वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 २/१ पृ. २६-२९
  • हा कोणाचा दोष आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • हा कोणाचा दोष आहे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आर्थिक संकट
  • मुलांसोबतचे नैराश्‍य
  • आध्यात्मिक उत्कर्षामध्ये अपयश
  • अंतिम सबब
  • वास्तविकतेला सामोरे जाणे
  • नेहमीच दोषी ठरवले जाण्याचे मी कसे टाळावे?
    सावध राहा!—१९९७
  • काळजी वाहणारा देव आहे?
    काळजी वाहणारा देव आहे का?
  • यहोवाला दोष देता येणार नाही
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • “ती माझी चूक नाही”
    सावध राहा!—१९९६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 २/१ पृ. २६-२९

हा कोणाचा दोष आहे?

पहिला मनुष्य आदाम याने या प्रवृत्तीची सुरुवात केली. त्याने पाप केल्यानंतर देवाला म्हटलेः “जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले.” वास्तविकपणे, “हा माझा दोष नाही!” असे तो म्हणत होता. पहिली स्त्री हव्वा हिने देखील तसेच केले आणि म्हटले: “सर्पाने—मला भुरळ घातली म्हणून ते मी खाल्ले.”—उत्पत्ती ३:१२, १३.

अशाप्रकारे एदेन बागेमध्ये स्वतःच्या कार्यांच्या जबाबदारीचा अस्वीकार करणाऱ्‍या प्रवृत्तीचा प्रारंभ झाला. याबद्दल तुम्ही कधी दोषी झालात का? समस्या उद्‌भवतात तेव्हा तुम्ही दोष लागलीच दुसऱ्‍यांवर लावता का? दोष खरोखरच कोणाचा आहे हे पाहण्यासाठी तुम्ही परिस्थितीचे परिक्षण करता का? दररोजच्या जीवनामध्ये आपल्या चुकांबद्दल इतरांवर दोषारोप करण्याच्या जाळ्यात सापडणे आणि “हा माझा दोष नाही!” असे म्हणणे फार सोपे आहे. आपण सामान्य परिस्थितींवर दृष्टिक्षेप टाकू या आणि काही लोकांची काय करण्याची प्रवृत्ती असते हे पाहू या. समान परिस्थितींमध्ये तुम्ही काय केले असते यावर विचार करणे हे अधिक महत्त्वाचे आहे.

आर्थिक संकट

आर्थिक बिकट समस्येमध्ये असताना काही लोक म्हणतील: “हा माझा दोष नाही—तर अर्थव्यवस्था, कपटी व्यापारी लोक, महागाई यांचा आहे. परंतु या बाबींवर खरोखरच दोष लावता येतो का? कदाचित अनिश्‍चित परिस्थिती त्यांना संशयास्पद किंवा व्यापारातील अतिरेकी धाडस याकडे निरवतात. काहीवेळा लोभ वास्तविकतेपेक्षा वरचढ ठरतो आणि त्यामुळे लोक अज्ञात प्रवाहात वाहवत जाऊन संकटांना सहज बळी पडतात. “दिसते तसे नसते म्हणून जग फसते” ही म्हण ते विसरतात. त्यांना ऐकायला आवडतो असा सल्ला ते शोधतात; परंतु आर्थिक संकट भयंकर स्वरूपाची वास्तविकता बनते तेव्हा ते दुसऱ्‍यावर दोषारोप करण्याचा प्रयत्न करतात. दुःखाचे म्हणजे, काहीवेळा ख्रिस्ती मंडळीमध्ये देखील हे होऊ शकतो.

काही लोक मूर्ख किंवा बनावट गुंतवणूक योजनांच्या सापळ्यामध्ये सापडले आहेत, जसे की बनावट हिरे खरेदी करणे, फोल ठरलेल्या दुरदर्शनवरील लोकप्रिय कार्यक्रमाला आर्थिक साहाय्य पुरविणे किंवा स्थावर मालमत्तेच्या विकासाला पाठींबा देणे हे दिवाळखोर झाले आहे. पैश्‍यांसाठी असणारी अत्याधिक हाव यामुळे बायबलच्या सल्ल्याचे त्यांना विस्मरण झाले असेल, ‘जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत व पाशात सापडतात आणि त्यांनी स्वतःला पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.’—१ तीमथ्य ६:९, १०.

बेशिस्तपणे खर्च केल्याने आर्थिक अधोगती होते. काहींना अलीकडील फॅशन नियतकालिकांमधील लोकांप्रमाणे त्यांनी दिसावे, खर्चीक सुट्ट्या घालवाव्यात, सर्वोत्तम रेस्टॉरंटमध्ये जेवावे आणि वयस्करांच्या मनोरंजनासाठी असणारी “खेळणी”—आरामदायक गाड्या, बोटी, कॅमेरे, स्टेरिओ इत्यादी साहित्य खरेदी करावे असे वाटते. अर्थातच, चातुर्यपूर्ण योजना आणि बचत यांच्या साहाय्याने काहींना कालांतराने हे प्राप्त करणे शक्य होईल. परंतु या गोष्टींना प्राप्त करण्याची घाई करणारे कर्जबाजारी होऊ शकतात. त्यांनी असे केल्यास हा दोष कोणाचा आहे? अर्थातच, त्यांनी नीतीसूत्राच्या १३:१८ मधील सबळ सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आहे, “बोधाचा अव्हेर करणाऱ्‍याला द्रारिद्र्‌य व लज्जा ही प्राप्त होतात.”

मुलांसोबतचे नैराश्‍य

काही पालक म्हणतील, “माझ्या मुलांनी सत्याचा त्याग केला यास वडील कारणीभूत आहेत; त्यांनी माझ्या मुलांकडे पुरेसे लक्ष दिले नाही.”

वडिलांवर कळपाचे मेंढपाळकत्व करण्याची आणि काळजी घेण्याची जबाबदारी आहे; परंतु स्वतः पालकांबद्दल काय? देवाच्या आत्म्याची फळे त्यांच्या प्रत्येक व्यवहारामध्ये प्रदर्शित करण्यात ते उदाहरणीय आहेत काय? बायबलचा कौटुंबिक अभ्यास नियमितपणे संचालित करण्यात येत होता का? यहोवाच्या सेवेत पालकांनी आवेश दाखविला होता का आणि त्यासाठी तयारी करण्यात मुलांना मदत दिली होती का? त्यांच्या मुलांच्या संगतीबद्दल ते दक्ष होते का?

याप्रमाणेच, पालकांनी शालेय अभ्यासक्रमाबद्दल म्हणणे सोपे आहे की, “माझ्या मुलाच्या शाळेतील झालेल्या अधोगतीस शिक्षक दोषी आहेत. माझा मुलगा त्यांना आवडत नव्हता. त्या शाळेचा शैक्षणिक स्तर फारच हलका आहे.” परंतु पालकाने शाळेबरोबर नजीकचा संपर्क ठेवला होता का? मुलाच्या अभ्यासक्रमात आणि अभ्यासात पालकाने आस्था दाखविली होती का? त्याच्या गृहपाठासाठी वेळापत्रक बनविले होते का आणि आवश्‍यकता होती तेव्हा त्याला मदत देण्यात आली होती का? मूलभूत समस्या पालकाच्या किंवा मुलाच्या मानसिकतेचा वा आळशीपणाचा परिणाम होऊ शकते का?

शालेय व्यवस्थेवर पालकांनी दोषारोप करण्यापेक्षा त्यांच्या मुलांकडे योग्य मनोवृत्ती आहे आणि शाळेमध्ये त्यांच्या शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या सर्व संधींचा ते फायदा घेतात याची खात्री करून घेण्यासाठी त्यांनी सकारात्मक कार्य केल्यास ते फारच लाभदायक ठरेल.

आध्यात्मिक उत्कर्षामध्ये अपयश

अनेकदा कोणीएक असे म्हणताना आपण ऐकता, “मी आध्यात्मिकरित्या दृढ झालो असतो; परंतु मी आध्यात्मिकरित्या दृढ नाही आणि हा माझा दोष नाही. वडील माझ्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. मला मित्र नाहीत. यहोवाचा आत्मा ह्‍या मंडळीमध्ये नाही.” त्याचवेळेस मंडळीतील इतरांना मित्र आहेत; ते आनंदी आहेत; आध्यात्मिकरित्या उत्तम प्रगती करतात आणि वृद्धी आणि आध्यात्मिक भरभराटीने मंडळी आशीर्वादित आहे. तर मग, काहींना समस्या का आहेत?

काही लोकांना नकारात्मक आणि तक्रारीचा आत्मा प्रदर्शित करणाऱ्‍यांची सोबत करण्यास आवडते. तीक्ष्ण धारदार जीभ आणि कायमस्वरूपी तक्रारी यामुळे मोठ्याप्रमाणात नैराश्‍य येऊ शकते. आध्यात्मिकरित्या अधःपात होऊ नये म्हणून काहीजण अशा लोकांच्या सामाजिक संबंधामध्ये मर्यादा ठेवतील. मंडळीमध्ये प्रेमाचा अभाव म्हणून एखादी व्यक्‍ती पहिल्यांदा एका मंडळीमध्ये त्यानंतर दुसऱ्‍या आणि तिसऱ्‍या असे स्थलांतर करण्यास सुरवात करील. आफ्रिकेतील हिरवळीच्या शोधार्थ स्थलांतर करणाऱ्‍या प्राण्यांप्रमाणे हे “स्थलांतरीत” ख्रिस्ती नेहमी त्यांच्यासाठी योग्य असणाऱ्‍या मंडळीचा शोध घेतात. त्यांनी इतरांमधील चांगल्या गोष्टींकडे पाहिले असते आणि त्यांच्या जीवनामध्ये देवाच्या आत्म्याच्या फळांना जास्तीत जास्त प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला असता तर ते किती आनंदी झाले असते!—गलतीकर ५:२२, २३.

काहीजण राज्य सभागृहातील प्रत्येक सभेमध्ये विभिन्‍न व्यक्‍तीबरोबर बोलण्यासाठी आणि तिच्या एखाद्या उत्तम मुद्याबद्दल प्रामाणिक प्रशंसा करण्यासाठी खास प्रयत्न करतात. ही प्रशंसा त्याच्या मुलाचे सद्‌वर्तन, ख्रिस्ती सभांमधील नियमितपणा, टेहळणी बुरुज अभ्यासात उत्तम तयारीनिशी केलेली विवेचने, मंडळीचा पुस्तक अभ्यास आणि क्षेत्र सेवेसाठी आणि इतर गोष्टींसाठी त्याचे घर उपलब्ध करुन दाखविलेले आदरातिथ्य यासाठी असू शकते. अपरिपूर्णतेमुळे सुरवातीस दुर्लक्षित झालेल्या चांगल्या गुणांचा शोध घेण्याचा तुम्ही निर्धार केल्यास तुमच्या ख्रिस्ती बंधू आणि भगिनींमध्ये हे चांगले गुण तुम्हाला निश्‍चितच आढळून येतील. यामुळे तुम्ही त्यांना प्रिय व्हाल आणि तुम्हाला एकनिष्ठ मित्रांचा तुटवडा भासणार नाही.

अंतिम सबब

“ही देवाची इच्छा आहे.” “दियाबलावर दोष लावा.” स्वतःच्या अपयशासाठी एकतर देवावर किंवा दियाबलावर दोष लावणे ही सामान्यपणे अंतिम सबब आहे. हे खरे आहे की, देवाचा किंवा सैतानाचा जीवनातील काही गोष्टींवर प्रभाव पडू शकतो. तथापि, काही असा विश्‍वास बाळगतात, की त्यांच्या जीवनामध्ये होणारी प्रत्येक गोष्ट चांगली वा वाईट हा देव किंवा सैतान यांच्या हस्तक्षेपाचा परिणाम आहे. त्यांच्याबाबतीत जे झाले आहे हे त्यांच्या स्वतःच्या कार्यांचा परिणाम नव्हता असे आहे. “माझ्याकडे ती नवी कार असावी अशी देवाची इच्छा असल्यास ती प्राप्त करण्यासाठी तो मला मदत करील.”

असे लोक देव त्यांना वाचवील असे गृहीत धरून आर्थिक तसेच इतर निर्णय घेतात आणि बिनधास्तपणे जीवन जगतात. त्यांच्या अविचारी कार्यांमुळे आर्थिक किंवा इतर आपत्ती आल्यास ते दियाबलावर दोष लावतात. ते घाईने ‘परिणामांची जाण’ न ठेवता काहीही करतात आणि अपयशाबद्दल सैतानावर दोष लावतात आणि त्याहून अधिक म्हणजे यहोवा हस्तक्षेप करील याची अपेक्षा करतात हे केवळ उद्दामपणाचे नव्हे तर शास्त्रवचनाच्या विरोधात देखील होईल.—लूक १४:२८, २९.

येशूला अशाप्रकारे विचार करण्यास आणि स्वतःच्या कार्यांची जबाबदारी न स्वीकारण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न सैतानाने केला. त्याच्या दुसऱ्‍या परीक्षेबद्दल मत्तय ४:५-७ मधील अहवाल म्हणतो: “सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले; आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील,’ आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील.” येशूने हे ओळखले, की त्याने अशाप्रकारचा मूर्खपणाचे किंबहूना आत्महत्येचा मार्ग अनुसरल्यास तो यहोवाच्या हस्तक्षेपाची अपेक्षा करू शकत नाही. म्हणूनच त्याने प्रत्युत्तर दिले, “असा शास्त्रलेख आहे की, तुझा देव [यहोवा, NW] त्याची परीक्षा पाहू नको.”

स्वतःच्या शंकास्पद कार्यांसाठी दियाबलावर किंवा देवावर दोष लावण्याची प्रवृत्ती असणारे लोक देव किंवा सैतान यांच्यासाठी ताऱ्‍यांची केवळ अदलाबदल करणाऱ्‍या ज्योतिषशास्त्राच्या अनुयायांप्रमाणेच आहेत. जे काही होते ते त्यांच्या नियंत्रणाच्या पलीकडे आहे अशी त्यांची खात्री पटल्यामुळे गलती ६:७ मध्ये लिहिलेल्या साध्या तत्त्वाकडे ते दुर्लक्ष करतात, “माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.”

वास्तविकतेला सामोरे जाणे

आपण अपरिपूर्ण जगामध्ये जगत आहोत यावर कोणीही वाद घालणार नाही. येथे चर्चा केलेल्या समस्या वास्तविक आहेत. लोक आर्थिकरीत्या आपला लाभ उठवतील. काही मालक अप्रामाणिक असतील. परिचितजन आपल्या मुलांवर अयोग्य प्रभाव टाकतील. काही शिक्षकांना आणि विद्यालयांना सुधारणेची आवश्‍यकता आहे. वडील कधीकधी अधिक प्रेमळ आणि चिंताशील होऊ शकतात. तरी देखील आपण अपरिपूर्णतेच्या परिणामाला त्याचप्रमाणे बायबल स्पष्ट म्हणते, “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे,” याला स्वीकारले पाहिजे. त्यामुळे जीवनाचा मार्ग नेहमी सहज असेल याची अपेक्षा करणे हे वास्तविक ठरणार नाही.—१ योहान ५:१९.

याशिवाय, आपल्या अपरिपूर्णतेला आणि मर्यादांना आपण ओळखले पाहिजे आणि हे समजून घेण्यास हवे की अनेकदा येणाऱ्‍या समस्या केवळ आपल्या मूर्खतेचा परिणाम आहे. पौलाने रोमच्या ख्रिश्‍चनांना सल्ला दिला: “मी तुम्हापैकी प्रत्येकाला सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका.” (रोमकर १२:३) तो सल्ला आपल्यासाठी आज तेवढ्याच प्रभावशालीपणे लागू होतो. आपल्या जीवनामध्ये काही चुकीचे घडल्यास तत्काळ आपले पूर्वज आदाम आणि हव्वा यांचे अनुकरण करून आपण असे म्हणणार नाही, की “हा माझा दोष नाही!” तर आम्ही स्वतःला विचारू, ‘हा दुःखद परिणाम टाळण्यासाठी मी वेगळ्या पद्धतीने काय करू शकलो असतो? या बाबतीत मी उत्तम निर्णयशक्‍ती आणि बुद्धीमान स्रोत असणाऱ्‍याकडून सल्ला घेतला का? मी संबंधित पक्ष किंवा पक्षांना दोषी नाहीत असे गृहित धरले वा त्यांना मोठेपण दिले होते का?’

आपण ख्रिस्ती तत्त्वांचे अनुकरण केले आणि योग्य निर्णयशक्‍ती वापरली तर आपल्याला अधिक मित्र आणि अल्प समस्या असतील. आपल्या दैनंदिन जीवनातील अनावश्‍यक समस्यांचे निवारण होईल. इतरांच्या व्यवहारामध्ये आपल्याला आनंद मिळेल आणि मग “हा कोणाचा दोष आहे?” हा प्रश्‍न आपल्याला सतावणार नाही.

[२८ पानांवरील चित्रं]

मुलांनी आध्यात्मिकरित्या उत्कर्ष पावण्यास मदत करण्यासाठी पालक पुष्कळ काही करू शकतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा