देव-भिरू लोकांबरोबर एकत्रित होणे
“सर्व लोक हिंसाचाराचे भय, बेकारीचे भय आणि गंभीर आजाराचे भय—भीतीपासून मुक्ततेची अपेक्षा करतात. आपण त्यामध्ये सहभागी आहोत. . . . तर मग, भय कसे जोपासावे याची चर्चा आपण का करीत आहोत?” जून १९९४ मध्ये सुरु झालेल्या “ईश्वरी भय” या प्रत्येक प्रांतीय अधिवेशनामधील प्रमुख वक्त्याकडून हा जिज्ञासेचा प्रश्न उभा करण्यात आला.
उपस्थित असणारे लाखोजण—पहिल्यांदा उत्तर अमेरिका, त्यानंतर युरोप, मध्य आणि दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया आणि समुद्रावरील द्वीप—अशाप्रकारचे भय विकसित करण्यासाठी उत्सुक होते. का बरे? कारण यहोवा देवाने त्याच्या लोकांसाठी राखून ठेवलेल्या आशीर्वादांमध्ये आपली सहभागिता ही ईश्वरी भय यावर अवलंबून आहे. अधिवेशनाला उपस्थित राहणारे ईश्वरी भयाविषयी शिकण्यासाठी एकत्र आले होते आणि या तीन दिवसाच्या कार्यक्रमाच्या काळात अत्यावश्यक असणाऱ्या या ख्रिस्ती गुणाविषयी ते पुष्कळ काही शिकले.
‘देवाचे भय धरा व त्याच्या आज्ञा पाळा’
हे उपदेशक १२:१३ यावर आधारित असलेले अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे शीर्षक होते. देवाचे भय बाळगणे याचा काय अर्थ होतो? अधिवेशनाच्या अध्यक्षांनी कार्यक्रमाच्या अगदी पहिल्या भागामध्ये स्पष्टीकरण केले की, ईश्वरी भय यहोवाप्रीत्यर्थ गाढ आणि दरारायुक्त आदर त्याचप्रमाणे त्याला निराश करण्याचे मनःपुर्वक भय याला प्रतिबिंबित करते. असे भय अपायकारक नाही; ते आरोग्यदायक आणि उचित आहे.
हे हितकारक भय आपल्याला कसा लाभ पोहंचवते? त्यानंतरचे “थकून जाऊ नका व सोडून देऊ नका” या भाषणाने देवाच्या आज्ञा आनंदाने पाळण्यासाठी ईश्वरी भय आपल्याला चालना देईल असे स्पष्टीकरण दिले. त्याबरोबरच देव आणि शेजाऱ्यासाठी असणाऱ्या प्रेमामुळे अशाप्रकारचे भय आपल्याला आध्यात्मिक ऊर्जेने भरून टाकील. होय, सार्वकालिक जीवनाच्या धावेमध्ये मंद होण्याचे टाळण्यासाठी ईश्वरी भय आपल्याला मदत करू शकते.
पुढील कार्यक्रम ईश्वरी भय आपल्याला बळकट करू शकते याचा वास्तविक पुरावा प्रदर्शित करणाऱ्या मुलाखतींचा होता. ज्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यांनी उदासीनता, उपेक्षितता किंवा छळ होत असताना देखील क्षेत्रात नियमित राहण्यासाठी देवाच्या आदरयुक्त भयाने त्यांना प्रभावित केले आणि व्यक्तीगत समस्यांना सहन करण्यासाठी कशी मदत केली हे सांगितले.
इतरजण, ईश्वरी भय बाळगत नसताना देखील काही ते का बाळगतात? “ईश्वरी भय विकसित करणे व त्याकडून लाभ मिळवणे” या भाषणामध्ये, यिर्मया ३२:३७-३९ मध्ये यहोवा त्याच्या लोकांना देवाचे भय बाळगणारे अंतःकरण देईल असे अभिवचन दिले याविषयीचे वर्णन प्रमुख वक्त्यांनी केले. यहोवा आपल्या हृदयामध्ये ईश्वरी भय बिंबवितो. कसे बरे? त्याचा पवित्र आत्मा आणि त्याचे प्रेरित वचन, बायबल यांच्याद्वारे. तथापि स्पष्टपणे, देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी आणि त्याने विपुल प्रमाणात केलेल्या आध्यात्मिक तरतूदींचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलाच पाहिजे. त्याचे भय बाळगण्याचे शिकण्यास मदत देणाऱ्या आपल्या अधिवेशनांचा आणि मंडळीच्या सभांचा यामध्ये समावेश होतो.
दुपारच्या कार्यक्रमाची सुरुवात यहोवा आणि त्याच्या वचनावर विश्वास ठेवणे या सूचनेने झाली. ख्रिस्ती या नात्याने राज्याने आपल्या जीवनावर परिणाम केला पाहिजे याबद्दलच्या प्राथमिक मार्गांची चर्चा करण्यात आली.
त्यानंतर तीन भाग असलेला पहिला परिसंवाद होता. या परिसंवादाचा विषय “ईश्वरी भय आम्हाला दैवी गरजांचे पालन करण्यास प्रवृत्त करते” हा होता आणि त्याने कुटुंबावर लक्ष केंद्रीत केले. खाली शास्त्रवचनीय—आणि व्यावहारिक सल्ल्याचा नमुना देण्यात आला आहे.
▫ पतींसाठी: ईश्वरी भयाने, पुरुषाला आपल्या पत्नीवर आपले शरीर समजून प्रीती करण्यासाठी उद्युक्त केले पाहिजे. (इफिसकर ५:२८, २९) पुरुष स्वतःच्या शरीराला गंभीररित्या जखमी करत नाही, मित्रांसमोर स्वतःला कमी लेखत नाही किंवा त्याच्या स्वतःच्या चुकांची चहाडी देखील करत नाही. म्हणून त्याने, जसे तो स्वतःच्या बाबतीत वागतो त्याप्रमाणेच आदराने आणि सभ्यतेने त्याच्या पत्नीबरोबर व्यवहार केला पाहिजे.
▫ पत्नींसाठी: ईश्वरी भयाने येशूला ‘देवाला आवडते ते करण्यासाठी’ नेहमी प्रेरित केले. (योहान ८:२९) हा पत्नींना त्यांच्या पतींबरोबर व्यवहार करताना अनुकरण करण्यासाठी एक उत्तम आत्मा आहे.
▫ पालकांसाठी: ख्रिस्ती पालक, त्यांची मुले यहोवाचे धन आहे असे समजून पालकीय जबाबदाऱ्यांना गंभीरपणे घेण्याद्वारे ईश्वरी भय प्रदर्शित करू शकतात. (स्तोत्र १२७:३) पालकांचे प्रमुख ध्येय त्यांच्या मुलांना खरे ख्रिस्ती बनविणे हे असले पाहिजे.
▫ मुलांसाठी: यहोवा मुलांना “प्रभूमध्ये . . . आईबापांच्या आज्ञेत राहा” अशी सूचना देतो. (इफिसकर ६:१) म्हणूनच, पालकांच्या आज्ञा पाळणे हे देवाच्या आज्ञा पाळणे होय.
दिवसाच्या समारोपाच्या भाषणाने सर्वांच्या भावनांचा वेध घेतला कारण त्यामध्ये एखाद्या प्रिय व्यक्तीला मृत्यूमध्ये गमावल्यानंतर आपल्या सर्वांना अनुभव येणाऱ्या आंतरिक भावनांची चर्चा करण्यात आली. तथापि, भाषणाच्या मध्यंतरापर्यंत आश्चर्य कायम होते, वक्त्याने, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा हे नवे माहितीपत्रक प्रकाशित करण्याद्वारे श्रोत्यांना आनंदित केले. हे ३२-पृष्ठांचे, रंगीत प्रकाशन, प्रियजनाच्या मृत्यूमळे शोकाकुल झालेल्यांना त्यामुळे निर्माण होणाऱ्या भावनांना आणि विचारांना समजण्यासाठी आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी मदतीबद्दल पुष्कळ काही सांगते. वियोगी व्यक्तीला काय बोलावे असा प्रश्न तुम्हाला कधी पडला नाही काय? या माहितीपत्रकाचा काही भाग शोकाकुल असणाऱ्यांना आपण कशी मदत करू शकतो याविषयी सांगतो. वक्त्याचे ऐकत असताना श्रोत्यांमधील अनेकजण या माहितीपत्रकाद्वारे कोणाला लाभ मिळू शकेल याविषयी विचार करत होते.
‘आदर व ईश्वरी भय धरून पवित्र सेवा सादर करा’
हे दुसऱ्या दिवसाचे शीर्षक इब्रीकर १२:२८ यावर आधारित होते. सकाळच्या कार्यक्रमाच्या दरम्यान दुसरा परिसंवाद “यहोवाचे भय धरून चालणाऱ्या मंडळ्या” हा होता. सभांना उपस्थित राहणे यावर पहिला भाग हाताळला गेला. सभांमध्ये आपली उपस्थिती यहोवासाठी आणि त्याच्या आध्यात्मिक तरतूदींसाठी आपला आदर प्रदर्शित करते. सभांना उपस्थित राहण्याद्वारे आपण हे दाखवितो की, त्याच्या नावाचे आपण भय बाळगतो आणि त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्यासाठी आपण उत्सुक आहोत. (इब्रीयांस १०:२४, २५) दुसऱ्या वक्त्याने याचे वर्णन केले, की संपूर्ण मंडळीने यहोवाचे भय बाळगले पाहिजे आणि उत्तम वर्तणूक कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. शेवटच्या वक्त्याने सर्व ख्रिश्चनांचा विशेषाधिकार आणि जबाबदारी—न थांबता सुवार्तेची घोषणा करणे याविषयी सांगितले. आपण किती काळ कायम प्रचार करू? यहोवा पुरे म्हणत नाही तोपर्यंत.—यशया ६:११.
पुढील भाषणाचे शीर्षक या नियतकालिकामधील अभ्यासाच्या लेखामध्ये चर्चा केल्याप्रमाणे “यहोवाचा आनंद हा तुमचा आश्रयदुर्ग आहे” हे होते. (नहेम्या ८:१०) यहोवाचे लोक आनंदी का आहेत? वक्त्याने काही कारणे दिली. देवाबरोबर नजीकचा नातेसंबंध हा आपल्याला पृथ्वीवरील सर्वात आनंदी लोक बनवितो हे एक प्रमुख कारण आहे. यहोवाने येशू ख्रिस्ताकडे ज्या लोकांना पाठविले त्यापैकी एक असल्याचा विशेषाधिकार आपल्याजवळ आहे याचे स्मरण वक्त्याने अधिवेशनाला उपस्थित असणाऱ्यांना करून दिले, याचा जरा विचार करा. (योहान ६:४४) आनंदासाठी किती मोठे कारण!
बाप्तिस्मा हे प्रत्येक अधिवेशनाचे प्रमुख आकर्षण आहे आणि “ईश्वरी भय” अधिवेशने त्यासाठी अपवाद नव्हती. वक्त्याने “यहोवाचे भय धरून केलेले समर्पण आणि बाप्तिस्मा” या भाषणामध्ये बाप्तिस्मा प्राप्त सर्व व्यक्तींसाठी असणाऱ्या चार वैयक्तिक कर्तव्याबद्दल वर्णन केले: (१) आपण देवाच्या वचनाचा अभ्यास प्रकाशनांच्या साह्याने केला पाहिजे त्यामुळे आपल्याला ते समजण्यास आणि वापरण्यास मदत होते; (२) आपण प्रार्थना केली पाहिजे; (३) आपण मंडळीतील सभांमध्ये समविश्वासू जणांबरोबर सहवास ठेवला पाहिजे आणि (४) आपण यहोवाच्या नावाची आणि राज्याची साक्ष दिली पाहिजे.
शनिवारच्या दुपारच्या कार्यक्रमाची सुरुवात “यहोवाने त्यागलेले नाहीत असे लोक” या आश्वासन प्रदान करणाऱ्या विषयाने झाली. सुमारे पस्तीस शतकांपूर्वी इस्राएल राष्ट्राने कठीण काळाचा सामना केला त्यावेळी यहोवाने मोशेद्वारे असे म्हणून आश्वासन दिले: “तुझा देव परमेश्वर [यहोवा, NW] . . . तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारहि नाही.” (अनुवाद ३१:६) ते वाग्दत्त देशात गेले आणि त्यावर अधिकार मिळविला त्यावेळी इस्राएल लोकांना संरक्षण देण्याद्वारे यहोवाने दिलेले आश्वासन सत्य शाबीत केले. आजही, कठीण परीक्षांना सामारे जाताना यहोवा आपला त्याग करणार नाही याची आपण पूर्ण खात्री बाळगू शकतो त्यासाठी आपल्याला त्याला जडून राहण्याची आणि त्याच्या वचनाच्या सल्ल्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
आपण बायबल वाचनामध्ये आनंद कसा मिळवू शकतो? वक्त्याने “देवाचे वचन, पवित्र बायबल याचे दररोज वाचन करा” या भाषणामध्ये जिज्ञासू मनाने वाचन करणे आणि हा अहवाल यहोवाचे गुण आणि मार्ग यांच्याविषयी मला काय शिकवतो? या संदर्भामध्ये मी अधिक यहोवासारखा कसा होऊ शकतो? अशाप्रकारचे प्रश्न विचारण्याचे सुचविले. याप्रकारे बायबलचे वाचन करणे हा आनंददायक आणि समाधानकारक अनुभव आहे.
त्यानंतर “यहोवाचे भय बाळगणाऱ्यांच्या मदतीसाठी तरतूदी” या तिसऱ्या परिसंवादाकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले. आज यहोवा त्याच्या सेवकांसाठी चमत्करांचा प्रयोग करत नाही तरीदेखील जे त्याचे भय बाळगतात त्यांना तो निश्चितच मदत पुरवतो. (२ पेत्र २:९) परिसंवादाने या कठीण काळामध्ये आपल्याला मदत करण्यासाठी यहोवाकडील चार तरतूदींची चर्चा केली: (१) यहोवा त्याचा आत्मा याद्वारे आपल्या अगदी शक्तीपलीकडे असणारी कामे करण्यासाठी आपल्याला सामर्थ्यशाली बनवितो. (२) त्याचे वचन याद्वारे तो आपल्याला सल्ला आणि मागदर्शन देतो. (३) तो आपल्याला खंडणी याद्वारे शुद्ध विवेक देतो. (४) त्याची संघटना याद्वारे त्यामध्ये वडिलांचा समावेश आहे आपल्याला मार्गदर्शन आणि संरक्षण देतो. (लूक ११:१३; इफिसकर १:७; २ तीमथ्य ३:१६; इब्रीयांस १३:१७) या तरतूदींचा पुरेपूर लाभ घेतल्याने आपण सहन करण्यास समर्थ होऊ आणि अशाप्रकारे आपल्याला यहोवाची मान्यता मिळेल.
शनिवारच्या दुपारचे शेवटचे भाषण मलाखीच्या भविष्यवाणीवर आधारित असून त्याचे शीर्षक “यहोवाचा भयप्रेरित दिवस जवळ आला आहे” हे होते. जेरूसलेमवर सा. यु. ७० मध्ये न्यायाची अंमलबजावणी करण्यात आली तेव्हा ते गत इतिहासातील भयप्रेरित दिवस होते. परंतु ‘जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत अशांवर सूड उगवण्याचा’ यहोवाचा येणारा दिवस सर्व मानवांनी अनुभवल्यापेक्षा अधिक भयप्रेरित असेल. (२ थेस्सलनीकाकर १:६-८) ते केव्हा घडेल? वक्त्याने म्हटले: “शेवट जवळ आहे! यहोवाला तो दिवस आणि घटका ठाऊक आहे. तो त्याचे वेळापत्रक बदलणार नाही. आपल्याकडून धीराने सहन करण्याची अपेक्षा केली जाते.”
दोन दिवस संपले यावर विश्वासच बसत नव्हता. शेवटचा दिवस कोणता कार्यक्रम सादर करणार होता?
“देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा”
तिसऱ्या दिवसाचे शीर्षक प्रकटीकरण १४:७ यावर आधारित होते. सकाळच्या कार्यक्रमाच्या दरम्यान भाषण मालिकेद्वारे मूर्तीपूजक शिकवणींवर प्रकाशझोत टाकण्यात आला ज्या यहोवाच्या साक्षीदारांना इतर धार्मिक संघटनेपासून अलिप्त ठेवतात.
वक्त्याने “नीतीमानांचे पुनरुत्थान होईल” या भाषणामध्ये उत्सुकता निर्माण करणारे प्रश्न उभे केले: “हजार वर्षांच्या त्या न्यायाच्या दिवसाच्या वेळी, सैतानाच्या व्यवस्थीकरणाच्या या शेवटल्या वर्षांच्या काळात विश्वासामध्ये मेलेल्यांचे पुनरुत्थान केव्हा होईल?” त्याचे उत्तर काय होते? वक्त्याने स्पष्टीकरण केले: “बायबल याचे वर्णन करत नाही.” “तथापि, संपूर्ण न्यायाच्या दिवसात होणाऱ्या विस्तृत शैक्षणिक कार्यामध्ये हर्मगिदोनातून बचावलेल्यांबरोबर सहभागिता घेण्यासाठी आपल्या दिवसांमध्ये मेलेल्यांचे पुनरुत्थान लवकर होणे हे तर्कसंगत ठरणार नाही का? होय, खरोखर!” बचाव झालेले तेथे असतील का? निश्चितच तेथे असतील. त्यानंतरचे “मोठ्या संकटातून जिवंतपणे बचाव” या भाषणाने बायबलच्या शिकवणी आणि उदाहरणे आपल्याला याची खात्री पुरवतात याचे स्पष्टीकरण केले.
यहोवाच्या साक्षीदारांना बायबलच्या दोन भवितव्यांची—लाखो लोकांना या नंदनवनमय पृथ्वीवर अनंतकाळाचे जीवन आणि येशूच्या राज्यामध्ये त्याच्याबरोबर राज्य करणाऱ्या मर्यादित लोकांसाठी स्वर्गात अमर्त्य जीवन, याची पूर्ण जाणीव फार पूर्वी झाली आहे. स्वर्गीय आशेबद्दल “हे लहान कळपा, भिऊ नको” या भाषणामध्ये चर्चा करण्यात आली. (लूक १२:३२) आजच्या वर्तमान परिस्थितीचा विचार करता, लहान कळपाने निर्भय असले पाहिजे; त्यापैकी प्रत्येकाने शेवटपर्यंत धीर धरला पाहिजे. (लूक २१:१९) वक्त्याने म्हटले, “त्यांचा निर्भिडपणा मोठ्या लोकसमुदायामध्ये असणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यास मदत करतो. पृथ्वीवर पुर्वी कधीही नव्हता अशा अतिशय त्रासदायक काळातून मुक्तता व्हावी अशी ते अपेक्षा करत असताना त्यांनी देखील निर्भिडपणाची मनोवृत्ती विकसित करण्याची गरज आहे.”
सकाळच्या कार्यक्रमाच्या समारोपाला श्रोत्यांनी तुम्हापुढे असलेल्या निवडी हे नाटक आनंदाने पाहिले. यहोशवा आणि संदेष्टा एलीया याच्या दिवसामध्ये देखील इस्राएलांना निर्णय घ्यावयाचा होता. निवड करावीच लागणार होती. एलीया म्हणाला: “तुम्ही दोहो मतांमध्ये कोठवर लटपटाल? परमेश्वर [यहोवा, NW] हा देव असला तर त्याच्या भजनी लागा; बआल हा देव असला तर त्याच्या भजनी लागा.” (१ राजे १८:२१) आजसुद्धा, मानवजातीसाठी निर्णय घेण्याची वेळ आहे. दोन भिन्न मतांवर लटपटत राहण्याची ही वेळ नाही. योग्य निवड कोणती आहे? प्राचीन यहोशवाने केली तीच. तो म्हणाला: “मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची [यहोवा, NW] सेवा करणार.”—यहोशवा २४:१५.
अचानक असे दिसून आले, की ती रविवारची दुपार आहे आणि “खऱ्या देवाचे भय आता का धरावे” हे शीर्षक असलेल्या जाहीर व्याख्यानाची वेळ आहे. सर्व मानवजातीला प्रकटीकरण १४:६, ७ मध्ये आर्जविले जाते: “देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा.” देवाची भीती आता बाळगणे एवढे निकडीचे का आहे? कारण हे वचन पुढे म्हणते, “न्यायनिवाडा करावयाची त्याची घटिका आली आहे.” यहोवा वर्तमान अशुद्ध, बंडखोर व्यवस्थीकरणाचा अंत, सध्या देवाच्या स्वर्गीय राज्याचा राजा या नात्याने सिंहासनाधिष्ठ असणाऱ्या त्याच्या पुत्राद्वारे करील. वक्त्याने याचे स्पष्टीकरण केले, की देवाची भिती बाळगणाऱ्यांच्या मुक्ततेचा त्याचप्रमाणे पृथ्वीचे संवर्धन आणि संरक्षण करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. या व्यवस्थीकरणाचे हे शेवटचे दिवस आहेत त्यामुळे आता खऱ्या देवाची भीती बाळगणे हे निकडीचे आहे!
त्यानंतर वक्ता टेहळणी बुरुज सारांश हा सप्ताहासाठी असणारा पाठ सादर करण्यासाठी रंगमंचावर आला. त्याने स्पष्टीकरण दिले की, उपस्थित असणाऱ्यांना ईश्वरी भय याची अधिवेशनाच्या कार्यक्रमामुळे अधिक समज प्राप्त झाली. ईश्वरी भय बाळगणाऱ्यांना अनेक फायदे मिळतात यावर त्याने जोर दिला. वक्त्याने नवीन व्हिडीयो—ईश्वरी शिक्षणाने एकत्रित हा प्रकाशित केल्याची घोषणा केली. त्याच्यामध्ये “ईश्वरी शिक्षण” १९९३-९४ च्या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाच्या अतुलनीय पैलूंवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. भाषणाची समाप्ती होत असताना अनेकांनी असा विचार केला, ‘पुढील वर्षी आमच्यासाठी काय असेल?’ अनेक ठिकाणी तीन दिवसांच्या प्रांतीय अधिवेशनाची आपण अपेक्षा करू शकतो.
समारोपास वक्त्याने मलाखी ३:१६, चा उल्लेख केला जे म्हणते: “तेव्हा परमेश्वराचे [यहोवा, NW] भय बाळगणारे एकमेकास बोलले; ते [यहोवाने] कान देऊन ऐकले, व [यहोवाचे] भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्याजसमोर लिहिण्यात आली.” यहोवाच्या नावाचा विचार करण्याचा आणि ईश्वरी भयाने त्याची सेवा करण्याचा ठाम निर्धार करून उपस्थितजण परतले.
[२४ पानांवरील चित्रं]
बाप्तिस्माप्राप्त उमेदवारांनी सतत ईश्वरी भय प्रदर्शित करण्याची गरज आहे
[२५ पानांवरील चित्रं]
“तुम्हापुढे असलेल्या निवडी” या नाटकाने श्रोत्यांना यहोवाच्या सेवेचा निर्णय घेण्याच्या आवश्यकतेसाठी प्रभावित केले
[२६ पानांवरील चित्रं]
“तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा” हे नवे माहितीपत्रक प्राप्त केल्यानंतर श्रोतेजन आनंदित झाले