वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ९/१५ पृ. १५-२०
  • देवाच्या संदेष्ट्याचा कित्ता घ्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाच्या संदेष्ट्याचा कित्ता घ्या
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • त्यांनी दुःख सहन केले
  • त्यांनी धीर दाखवला
  • “त्याप्रमाणे त्यांनी केले”
  • त्यांची सकारात्मक मनोवृत्ती होती
  • उत्तेजनाचे उगम
  • आवेश व थांबून राहण्याची मनोवृत्ती
  • आज धीर दाखवणे
  • देवाचे वचन धैर्याने घोषित करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • यहोवाच्या सहनशीलतेचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • यहोवाच्या नावाची जाहीर घोषणा करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • संदेष्ट्यांचे अनुकरण करा—आमोस
    आमची राज्य सेवा—२०१३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ९/१५ पृ. १५-२०

देवाच्या संदेष्ट्याचा कित्ता घ्या

“बंधूनो, जे संदेष्टे प्रभूच्या [यहोवा, NW] नावाने बोलले त्यांचे दुःख सहन व त्यांचा धीर ह्‍याविषयीचा कित्ता घ्या.”—याकोब ५:१०.

१. छळ केला जात असताना देखील यहोवाच्या सेवकांना आनंदी राहण्यास काय मदत करते?

या शेवटल्या दिवसात जगभरात नैराश्‍य वाढत असले तरी, यहोवाचे सेवक आनंदास परावर्तित करीत आहेत. याचे कारण ते देवाला संतुष्ट करत आहेत हे त्यांना माहीत आहे. यहोवाचे साक्षीदार त्यांच्या जाहीरपणे केल्या जाणाऱ्‍या सेवेत होणारा छळ व विरोध देखील सहन करतात, कारण त्यांना धार्मिकतेसाठी त्रास होत असल्याची जाणीव आहे. येशू ख्रिस्ताने त्याच्या अनुयायांना सांगितले: “नीतिमत्त्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करितील आणि तुमच्याविरूद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.” (मत्तय ५:१०-१२) खरोखर, देवाचे सेवक विश्‍वासाच्या परीक्षांचा सामना करतात, तेव्हा तेव्हा ते त्यांना आनंद समजतात.—याकोब १:२, ३.

२. याकोब ५:१० नुसार, धीर धरण्यासाठी आम्हाला काय मदत करु शकते?

२ शिष्य याकोबाने लिहिले: “बंधूनो, जे संदेष्टे प्रभूच्या [यहोवा, NW] नावाने बोलले त्यांचे दुःख सहन व त्यांचा धीर ह्‍याविषयीचा कित्ता घ्या.” (याकोब ५:१०) डब्ल्यू. एफ. ऑर्नट्‌ व एफ. डब्ल्यू. गिंगरिच यांनी “कित्ता” (हाय·पोʹडिग·मा) यासाठी भाषांतरीत केलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ “उदाहरण, आदर्श, कित्ता, चांगल्या अर्थाने आम्हाला प्रेरणा देणारे किंवा अनुकरण करण्यासाठी प्रवृत्त करणारी एखादी गोष्ट” अशाप्रकारे स्पष्ट केला. योहान १३:१५ मध्ये दाखविल्याप्रमाणे, “हे, उदाहरणापेक्षा अधिक आहे. तो निश्‍चित एक मूळ नमूना आहे.” (थिओलॉजिकल डिक्शनरी ऑफ द न्यू टेस्टामेंट) अशाप्रकारे आधुनिक दिवसातील यहोवाचे सेवक, ‘दुःख सहन करण्यासाठी’ व ‘धीर दाखविण्यासाठी’ विश्‍वासू संदेष्ट्यांना कित्ता समजू शकतात. त्यांच्या जीवनाचा आम्ही अभ्यास करु, तेव्हा आणखी कशाकडे स्पष्ट पाहू शकतो? व याची आमच्या प्रचारकार्याला कशी मदत होऊ शकते?

त्यांनी दुःख सहन केले

३, ४. आमोस संदेष्ट्याने अमस्याकडील विरोधाला कशी प्रतिक्रिया दाखवली?

३ यहोवाच्या संदेष्ट्यांना अनेकदा दुःख अथवा वाईट वागणूक सहन करावी लागली. उदाहरणार्थ, सा. यु. पूर्व नवव्या शतकात वासराची उपासना करणाऱ्‍या अमस्या याजकाने आमोस संदेष्ट्याला दुष्ट रीतीने विरोध केला. अमस्याने हा खोटा दावा केला की, आमोसने, दुसरा यराबाम हा तरवारीने मरेल व इस्राएलास बंदिवान करुन नेतील अशी भविष्यवाणी करण्याद्वारे राजाविरुद्ध फितुरी केली. अमस्याने तिरस्काराने आमोसला सांगितले: “अरे द्रष्ट्या, जा, यहूदा देशात पळून जा; तेथे संदेश सांगून पोट भर; पण बेथेलात यापुढे संदेश सांगू नको; कारण हे राजाचे पवित्र स्थान आहे, ही राजधानी आहे.” या घोर शाब्दिक हल्ल्याने धैर्य न गमावता आमोसने उत्तर दिले: “मी संदेष्टा नाही किंवा संदेष्ट्याचा पुत्र नाही; तर मी गुराखी, उंबराच्या झाडाची निगा करणारा आहे. मी कळपामागे असता परमेश्‍वराने [यहोवा, NW] मला निवडिले; परमेश्‍वर [यहोवा, NW] मला म्हणाला, जा, माझे लोक इस्राएल यांस संदेश सांग.”—आमोस ७:१०-१५.

४ यहोवाच्या आत्म्याने धैर्याने भविष्यवाणी करण्यासाठी आमोसला शक्‍ती दिली. आमोसने असे म्हटले तेव्हा अमस्या काय प्रतिक्रिया दाखवतो याची कल्पना करा: “परमेश्‍वराचे [यहोवा, NW] वचन ऐक; ‘तू म्हणतोस: “इस्राएलाविरुद्ध संदेश सांगू नको, इसहाकाच्या घराण्याविरूद्ध शब्द काढू नको.” यास्तव यहोवाने हे म्हटले आहे: “तुझी बायको नगरात वेश्‍या होईल, तुझे पुत्र व तुझ्या कन्या तरवारीने पडतील. तुझी जमीन सूत्र लावून वाटून टाकितील, तू स्वतः अमंगळ देशात मरशील आणि इस्राएलास त्याच्या देशातून खात्रीने बंदिवान करुन नेतील.”’” त्या भविष्यवाणीची पूर्णता झाली. (आमोस ७:१६, १७) धर्मत्यागी अमस्याला याचा किती धक्का बसला असावा!

५. यहोवाच्या आधुनिक दिवसातील सेवक व आमोस संदेष्टा यामध्ये कोणती समांतर परिस्थिती दिसू शकते?

५ यहोवाच्या लोकांची आज अशीच परिस्थिती आहे. देवाचा संदेश घोषित करीत असताना आपल्याला दुःख सहन करावे लागते व अनेक लोक आमच्या प्रचारकार्याविषयी तिरस्करणीय भावनेने बोलतात. प्रचार करण्यासाठी आम्हाला वेदान्ताच्या उच्च विद्यालयाकडून अधिकार मिळाला नाही, हे खरे आहे. उलटपक्षी, यहोवाचा पवित्र आत्मा राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यास आम्हाला प्रेरणा देतो. यास्तव, आम्ही देवाचा संदेश फेरफार किंवा त्याचे महत्त्व कमी करुन सांगत नाही. त्याऐवजी आमोसप्रमाणे, ऐकणाऱ्‍यांची कोणतीही प्रतिक्रिया असली तरीही आम्ही तो आज्ञांकितपणे घोषित करतो.—२ करिंथकर २:१५-१७.

त्यांनी धीर दाखवला

६, ७. (अ) यशयाची भविष्यवाणी करण्याची गुणलक्षणे कोणती आहेत? (ब) आधुनिक दिवसातील यहोवाचे सेवक यशयाप्रमाणे कसे कार्य करतात?

६ देवाच्या संदेष्ट्यांनी धीर दाखवला. उदाहरणार्थ, सा. यु. पूर्व आठव्या शतकात सेवा करत असलेला यहोवाचा संदेष्टा यशया याने धीर दाखवला. देवाने त्याला म्हटले: “जा, या लोकांस सांग की ऐकत राहा पण समजू नका, पाहत राहा, पण जाणू नका. ह्‍या लोकांनी डोळ्यांनी पाहून, कानांनी ऐकून व मनाने समजून मजकडे वळून सुधारु नये म्हणून त्यांचे हृदय जड कर, त्यांचे कान बधिर कर व त्यांचे डोळे चिपडे कर.” (यशया ६:९, १०) लोकांनी खरोखरच, अशाप्रकारे प्रतिक्रिया दाखवली. परंतु या गोष्टीने यशयाला बोलण्याचे थांबवले का? नाही. उलट, त्याने यहोवाच्या इशारेवजा संदेशांना धीराने व आवेशाने घोषित केले. आता उद्धृत केलेल्या देवाच्या वचनाची इब्री रचना, संदेष्ट्याच्या घोषणेची “दीर्घ सहनशीलता” या विचाराला पुष्टी देते व तो संदेश लोकांनी “पुनः पुन्हा” ऐकला.—जेझेनिस’ इब्री व्याकरण.

७ यशयाने सांगितलेल्या यहोवाच्या वचनांना लोकांनी तेव्हा जशी प्रतिक्रिया दाखवली तशीच आज देखील दाखवतात. तथापि, त्या विश्‍वासू संदेष्ट्याप्रमाणे, आम्ही देखील “पुनःपुन्हा” राज्याचा संदेश घोषित करतो. ही यहोवाची इच्छा असल्यामुळे आम्ही हे कार्य आवेशाने व धीराच्या चिकाटीने करतो.

“त्याप्रमाणे त्यांनी केले”

८, ९. यहोवाचा संदेष्टा, मोशे कोणत्या बाबतीत एक उत्तम उदाहरण होता?

८ धीर व आज्ञाधारकपणा याबाबतीत मोशे संदेष्टा उदाहरणशील होता. त्याने गुलाम असलेल्या इस्राएल लोकांसोबत आपली भूमिका घेण्याचे निवडले, पण दास्यत्वातून त्यांची सुटका होईपर्यंत त्याला धीराने थांबून राहावे लागले. इस्राएल लोकांना बाहेर काढून त्यांचे नेतृत्त्व करण्यास देवाने त्याचा वापर करीपर्यंत ४० वर्षे तो मिद्यानात राहिला. मोशे व त्याचा भाऊ अहरोन इजिप्तच्या शासकासमोर असताना, देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी सांगितले व केले. वस्तुतः, “त्याप्रमाणे त्यांनी केले.”—निर्गम ७:१-६; इब्रीयांस ११:२४-२९.

९ मोशेने अरण्यवासात इस्राएलांच्या ४० खडतर वर्षांना धीराने सहन केले. त्याने इस्राएलाच्या निवासमंडपाची बांधणी करताना व यहोवाच्या उपासनेत लागणाऱ्‍या इतर वस्तू बनविण्याद्वारे ईश्‍वरी मार्गदर्शनाचे अनुसरण देखील आज्ञांकितपणे केले. संदेष्ट्याने देवाच्या मार्गदर्शनाचे अगदी जवळून अनुसरण केल्यामुळे त्याबद्दल आम्ही असे वाचतो: “मोशेने तसे केले म्हणजे परमेश्‍वराने [यहोवा, NW] आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने तसे केले.” (निर्गम ४०:१६) यहोवाच्या संघटनेसोबत सहवास ठेवून आमची सेवा करताना, आपण मोशेची आज्ञाधारकता लक्षात ठेवूया व ‘आम्हामध्ये जे पुढाकार घेतात त्यांच्या आज्ञेत राहा’ या प्रेषित पौलाच्या सल्ल्याचा अवलंब करुया.—इब्रीयांस १३:१७, NW.

त्यांची सकारात्मक मनोवृत्ती होती

१०, ११. (अ) होशेय संदेष्ट्याची सकारात्मक मनोवृत्ती असल्याचे कशावरुन सूचित होते? (ब) आमच्या क्षेत्रातील लोकांना भेटतो तेव्हा आम्ही सकारात्मक मनोवृत्ती कशी ठेवू शकतो?

१० न्यायदंडाच्या संदेशांना सांगताना तसेच इस्राएलात विखुरलेल्या विश्‍वासू जणांकरता असलेल्या देवाच्या प्रेमळ काळजीला प्रदर्शित करत असलेल्या भविष्यवाण्या करताना, संदेष्ट्यांनी सकारात्मक मनोवृत्ती ठेवण्याची आवश्‍यकता होती. हे होशेय याच्याबाबतीत खरे होते, जो ५९ वर्षांपासून देवाचा संदेष्टा होता. त्याने सकारात्मक रितीने यहोवाच्या संदेशांना घोषित करण्याचे कायम ठेवले व त्याच्या भविष्यसूचक पुस्तकाचा समारोप या शब्दांनी केला: “जो कोणी शहाणा आहे त्याला हे समजेल, जो कोणी समंजस आहे त्याला हे कळेल; परमेश्‍वराचे [यहोवा, NW] मार्ग सरळ आहेत; त्यांनी धार्मिक चालतील आणि पातकी त्यांत अडखळून पडतील.” (होशेय १४:९) साक्ष देण्यासाठी आम्हाला यहोवा जोवर परवानगी देतो, तोवर सकारात्मक मनोवृत्ती ठेवूया व देवाच्या अपात्री कृपेचा सुज्ञपणे स्वीकार करणाऱ्‍यांचा शोध घेत राहूया.

११ ‘योग्य असणाऱ्‍यांना शोधून काढण्यासाठी,’ आम्ही पिच्छा पुरवला पाहिजे व सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. (मत्तय १०:११) उदाहरणार्थ, आम्ही आमच्या किल्ल्या हरवल्या असल्यास, परत माघारी जाऊन जेथे जेथे गेलो होतो अशा विविध ठिकाणी त्या शोधू. बऱ्‍याच वेळा असे केल्यावर आम्हाला त्या कदाचित सापडतील. अशाच रीतीने मेंढरासमान लोकांना शोधण्यात चिकाटी ठेवा. वारंवार कार्य केलेल्या क्षेत्रात त्यांनी सुवार्तेला चांगला प्रतिसाद दिल्यामुळे आम्हाला किती आनंद होतो! तसेच, आमच्या जाहीर सेवेवर आधी बंदी आणून मर्यादित केलेल्या देशांमधील आमच्या कार्यावर देव आशीर्वाद देत असल्यामुळे आम्हाला किती आनंद होतो!—गलतीकर ६:१०.

उत्तेजनाचे उगम

१२. योएलच्या कोणत्या भविष्यवाणीची पूर्णता २० व्या शतकात होत आहे व कशाप्रकारे?

१२ आमच्या सेवेत यहोवाच्या संदेष्ट्यांचे शब्द आम्हासाठी उत्तेजनाचे असू शकतात. उदाहरणार्थ, योएलच्या भविष्यवाणीचा विचार करा. त्यामध्ये सा. यु. पूर्व नवव्या शतकातील धर्मत्यागी इस्राएल व इतरांसाठी न्यायदंडाच्या संदेशांचा समावेश होता. तरीही, योएलला भविष्यवाणी करण्यासाठी प्रेरणा देखील दिली होती: “यानंतर असे होईल की मी [यहोवा] मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांस स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांस दृष्टांत होतील. तुमचे दास व दासी यावरहि त्या समयी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन.” (योएल २:२८, २९) ही गोष्ट येशूच्या अनुयायांच्या बाबतीत पेन्टेकॉस्ट सा. यु. ३३ पासून खरी ठरली आहे. या २० व्या शतकात या भविष्यवाणीची किती मोठी पूर्णता आम्हाला पाहण्यास मिळते! आज “भविष्यवाणी” करणारे, किंवा यहोवाच्या संदेशांची घोषणा करणारे लक्षावधी आहेत—त्यांच्यामधील ६,००,००० पेक्षा अधिक पूर्ण वेळेच्या पायनियर सेवेमधील आहेत.

१३, १४. तरुण ख्रिश्‍चनांना क्षेत्र सेवेत आनंद मिळविण्यासाठी काय मदत करु शकते?

१३ अनेक राज्य उद्‌घोषक तरुण जण आहेत. पवित्र शास्त्राविषयी वयस्कर लोकांबरोबर बोलणे त्यांच्यासाठी नेहमीच सोपे नाही. कधीकधी यहोवाच्या तरुण सेवकांना सांगितले जाते: ‘प्रचारकार्यात तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात’, आणि ‘तुम्ही दुसरे काही केले पाहिजे.’ यहोवाच्या तरुण साक्षीदारांनी, तो व्यक्‍ती अशा रीतीने विचार करत असल्याबद्दल त्यांना खेद वाटतो, असे चातुर्याने उत्तर दिले पाहिजे. सुवार्तेच्या एका तरुण प्रचारकाला असे म्हणणे मदतदायक वाटते: “तुमच्यासारख्या वयस्कर लोकांसोबत बोलल्यामुळे मला खरेच लाभ मिळतो, व आनंद वाटतो.” अर्थातच, सुवार्तेचा प्रचार करणे म्हणजे वेळ वाया घालवणे नव्हे. जीवन धोक्यात आहेत. देवाने योएलद्वारे पुढे असे म्हटले: “जो कोणी परमेश्‍वराचा [यहोवा, NW] धावा करील तो तरेल.”—योएल २:३२.

१४ राज्य प्रचारकार्यात पालकांना साथ देत असलेली मुले वैयक्‍तिक ध्येये ठेवण्यासाठी पालकांच्या मदतीचा स्वीकार करतात. हे किशोरवयीन तरुण आस्थेवाईक लोकांना शास्त्रवचनाचे वाचन करुन, पवित्र शास्त्रावर आधारित असलेल्या आशेचे विश्‍लेषण देऊन व योग्य साहित्य प्रस्तुत करुन हळूहळू प्रगती करतात. स्वतःची प्रगती व यहोवाचा आशीर्वाद पाहताना, सुवार्तेचा प्रचार करण्यात तरुण राज्य प्रचारकांना अधिक आनंद होतो.—स्तोत्र ११०:३; १४८:१२, १३.

आवेश व थांबून राहण्याची मनोवृत्ती

१५. यहेज्केलचे उदाहरण राज्य प्रचारकार्यासाठी असलेल्या आमच्या आवेशाला कसे प्रज्वलित करु शकते?

१५ देवाचे संदेष्टे, आज आम्हाला आमच्या सेवेत लागणारा आवेश आणि थांबून राहण्याची मनोवृत्ती—लक्षणे दाखविण्यात देखील उदाहरणशील होते. देवाच्या वचनातून आम्ही प्रथम सत्य शिकलो तेव्हा, आम्हाला धैर्याने बोलण्यासाठी आवेशाने उत्तजेजित केले होते. पण त्यानंतर, आता वर्षे उलटून गेली असतील व आम्ही आमचे साक्षकार्याचे क्षेत्र अनेकदा उरकले असेल. काही लोक आता राज्य संदेशाचा स्वीकार करत असतील. याने आमच्या आवेशाला कमी केले का? असे असल्यास, यहेज्केल संदेष्ट्याचा विचार करा. त्याच्या नावाचा अर्थ “देव सामर्थ्यवान करतो” असा आहे. प्राचीन इस्राएलात यहेज्केलाने कठीण अंतःकरणाच्या लोकांचा सामना केला असला तरी, देवाने त्याला सामर्थ्यवान केले व लाक्षणिकरित्या त्याचे कपाळ गारगोटीपेक्षाही कठीण बनविले. यामुळे, लोक ऐको अथवा न ऐकोत पुष्कळ वर्षे यहेज्केल त्याची सेवा करु शकला. आम्ही देखील तसेच करु शकतो हेच त्याचे उदाहरण दाखवते. तसेच प्रचारकार्यासाठी आमच्या आवेशाला पुन्हा जागृत करण्यास आम्हाला मदत करते.—यहेज्केल ३:८, ९; २ तीमथ्य ४:५.

१६. मीखाच्या कोणत्या मनोवृत्तीला आम्ही विकसित केले पाहिजे?

१६ धीराच्या बाबतीत मीखा विचार करण्याजोगा होता. त्याने सा. यु. पूर्व आठव्या शतकात भविष्यवाणी केली. त्याने लिहिले, “मी तर परमेश्‍वराची [यहोवा, NW] मार्गप्रतीक्षा करीन; मी आपल्या तारण करणाऱ्‍या देवाची वाट पाहत राहीन; माझा देव माझे ऐकेल.” (मीखा ७:७) मीखाचा भरवसा त्याच्या दृढ विश्‍वासात मुळावलेला होता. यहोवाने जी भविष्यवाणी केली आहे ती तो नक्कीच पूर्ण करील हे यशया संदेष्ट्याप्रमाणे मीखाला माहीत होते. आम्हाला देखील हे माहीत आहे. (यशया ५५:११) यास्तव, देवाच्या अभिवचनांच्या पूर्णतेविषयी थांबून राहण्याची मनोवृत्ती आपण विकसित करुया. त्याचप्रमाणे आपण राज्य संदेशाबद्दल लोकांनी कमी आस्था दाखविलेल्या क्षेत्रातही सुवार्तेचा प्रचार आवेशाने करुया.—तीतास २:१४; याकोब ५:७-१०.

आज धीर दाखवणे

१७, १८. धीर दाखविण्यासाठी कोणती प्राचीन व आधुनिक उदाहरणे आम्हाला मदत करु शकतात?

१७ यहोवाचे काही संदेष्टे त्यांची नेमणूक धीराने व चिकाटीने वर्षांनुवर्षे करीत राहिले, परंतु त्यांच्या भविष्यवाण्यांची पूर्णता त्यांना पाहण्यास मिळाली नाही. तरीही, वाईट वागणूक सहन करीत असताना त्यांची धीराने राखलेली चिकाटी, आमची सेवा पूर्ण करण्याची जाणीव ठेवण्यास आम्हाला मदत करु शकते. या २० व्या शतकाच्या आरंभीच्या दशकातील विश्‍वासू अभिषिक्‍त जणांच्या उदाहरणांपासून देखील आम्हाला लाभ मिळू शकतो. त्यांनी अपेक्षिल्याप्रमाणे त्यांच्या स्वर्गीय आशेची लगेच पूर्तता झाली नसली, तरी देवाने प्रकट केलेल्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी, वाटत असलेल्या उशीरामुळे आवेशाला थंड होऊ देण्यास त्यांनी अनुमती दिली नाही.

१८ अनेक वर्षे, या ख्रिश्‍चनांनी द वॉचटावर व त्याच्या जोडीचे नियतकालिक, अवेक! (सुरवातीला त्याचे नाव द गोल्डन एज व नंतर कॉन्सोलेशन) याचे नियमितपणे वाटप केले. त्यांनी ही बहुमोलाची नियतकालिके लोकांना रस्त्यावर व आज आपण ज्याला नियतकालिक मार्ग म्हणतो त्याप्रकारे त्यांच्या घरी जाऊन देण्यात आवेश दाखविला. रस्त्यावरुन जाणारे लोक साक्ष देत असलेल्या एका वयस्कर बहिणीला नेहमी पाहत असत. तिचे पार्थिव जीवन संपल्यामुळे ती नसल्याची जाणीव लगेचच त्यांना झाली. तिची जाहीर सेवा निरीक्षलेल्या लोकांनी दिलेल्या गुणग्राहकतेच्या शेऱ्‍यांना पाहिल्यावर अनेक वर्षांच्या विश्‍वासू सेवेत तिने उल्लेखनीय साक्ष दिली! राज्य उद्‌घोषक या नात्याने, तुमच्या सेवेत भेटणाऱ्‍या सर्वांना तुम्ही द वॉचटावर व अवेक! नियमितपणे सादर करता का?

१९. इब्रीयांस ६:१०-१२ कोणते उत्तेजन आम्हाला पुरवते?

१९ यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळात सदस्य या नात्याने सेवा करत असलेल्या धीर धरणाऱ्‍या व विश्‍वासू बांधवांच्या सेवेचा देखील जरा विचार करा. त्यांच्यातील अनेक जण त्यांच्या जीवनातील नवव्या अथवा दहाव्या दशकात आहेत. परंतु नेमलेल्या त्यांच्या कार्याला आवेशाने पूर्ण करणारे ते अजूनही राज्य उद्‌घोषक आहेत. (इब्रीयांस १३:७) तसेच स्वर्गीय आशा असलेल्या इतर वयस्करांबद्दल आणि “दुसरी मेंढरे” यांच्यातील उतारवय होत असलेल्यांबद्दल काय? (योहान १०:१६) त्यांच्या कार्याला व त्याच्या नावाला दाखवत असलेले प्रेम विसरण्यास देव अन्यायी नाही याची त्यांना खात्री आहे. तरुण सहउपासकांसोबत, यहोवाच्या वयस्कर साक्षीदारांनी देवाच्या सेवेत विश्‍वास प्रदर्शित करुन व धीर दाखवून त्यांना शक्य होईल त्याप्रमाणे करण्याचा पिच्छा पुरवला पाहिजे. (इब्रीयांस ६:१०-१२) मग, प्राचीन संदेष्ट्यांप्रमाणे त्यांचा पुनरूत्थानाद्वारे किंवा येणाऱ्‍या ‘मोठ्या संकटातून’ बचाव होण्याद्वारे त्यांना सार्वकालिक जीवनाचे समृद्ध बक्षीस मिळेल.—मत्तय २४:२१.

२०. (अ) संदेष्ट्यांच्या ‘कित्त्यापासून’ तुम्ही काय शिकला? (ब) आम्हाला संदेष्ट्यांसमान धीर कशी मदत करु शकतो?

२० देवाच्या संदेष्ट्यांनी आम्हासाठी किती उत्तम कित्ता ठेवला आहे! त्यांनी दुःख सहन केले, धीर दाखवला व इतर ईश्‍वरी गुणांचे प्रदर्शन केले, कारण यहोवाच्या नावाविषयी बोलण्यास सुसंधी त्यांना मिळाली. त्याचे आधुनिक दिवसातील साक्षीदार या नात्याने, आपण त्यांच्यासारखे होऊया व हबक्कूकप्रमाणे दृढनिश्‍चयी होऊ, ज्याने म्हटले: “मी आपल्या पहाऱ्‍यावर उभा राहीन, किल्ल्यावर पहारा करीन; तो [देव] मजबरोबर काय बोलेल आणि माझ्या गाऱ्‍हाण्याविषयी त्यास मला काय उत्तर देता येईल ते मी पाहीन.” (हबक्कूक २:१) आमचा महान निर्माणकर्ता, यहोवा याच्या सुविख्यात नावाची धीराने व आनंदाने जाहीर घोषणा करताना, अशाच प्रकारचा निश्‍चय आपण करुया!—नहेम्या ८:१०; रोमकर १०:१०.

तुम्हाला हे मुद्दे समजले का?

▫ आमोस संदेष्ट्याने कोणते साहसी उदाहरण मांडले?

▫ संदेष्टा, मोशे कोणत्या बाबतीत एक उत्तम उदाहरण होता?

▫ आधुनिक दिवसातील यहोवाचे साक्षीदार आमोस व यशयाप्रमाणे कसे कार्य करु शकतात?

▫ ख्रिस्ती सेवक, होशेय व योएल यांच्या वर्तनावरून काय शिकू शकतात?

▫ आम्हाला यहेज्केल व मीखा यांच्या उदाहरणांपासून कसा लाभ मिळू शकतो?

[१६ पानांवरील चित्रं]

अमस्याचा जहाल विरोध असताना देखील, धैयाने भविष्य वर्तवण्यासाठी यहोवाच्या आत्म्याने आमोसला शक्‍ती दिली

[१८ पानांवरील चित्रं]

यहोवाच्या सेवेत धीर दाखविण्याद्वारे विश्‍वासू अभिषिक्‍तांनी उत्तम उदाहरण मांडले

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा