मोठा लोकसमुदाय पवित्र सेवा करत आहे
“ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करितात.”—प्रकटीकरण ७:१५.
१. सन १९३५ मध्ये आध्यात्मिक समजेची कोणती प्रगतीदर्शक गोष्ट गाठली गेली?
वॉशिंग्टन, डी. सी. मधील यहोवाच्या साक्षीदारांच्या एका अधिवेशनातील प्रतिनिधींमध्ये मे ३१, १९३५ रोजी आनंदीआनंद होता. तेथे, पहिल्यांदाच, प्रकटीकरण ७:९ मधील मोठ्या समुहाची (किंवा मोठ्या लोकसमुदायाची), बायबलच्या उर्वरित भागाच्या सुसंगतीत आणि ज्या घटनांचा उलगडा होण्यास सुरवात झाली त्याच्या एकमतात स्पष्ट ओळख देण्यात आली.
२. देवाने वाढत्या संख्येला स्वर्गीय जीवनासाठी बोलावलेले नसल्याचे त्यांना कळले हे कशावरुन दिसून येते?
२ सुमारे सहा आठवड्यांआधी, यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांतील प्रभूच्या सांज भोजनाच्या समारंभाला उपस्थित असलेल्या १०,६८१ (जवळजवळ ६ पैकी १) लोकांनी भाकरी आणि द्राक्षारस या बोधचिन्हांचा सहभाग घेतला नव्हता. त्यांच्यापैकी ३,६८८ जण देवाच्या राज्याचे सक्रिय उद्घोषक होते. त्यांनी त्या बोधचिन्हांची सहभागिता का केली नाही बरे? कारण बायबलच्या आधारावर जे काही शिकले होते त्यातून त्यांनी जाणले की देवाने त्यांना स्वर्गीय जीवनाचे आमंत्रण दिले नव्हते; परंतु ते यहोवाच्या प्रेमळ तरतूदींमध्ये एका वेगळ्या मार्गाने भाग घेऊ शकत होते. यास्तव, त्या अधिवेशनात वक्त्याने, “पृथ्वीवर अनंतकालिक जीवनाची आशा असणारे सर्व जण, कृपया उभे राहाल का?” असे विचारल्यावर काय झाले? हजारो लोक उभे राहिले आणि त्यानंतर श्रोत्यांनी खूप वेळेपर्यंत आनंदाने जयघोष केला.
३. मोठ्या लोकसमुदायाची ओळख पटल्याने क्षेत्र सेवेसाठी नव्याने उत्तेजन का मिळते आणि साक्षीदारांना याबद्दल काय वाटले?
३ प्रतिनिधी त्या अधिवेशनात जे शिकले त्यामुळे त्यांच्या सेवेला नव्याने उत्तेजन मिळाले. त्यांना हे समजून आले की, जुन्या व्यवस्थेच्या अंताआधी, आता केवळ काही हजारोंनाच नव्हे तर लोकांच्या एका मोठ्या समुहाला नंदनवनमय पृथ्वीवर सर्वकाळ जगण्यासाठी जीवन बचावण्याच्या यहोवाच्या व्यवस्थेत येण्याची संधी दिली जाईल. सत्याच्या प्रेमिकांना तेथे किती उत्साहवर्धक संदेश सादर करण्यात आला होता! एक खूप मोठे कार्य—आनंदविणारे कार्य सिद्धीस न्यावयाचे होते हे यहोवाच्या साक्षीदारांनी जाणले. अनेक वर्षांनंतर, जॉन बूथ जे नियमन मंडळाचे एक सदस्य बनले त्यांनी आठवून म्हटले: “त्या संमेलनाने आम्हाला आनंदासाठी पुष्कळ कारणे पुरवली.”
४. (अ) सन १९३५ पासून मोठ्या लोकसमुदायाचे एकत्रीकरण खरेपणाने कोठवर झाले आहे? (ब) मोठा लोकसमुदाय आपला विश्वास जिवंत असल्याचा पुरावा कशाप्रकारे देत आहे?
४ त्यानंतरच्या वर्षांमध्ये, यहोवाच्या साक्षीदारांची संख्या नाट्यमयरीत्या वाढली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान, बहुतेकवेळा त्यांचा हिंसक छळ केला असताना देखील, एका दशकात त्यांची संख्या जवळजवळ तिप्पट झाली. १९३५ मध्ये जाहीर साक्ष देणाऱ्या ५६,१५३ प्रचारकांची संख्या १९९४ पर्यंत वाढली. त्यांचे २३० पेक्षा अधिक राष्ट्रांमध्ये ४९,००,००० पेक्षा अधिक राज्य उद्घोषक झाले. यांच्यातील बहुतांश लोक, ज्यांना यहोवा नंदनवनमय पृथ्वीवरील परिपूर्ण जीवन देणार आहे अशांपैकीचे असण्याची उत्सुकतेने वाट पाहून आहेत. त्यांची तुलना लहान कळपासोबत केल्यावर, हा खरोखरच एक मोठा लोकसमुदाय बनला आहे. विश्वास आहे असे म्हणणारे आणि तरीही तो प्रदर्शित न करणारे असे हे लोक नाहीत. (याकोब १:२२; २:१४-१७) ते सर्व इतरांसोबत देवाच्या राज्याच्या सुवार्तेची सहभागिता करतात. तुम्ही त्या आनंदी समूहातील एक आहात का? सक्रिय साक्षीदार असणे हे एक महत्त्वपूर्ण ओळखचिन्ह आहे, परंतु यामध्ये यापेक्षाही अधिक काही समाविष्ट आहे.
‘राजासनासमोर उभा राहिलेला’
५. मोठा लोकसमुदाय ‘राजासनासमोर उभा आहे’ या वस्तुस्थितीने काय सूचित होते?
५ प्रेषित योहानाला दिलेल्या दृष्टांतात, त्याने त्यांना ‘राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभे राहिलेले’ पाहिले. (प्रकटीकरण ७:९) या संदर्भात वर्णन केल्याप्रमाणे, देवाच्या राजासनासमोर त्यांचे उभे राहणे, यहोवाच्या सार्वभौम सत्तेला ते देत असलेल्या पूर्ण मान्यतेला सूचित करते. यामध्ये पुष्कळ गोष्टी समाविष्ट आहेत. जसे की: (१) आपल्या सेवकांसाठी बरे आणि वाईट काय आहे हा निर्णय करण्याचा हक्क यहोवाचा आहे हे ते कबूल करतात. (उत्पत्ती २:१६, १७; यशया ५:२०, २१) (२) यहोवा त्याच्या वचनाद्वारे जे काही बोलतो त्याचे ते श्रवण करतात. (अनुवाद ६:१-३; २ पेत्र १:१९-२१) (३) यहोवाने देखरेख करण्यासाठी ज्यांना सुपूर्त केले आहे अशांच्या अधीन राहण्याचे महत्त्व ते जाणतात. (१ करिंथकर ११:३; इफिसकर ५:२२, २३; ६:१-३; इब्रीयांस १३:१७) (४) अपरिपूर्ण असताही ते ईश्वरी मार्गदर्शनाला, कुरकुर न करता, स्वेच्छेने, पूर्ण अंतःकरणाने प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतात. (नीतीसूत्रे ३:१; याकोब ३:१७, १८) ज्याला गाढ आदर आणि अधिक प्रीती दाखवतात त्या यहोवाच्या राजासनासमोर ते पवित्र सेवा करण्यासाठी उभे आहेत. या मोठ्या लोकसमुदायाच्या बाबतीत, राजासनासमोर त्यांचे ‘उभे राहणे’, राजासनावर बसलेल्याच्या स्वीकृतीला सूचित करते. (पडताळा प्रकटीकरण ६:१६, १७.) कोणत्या आधारावर स्वीकृती?
“शुभ्र झगे परिधान केलेला”
६. (अ) मोठ्या लोकसमुदायाने ‘शुभ्र झगे परिधान केलेले’ आहेत, याचा अर्थ काय होतो? (ब) मोठा लोकसमुदाय यहोवासमोर नीतीमान भूमिका कशी प्राप्त करतो? (क) ख्रिस्ताच्या ओतलेल्या रक्तावरील विश्वासाचा प्रभाव मोठ्या लोकसमुदायाच्या जीवनावर कोठवर होतो?
६ प्रेषित योहानाने जे पाहिले त्याच्या वर्णनानुसार या मोठ्या लोकसमुदायाच्या सदस्यांनी “शुभ्र झगे परिधान” केलेले आहेत. ते शुभ्र झगे यहोवासमोर त्यांच्या शुद्ध, नीतिमान भूमिकेला चित्रित करतात. त्यांना अशाप्रकारची भूमिका कशी मिळाली बरे? योहानाच्या दृष्टांतात ते “कोकऱ्यासमोर” उभे होते हे आपण आधीच पाहिले आहे. ते येशू ख्रिस्ताला “जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा” म्हणून ओळखतात. (योहान १:२९) दृष्टांतात देवाच्या राजासनाजवळ उपस्थित असलेल्या एका वडिलांना असे म्हणताना योहानाने ऐकले: “ह्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत. ह्यामुळे ते देवाच्या राजासनासमोर आहेत.” (प्रकटीकरण ७:१४, १५) लाक्षणिकरीत्या, त्यांनी मुक्त करणाऱ्या ख्रिस्ताच्या रक्तावर विश्वास ठेवून आपले झगे धुतले आहेत. खंडणीविषयी बायबलच्या शिक्षणाला ते केवळ बौद्धिक मान्यता देत नाहीत. त्याच्यासाठी दाखवलेली गुणग्राहकता ते आंतरिक कोणत्या प्रकारचे आहेत त्यावर प्रभाव पाडते; आणि अशाप्रकारे, ते “अंतःकरणाने” विश्वास ठेवतात. (रोमकर १०:९, १०) ते त्यांच्या जीवनात काय करतात त्यावर याचा खोलवर परिणाम होतो. विश्वास बाळगून, ते ख्रिस्ताच्या बलिदानाच्या आधारावर स्वतःला यहोवास समर्पित करतात व समर्पणाचे द्योतक म्हणून पाण्याने बाप्तिस्मा घेऊन त्यांनी केलेल्या समर्पणाच्या एकवाक्यतेत राहतात आणि अशाप्रकारे यहोवासोबत एका स्वीकृत नातेसंबंधाचा आनंद लुटतात. काळजीपूर्वकपणे सुरक्षित ठेवण्याचा—किती मोठा विशेषाधिकार!—२ करिंथकर ५:१४, १५.
७, ८. मोठ्या लोकसमुदायाने आपली वस्रे निष्कलंक ठेवण्यासाठी यहोवाच्या संघटनेने त्यांना कशी मदत दिली आहे?
७ यहोवाच्या संघटनेने प्रेमळ काळजीने त्यांच्या चिरकाल लाभास्तव वारंवार एखाद्याच्या ओळखचिन्हाच्या झग्याला डाग किंवा कलंकित करणारी मनोवृत्ती व वर्तन याकडे लक्ष आकर्षित केले आहे. हा दिखाऊ दावा ती व्यक्ती प्रकटीकरण ७:९, १० मधील भविष्यसूचक वर्णनाशी खरोखर जुळणार नाही. (१ पेत्र १:१५, १६) आधी जे प्रकाशित करण्यात आले होते त्यावर आणखी जोर देऊन टेहळणी बुरुज नियतकालिकाने १९४१ मध्ये व त्यानंतर वारंवार हे दाखवून दिले की इतरांना प्रचार करावा आणि नंतर सेवा करत नसताना जारकर्म किंवा व्यभिचार यासारख्या वर्तनात गुंतणे अतिशय अयोग्य ठरेल. (१ थेस्सलनीकाकर ४:३; इब्रीयांस १३:४) १९४७ मध्ये, यावर जोर देऊन सांगण्यात आले की, ख्रिस्ती विवाहाबद्दल यहोवाचे दर्जे सर्व राष्ट्रांमध्ये लागू होतात; स्थानिक रीतीरिवाज कोणत्याही पद्धतीला मान्यता देत असले तरी, बहुपत्नीकत्व आचरीत राहणारे लोक, यहोवाचे साक्षीदार बनू शकत नाहीत.—मत्तय १९:४-६; तीत १:५, ६.
८ सन १९७३ मध्ये, संपूर्ण जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांना दाखवून देण्यात आले की सर्वांनी मग ते कोठेही असले तरी, तंबाखूचा दुरुपयोग, या सारख्या निर्विवाद मलिन सवयांशी संबंधित असलेल्या कोणत्याही गोष्टीपासून—केवळ राज्य सभागृहात किंवा क्षेत्र सेवेतच नव्हे तर लौकिक काम करताना किंवा लोकांच्या नजरेस दिसणार नाही अशा एकांत ठिकाणी असताना देखील त्यापासून पूर्णपणे दूर राहिले पाहिजे. (२ करिंथकर ७:१) यहोवाच्या साक्षीदारांच्या १९८७ च्या प्रांतीय अधिवेशनांमध्ये, ख्रिस्ती युवकांना देवासमोर शुद्ध आचरण राखण्यासाठी त्यांनी दुहेरी जीवन जगण्यापासून दक्ष राहिले पाहिजे याविषयी कडक सल्ला दिला गेला. (स्तोत्र २६:१, ४) टेहळणी बुरुज नियतकालिकाने वारंवार जगाच्या आत्म्याच्या विविध पैलूंविषयी इशारा दिला आहे. कारण “देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण” यामध्ये स्वतःला “जगापासून निष्कलंक ठेवणे” समाविष्ट आहे.—याकोब १:२७.
९. मोठ्या संकटानंतर देवाच्या राजासनासमोर अनुमोदन मिळालेल्या स्थितीत वास्तविकतेत कोण उभे राहतील?
९ आध्यात्मिक आणि नैतिकदृष्ट्या शुद्ध राहण्यासाठी ज्यांचा विश्वास प्रेरित करील असेच लोक देवाचे अनुमोदन मिळालेले सेवक या नात्याने येणाऱ्या महासंकटानंतर ‘राजासनासमोर उभे’ राहिलेले असतील. हे लोक ख्रिस्ती राहणीमानाची केवळ सुरवातच करणार नाहीत तर निष्ठावानपणे त्यातच टिकून राहतील.—इफिसकर ४:२४.
‘हाती खजुरीच्या झावळ्या घेतलेला’
१०. योहानाने मोठ्या लोकसमुदायाच्या हातात पाहिलेल्या खजुरीच्या झावळ्यांचे महत्त्व काय आहे?
१० प्रेषित योहानाच्या निदर्शनास आलेल्या मोठ्या लोकसमुदायाच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे, ‘त्यांच्या हातात खजुरीच्या झावळ्या होत्या’ हे आहे. त्याचा काय अर्थ होतो? खजुरीच्या झावळ्यांनी योहानाला यहुद्यांच्या मांडवांच्या सणाची आठवण करुन दिली असावी यात काही संशय नाही. हा इब्री दिनदर्शिकेतील अत्यानंदाचा सण असून तो उन्हाळ्यातील कापणी हंगामानंतर केला जात होता. नियमशास्त्राच्या एकवाक्यतेत, खजुरीची पाने तसेच इतर वृक्षांच्या फांद्यांचा मांडव घालून सणाच्या दरम्यान त्यात राहावयाचे होते. (लेवीय २३:३९-४०; नहेम्या ८:१४-१८) मंदिरात हालेल स्तोत्रे गायनाच्या वेळी देखील उपासक खजुरीच्या झावळ्या हालवीत असत. (स्तोत्रसंहिता ११३-११८). हातात खजुरीच्या झावळ्या हालवत असलेल्या मोठ्या लोकसमुदायाने येशू जेरुसलेमच्या वाटेवर असताना उपासकांच्या समुहाने हर्षाने खजुरीच्या झावळ्या हालवून गजर केला: “प्रभूच्या [यहोवा, NW] नावाने येणारा इस्राएलाचा राजा धन्यवादित असो.” योहानाला निःसंशये, याची देखील आठवण करुन दिली असावी. (योहान १२:१२, १३) यास्तव, खजुरीच्या झावळ्यांना हालवणे, मोठा लोकसमुदाय हर्षाने यहोवाच्या राज्याचा आणि त्याच्या अभिषिक्त राजाचा जयजयकार करतो याला सूचित करते.
११. देवाच्या सेवकांना यहोवाची सेवा करण्यात खरा आनंद का मिळतो?
११ हा आनंदाचा आत्मा अशाप्रकारचा आहे ज्याला मोठा लोकसमुदाय यहोवाची सेवा करताना आज देखील प्रदर्शित करत आहे. याचा अर्थ त्यांना कोणत्याही त्रासाचा सामना करावा लागत नाही किंवा त्यांना दुःख किंवा वेदना होत नाहीत असा नाही. पण यहोवाची सेवा व त्याला खूष करण्यापासून मिळणारे समाधान त्या गोष्टींपेक्षा वरचढ ठरण्यास मदत करते. यास्तव, ग्वातेमाला येथे ४५ वर्षे आपल्या पतीसोबत सेवा केलेल्या एका मिशनरीने त्यांच्या सभोवती असलेल्या पूर्वीच्या परिस्थितीबद्दल सांगितले की, आदिवासी गावांप्रत राज्याचा संदेश घेऊन जाण्याचे परिश्रमाचे कार्य तसेच धोक्याचा प्रवास जीवनाचा एक भाग होता. तिने शेवटी म्हटले: “आमच्या जीवनातील ती वेळ, अत्याधिक आनंदाची होती.” तिला वृद्धावस्था आणि आजारपणाचा प्रभाव जाणवू लागला होता. तिच्या डायरीत शेवटी लिहिलेल्या शब्दातील काही असे होते: “ते जीवन चांगले होते, अधिक फलदायी होते.” संपूर्ण जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांना त्यांच्या सेवेबद्दल असेच वाटते.
‘अहोरात्र पवित्र सेवा’
१२. यहोवा पृथ्वीवर दिवसा किंवा रात्रीच्या वेळी कशाचे निरीक्षण करतो?
१२ हे आनंदी उपासक यहोवाला ‘अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची पवित्र सेवा’ करतात. (प्रकटीकरण ७:१५) संपूर्ण जगभरात लाखोजण या पवित्र सेवेत सहभाग घेत आहेत. काही देशात रात्रीची वेळ असते व लोक झोपेत असतात तर इतर देशात सूर्य वर आलेला असतो आणि यहोवाचे साक्षीदार साक्षकार्यात व्यग्र असतात. पृथ्वी जशी फिरत राहते तसे अहोरात्र ते यहोवाचे गुणगान करत असतात. (स्तोत्र ८६:९) परंतु प्रकटीकरण ७:१५ मध्ये सांगितलेली अहोरात्र सेवा अधिककरून वैयक्तिकांना लागू होते.
१३. “अहोरात्र” सेवा करण्याचा अर्थ काय होतो, याबद्दल शास्त्रवचने कसे दाखवतात?
१३ मोठ्या लोकसमुदायाला बनविणारे वैयक्तिक, अहोरात्र पवित्र सेवा सादर करतात. याचा अर्थ ते करत असलेल्या प्रत्येक गोष्टीला पवित्र सेवा समजली जाते असा होतो का? हे खरे आहे की, ते जे काही करत आहेत, ते यहोवाचा सन्मान करणाऱ्या मार्गाने करण्याचे शिकले आहेत. (१ करिंथकर १०:३१; कलस्सैकर ३:२३) तथापि, थेटपणे देवाची उपासना ज्यात समाविष्ट आहे त्यालाच ‘पवित्र सेवा’ लागू होते. “अहोरात्र” कार्य करणे, नियमितपणा किंवा एकवाक्यता तसेच परिश्रमपूर्वक प्रयत्न हे दाखवते.—पडताळा यहोशवा १:८; लूक २:३७; प्रेषितांची कृत्ये २०:३१; २ थेस्सलनीकाकर ३:८.
१४. आपल्या व्यक्तिगत क्षेत्र सेवेला, “अहोरात्र” सेवा या वर्णनानुरूप काय बनवील?
१४ यहोवाच्या मोठ्या आध्यात्मिक मंदिराच्या पार्थिव अंगणात सेवा करताना, मोठ्या लोकसमुदायातील लोक क्षेत्र सेवेत नियमितपणे आणि वारंवार सहभाग घेण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक आठवडी क्षेत्र सेवेत काही भाग घेण्यासाठी पुष्कळांनी त्यांचे ध्येय ठेवले आहे. इतर जण नियमित पायनियर किंवा साहाय्यक पायनियर या नात्याने परिश्रम करतात. अनेकदा हे, सकाळीच रस्त्यावर आणि दुकानांमध्ये साक्ष देण्यात व्यग्र असतात. काही साक्षीदार तर नवोदितांचा बायबल अभ्यास रात्री उशिरा घेतात. ते खरेदी करताना, प्रवास करताना, जेवणाच्या सुट्टीत तसेच दूरध्वनीवरुन साक्ष देतात.
१५. क्षेत्र सेवेव्यतिरिक्त, आपल्या पवित्र सेवेत काय गोवलेले आहे?
१५ मंडळीच्या सभांमध्ये भाग घेणे देखील आपल्या पवित्र सेवेचा भाग आहे; त्याचप्रमाणे ख्रिस्ती एकत्रीकरणाची गृहे बांधणे आणि त्यांची काळजी घेणे या कामाचा यात समावेश होतो. यामध्ये ख्रिस्ती बंधू आणि बहिणींना यहोवाच्या सेवेत आध्यात्मिक आणि भौतिकरीत्या जिवंत ठेवण्यासाठी उत्तेजन आणि मदत करण्यास कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांचा समावेश होतो. यामध्ये आपल्या इस्पितळ सहकार्य समितीच्या कार्याचाही समावेश होतो. बेथेल सेवेतील कार्यांचे विविध प्रकार तसेच आपल्या अधिवेशनातील स्वयंसेवा या सर्व गोष्टी पवित्र सेवा आहेत. खरेच आपले जीवन यहोवाबरोबरच्या नातेसंबंधाभोवती केंद्रित असते तेव्हा ते पवित्र सेवेने व्यापलेले असते. शास्त्रवचन म्हणते त्याप्रमाणे यहोवाचे लोक ‘अहोरात्र पवित्र सेवा’ करतात, आणि ती करण्यात त्यांना आनंद मिळतो.—प्रेषितांची कृत्ये २०:३५; १ तीमथ्य १:११.
‘सर्व राष्ट्रे वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्यांपैकी’
१६. मोठा लोकसमुदाय ‘सर्व राष्ट्रांमधून’ येतो ही गोष्ट कशाप्रकारे शाबीत होत आहे?
१६ सर्व राष्ट्रांमधून मोठ्या लोकसमुदायातील लोक येत आहेत. देव पक्षपाती नाही, तसेच येशू ख्रिस्ताद्वारे पुरविलेल्या खंडणीच्या तरतूदीचा त्या सर्वांना भरपूर लाभ होतो. मोठ्या लोकसमुदायाला जेव्हा प्रथमच शास्त्रवचनीय दृष्ट्या १९३५ मध्ये ओळखले गेले, तेव्हा यहोवाचे साक्षीदार ११५ देशांमध्ये क्रियाशील होते. १९९० च्या दशकापर्यंत मेंढरासमान लोकांना शोधण्याचे कार्य दुप्पट पेक्षा अधिक देशात वाढले.—मार्क १३:१०.
१७. मोठ्या लोकसमुदायात सर्व ‘वंश, लोक निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या’ लोकांचा समावेश होण्याकरता त्यांना मदत करण्यासाठी काय केले जात आहे?
१७ मोठ्या लोकसमुदायाच्या संभाव्य सदस्यांना शोधण्यात यहोवाच्या साक्षीदारांनी केवळ राष्ट्रीय समुहांकडेच लक्ष दिले नाही तर त्या राष्ट्रांमधील वंश, लोक आणि भाषीय समुहांकडे देखील लक्ष दिले आहे. या लोकांप्रत पोहंचण्यासाठी साक्षीदार बायबल साहित्य ३०० पेक्षा अधिक भाषांमध्ये प्रकाशित करतात. यामध्ये योग्य भाषांतरकारांच्या संघाला प्रशिक्षण देण्याचा आणि त्यांची देखभाल करण्याचा समावेश होतो, तसेच यामध्ये संगणक साधन पुरवून या सर्व भाषांचे पुढील कार्य करण्यासाठी त्याचप्रमाणे छपाई करण्याचा देखील समावेश होतो. मागील केवळ पाच वर्षांदरम्यानच ९,८०,००,००० लोक बोलत असलेल्या ३६ भाषा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, अशा लोकांना देवाचे वचन समजण्यास मदत करण्यासाठी साक्षीदार त्यांची व्यक्तिशः भेट घेण्याचा प्रयत्न करतात.—मत्तय २८:१९, २०.
“मोठ्या संकटातून”
१८. मोठे संकट अचानक सुरु झाल्यावर कोणाला संरक्षण दिले जाईल? (ब) त्यानंतर आनंदाच्या कोणत्या घोषणा केल्या जातील?
१८ प्रकटीकरण ७:१ मध्ये उल्लेख केलेल्या विनाशाच्या वाऱ्यांना देवदूत सोडतील तेव्हा, यहोवाकडील प्रेमळ संरक्षणाचा अनुभव केवळ ‘आमच्या देवाचे अभिषिक्त दासच’ नव्हे तर त्यांच्यासोबत खऱ्या उपासनेत सहभागी असलेला मोठा लोकसमुदाय देखील घेईल. प्रेषित योहानाला सांगितले होते त्यानुसार मोठ्या लोकसमुदायातील लोक, बचावलेले या नात्याने ‘मोठ्या संकटातून येतील.’ तेव्हा ते कृतज्ञता आणि स्तुतीचा केवढा गजर करतील व असे घोषित करतील: “राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून तारण आहे”! आणि देवाचे स्वर्गातील सर्व निष्ठावंत सेवक अशी घोषणा करण्यात आपल्या आवाजाची साथ देतील: “आमेन! धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकारस्तुति, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुग आमच्या देवाची आहेत.”—प्रकटीकरण ७:१०-१४.
१९. बचावलेले लोक कोणत्या आनंददायक कार्यात सहभाग घेण्यासाठी आवेशी असतील?
१९ तो समय किती आनंदाचा असेल! जिवंत असणारे सर्व जण एकाच खऱ्या देवाचे सेवक असतील. यहोवाची सेवा करणे, हा यामधील अत्याधिक आनंद असेल. तेथे अधिक काम—आनंदी काम करावयाचे असेल! पृथ्वीला नंदनवनामध्ये बदलावयाचे आहे. हजारो लाखो मृतांचे पुनरुत्थान व्हावयाचे आहे आणि त्यांना यहोवाच्या मार्गांचे शिक्षण द्यावयाचे आहे. त्यात सहभागी होण्याचा विशेषाधिकार किती आनंददायक असेल!
तुमचे विवेचन काय आहे?
▫ यहोवाच्या साक्षीदारांच्या क्षेत्र सेवेवर १९३५ मधील घटनांचा काय परिणाम झाला?
▫ मोठा लोकसमुदाय ‘राजासनासमोर उभा असल्याचे’ दाखवलेल्या वस्तुस्थितीमुळे काय सूचित होते?
▫ कोकऱ्याच्या रक्ताबद्दलच्या गुणग्राहकतेमुळे आपल्या जीवनावर कसा परिणाम होण्यास हवा?
▫ त्यांच्या खजुरीच्या झावळ्या हालविण्याने काय सूचित केले आहे?
▫ मोठा लोकसमुदाय पवित्र सेवा, अहोरात्र कशाप्रकारे करतो?
[१६, १७पानांवरील चित्रं]
त्यांची पवित्र सेवा नियमितपणा, दीर्घोद्योग आणि परिश्रमपूर्वक प्रयत्न यांना प्रकट करते