विश्वासाच्या बाजूने उघडपणे मांडलेली मते
शेवटले शतक समाप्त होत आले, तसे विज्ञान, तत्त्वज्ञान आणि नीतीवादाला पाठबळ देणाऱ्या अभिप्रायांचा देवावरच्या विश्वासावर व बायबलच्या प्रेरणेवर हानीकारक परिणाम होत गेला.
परंतु इतकेच अभिप्राय व्यक्त करण्यात आले नव्हते. अनेक संशोधकांनी पाहिले, की नास्तिकवादाऐवजी देवावरील विश्वासाला पुष्टी देण्याबद्दल पुष्कळ काही म्हणता येते. बायबल देवाचे प्रेरित वचन आहे याचा मुबलक पुरावा त्यांच्या अभ्यासाने प्रकट केला.
या बाबतीत आपला अभिप्राय व्यक्त करणारी एक प्रमुख व्यक्ती सी. टी. रस्सेल ही होती. युगांची ईश्वरी योजना (इंग्रजी) हा त्यांचा १८८६ खंड लाखोंनी वाचून काढला. त्यातील एक जबरदस्त धडा, “सर्वश्रेष्ठ बुद्धिमान सृष्टिकर्त्याचे अस्तित्व सिद्ध झाले” हा होता.
पुढील दशकांमध्ये, रस्सेल यांनी, देव आणि बायबलवर विश्वास ठेवण्यास बळकट कारणे पुरवणारे लेख, पत्रिका व पुस्तके लिहिली. ही प्रकाशने वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केली. या संस्थेचे दुसरे अध्यक्ष, जे. एफ. रदरफोर्ड यांनी विश्वासाच्या बाजूने उघडपणे मांडलेल्या मतांना आधार देणारे निर्मिती (इंग्रजी) (१९२७) हे पुस्तक तसेच आणखी इतर साहित्य लिहिले.
ह्या संस्थेने अलिकडेच या बाबतीत आणखी अद्ययावत माहिती तयार केली आहे. तुम्हाला यावर मननपूर्वक विचार करण्यास यहोवाचे साक्षीदार ही माहिती पुरवू शकतात.
तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास, किंवा तुमच्या घरी कोणी येऊन तुमच्यासोबत मोफत गृह बायबल अभ्यास करण्याची तुमची इच्छा असेल तर, कृपया Watch Tower, H-58 Old Khandala Road, Lonavla 410401, Mah., India, किंवा पृष्ठ २ वर दिलेल्या योग्य पत्त्यावर लिहा.