वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 १०/१५ पृ. ४-७
  • मृतांची काय स्थिती आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मृतांची काय स्थिती आहे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मृत्यू मानवजातीकरिता उद्देशिला नव्हता
  • कोणते अभिवचन?
  • आत्मिक क्षेत्रातून दळणवळण
  • यहोवा, सत्य आणि प्रीतीचा देव
  • आपल्या मृत प्रियजनांचे काय होते?
    सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
  • मृत्यूनंतर जीवन—कसे, कोठे, केव्हा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • तुमच्यात अमर आत्मा आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • मेलेल्या लोकांसाठी काय आशा आहे?
    देवाकडून आनंदाची बातमी!
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 १०/१५ पृ. ४-७

मृतांची काय स्थिती आहे?

मृतांचे भय एका पूर्वपक्षावर आधारित आहे—मृत व्यक्‍तीचा जीव किंवा आत्मा मृत्यूनंतर जिवंत राहतो. ही शिकवण खोटी आहे असे बायबल स्पष्टपणे शिकवते, तर मग मृत तुम्हाला इजा करू शकतात का हा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. तर मग, बायबल काय म्हणते?

मृतांच्या स्थितीला विचारात घेता देवाचे वचन असे म्हणते: “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतास तर काहीच कळत नाही; त्यांस आणखी काही फलप्राप्ति व्हावयाची नसते; त्यांचे स्मरण कोणास राहत नाही. त्यांचे प्रेम, त्यांचे वैर व त्यांचा हेवादावा ही नष्ट होऊन गेली आहेत; ह्‍या भूतलावरील व्यवहारात त्यांचा भाग कधीहि असणार नाही.”—उपदेशक ९:५, ६.

हे लक्षात घेता, मृत तुम्हाला मदत किंवा इजा करू शकतात का? नाही, असे शास्त्रवचने म्हणतात. मृत बेशुद्ध व शांत स्थितीत असतात. ते जिवंतांसोबत दळणवळण करण्यास किंवा कोणतीही भावना—प्रीती वा वैर—व्यक्‍त करण्यास किंवा कृती करण्यास असमर्थ असतात. तुम्ही त्यांना भिण्याचे काही कारण नाही.

‘होय, तुम्ही जर भौतिक शरीराच्या मृत्यूसंबंधाने बोलत असाल तर ही गोष्ट खरी असू शकेल, परंतु भौतिक मृत्यूने काय जीवनाचा अंत होत नाही; ते फक्‍त शरीरातून आत्म्याला मोकळे करते. आणि तो आत्मा जिवंतांना मदत किंवा इजा करू शकतो,’ असे काही म्हणतील. पृथ्वीवरील लाखो लोकांना असेच वाटते.

उदाहरणार्थ, मादागास्करमध्ये जीवन हे केवळ एक स्थित्यंतर आहे, असे समजले जाते म्हणूनच अत्यंसंस्कार व थडग्यातून प्रेत बाहेर काढण्याच्या क्रियेला विवाहसोहळ्यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण समजले जाते. तेथे असा विचार केला जातो की, एखादी व्यक्‍ती तिच्या पूर्वजांकडून आली होती व मृत्यूनंतर ती त्यांच्याकडे पुन्हा जाते. याचकारणास्तव, जीवितांसाठी लाकूड, माती व पेंढ्यांच्या काड्यांनी घरे बनवली जातात जी कालांतराने मोडू शकतात; परंतु मृतांची “घरे,” म्हणजे थडगी, सामान्यपणे अधिक प्रशस्त व टिकाऊ अशी बनवली जातात. थडग्यातून प्रेत बाहेर काढतेवेळी, मृत व्यक्‍तीच्या कुटुंबाला आणि मित्रांना वाटते की, त्यांना आशीर्वाद मिळेल, व स्त्रियांचा विश्‍वास असतो की जर त्यांनी त्यांच्या मृत नातेवाईकाच्या अर्स्थिना स्पर्श केला तर त्यांना प्रसवशक्‍ती प्राप्त होईल. परंतु पुन्हा एकदा, देवाचे वचन काय म्हणते?

मृत्यू मानवजातीकरिता उद्देशिला नव्हता

यहोवा देवाने मानवाला जगण्यासाठी निर्माण केले होते व केवळ अवज्ञेचा परिणाम मृत्यू असे त्याने म्हटले होते ही गोष्ट जाणणे आस्थेचे आहे. (उत्पत्ती २:१७) दुःखाची गोष्ट अशी की, पहिल्या पुरूष आणि स्त्रीने पाप केले व परिणामस्वरूप, त्यांचे पाप सर्व मानवजातीला मृत्यूचा वारसा ठरले. (रोमकर ५:१२) यास्तव, पहिल्या मानवी जोडप्याने अवज्ञा केल्यापासून मृत्यू ही जीवनाची वास्तविकता ठरली आहे असे तुम्ही म्हणू शकता, होय, दुःखद वास्तविकता बनली आहे. आपल्याला जगण्यासाठी बनवले होते व यामुळे लाखो लोकांना सर्व गोष्टींचा शेवट असलेल्या मृत्यूचा सामना करणे कठीण का वाटते हे काही प्रमाणात स्पष्ट होते.

बायबलच्या अहवालानुसार, अवज्ञेमुळे मृत्यू येऊ शकतो या देवाने दिलेल्या इशाऱ्‍याचे खंडन करून सैतानाने पहिल्या मानवी जोडप्याची मृत्यूविषयी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. (उत्पत्ती ३:४) परंतु, काळ जसजसा जात राहिला तसे हे अगदी स्पष्टपणे दिसू लागले की देवाने म्हटल्याप्रमाणे मानव मरतात. यास्तव, या शतकांमध्ये सैतानाने आणखी एक लबाडी उठवली—मृत्यू झाल्यावर मानवाच्या शरीरातून आत्मा जिवंत राहतो. ही फसवणूक दियाबल सैतानाला अगदी लागू होते ज्याच्याविषयीचे वर्णन येशूने “लबाडीचा बाप” असे केले. (योहान ८:४४) उलटपक्षी, देवाने मृत्यूला दिलेले उत्तर एक उत्तेजनकारक अभिवचन आहे.

कोणते अभिवचन?

अनेकांकरता हे पुनरुत्थानाचे अभिवचन आहे. “पुनरुत्थान” यासाठी भाषांतरित केलेला ग्रीक शब्द ॲ·नाʹस्टा·सिस हा आहे. त्याचा अक्षरश: अर्थ “पुन्हा एकदा उठून उभे राहणे,” असा होतो व तो मृत्यूतून उठणे याला सुचित होतो. होय, मनुष्य मृत्यूमध्ये निजतो; परंतु देव आपल्या शक्‍तीद्वारे एखाद्या व्यक्‍तीला पुन्हा उठवू शकतो. मनुष्य जीवन गमावतो; परंतु देव त्याला जीवन पुन्हा बहाल करू शकतो. देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त म्हणाला, की “कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील . . . अशी वेळ येत आहे.” (योहान ५:२८, २९) प्रेषित पौलाने ‘नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल . . . तीच आशा देवाकडे पाहून’ व्यक्‍त केली. (प्रेषितांची कृत्ये २४:१५) ख्रिस्ती काळाआधी राहणाऱ्‍या ईयोब नावाच्या देवाच्या एका विश्‍वासू सेवकाने देखील पुनरुत्थानावरील त्याची आशा प्रकट केली. तो म्हणाला: “मनुष्य मृत झाल्यावर पुनः जिवंत होईल काय? माझी सुटका होईपर्यंत कष्टमय सेवेचे सगळे दिवस मी वाट पाहत राहीन. तू [देव] मला हाक मारिशील व मी तुला उत्तर देईन.”—ईयोब १४:१४, १५.

पुनरुत्थानाची स्पष्ट आशा, मृत आत्मिक स्वरूपात जिवंत आहेत या लबाडीला खोटे ठरवत नाही का? जर मृत जिवंत होते व स्वर्ग किंवा कोणत्याही आत्मिक दुनियेत आनंद घेत होते तर पुनरुत्थानाचा काय उद्देश राहिला असता? त्यांना त्यांचे प्रतिफळ किंवा विधिलिखित प्राप्त झाले नसते का? देव वचनाच्या अभ्यासातून हे स्पष्ट होते की, मृत लोक खरोखर मृतावस्थेत, बेशुद्ध असतात. आमच्या प्रेमळ पित्या यहोवाने अभिवचन दिलेल्या—नंदनवनात—एका नव्या जगात पुनरूत्थानाद्वारे पुन्हा उठवण्याच्या महान कार्यापर्यंत ते गाढ झोपेतच असतील. परंतु जर मृत्यूचा अर्थ, शरीर आणि आत्म्याचे वेगळे होणे असा होत नाही व आत्मा जिवंत राहात नाही तर, आत्मिक दुनियेतून दळणवळण होत असल्याचे भासवणाऱ्‍या घटनांबद्दल काय?

आत्मिक क्षेत्रातून दळणवळण

आत्मिक क्षेत्रातून दळणवळण होत असल्याच्या असंख्य घटनांचा अहवाल दिला गेला आहे. त्यांचा वास्तविक उगम काय आहे? बायबल आपल्याला ताकीद देते की, “सैतानहि स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. म्हणून त्याच्या सेवकांनीहि नीतिमत्त्वाच्या सेवकांचे सोंग घेतले तर ती मोठीशी गोष्ट नाही.” (२ करिंथकर ११:१४, १५) होय, लोकांना सहजगत्या फुसलावण्यास व दिशाभूल करण्यास, दुरात्म्यांनी (बंडखोर देवदूत) जीवितांसोबत दळणवळण केले आहे, काही वेळा मदत करण्याचे सोंगही केले आहे.

प्रेषित पौल फुसलावण्याच्या या हेतूविषयी पुढे आणखी ताकीद देतो. तो म्हणतो: “फुसलाविणाऱ्‍या आत्म्यांच्या व दुरात्म्यांच्या शिक्षणाच्या नादी लागून कित्येक लोक विश्‍वासापासून भ्रष्ट होतील.” (१ तीमथ्य ४:१, NW) यास्तव, मृतांकडे निर्देशून कोणतीही प्रतिक्रिया असेल तर ती नक्की दुरात्म्यांकडून आहे जे “नीतिमत्त्वाच्या सेवकांचे सोंग” घेऊन धार्मिक लबाडी फैलावतात. ते लोकांना देव वचनाच्या सत्यापासून दूर बहकविणाऱ्‍या अंधश्रद्धेच्या दास्यत्वात ठेवतात.

मृतांना काहीच बोलता येत नाही, करता येत नाही किंवा त्यांना काही वाटतही नाही याची पुष्टी देत स्तोत्र १४६:३, ४ म्हणते: “अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही. त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो; त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो.” त्याचा प्राण जातो म्हणजे नेमका कोणता प्राण निघून “जातो”? तो त्या व्यक्‍तीची जीवनशक्‍ती आहे जिला श्‍वासोच्व्छासाद्वारे टिकवले जाते. तथापि, जेव्हा एखाद्या मृत व्यक्‍तीने श्‍वास घेण्याचे थांबवले तेथूनपुढे तिचे ज्ञानेंद्रिय कार्य करण्याचे थांबते. ती पूर्ण बेशुद्धावस्थेत असते. यास्तव, त्याला जीवितांवर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे.

याचकारणास्तव बायबल मानवाच्या मृत्यूची तुलना, एखाद्या प्राण्याच्या मृत्यूशी करते. ते म्हणते, की दोघेही मृत्यूनंतर बेशुद्ध होतात व त्यांना जिच्यातून बनवले होते त्या मातीला पुन्हा जाऊन मिळतात. उपदेशक ३:१९, २० म्हणते: “मानवपुत्रावर प्रसंग येतात तसेच पशूवर येतात; दोघांवरहि एकच प्रसंग येतो; हा मरतो तसाच तोहि मरतो; त्या सर्वांचा प्राण सारखाच आहे; पशूंपेक्षा मनुष्य काही श्रेष्ठ नाही; कारण सर्व काही व्यर्थ आहे! सर्व एकाच स्थानी जातात; सर्वांची उत्पती मातीपासून आहे व सर्व पुनः मातीस मिळतात.”

लोक मृतांसोबत दळणवळण राखू शकतील व त्यांच्यावर त्यांचा प्रभावही पडेल असा विचार करण्यास दुरात्मे त्यांना फुसलावण्याचा प्रयत्न करतात हे माहीत असल्यामुळे यहोवा देवाने त्याच्या प्राचीन इस्त्राएल लोकांना ताकीद दिली: “चेटूक करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार, वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छांछू करणारा, अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा. कारण जो कोणी असली कृत्ये करितो त्याचा परमेश्‍वराला [यहोवा, NW] वीट आहे.”—अनुवाद १८:१०-१२.

स्पष्टतः मग, मृत आपल्याला इजा करू शकतात ही कल्पना देवाकडून नाही. तो सत्याचा देव आहे. (स्तोत्र ३१:५; योहान १७:१७) शिवाय त्याची उपासना “आत्म्याने आणि खरेपणाने” करणाऱ्‍या सत्याच्या प्रेमिकांसाठी त्याने एक अद्‌भुत भवितव्य राखून ठेवले आहे.—योहान ४:२३, २४.

यहोवा, सत्य आणि प्रीतीचा देव

आमचा प्रेमळ स्वर्गीय पिता, जो “कधीही खोटे बोलत नाही,” त्याने अभिवचन दिले: मरण पावलेले व ज्यांना कबरेत पुरले आहे अशा लाखो लोकांना, धार्मिकतेच्या नव्या जगात चिरकालिक जीवनाच्या आशेसह पुनरुत्थित केले जाईल! (तीत १:१, २, NW; योहान ५:२८) पुनरुत्थानाचे हे प्रेमळ अभिवचन प्रकट करते की, यहोवाला त्याच्या मानवी सृष्टिच्या हिताबद्दल गाढ आस्था आहे तसेच मृत्यू, दुःख आणि कष्टाला पूर्णपणे काढून टाकण्याची मनापासून इच्छा आहे. यास्तव मृतांबद्दल कोणतेही भय बाळगण्याची किंवा त्यांच्याविषयी आणि त्यांच्या भवितव्याविषयी विनाकारण काळजी करण्याची काही गरज नाही. (यशया २५:८, ९; प्रकटीकरण २१:३, ४) आमचा प्रेमळ आणि न्यायी देव यहोवा, त्यांना पुनरुत्थित करू शकतो व निश्‍चित करील. मृत्यूमुळे होणाऱ्‍या दुःखाला तो काढून टाकणार आहे.

देवाचे वचन, बायबल, धार्मिकतेच्या त्या अभिवचन केलेल्या नव्या जगात पृथ्वीवर कशी परिस्थिती असेल याच्या वर्णनांनी भरलेले आहे. (स्तोत्र ३७:२९; २ पेत्र ३:१३) सर्व सहमानवांसाठी तो काळ शांतीचा, आनंदाचा व प्रीतीचा असेल. (स्तोत्र ७२:७; यशया ९:७; ११:६-९; मीखा ४:३, ४) सर्वांना सुरक्षित, उत्तम घरकूल त्यासोबतच आनंदविणारे कामही असेल. (यशया ६५:२१-२३) सर्वांना खाण्यासाठी पुष्कळ स्वादिष्ठ अन्‍न असेल. (स्तोत्र ६७:६; ७२:१६) सर्वजण उत्तम आरोग्याचा आनंद लुटतील. (यशया ३३:२४; ३५:५, ६) येशूसोबत स्वर्गामध्ये प्रेषित आणि त्यांच्यासोबत काही मर्यादित लोक राज्य करतील तेव्हा, मरणानंतर इतरांचे आत्मे स्वर्गामध्ये आशीर्वादित स्थितीत असतील याचा बायबल कोठेही उल्लेख करत नाही. (प्रकटीकरण ५:९, १०; २०:६) मरण पावलेले करोडो लोक मृत्यूनंतरही जिवंत आहेत ही कल्पनाच विचित्र वाटते.

परंतु बायबलची स्पष्ट शिकवण समजल्यावर आम्हाला ते विचित्र वाटणार नाही. ती शिकवण म्हणजे, मृत जिवंत जीव म्हणून अस्तित्वात नाहीत. ते तुम्हाला इजा करू शकत नाहीत. कबरेत असलेले, देवाच्या नियुक्‍त समयी त्यांच्या पुनरुत्थानापर्यंत निपचित, बेशुद्धावस्थेत आहेत. (उपदेशक ९:१०; योहान ११:११-१४, ३८-४४) तेव्हा, आमच्या आशा आणि आकांक्षा देवावर निर्भर करतात. “त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास व हर्ष पावू.”—यशया २५:९.

[७ पानांवरील चित्रं]

देवाचे वचन स्पष्टपणे दाखवते त्याप्रमाणे, मृत पुनरुत्थानापर्यंत पूर्णपणे अक्रियाक आहेत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा