आपल्याला कोणते प्रतिफळ मिळवता येईल?

१८ समर्पणात आपले सबंध जीवन गोवलेले आहे. आपण स्वतःचा त्याग करून येशूच्या सुंदर उदाहरणास “दररोज” अनुसरले पाहिजे. (लूक ९:२३) आपण स्वतःचा त्याग केला असल्यामुळे यहोवाला एखादी सुटी किंवा रजा विचारत नाही. आपले जीवन, यहोवाने त्याच्या सेवकांकरता आखून दिलेल्या तत्त्वांशी सुसंगत आहे. जेथे कोठे आपल्याला वैयक्‍तीक निवड करण्याची संधी आहे तेथे देखील आपण यहोवासाठी समर्पित जीवन जगण्यासाठी करता येईल ते सर्व करीत आहोत का हे पाहणे उचित ठरेल. आपण दररोज त्याची सेवा करीत असता, त्याला संतुष्ट करण्यासाठी होता होईल तितके करीत असता, आपण ख्रिस्ती या नात्याने नक्कीच यशस्वी होऊ आणि आपल्याला यहोवाची कृपापसंती लाभेल; तोच आपल्या पूर्ण जिवाच्या भक्‍तीला पात्र आहे.

तुम्हाला स्पष्टीकरण देता येईल का?

◻ येशू ख्रिस्ताच्या बाबतीत समर्पणामध्ये काय समाविष्ट होते?

◻ आपण यहोवाविरूद्ध कुरकूर करायचे का टाळावे?

◻ मूर्तिपूजेला धूर्तपणे आपल्या जीवनात शिरु देण्याचे आपण कसे टाळू शकतो?

◻ काय लक्षात ठेवल्यामुळे देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यात ‘खचून जाऊ नये’ म्हणून आपल्याला मदत मिळू शकेल?

[१७ पानांवरील चित्रं]

समर्पित ख्रिस्ती ‘चांगले ते करण्याचा कंटाळा करीत नाहीत’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा