वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 १२/१५ पृ. ३-४
  • नाताळाचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नाताळाचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ‘व्यापारी संस्था’
  • तुम्ही नाताळ साजरा करावा का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • नाताळ—पौर्वात्य देशांमध्येही का साजरा केला जातो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • आधुनिक नाताळाचा उगम
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • ख्रिस्ताने ख्रिसमसला मान्यता दिलेली आहे का?
    सावध राहा! माहितीपत्रक ६-४ (gbr6-4)
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 १२/१५ पृ. ३-४

नाताळाचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो?

नाताळ (१) कुटुंबासमवेत असण्याची वेळ (२) पार्ट्या करण्याची वेळ (३) धार्मिक वेळ (४) तणावाची वेळ (५) घरची ओढ लावणारी वेळ (६) व्यापारासाठी भरभराटीची वेळ, याचे तुम्ही कसे उत्तर द्याल?

हे पाहून आश्‍चर्य वाटते, की ब्रिटनमध्ये १००० पेक्षा अधिक लोकांमध्ये केलेल्या पाहणीनुसार, केवळ ६ टक्के लोकांनी नाताळ हा प्रमुख धार्मिक विधी असावा असा विचार केला. उलटपक्षी, ४८ टक्के लोकांनी त्यांच्या कुटुंबासमवेत राहणे या नाताळाच्या प्रामुखतेवर विचार केला. खरोखरच, अनेकजन ती मुलांसाठी एक खास वेळ आहे असे प्रतिपादन करतात. वैशिष्टपूर्ण म्हणजे, एका ११ वर्षीय मुलीला नाताळाच्या बाबतीत तिला सर्वात अधिक काय आवडते असे विचारण्यात आल्यावर तिने प्रत्युत्तर दिले: “काहीतरी हर्षदायक, आनंदाची भावना [आणि] भेटवस्तू देणे.” द मेकिंग ऑफ द मॉडर्न ख्रिसमस या पुस्तकाने मान्य केले: “निःसंशये, ‘पारंपारिक’ नाताळासाठी घर, कुटुंब आणि विशेषकरुन मुले खास महत्त्व देतात.”

परंतु खासपणे, पाश्‍चिमात्य ख्रिस्ती धर्मजगतामध्ये नाताळ हा कौटुंबिक प्रसंग आहे जेव्हा नातेवाईक एकमेकांना भेटवस्तू देण्यासाठी एकत्र येतात. पूर्वेकडील कर्मठवादी चर्चचे प्रभुत्व असणाऱ्‍या प्रदेशांमधील लोक ईस्टरवर अधिक भर देतात तरीदेखील नाताळाचा काळ हा सामान्यपणे सुटीचा समय आहे.

‘व्यापारी संस्था’

द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका म्हणतो, की नाताळाला “उल्लेखनीय घटनांचा . . . व्यापाराचा अनुभव आहे.” जपानप्रमाणे इतरत्र क्वचितच असे आहे.

वॉशिंग्टन येथील डेली रेकॉर्ड याने असा अहवाल दिला, की “जपानी लोकांनी सर्व धार्मिक सबबींना सोडून दिले आहे आणि नाताळाचे व्यापारामध्ये रुपांतर केले आहे.” हा अहवाल पुढे असे सांगतो, की “जपानमधील नाताळ धार्मिक बाबीं याऐवजी व्यापारावर अधिक भर देणारा प्रमुख सण आहे.”

तथाकथित ख्रिस्ती राष्ट्रांमध्येही हे “धार्मिक स्वरुप” अत्यंत अल्प प्रमाणात अस्तित्वात आहे. सुमारे ४० वर्षांपूर्वी नाताळ विरोधी पुस्तिकेने असा खेद व्यक्‍त केला: “व्यापारी जगाद्वारे नाताळाचा ऊहापोह झाला आहे. हा पैसे कमविण्याचा वर्षातील सर्वोत्कृष्ट काळ आहे. ढोंगी ख्रिस्ती व्यापारी येशू खिस्ताप्रीत्यर्थ नव्हे तर आर्थिक लाभांशाच्या अपेक्षेने नाताळाची वाट पाहतात.” आज हे शब्द किती सत्य आहेत! अनेक देशामध्ये, आपण वर्षाच्या शेवटल्या तीन महिन्याच्या सुरुवातीस पोहंचण्यापुर्वीच येणाऱ्‍या नाताळासाठी भेटवस्तू घेण्यासाठी किती दिवस बाकी आहेत याची आठवण आपल्याला करुन दिल्याचे ऐकतो. वर्षाच्या शेवटी व्यापाराची भरभराट होते कारण एक चतुर्थांश दुकानांमध्ये नाताळाच्या काळात वार्षिक सेल लावले जातात.

आता तुमच्यासाठी नाताळाचा कोणताही अर्थ असला तरी त्याची सुरुवात कशी झाली हे जाणून तुम्हाला आश्‍चर्य वाटेल. वास्तविकपणे, बायबल नाताळाच्या भेटवस्तू देण्यासाठी पाठिंबा देते का? आजचे नाताळ समारंभ खरोखरच ख्रिस्ती आहेत का? आपण पाहू या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा