वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 २/१ पृ. ३०
  • “मी पूर्वी कधीही असे पाहिले नाही!”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “मी पूर्वी कधीही असे पाहिले नाही!”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 २/१ पृ. ३०

“मी पूर्वी कधीही असे पाहिले नाही!”

अर्जेंटिना येथील वॉचटावर संस्थेच्या शाखा दप्तराला हजार प्रतिनिधींना चिलीमधील सॉन्तिआगो येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या चार दिवसीय “ईश्‍वरी शिक्षण” या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण देण्यात आले. परदेशातील अधिवेशनाला विशाल समूहाने उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण मिळण्याची अर्जेंटिनातील साक्षीदारांची ही पहिलीच वेळ होती.a प्रतिक्रिया काय होती? ८,५०० पेक्षा अधिक अर्ज आले आणि त्यापैकी १,०३९ प्रतिनिधींची निवड करण्यात आली.

ब्यूनोस आईरेस ते सॉन्तिआगो पर्यंतचा १,४०० किलोमिटरचा प्रवास करण्यासाठी एकूण १४ बस गाड्यांची योजना करण्यात आली होती. नेत्रदीप सृष्टी सौंदर्याने २६ तासांच्या प्रवासाची शोभा वाढविली. ॲडीज पर्वत पार करताना प्रतिनिधी ॲकोनकाग्वा या ६,९६० उंची असलेल्या पश्‍चिम गोलार्धातील सर्वोच्च शिखराजवळून गेले. चिलीच्या दिशेने जाणारा खोल उतार असणारा वळणदार घाट विशेष स्मरणीय ठरला. चालकांनी हा कठीण भूप्रदेश मोठ्या कौशल्याने पार केल्यामुळे त्यांची खूप प्रशंसा झाली!

तथापि, सर्वात मनोरम देखावा तर अधिवेशनामध्ये पाहावयास मिळणार होता. राष्ट्रीय संघर्ष आणि जातीय तणाव असलेल्या जगात, उपस्थित २४ राष्ट्रांमधून आलेला ८०,००० लोकांचा एकत्रित प्रचंड समूह पाहणे किती तजेला देणारे होते—खरोखर एक आंतरराष्ट्रीय बंधुत्व! उपस्थितांमध्ये अशाप्रकारचे ऐक्य पहिल्यांदाच पाहिल्याने अनेक बस चालकांनी यहोवाच्या साक्षीदारांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आस्था दर्शविली. त्यापैकी एकाने उद्‌गारले, “मी पूर्वी कधीही असे पाहिले नाही!”

[तळटीपा]

a अर्जेंटिनामध्ये १९४९ ते १९८२ पर्यंत असणाऱ्‍या शासकीय निर्बंधामुळे अशाप्रकारचे कार्य अशक्य होते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा