वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 १/१ पृ. २०-२३
  • सहभागिता करण्याजोगा अमूल्य ठेवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सहभागिता करण्याजोगा अमूल्य ठेवा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आईचे प्रेरणात्मक उदाहरण
  • आमच्या ठेवेची पूर्ण-वेळ सहभागिता करणे
  • ध्येयाची पूर्ती करणे
  • माल्टा आणि लिबिया
  • नवीन नियुक्‍ती
  • महारोग्यांची समाजबाह्‍य वसाहत
  • ठेवेने दृढ केले
  • यहोवानं मला त्याच्या इच्छेनुसार करण्यास शिकवलं
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • दृष्टी आणि अंतःकरण प्रतिफळावर लावणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • सर्वांना सर्वकाही झालो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 १/१ पृ. २०-२३

सहभागिता करण्याजोगा अमूल्य ठेवा

ग्लोरिया मालास्पिना यांनी निवेदन केल्याप्रमाणे

सिसिलीची किनारपट्टी दृष्टिआड झाली तेव्हा मी आणि माझ्या पतीने आमचे भूमध्य सागरातील नियुक्‍त स्थान म्हणजेच माल्टा बेट यावर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली. किती मोठी चित्तथरारक भावी योजना! जहाज समुद्रात पुढे जाऊ लागले आणि आमच्या मनात पहिल्या शतकातील प्रेषित पौलाचा माल्टा वरील अनुभव डोकावून गेला.—प्रेषितांची कृत्ये २८:१-१०.

ते वर्ष १९५३ हे होते आणि माल्टामध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रचार कार्याला अधिकृत मान्यता नव्हती. एका वर्षा अगोदर वॉचटावर बायबल गिलियड प्रशाला यापासून आम्हाला प्रशिक्षित करण्यात आले आणि इटलीमध्ये नियुक्‍ती करण्यात आली. इटालियन शिकून काही काळच लोटला होता व आमच्यासाठी माल्टामध्ये काय राखून ठेवले आहे हे पाहण्यास आम्ही उत्सुक होतो.

मी एक तरुणी, परदेशी मिशनरी कशी झाले हे जाणण्यास तुम्हाला आवडेल का? मला वर्णन करू द्या.

आईचे प्रेरणात्मक उदाहरण

आमचे कुटुंब १९२६ मध्ये कॅनडा, ओंटॅरिओ मधील फोर्ट फ्रॅन्सेस येथे राहत होते, तेव्हा माझ्या आईने आत्ता जिवंत असलेले कधीही मरणार नाहीत ही पुस्तिका बायबल विद्यार्थ्याकडून (तेव्हा यहोवाचे साक्षिदार या नावाने ज्ञात होते) स्वीकारली. तिने सखोल आस्थेने ती वाचली आणि त्याच सप्ताहामध्ये टेहळणी बुरुज या नियतकालिकाच्या माध्यमाने संचालित होणाऱ्‍या बायबल अभ्यासाच्या गटास ती उपस्थित राहिली. आईला बायबल वाचनाची विलक्षण आवड होती आणि तिने देवाच्या राज्याबद्दलच्या संदेशाचा स्वीकार ती शोधत असलेली ठेव असा केला. (मत्तय ६:३३; १३:४४) बाबांचा जबरदस्त विरोध आणि शिवाय तिला तीन लहान मुलींची काळजी घ्यावयाची असताना देखील ती जे काही शिकत होती त्यासाठी दृढ राहिली.

आईच्या पुढील २० वर्षांच्या काळातील मजबूत विश्‍वासाने मला आणि थेल्मा आणि वॉयला या माझ्या दोन थोरल्या बहिणींना नीतीमत्त्वाच्या जगात अनंतकाळचे जीवन या आशेची जाणीव करून दिली. (२ पेत्र ३:१३) तिने अनेक अवघड परीक्षांना तोंड दिले आणि तिने निवडलेल्या मार्गाच्या यथार्थपणावर आम्ही कधीही शंका घेतली नाही.

मी केवळ दहा वर्षांची असताना म्हणजेच १९३१ मध्ये आम्ही अमेरिकेत मिनेसोटाच्या उत्तरेला स्थानांतर केले. तेथे आम्ही यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमित सहवासापासून अलग झालो असलो तरीही आईकडून मिळणाऱ्‍या बायबल आधारित सूचनेपासून अलिप्त झालो नाही. कॉलपोर्चर किंवा पूर्णवेळेची सेविका या तिच्या समर्पित सेवेने, मला तिच्या कामामध्ये सहभागी होण्यास प्रेरणा दिली. पुढे १९३८ मध्ये मी आणि माझ्या दोन बहिणींनी ड्युलथा, मिनेसोटा येथील संमेलनामध्ये यहोवाप्रीत्यर्थ समर्पणाचे प्रतीक म्हणून बाप्तिस्मा घेतला.

मी पायनियर (कॉलपोर्चर यासाठी नवीन नाव) या नात्याने माझ्या पायावर उभी राहण्यासाठी १९३८ मध्ये माझे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आईने मला व्यापारविषयक कोर्स निवडण्याचे सुचविले. खासकरून, जेव्हा बाबांनी स्वतःच्या मार्गावर जाण्याचा आणि आम्हाला आमच्यावर सोपवण्याचा निर्णय घेतला तेव्हा हा सल्ला उत्तम सिद्ध झाला.

आमच्या ठेवेची पूर्ण-वेळ सहभागिता करणे

अखेरीस मी कॅलिफोर्नियाला गेले आणि १९४७ मध्ये सॅन फ्रॅन्सिस्को येथे पायनियर कार्याची सुरुवात केली. मी, “सर्व राष्ट्रांचा विस्तार” या लॉस ऍन्जेलेस्‌मध्ये होणाऱ्‍या संमेलनाच्या पूर्वतयारीच्या कार्यात गुंतलेली असताना माझी भेट फ्रॅन्सिस्‌ मालास्पिना यांच्याबरोबर झाली. आमच्या दोघांच्या मिशनरी कार्यासाठी असणाऱ्‍या ध्येयाने आम्हाला प्रेमळ नातेसंबंधाच्या सुरुवातीकडे निरविले. आणि आम्ही १९४९ मध्ये विवाहबद्ध झालो.

आम्हाला सप्टेंबर १९५१ मध्ये गिलियडच्या १८ व्या वर्गासाठी बोलावण्यात आले. पाच महिन्यांच्या सखोल प्रशिक्षणानंतर फेब्रुवारी १०, १९५२ मध्ये पदवीदान समारंभाच्या दिवशी ज्या देशांमध्ये आम्हाला पाठवायचे होते त्यांची नावे मुळाक्षरांच्या अनुक्रमाने प्रशालेचे अध्यक्ष नेथन एच. नॉर यांच्याद्वारे पुकारण्यात आली. ते “बंधू आणि भगिनी मालास्पिना इटलीसाठी,” असे म्हणण्या अगोदरच आम्ही प्रवासाची कल्पना करीत होतो!”

काही सप्ताहांनंतर आम्ही न्यूयॉर्क येथून इटलीतील जिनोवाकडे जाण्यासाठी दहा दिवसांचा जलप्रवास करण्यास जहाजात चढलो. ब्रुकलिन मुख्यालयाचे जोव्हाने डेखेका आणि मॅक्स लारसन हे कर्मचारी आम्हाला निरोप देण्यासाठी गोदीवर उपस्थित होते. जिनोवा येथे मिशनऱ्‍यांनी आमचे स्वागत केले आणि ते देशांतरासाठी आवश्‍यक असणाऱ्‍या गुंतागुंतीच्या कार्यपद्धतींशी परिचित होते.

आमच्या भोवती असलेल्या सर्व गोष्टीने आम्ही भारावून गेलो होतो त्यानंतर आम्ही बोलोन्या येथे जाण्यासाठी रेल्वेमध्ये चढलो. दुसऱ्‍या महायुद्धामधील बॉम्बच्या भडिमारामुळे या शहराची झालेली विकृतता अजूनही कायम असल्याचे प्रगमनाच्या वेळी आमच्या दृष्टिस पडले. तरीदेखील, सकाळच्या वातावरणात दरवळत असलेला कडक कॉफीचा अनावर सुगंध आणि अनेक प्रकारच्या पास्टा यासाठी तयार करण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट सॉसेस्‌चा खमंग वास, यासारख्या अनेक सुखावह गोष्टी तेथे होत्या.

ध्येयाची पूर्ती करणे

आम्ही पाठ केलेल्या प्रस्तावनेने सेवेची सुरुवात केली आणि संदेशाचा स्वीकार किंवा अस्वीकार केला जात नाही तोपर्यंत आम्ही तिची पुनरावृत्ती केली. स्वतःच्या भावना प्रगट करण्याच्या मनसेने आम्हाला भाषेचा तन्मयतेने अभ्यास करण्यास प्रवृत्त केले. चार महिन्यांनंतर आमची नेपल्स येथे नवीन मिशनरी गृहात नियुक्‍ती करण्यात आली.

हे प्रचंड शहर त्याच्या विलक्षण देखाव्यांसाठी उल्लेखनीय आहे. तेथे आम्ही सेवेचा आनंद घेतला; परंतु आणखीन चार महिन्यानंतर माझ्या पतींची रोमपासून सिसिलीपर्यंतच्या विभागासाठी म्हणजेच प्रवास आणि मंडळ्यांना भेट देण्याच्या कार्यासाठी नियुक्‍ती करण्यात आली. कालांतराने आम्ही माल्टा आणि आफ्रिकेच्या उत्तरेकडील लिबिया येथे देखील भेट दिली.

त्या काळाच्या दरम्यान रेल्वेच्या साहाय्याने नेपल्स ते सिसिली या खेपा ही एक शारीरिक सहनशक्‍तिची परीक्षाच होती. आम्हाला लोकांनी तुडूंब भरलेल्या रेल्वेमध्ये आणि काहीवेळा तर सात ते आठ तास गर्दीमध्ये उभे राहून प्रवास करावा लागत होता. तथापि, आमच्या आसपास असणाऱ्‍यांचे परीक्षण करण्यास यामुळे आम्हाला उत्तम संधी प्राप्त झाली. अनेकदा प्रवाश्‍याला वेताचे आवरण असलेली मोठी बाटली दिली जात असे आणि त्यावर तो बसत असे त्याचप्रमाणे लांबच्या प्रवासात लागणारी तहान शमविण्यासाठी त्यातील मद्याचा वारंवार वापर देखील करीत असे. बहुतेकवेळा मैत्रीपूर्ण यात्रेकरू त्यांचा ब्रेड आणि सलामीमध्ये सहभागी होण्यासाठी आम्हाला बोलावत, त्यांचे आदरातिथ्य आणि मनःपूर्वक भावना यांची आम्ही गुणग्राहकता बाळगली.

सिसिलीमध्ये आमची भेट मित्रांबरोबर होत होती आणि ते आमच्या पेट्या डोंगराच्या माथ्यावर असणाऱ्‍या मंडळीपर्यंत साडेतीन तासांमध्ये न थांबता वाहून नेत असत. खिस्ती बांधवांनी केलेल्या उबदार स्वागतामुळे आमचा शीण नाहीसा होत असे. काहीवेळा आम्ही, तरबेज असणाऱ्‍या खेचरांवर स्वार झालो परंतु आम्ही दरीकडे जिच्यामध्ये केवळ खेचराच्या एका चुकीच्या पावलामुळे कोसळलो असतो एकदाही पाहिले नाही. आपले बांधव सहन कराव्या लागणाऱ्‍या कठीण परिस्थितीत देखील बायबलच्या सत्यासाठी दृढ असल्यामुळे आम्हाला बळकटी प्राप्त झाली आणि आमच्याप्रीत्यर्थ दाखवलेल्या प्रेमामुळे आम्ही कृतज्ञ झालो.

माल्टा आणि लिबिया

सिसिली येथील आपल्या बांधवांच्या अनेक आठवणींसह आम्ही माल्टाच्या दिशेने रवाना झालो. प्रेंषित पौलाप्रमाणे आम्हाला सुद्धा तेथे प्रेमळ लोक आढळले. सेंट पौलस्‌ बे येथील वादळाने आम्हाला पहिल्या शतकामधील बोटिने तोंड दिलेल्या धोक्याची जाणीव करून दिली. (प्रेषितांची कृत्ये २७:३९–२८:१०) लिबिया येथे आमची पुढील भेट होती. आफ्रिकेमधील प्रदेशात आमच्या कार्यावर बंदी असताना आम्ही तेथे कसे जाणार होतो?

पुन्हा एकदा आम्ही पूर्णपणे विक्षिप्त संस्कृतीचा अनुभव घेतला. ट्रिपोली शहराच्या खालच्या भागातील दुहेरी रस्त्यावरून चालताना माझे लक्ष तेथील देखावे आणि गजबजाट यांनी आकर्षित झाले. तेथील पुरुषांनी सहारा वाळवंटाची दिवसा असणारी अतितप्त उष्णता आणि रात्रीची थंडी यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ऊंटाच्या केसांनी विणलेले पोषाख घातले होते. आम्हाला, लोक ज्या ठिकाणी राहतात तेथील भौगोलिक परिस्थितींना जुळवून घेण्याच्या पद्धतीची समज मिळाली आणि आम्ही तिला आदर देण्यासाठी शिकलो.

बांधवांच्या जागृत उत्साहाने आम्हाला यहोवावर पूर्णपणे विसंबून राहण्यास आणि अशाप्रकारच्या परिस्थितींमध्ये प्रचार कार्याविषयीची विशेष माहिती असणाऱ्‍यांच्या सूचनांचे पालन करण्याचे शिकविले. आपले ख्रिस्ती बांधव अनेक राष्ट्रीयत्व असणारे होते आणि तरीही यहोवासाठी असलेल्या त्यांच्या सेवेत एकवाक्यतेमध्ये कार्य करीत होते.

नवीन नियुक्‍ती

आमच्या प्रचार कार्याला विरोध असल्यामुळे आम्हाला इटली सोडावे लागले; परंतु आम्ही १९५७ मध्ये ब्राझील येथील नव्या प्रचार कार्याच्या नियुक्‍तीचा आनंदाने स्वीकार केला. फ्रॅन्सिस्‌ आणि मी तेथील जीवन आणि चालीरीती यांना आत्मसात केले आणि आठ महिन्यांनंतर फ्रॅन्सिस्‌ यांना विभागीय कार्यासाठी निमंत्रण देण्यात आले. आम्ही बसने, विमानाने आणि पायी प्रवास केला. हा प्रचंड विस्तृत सुंदर प्रदेश आमच्यासाठी भूगोलाचा एक धडाच होता.

आमच्या पहिल्या विभागामध्ये साओ पावलो या शहरातील दहा मंडळ्या त्याचप्रमाणे राज्यातील आणि साओ पावलो राज्याच्या दक्षिणेकडील किनारपट्टीच्या क्षेत्रातील दहा उप-शहरे समाविष्ट होती. त्यावेळी त्या शहरांमध्ये मंडळ्या नव्हत्या. निवासासाठी आम्ही स्थान निश्‍चित करत असू आणि स्थायिक झाल्यानंतर आम्ही राज्य संदेशासहित घरोघर जात होतो. आम्ही, वॉचटावर संस्थेच्या शैक्षणिक फिल्म्स्‌पैकी एकीचा मथळा असलेले निमंत्रणपत्रके देखील दिली.

बसमध्ये फिल्म्स्‌, प्रोजेक्टर, ट्रॅन्सफॉर्मर, अहवालांच्या फाईल्स्‌, साहित्य, निमंत्रणपत्रके आणि फिल्म दाखविण्याच्या स्थानाविषयी निमंत्रणपत्रके छापण्यासाठी हात-छपाईचे साहित्य घेऊन चढणे ही काही साधी कामगिरी नव्हती. तुलनात्मकरीत्या आमची कपड्यांची लहान पेटी ही एक मोठी बाब नव्हती. कच्च्या रस्त्यावरून प्रवास करताना प्रोजेक्टरला धक्के बसून त्याचे भाग विलग होऊ नयेत याकरिता त्याला मांडीवर अलगदरित्या ठेवण्याची गरज होती.

फिल्म प्रक्षेपित करण्याचे ठिकाण निश्‍चित केल्यानंतर आम्ही फिल्म दाखविण्याची निमंत्रणपत्रके देण्यासाठी दारोदार जात होतो. काहीवेळेस हॉटेल किंवा रेस्टॉरंट यामध्ये फिल्म दाखविण्यासाठी आम्ही परवानगी घेतली. इतरवेळी मात्र आम्ही मोकळ्या वातावरणात दोन खांबांच्या मध्ये बेड शीट ताणून बांधले. गुणग्राहकता बाळगणारे श्रोतागण त्यापैकी आत्तापर्यंत अनेकांनी चल-चित्र पाहिले नव्हते, फ्रॅन्सिस्‌ वृतांताचे समालोचन करतेवेळी उभे राहून लक्षपूर्वक ऐकत असत. त्यानंतर आम्ही बायबल आधारित साहित्याचे वाटप करीत होतो.

खेड्यापर्यंत पोहंचण्यासाठी आम्ही बसने प्रवास केला. काही नद्यांवर पूलाची कमान नसल्यामुळे बसला नदीच्या दुसऱ्‍या किनाऱ्‍यावर वाहून नेण्यासाठी मोठ्या आकाराच्या तराफावर ठेवावे लागत असे. पाण्यात बुडण्याचे टाळण्यासाठी आम्हाला बसमधून उतरण्याचा आणि बस एका बाजूने नदीमध्ये सरकत असल्याचे पाहताच तराफाच्या दुसऱ्‍या बाजूला जाण्याचा सल्ला आम्हाला देण्यात आला होता. आमची बस एकदाही पाण्यात बुडाली नाही—सुदैवच खासकरून यासाठी की, पिरान्हा या मांसाहारी माश्‍यासाठी ही नदी प्रसिद्ध होती!

न्यूयॉर्क येथे १९५८ मध्ये आंतरराष्ट्रीय संमेलनाला उपस्थित राहिल्यानंतर आम्ही ब्राझीलला पुन्हा परतलो आणि तेथे आम्ही लगेचच प्रवासी कार्याची पुन्हा सुरुवात केली. या प्रदेशाने आम्हाला दक्षिणेकडील उरुग्वेची सरहद्द, पश्‍चिमेकडील पेरू, उत्तरेकडील पारामारिबोचे राज्य आणि ब्राझीलच्या पूर्वेकडील अटलांटिक महासागर येथपर्यंत नेले.

महारोग्यांची समाजबाह्‍य वसाहत

आम्ही, १९६० या दशकाच्या मध्यांतरास महारोग्यांच्या वसाहतीमध्ये संस्थेची फिल्म दाखविण्याचे निमंत्रण स्वीकारले. त्यावेळी मी जरा घाबरलेच होते हे मला मान्य करावे लागेल. आम्ही बायबलमध्ये जे काही वाचले होते त्याशिवाय आम्हाला महारोगाविषयी अगदी तुटपुंजे ज्ञान होते. पांढरा रंग दिलेल्या कुंपणाच्या आत आल्यावर आम्हाला एका विशाल सभागृहाकडे निर्देशित करण्यात आले. आमच्यासाठी आणि आमच्या साहित्यासाठी मध्यभागी दोरीच्या साहाय्याने विभाग करण्यात आला होता.

आम्हाला मदत करत असलेला इलेक्ट्रिशियन त्या वसाहतीतील ४० वर्षांपासून निवासी होता. त्याने स्वतःचे हात आणि तसेच शरीराचे इतर काही अवयव पूर्णपणे गमावलेले होते त्यामुळे तो अतिशय विकृत दिसत होता. मला सुरुवातीला चिंता वाटली; परंतु त्याची काम हाताळण्याची उत्साही ढब अणि हातोटी यामुळे मला आराम मिळाला. आम्ही आवश्‍यक ती पूर्वतयारी पूर्ण केल्यावर लवकरच आम्ही अनेक गोष्टींबद्दल संभाषण करू लागलो. त्या वसाहतीमध्ये राहणाऱ्‍या एक हजार पीडाग्रस्तांपैकी दोनशेजण उपस्थित राहिले. ते अडखळत चालत असताना ते सहन करत असलेल्या रोगाच्या अनेक विविध अवस्थांना आम्ही पाहिले. आमच्यासाठी किती हृदयद्रावक आणि भावनात्मक अनुभव!

एका महारोग्याने येशूला याचना केली की, “प्रभुजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा,” तेव्हा येशू त्याला काय म्हणाला याची आम्हाला आठवण झाली. त्या पुरुषाला स्पर्श करून येशूने त्याला निश्‍चिंत केले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” (मत्तय ८:२, ३) अनेकांनी कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर याबद्दलचे आभार मानण्यासाठी आमचा संपर्क साधला, मानवजातीच्या अति यातनेचा स्पष्ट पुरावा त्यांची विकृत शरीरे हा होता. नंतर, स्थानिक साक्षीदारांनी अधिक शिकण्याची इच्छा असणाऱ्‍यांचा बायबल अभ्यास घेतला.

आम्ही १९६७ मध्ये आरोग्याच्या गंभीर समस्येची काळजी घेण्यासाठी अमेरिकेला परतलो. याचा सामना करत असताना पुन्हा एकदा आम्हाला विभागीय कार्यात सेवा करण्यासाठी विशेषाधिकार देण्यात आला. मी, अमेरिकेत पुढील २० वर्षांपर्यंत फ्रॅन्सिस्‌ यांच्याबरोबर प्रवासी कार्यात सहभाग घेतला. या काळाच्या दरम्यान त्यांनी राज्य सेवा प्रशाला देखील संचालित केली.

देण्यात आलेल्या सर्व नियुक्त्यांबद्दल जागृत राहिलेले प्रेमळ पती आणि विश्‍वासू सोबती लाभणे हा माझ्यासाठी प्रेरणेचा किती मोठा स्रोत होता! आम्हा दोघांना, बायबल सत्याच्या ठेवेची सहभागिता चार खंडामधील प्रदेशांमध्ये करण्यासाठी विशेषाधिकार देण्यात आला होता.

ठेवेने दृढ केले

आईने १९५० च्या अंतास डेव्हिड एस्टर यांच्याबरोबर विवाह केला आणि ते एक विश्‍वासू बंधु असून त्यांचा बाप्तिस्मा १९२४ मध्ये झालेला होता. त्यांनी एकत्र मिळून अनेक वर्षे पूर्ण वेळेची सेवा केली. तथापि, आईच्या उतारवयात आल्टझिमर्स ह्‍या रोगाची लक्षणे तिच्यामध्ये दिसू लागली. या रोगाने तिच्या तर्कशक्‍तीचा पूर्णपणे ऱ्‍हास केल्याने तिला खास देखभालीची आवश्‍यकता होती. पाठींबा देणाऱ्‍या माझ्या बहिणी आणि डेव्हिड यांची हीच इच्छा होती, की पूर्णवेळेच्या सेवेच्या खास विशेषाधिकारापासून आम्ही विलग होऊ नये आणि त्यामुळे त्यांनी आईची काळजी घेण्याची अवघड जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. आईचा मृत्यू १९८७ मध्ये झाला आणि तोपर्यंतच्या तिच्या विश्‍वासू उदाहरणाने, आमच्या जीवनातील मार्गाचे नियोजन करण्यासाठी पुष्कळ काही केले आणि तिने बाळगलेल्या स्वर्गीय प्रतिफळाच्या आशेने आमचे सांत्वन केले.

मला १९८९ च्या आसपास याची जाणीव झाली, की फ्रॅन्सिस्‌ आत्ता पूर्वीसारखे सामर्थ्यशाली राहिले नाहीत. जगाच्या अनेक भागात चांगल्या प्रकारे ज्ञात असलेला स्नेल फिवर हा रोग घातक परिणाम करत असल्याचे समजण्यात आम्ही अजाण होतो. अखेरीस, १९९० मध्ये या निष्ठुर शत्रूने त्यांना नामोहरण केले आणि मी माझा जिवलग जोडीदार, ज्याबरोबर मी यहोवाच्या सेवेत ४० वर्षांपेक्षा अधिक काळ घालविलेला होता गमावला.

तडजोडी जीवनाचा भाग आहे. काही सोप्या तर काही कठीण आहेत. परंतु बायबल सत्याची अमूल्य ठेव देणाऱ्‍या यहोवाने, मला त्याची संघटना आणि त्याचे प्रेम तसेच माझ्या कुटुंबाकडून मिळणारे प्रोत्साहन याद्वारे दृढता मिळाली. मला अजूनही, यहोवाच्या सर्व अढळणाऱ्‍या भविष्यवाण्यांच्या पूर्णतेच्या प्रतिक्षेत समाधान मिळत आहे.

[२३ पानांवरील चित्रं]

इटलीमध्ये मी आणि माझे पती मिशनरी होतो तेव्हा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा