वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 १०/१५ पृ. २१-२६
  • यहोवाप्रमाणे तुम्ही क्षमा करता का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाप्रमाणे तुम्ही क्षमा करता का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मोशे मध्यस्थी करतो—यहोवा ऐकतो
  • मनश्‍शेची मूर्तीपूजा व दाविदाचा व्यभिचार
  • शलमोनाने मंदिराचे केलेले समर्पण
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनातील क्षमाशीलता
  • “आपसात क्षमा करा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • यहोवा, ‘क्षमा करायला तयार असणारा’ देव
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • यहोवा क्षमा करायला नेहमी तयार असतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • क्षमाशील का असावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 १०/१५ पृ. २१-२६

यहोवाप्रमाणे तुम्ही क्षमा करता का?

“कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हांलाहि क्षमा करील; परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताहि तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.”—मत्तय ६:१४, १५.

१, २. आपल्याला कोणत्याप्रकारच्या देवाची गरज असते आणि का बरे?

“परमेश्‍वर [यहोवा, NW] दयाळू व कृपाळू आहे, तो मंदक्रोध व दयामय आहे. तो सर्वदाच दोष देत राहणार नाही; तो आपला क्रोध सर्वकाळ राहू देणार नाही. आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. कारण जसे पृथ्वीच्यावर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्‍यांवर विपुल आहे. पश्‍चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करितो, तसा परमेश्‍वर [यहोवा] आपले भय धरणाऱ्‍यांवर ममता करितो. कारण तो आमची प्रकृति जाणतो; आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो.”—स्तोत्र १०३:८-१४.

२ आपले गर्भधारण पापात झाले व आपण जन्मतःच पापी आहोत, वारसाने मिळालेली अपरिपूर्णता आपल्याला पापाच्या नियमाचे दास बनविण्याकडे नेहमीच निरवित असते. असे असताना, आपण ‘केवळ माती आहो हे आठविणाऱ्‍या’ देवाची आपल्याला अतिशय गरज आहे. दावीदाने १०३ या स्तोत्रात यहोवाचे अति सुंदर वर्णन केल्याच्या तीनशे वर्षांनंतर, आणखी एक बायबल लेखक, मीखा याने याच देवाची, एके काळी केलेल्या पापाची अगदी त्याच मार्गाने दयाळूपणे क्षमा केल्याबद्दल खूप स्तुती केली: “अपराध मागे टाकणारा, अधर्माची क्षमा करणारा, आपला राग सर्वकाळ मनात न ठेवता दया करण्यात आनंद वाटणारा असा तुझ्यासारखा कोणता देव आहे? पुन्हा आम्हावर दया कर, आमचे अपराध पायाखाली तुडव, तू आमची सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकून दे.”—मीखा ७:१८, १९, द जेरुसलेम बायबल.

३. क्षमा करण्याचा अर्थ काय होतो?

३ ग्रीक शास्त्रवचनांत “क्षमा” या शब्दाचा अर्थ, “शिक्षा न करता जाऊ देणे” असा होतो. दावीद व मीखा यांनी वर उद्धृत केलेल्या गोष्टीकडे लक्ष द्या, त्यांनी एकसारखाच अर्थ आकर्षक व वर्णनात्मक शब्दात सांगितला आहे. यहोवाच्या क्षमा करण्याविषयीच्या आश्‍चर्यकारक सीमेची पूर्ण गुणग्राहकता बाळगण्यासाठी, अनेक उदाहरणांमधील काहींची उजळणी आपण करुया. पहिले उदाहरण दाखविते की, यहोवाचे मन नाश करण्यापासून क्षमा करण्याकडे वळू शकते.

मोशे मध्यस्थी करतो—यहोवा ऐकतो

४. यहोवाच्या सामर्थ्याच्या कोणत्या प्रदर्शनानंतर देखील इस्राएल लोक वाग्दत्त देशात जाण्यासाठी घाबरत होते?

४ यहोवाने इस्राएलांना इजिप्तमधून सुखरुप आणून मातृभूमी म्हणून देण्याचे वचन दिलेल्या देशाजवळ आणले; पण केवळ कनानी लोकांच्या भीतीमुळे पुढे जाण्याचे त्यांनी नाकारले. यहोवाने घातक दहा पीडा आणून इजिप्तच्या हातातून त्यांची सुटका केली, तांबडा समुद्र दुभागून तेथून जाण्यासाठी वाट करुन दिली, त्यांच्या मागे येण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या इजिप्तच्या सैन्यांचा नाश केला, सीयोन डोंगराजवळ यहोवाचे निवडलेले राष्ट्र होईल अशी नियमशास्त्र कराराची स्थापना केली, त्यांचे पालनपोषण होण्यासाठी रोज आकाशातून चमत्कारिकरित्या मान्‍ना पुरविला, या सर्व गोष्टी केल्या असताना देखील काही राक्षसी कनानी लोकांमुळे वचनदत्त देशात प्रवेश करण्यासाठी ते घाबरले!—गणना १४:१-४.

५. दोन विश्‍वासू हेरांनी इस्राएलांना दृढ करण्याचा प्रयत्न कसा केला?

५ मोशे आणि अहरोन यांचे धैर्य खचून ते पालथे पडले. यहोशवा व कालेब या दोन विश्‍वासू हेरांनी इस्राएलांना दृढ करण्याचा प्रयत्न केला: ‘तो देश अतिशय उत्तम, दुधामधाचे प्रवाह वाहणारा आहे. लोकांची भीती बाळगू नका; आमच्याबरोबर यहोवा आहे!’ या शब्दांनी उत्तेजन मिळण्याऐवजी, भयभीत झालेल्या बंडखोर लोकांनी यहोशवा व कालेब यांना दगडमार करण्याचा प्रयत्न केला.—गणना १४:५-१०.

६, ७. (अ) पुढे वाग्दत्त देशात जाण्यासाठी इस्राएल लोकांनी विरोध केला, तेव्हा यहोवाने काय करण्याचे ठरविले? (ब) इस्राएल लोकांवर यहोवाचा न्यायदंड येण्यावर मोशेने आक्षेप का घेतला व कोणत्या परिणामास्तव?

६ यहोवा क्रोधिष्ट झाला! “परमेश्‍वर [यहोवा, NW] मोशेला म्हणाला: ‘कोठवर हे लोक मला तुच्छ लेखणार आणि ह्‍यांच्यामध्ये मी केलेली सगळी चिन्हे पाहूनहि हे कोठवर माझ्यावर विश्‍वास ठेवणार नाहीत? मी त्यांचा मरीने संहार करुन त्यांचा वारसा नष्ट करीन आणि तुझेच त्यांच्याहून मोठे व प्रबळ राष्ट्र करीन.’ पण मोशेने परमेश्‍वराला [यहोवा, NW] म्हटले: ‘तू आपल्या सामर्थ्याने ह्‍या लोकांना मिसरी [ईजिप्शियन] लोकांमधून आणिले आहेस. . . . आणि ह्‍या देशातील रहिवाश्‍यांनाहि ते सांगतील. . . . आता तू ह्‍या लोकांचा समूळ नाश केलास तर ज्या ज्या राष्ट्रांनी तुझी कीर्ति ऐकली आहे ती म्हणतील, “जो देश परमेश्‍वराने [यहोवा, NW] ह्‍या लोकांना शपथपूर्वक देऊ केला होता तेथे त्यांना न्यावयास तो असमर्थ ठरल्याने त्यांना रानातच त्याने मारुन टाकिले.”’”—गणना १४:११-१६.

७ यहोवाच्या नावास्तव, मोशे क्षमेची याचना करतो: “तुझ्या थोर दयेनुसार मिसर [इजिप्त] देशापासून येथपर्यंत जशी तू ह्‍या लोकांना क्षमा केली तशी ह्‍या वेळीहि त्यांच्या अन्यायाची क्षमा कर असे मी तुला विनवितो.”—गणना १४:१९, २०.

मनश्‍शेची मूर्तीपूजा व दाविदाचा व्यभिचार

८. यहूदाचा राजा मनश्‍शेने कोणता अहवाल बनविला होता?

८ यहोवाच्या क्षमेचे उल्लेखनीय उदाहरण, चांगला राजा, हिज्कीयाचा पुत्र मनश्‍शे याच्या बाबतीत आहे. मनश्‍शेने १२ वर्षांचा असताना जेरुशलेमात राज्य करण्यास आरंभ केला. त्याने उच्च स्थाने बांधली, बआल मूर्तीसाठी वेद्या बांधल्या, अशेरा मूर्ती केल्या, नक्षत्रगणांना त्यांनी नमन केले, जादूटोणा व मंत्रतंत्र केले आणि भूतविद्या व भविष्य सांगणारे, आपण केलेली कोरीव मूर्ति त्याने यहोवाच्या मंदिरात ठेवली व त्याने आपली मुले हिन्‍नोमच्या खोऱ्‍यात अग्नीत होम करुन अर्पिली. ‘त्याने मोठ्या प्रमाणावर, यहोवाच्या दृष्टीने वाईट ते केले’ आणि “यहूद्यांस व यरुशलेमकरांस एवढे बहकविले की परमेश्‍वराने [यहोवा, NW] इस्राएलांपुढून ज्या राष्ट्रांचा नाश केला होता त्यांच्याहूनहि अधिक दुराचार त्यांनी केला.”—२ इतिहास ३३:१-९.

९. मनश्‍शेबद्दल यहोवाने सौम्यता कशी दाखवली होती व कोणत्या परिणामास्तव?

९ शेवटी, यहोवाने यहुदाविरुद्ध अश्‍शूरी लोकांना पाठविले व त्यांनी मनश्‍शेला पकडून बॅबिलॉनला नेले. “तो संकटात पडला तेव्हा तो आपला देव परमेश्‍वर [यहोवा, NW] यास शरण गेला आणि आपल्या पूर्वजांच्या देवासमोर फार दीन झाला. त्याने त्याची प्रार्थना केली, त्याचा धावा केला तेव्हा त्याने त्याची विनंति ऐकून त्यास पुनः यरुशलेमेत आणून त्याचे राज्य त्यास दिले.” (२ इतिहास ३३:११-१३) मनश्‍शेने मग अन्य देव, मूर्ती व वेद्या काढून नगराबाहेर फेकून दिल्या. त्याने यहोवाच्या वेदीवर अर्पणे वाहण्यास सुरवात केली व यहूदाला खऱ्‍या देवाची उपासना करावयास लावले. लीनता, प्रार्थना व चुकीच्या कार्यात बदल ही पश्‍चात्तापाला उचित असलेली फळे उत्पादित करतात तेव्हा क्षमा करण्याच्या बाबतीत हे, यहोवाच्या स्वेच्छेचे आश्‍चर्यकारक प्रदर्शन होते!—२ इतिहास ३३:१५, १६.

१०. दाविदाने उरीयाच्या पत्नीसोबत केलेले पाप लपविण्याचा प्रयत्न कशारितीने केला?

१० राजा दाविदाने उरीया हित्ती याच्या पत्नीबरोबर केलेले व्यभिचारी पाप हे सर्वांच्या परिचयाचे आहे. त्याने तिच्याशी केवळ व्यभिचारच केला नाही, तर ती गरोदर राहिल्यावर, ते लपविण्यासाठी त्याने योजना देखील केली. उरीया घरी जाऊन त्याच्या पत्नीशी समागम करील ही अपेक्षा मनात बाळगून राजाने त्याला युद्धावरुन सुटी दिली. परंतु, युद्धाच्या तोंडी लढणाऱ्‍या आपल्या सह सैनिकांसाठी असलेल्या आदरामुळे उरीयाने ते नाकारले. मग दाविदाने उरीयाला खाऊ घातले व मद्य दिले तरी उरीया त्याच्या पत्नीकडे गेला नाही. मग दाविदाने उरीया ठार मारला जाण्यासाठी त्याला तुंबळ युद्धाच्या तोंडी ठेवण्याचा सेनापतीला निरोप पाठविला व त्याप्रमाणेच झाले.—२ शमुवेल ११:२-२५.

११. दाविदाला त्याने केलेल्या पापाचा पश्‍चात्ताप करण्याप्रत कसे आणले गेले, तरीही त्याला कोणती गोष्ट सहन करावी लागली?

११ दावीद राजाचे पाप उघडे करण्यासाठी यहोवाने त्याचा संदेष्टा नाथान याला त्याच्याकडे पाठविले. “दावीद नाथानास म्हणाला: ‘मी परमेश्‍वराविरुद्ध [यहोवा, NW] पातक केले आहे.’ नाथान दाविदास म्हणाला: ‘परमेश्‍वराने [यहोवा] तुझे पातक दूर केले आहे; तू मरावयाचा नाहीस.’” (२ शमुवेल १२:१३) दाविदाला आपल्या पातकाबद्दल अतिशय अपराधी असल्याचे वाटले व यहोवाला मनःपूर्वक प्रार्थना करण्याद्वारे त्याने त्याचा पश्‍चात्ताप व्यक्‍त केला: “तुला पशुयज्ञ आवडत नाही, नाही तर तो मी केला असता; होमबलिही तुला प्रिय नाही. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा; हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.” (स्तोत्र ५१:१६, १७) दाविदाच्या भग्न हृदयाने केलेल्या प्रार्थनेला यहोवाने तुच्छ लेखले नाही. असे असले तरी, निर्गम ३४:६, ७ मध्ये “अपराधांची मुळीच गय न करणारा” या क्षमा करण्याविषयी यहोवाच्या विधानाच्या एकवाक्यतेत दाविदाला मोठी शिक्षा सहन करावी लागली.

शलमोनाने मंदिराचे केलेले समर्पण

१२. शलमोनाने मंदिराच्या समर्पणाच्या प्रसंगी कोणती विनंती केली व यावर यहोवाने कसा प्रतिसाद दिला?

१२ शलमोनाने यहोवाच्या मंदिराची इमारत बांधून पूर्ण केल्यावर, समर्पणाच्या वेळी केलेल्या प्रार्थनेत असे म्हटले: “तुझ्या सेवकाच्या विनवणीकडे आणि तुझे लोक इस्राएल या स्थलाकडे तोंड करुन विनवणी करतील तिच्याकडे तू कान दे; स्वर्गांतील तुझ्या निवासस्थानातून तू ती श्रवण कर आणि श्रवण करुन त्यांना क्षमा कर.” यहोवाने प्रतिसाद दिला: “पर्जन्यवृष्टि होऊ नये म्हणून मी जर आकाशकपाटे बंद केली, किंवा जमिनीचा उपज फस्त करण्यासाठी टोळधाड पाठविली, किंवा आपल्या लोकांमध्ये मरी पाठविली, तर माझे नाम ज्यांस दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले तर मी स्वर्गांतून त्यांची विनंति ऐकून त्यांच्या पापांची त्यांस क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन.”—२ इतिहास ६:२१; ७:१३, १४.

१३. एखाद्या व्यक्‍तीकडे यहोवा कसा पाहतो याबद्दल यहेज्केल ३३:१३-१६ काय दाखवते?

१३ यहोवा तुमच्याकडे पाहतो तेव्हा, गतकाळात तुम्ही जे होता त्याचा नव्हे तर सध्या जे आहात त्यासाठी तो तुमचा स्वीकार करतो. ते यहेज्केल ३३:१३-१६ जे म्हणते त्यासारखेच असेल: “मी कोणा धार्मिकास म्हणालो की तू खास वाचशील आणि त्याने आपल्या धार्मिकतेवर भिस्त ठेवून दुष्कर्म केले तर त्याची सर्व धार्मिकता जमेस धरण्यात येणार नाही; त्याने केलेल्या दुष्कर्मामुळे तो मरेलच. तसेच मी कोणा दुर्जनास म्हणालो की, तू मरशीलच, आणि तो आपल्या पापांच्या मार्गावरुन फिरून नीति व न्याय आचरील; तो दुर्जन गहाण परत करील, हरण केलेले परत देईल, आणि काहीएक अधर्म न करिता जीवनाच्या नियमांप्रमाणे चालेल तर तो जगेलच, मरावयाचा नाही. त्याने केलेली सर्व पातके त्याच्या हिशेबी धरली जाणार नाहीत; नीतीने व धार्मिकतेने वागत असल्यामुळे तो जगेलच.”

१४. यहोवाच्या क्षमाशीलतेविषयी काय विभिन्‍नता आहे?

१४ यहोवा देव आपल्याला करीत असलेल्या क्षमेचा एक विशेष पैलू आहे, म्हणजे, तो क्षमा करतो व विसरतो. या पैलूचा समावेश, मानवप्राणी एकदुसऱ्‍यांना करीत असलेल्या क्षमेत करण्यास कठीण आहे. काही लोक म्हणतील, ‘तुम्ही जे काही केले आहे ते मी क्षमा करीन पण ते मी कधी विसरु शकत (विसरणार) नाही.’ परंतु याच्या अगदी विपरीत यहोवा काय म्हणतो याकडे लक्ष द्या: “मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही.”—यिर्मया ३१:३४.

१५. क्षमा करण्याविषयी यहोवाचा कोणता अहवाल आहे?

१५ यहोवा त्याच्या पृथ्वीवरील उपासकांना हजारो वर्षांपासून क्षमा करीत आला आहे. तो त्यांनी जाणीवपूर्वक केलेल्या पापांची तसेच अजाणतेत केलेल्या पापांची देखील क्षमा करीत आला आहे. त्याची दया, सहानुभूती व क्षमेची ही तरतूद अंतहीन आहे. यशया ५५:७ म्हणते: “दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्‍वराकडे [यहोवा, NW] वळो म्हणजे तो त्याजवर दया करील; तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील.”

ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनातील क्षमाशीलता

१६. येशू करीत असलेली क्षमा यहोवा करीत असलेल्या क्षमेच्या एकवाक्यतेत आहे, असे आपण का म्हणू शकतो?

१६ ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनातील अहवाल देवाच्या क्षमाशीलतेने व्यापलेले आहे. या विषयाच्या बाबतीत येशू यहोवाच्या विचाराच्या एकवाक्यतेत असल्याचे अनेकदा बोलतो. येशूची विचारसरणी यहोवाकडून येते; तो यहोवाला प्रतिबिंबित करतो व तो त्याच्या तत्त्वाचे प्रतिरुप आहे हे; त्याला पाहणे म्हणजे यहोवाला पाहण्यासारखे आहे.—योहान १२:४५-५०; १४:९; इब्रीयांस १:३.

१७. यहोवा “भरपूर” क्षमा करतो हे येशूने कसे स्पष्ट केले?

१७ यहोवा मोठ्या प्रमाणात क्षमा करत असल्याचे येशूच्या एका दृष्टांतामधून दिसून येते. त्यात राजाने एका दासाचे १०,००० किक्कार (अंदाजे ३,३०,००,००० अमेरिकन डॉलर) कर्ज माफ केलेले होते. परंतु त्या दासाने सोबतीच्या दासाचे शंभर दिनार (जवळपास ६०, अमेरिकन डॉलर) असलेल्या कर्जाची क्षमा केली नाही तेव्हा राजा संतापतो. “‘अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडिले होते. मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूहि आपल्या सोबतीच्या दासावर दया करावयाची नव्हतीस काय?’ मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हालहाल करणाऱ्‍यांच्या हाती दिले.” येशूने मग याचा अवलंब केला: “म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण आपआपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गांतील पिताहि त्याप्रमाणेच तुमचे करील.”—मत्तय १८:२३-३५.

१८. क्षमा करण्याविषयी पेत्राच्या दृष्टिकोनाची तुलना येशूच्या दृष्टिकोनाप्रमाणे कशी झाली?

१८ वरील दृष्टांत देण्याअगोदरच पेत्राने येऊन येशूला विचारले: “प्रभुजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? सात वेळा काय?” पेत्राला वाटले की या बाबतीत तो फारच उदार आहे. शास्त्री आणि परुश्‍यांनी या बाबतीत मर्यादा ठेवल्या असल्या, तरी येशूने पेत्राला म्हटले: “सात वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर साताच्या सत्तर वेळा.” (मत्तय १८:२१, २२) येशूने म्हटल्याप्रमाणे दिवसातून सात वेळा क्षमा करणे काहीच नव्हे: “तुम्ही स्वतः संभाळा. तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव आणि त्याने पश्‍चात्ताप केला तर त्याला क्षमा कर. त्याने दिवसातून सात वेळा तुझा अपराध केला आणि सात वेळा तुझ्याकडे परत येऊन ‘मला पश्‍चात्ताप झाला आहे’, असे म्हटले तरी त्याला क्षमा कर.” (लूक १७:३, ४) यहोवा क्षमा करतो तेव्हा तो आमच्या पापांचा अहवाल ठेवत नाही हे आमच्यासाठी किती आनंदाचे आहे.

१९. यहोवाची क्षमा मिळवण्यासाठी आपण काय प्राप्त केले पाहिजे?

१९ पश्‍चात्ताप करण्यासाठी आपल्याजवळ लीनता असेल व आपण आपली पातके कबूल केल्यास, आपल्यावतीने कार्य करण्यासाठी यहोवा तत्पर असतो. “जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्‍वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.”—१ योहान १:९.

२०. स्तेफनने पापाची क्षमा करण्याची कोणती स्वेच्छा दाखवली होती?

२० येशूचा अनुयायी स्तेफनने, जमाव त्याला दगडमार करीत असताना क्षमाशीलतेच्या उल्लेखनीय आत्म्याने अपील करुन धावा केला: “‘हे प्रभू येशू माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.’ मग, गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला: ‘हे प्रभू, [यहोवा, NW] हे पाप त्यांच्याकडे मोजू नको.’ असे बोलून तो [मृत्यूत] झोपी गेला.”—प्रेषितांची कृत्ये ७:५९, ६०.

२१. रोमी सैनिकांना क्षमा करण्याची येशूची स्वेच्छा इतकी आश्‍चर्याची का आहे?

२१ स्वेच्छेने क्षमा करण्याच्या बाबतीत येशूने यापेक्षाही आश्‍चर्यकारक उदाहरण मांडले. त्याच्या शत्रूंनी त्याला अटक केली बेकायदेशीररित्या त्याची परीक्षा घेतली; त्याला दोषी ठरवले, त्याची थट्टा केली, त्याच्यावर थुंकले, वादीवर कदाचित हाडे व धातुचे तुकडे रोवलेल्या चाबकाने त्याला मारले आणि शेवटी खिळे ठोकून वधस्तंभावर कितीतरी वेळासाठी त्याला टांगले. यामध्ये रोमी लोक अधिक गोवलेले होते. तथापि, येशू त्या वधस्तंभावर मरण पावत असतानाही, ज्या सैनिकांनी त्याला वधस्तंभावर चढविले त्यांच्याविषयी त्याने त्याच्या स्वर्गीय पित्याला म्हटले: “हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करितात हे त्यांना समजत नाही.”—लूक २३:३४.

२२. आपण डोंगरावरील प्रवचनाच्या कोणत्या शब्दांचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला पाहिजे?

२२ येशूने डोंगरावरील त्याच्या प्रवचनात म्हटले: “आपल्या वैऱ्‍यांवर प्रीति करा आणि जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.” त्याच्या पृथ्वीवरील सेवेच्या समाप्तीपर्यंत, त्याने स्वतः या तत्त्वाचे पालन केले. आपल्याला पतित शरीराच्या कमतरतेमुळे झगडावे लागत असल्यामुळे, आपल्याकडून ही गोष्ट अधिक मागणी करते का? येशूने आपल्या शिष्यांना आदर्श प्रार्थना शिकवल्यावर निदान त्याने शिकवलेल्या शब्दांचा अवलंब तरी, आपण केला पाहिजे: “जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हांलाहि क्षमा करील; परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाहीत तर तुमचा पिताहि तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.” (मत्तय ५:४४; ६:१४, १५) यहोवाप्रमाणे क्षमा केल्यास, आपण देखील क्षमा करु व विसरून जाऊ.

तुम्हाला आठवते का?

◻ यहोवा आपल्या पापांवर कशी कारवाई करतो आणि का?

◻ मनश्‍शेला त्याचे राज्यत्व परत का दिले गेले?

◻ यहोवाच्या क्षमा करण्याच्या कोणत्या भिन्‍न पैलूचे अनुकरण करणे मानवांसाठी आव्हानात्मक आहे?

◻ क्षमा करण्याच्या बाबतीत येशूची स्वेच्छा इतकी आश्‍चर्याची का होती?

[२४ पानांवरील चित्रं]

देवाची क्षमा मिळवण्याच्या गरजेबद्दल नाथानने दाविदाला मदत केली

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा