यहोवाच्या नावाची जाहीर घोषणा करा
“देवाच्या नावाची जाहीर घोषणा करणारे ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याला नित्य अर्पण करावा.”—इब्रीयांस १३:१५, NW.
१. होशेय संदेष्ट्याने सह-इस्राएलांना काय करण्याचे आर्जवले?
यहोवाचा संदेष्टा होशेय याजकडे सह-इस्राएलांकरिता महत्त्वपूर्ण संदेश होता. त्याने आमच्या सामान्य युगाच्या आठव्या शतकापूर्वी, समकालीन हेकेखोर लोकांना पश्चात्ताप करण्याचे आवर्जून सांगितले. त्याने आर्जवले: “तुम्ही आपल्याबरोबर वचने घेऊन यहोवाकडे फिरा; त्याला म्हणा, तू सर्व अन्याय दूर कर आणि जे चांगले आहे त्याचा स्वीकार कर; म्हणजे आम्ही आपले ओठ वासरे असे अर्पू.” (होशेय १४:२, पं. र. भाषांतर.) लोकांनी यहोवाला त्यांचे ओठ वासरे असे अर्पण करावयाचे म्हणून होशेय याची भविष्यवाणी इस्राएलांना पश्चात्ताप करण्याची व देवाला स्तुतियोग्य बलिदान अर्पण करण्याचे उत्तेजन देत होती.
२. प्रेषित पौलाने ख्रिश्चनांना कोणत्या प्रकारचे बलिदान अर्पण करण्याचे उत्तेजन दिले?
२ यहोवाचे साक्षीदार आज ‘आपले ओठ वासरे असे अर्पण’ करतात. ते प्रेषित पौलाने सांगितलेला बोध देखील ऐकतात. त्याने लिहिताना होशेय याच्या भविष्यवाणीतील शब्दांना ध्वनित केले: “त्याच्या नावाची जाहीर घोषणा करणारे ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे [येशू ख्रिस्त] देवाला नित्य अर्पण करावा.” (इब्रीयांस १३:१५, NW) अशाप्रकारे, देवाचे सेवक त्यांच्या राज्य प्रचारकार्यात आनंदाने यहोवाची स्तुती करतात.—मत्तय २४:१४.
३. आम्ही यहोवाला “स्तुतीचा यज्ञ” कसा अर्पण करु शकतो, व आता आपण कोणाच्या कार्यांचे परीक्षण करणार आहोत?
३ अपरिपूर्ण मानवांना यहोवाच्या नावाची जाहीर घोषणा करण्याचा अपात्री विशेषाधिकार आहे. आमच्या देवाबद्दल इतरांना सांगण्यासाठी आम्ही किती आनंदी आहोत, याप्रकारे आपण यहोवाला “स्तुतीचा यज्ञ,” “आपले ओठ वासरे असे” अर्पण करत असतो. आज राज्याच्या सुवार्तेच्या जाहीर प्रचारात आमच्या उत्तेजनासाठी, देवाचे संदेष्टे व यहोवाच्या इतर सेवकांविषयी पवित्र शास्त्र काय म्हणते त्याचे परीक्षण आपण करु या. त्यांच्या जीवनकार्यापासून प्रचारकार्याचा आनंद घेण्यास आम्हाला अधिक मदत मिळेल.—रोमकर १५:४.
संदेष्ट्यांची भूमिका
४, ५. (अ) पवित्र शास्त्राच्या मूळ भाषेत, “संदेष्टा” यासाठी भाषांतरीत केलेल्या शब्दांचा मूलभूत अर्थ काय आहे? (ब) देवाच्या व्यवस्थेत संदेष्ट्यांची जोरदार भूमिका होती हे कशावरुन दिसते?
४ यहोवाच्या संदेष्ट्यांना त्याचा संदेश जाहीरपणे घोषित करण्याची सुसंधी होती. “संदेष्टा” (ने·वीʼʹ) या इब्री संज्ञेचे अनिश्चित व्युत्पत्तिशास्त्र आहे. परंतु पवित्र शास्त्रातील त्याचा वापर, खरे संदेष्टे यहोवाचे प्रवक्ते, ईश्वरप्रेरित संदेश असलेली देवाची मनुष्ये असल्याचे सुचवितो. “संदेष्टा” (प्रॉ·फेʹटस्) यासाठी भाषांतरीत केलेल्या ग्रीक शब्दाचा अक्षरशः अर्थ, “मोठ्याने बोलणे,” “सर्वांसमक्ष” किंवा एखाद्याच्या “समोर” काही बोलणे असा होतो. ईश्वरी उगमाकडून आलेल्या संदेशांची घोषणा करणारा व्यक्ती संदेष्टा आहे. देवाच्या खऱ्या संदेष्ट्यांनी, नेहमीच नव्हे पण अनेकदा भविष्यातील घटनांविषयी भाकीत केले.
५ देवाच्या व्यवस्थेतील संदेष्ट्यांच्या चित्तवेधी भूमिकेबद्दल मॅक्लिनटॉक व स्ट्राँग यांचा सायक्लोपिडीया म्हणतो: “काही वेळा त्यांचा सल्ला विचारला जात असे . . . परंतु बऱ्याच वेळा लोकांनी त्यांचा सल्ला विचारला नसताना देखील तो सांगण्यासाठी त्यांच्या आंतरिक भावनेने ते प्रवृत्त झाले. त्यांना पाहिल्यावर कदाचित संताप व भय निर्माण होईल अशा ठिकाणी धैर्याने व करारीपणे बोलण्यासाठी ते घाबरले नाहीत.” (खंड ८, पृष्ठ ६४०) संदेष्ट्यांना धैर्याची भूमिका घेण्यासाठी ज्याने प्रेरणा दिली, अशा काही उदाहरणांचा विचार करा.
भावना व प्रवृत्त करणारी गोष्ट
६, ७. यहोवाजवळ त्याचा संदेष्टा यहेज्केल याने सेवन करावे म्हणून काय होते व त्याचा काय परिणाम झाला?
६ यरूशलेमाच्या नाशाच्या सा. यु. पूर्व ६०७ आधी, यहोवा त्याच्या यहेज्केल संदेष्ट्यांद्वारे बाबेलातील यहुदी बंदिवानांशी बोलला. यहोवाने त्याला सांगितले: “मानवपुत्रा, तुझ्यापुढे जे आले आहे ते सेवन कर; हा पट सेवन कर व जाऊन इस्राएल घराण्याबरोबर बोल.” यहेज्केलने आज्ञापालन केले. त्याने म्हटले: “तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला तो पट सेवन करावयास लाविले. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, जो पट मी तुला देतो तो पोटात जाऊ दे, त्याने आपली आंतडी भर. मी तो सेवन केला तो तो माझ्या तोंडात मधासारखा मधुर लागला.”—यहेज्केल ३:१-३.
७ आम्ही सेवन करत असलेल्या अन्नापासून आमच्या शरीराला पौष्टिकता मिळते व ही पौष्टिकता जणू आमच्या शरीराचा भाग बनते. अशाचप्रकारे, यहेज्केलने सेवन केलेला “पट”—संदेष्ट्याला घोषणा करावा लागणारा यहोवाचा संदेश—भावनांवर परिणाम करुन त्याचा भाग व्हावयाचे होते. देवाच्या वचनाने यहेज्केलच्या आंतरिक भावनांना इतके चेतवले की, ज्यामुळे त्यांची जाहीरपणे घोषणा करणे त्याच्यासाठी आनंदाचे होते. तुम्ही यहोवाचे एक साक्षीदार असल्यास, देवाच्या संदेशाची जाहीर घोषणा करण्यात आनंद घेता का?
८, ९. आमोसला भविष्यवाणी करण्यासाठी कशाने प्रवृत्त केले?
८ आमोस या संदेष्ट्याचा देखील विचार करा. सा. यु. पूर्व नवव्या शतकात राहत असताना, स्वतःचे नाव असलेले पुस्तक लिहिणाऱ्या इब्री संदेष्ट्यांमध्ये तो प्रथम होता. तो यहेज्केलप्रमाणे, यहोवाच्या वचनाची परखड घोषणा करणारा होता. त्याचे नाव असलेल्या पुस्तकात “असे परमेश्वर [यहोवा, NW] म्हणतो” हा वाक्यांश ११ वेळा आहे! (आमोस १:३, ६, ९, ११, १३; २:१, ४, ६; ३:१२; ५:४; ७:१७) आमोसला देवाच्या वचनांची जाहीर घोषणा करण्याची गरज भासली.
९ आमोसने देवाचा संदेष्टा या नात्याने, त्वरित कार्य करण्याद्वारे ईश्वरी घोषणांना प्रतिसाद दिला. आमोसद्वारे देवाने म्हटले: “सिंहाने गर्जना केली आहे; त्याला भिणार नाही असा कोण? प्रभू परमेश्वर [यहोवा, NW] बोलला आहे; संदेश दिल्यावाचून कोणाच्याने राहवेल?” (आमोस ३:८) देवाचा संदेश घोषित करण्यासाठी संदेष्टा विरोध न करता प्रवृत्त झाला.
१०. आधुनिक दिवसातील यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रचाराकार्यावर विरोध आल्यावर ते कशी प्रतिक्रिया दाखवतात?
१० यहोवा, सद्य दुष्ट जागतिक व्यवस्थीकरणावर न्यायदंडाच्या संदेशांची सिंहाप्रमाणे गर्जना करतो. आमोसप्रमाणे, यहोवाच्या आधुनिक दिवसातील सेवकांना देवाच्या वचनांची जाहीर घोषणा करण्यास भाग पडल्याचे वाटते. ते विरोधकांनी धमकी दिल्यावर देखील प्रेषित पेत्र व योहान यांच्या उदाहरणाचे अनुकरण करतात. त्यांनी जोरदारपणे घोषित केले: “जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हाला शक्य नाही.” प्रेषितांनी हे देखील खात्रीपूर्वक प्रतिपादले: “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.” (प्रेषितांची कृत्ये ४:२०; ५:२९) मग आमच्याबद्दल काय? यहोवाच्या नावाची जाहीर घोषणा करण्याच्या आमच्या भावनेचे परीक्षण करणे चांगले आहे.
“अंतःकरणात जे भरले आहे”
११. यहोवाच्या नावाची जाहीर घोषणा करण्यासाठी कशाने आम्हाला चालना दिली पाहिजे?
११ यहोवाचे संदेष्टे त्यांच्या विशेषाधिकारांबद्दल कृतज्ञ होते यात काही संशय नाही. यहोवाबद्दल अशाचप्रकारच्या कृतज्ञतेने आम्हाला त्याच्या नावाची जाहीर घोषणा करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. स्तोत्र १४५:१, २ म्हणते: “हे राजा, माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन; आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचा धन्यवाद करीन. मी प्रतिदिवशी तुझा धन्यवाद करीन; आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचे स्तवन करीन.” हे शब्द तुमच्या प्रवृत्तीला प्रकट करतात का? पवित्र शास्त्राचा नियमित अभ्यास आम्हाला, यहोवाने जे केले आहे, करत आहे व अद्याप काही करील त्याबद्दल त्याची कृतज्ञता बाळगण्यास मदत करतो. शिवाय, कुटुंब मिळून पवित्र शास्त्राचा अभ्यास करतो तेव्हा, देवाबद्दल व त्याच्या उद्देशांबद्दल सांगण्यासाठी देवाच्या वचनात सामर्थ्य असल्याचे आमच्या प्रत्ययास येत नाही का? (इब्रीयांस ४:१२) यहोवाच्या नावाची जाहीर घोषणा करण्यात परिणामकारक असण्यासाठी, यहोवा देवाने “विश्वासू बुद्धिमान दास” याकरवी पुरवलेल्या ख्रिस्ती प्रकाशनांचा पूर्ण वापर करण्याची गरज आहे.—मत्तय २४:४५-४७.
१२. जाहीर घोषणा करण्यासाठी ख्रिस्ती सभा व मनन आम्हाला कशी मदत करु शकतात?
१२ आम्हाला कृतज्ञ अंतःकरणांनी यहोवाची स्तुती करावयाची असल्यास, ख्रिस्ती सभांना नियमित उपस्थित राहण्याची आवश्यकता आहे. यहोवाच्या सर्वच लोकांनी प्रेषित पौलाचा सल्ला ऐकला पाहिजे: “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.” (इब्रीयांस १०:२४, २५) तुम्ही ख्रिस्ती सभांना नियमित उपस्थित राहता का? देवाच्या लोकांच्या सभेत तुम्ही शास्त्रवचनीय सत्य, चांगले अनुभव, व ईश्वरशासित वाढीच्या उद्दीपित वार्ताबद्दल नेहमीच बोलता का? यहोवा व त्याच्या उद्देशांना तुम्ही नाराजीने व्यक्त करत असल्यास, त्याच्या विचारांना तुमच्या अंतःकरणात खोलवर जावे म्हणून त्याच्या वचनावर मनन करण्यासाठी वेळ द्या. (स्तोत्र ७७:१२; १४३:५) होय, ख्रिस्ती सभा व देवाच्या वचनांवरील नियमित मनन, यहोवाच्या नावाची जाहीर घोषणा करण्याच्या अद्भुत विशेषाधिकाराची गुणग्राहकता बाळगण्यास तुम्हाला मदत करील.
१३. आमच्या अंतःकरणातून आम्ही कशाप्रकारे ‘चांगले ते काढू’ शकतो?
१३ यहोवाबद्दल पूर्ण कृतज्ञतेने भरलेल्या अंतःकरणांतून आम्ही चांगल्या गोष्टी बाहेर काढतो. येशूने म्हटले “चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो; तसेच वाईट मनुष्य वाइटांतून वाईट काढतो; कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार.” (लूक ६:४५) यहोवाच्या नावाची जाहीर घोषणा करणे व आमच्या शेजाऱ्यांना व नातेवाईकांना—तसेच आम्ही भेटत असलेल्या सर्वांना त्याचे उद्देश सांगणे यापेक्षा ‘चांगले ते काढण्यासाठी’ अधिक उत्तम मार्ग असू शकेल काय?
जाहीर घोषणा करण्याचे परिणाम
१४. (अ) राज्याचा संदेश घोषित करणारे व ऐकणारे कशाचा अनुभव घेतात? (ब) राज्य प्रचारकार्याद्वारे कशाची पूर्णता होत आहे?
१४ देवाच्या संदेष्ट्यांना त्यांच्या सेवेत आनंद मिळाला. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा ग्रहणक्षम ऐकणाऱ्यांना लाभ झाला. राज्याच्या संदेशाची जाहीर घोषणा, तुलनात्मकरित्या त्याच्या उद्घोषकांना अत्याधिक आनंद देते. (प्रेषितांची कृत्ये २०:३५) त्याचा कृतज्ञतेने ऐकणाऱ्यांना किती लाभ होतो! लोकांनी सुवार्तेचा स्वीकार केल्याने निराशेवर विजय मिळवण्यास किंवा तिचा सामना करण्यास त्यांना मदत मिळते. ज्यांनी कोणाला मृत्यूत गमावले अशांना पुनरूत्थानाच्या पुढील आशेमुळे आनंद होतो. व्यसनी व्यक्ती निकोटीन, हेरॉईन, व इतर व्यसनी पदार्थांच्या दास्यत्वापासून मुक्त होतात. नैतिकतेत अनेकांची उन्नती होत आहे व पवित्र शास्त्रीय सत्याचा स्वीकार करणाऱ्या सर्वांना आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळते. (योहान ५:२८, २९; ८:३२) मानवजातीची एकमात्र आशा या नात्याने राज्याची घोषणा करण्याद्वारे दुष्टांना इशारा दिला जातो व त्याचवेळी प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांमध्ये हर्षाचा प्रतिसाद निर्माण करण्यात येतो. अशाप्रकारे, या दुष्ट जगावर ईश्वरी न्यायदंड बजावला जाईल तेव्हा लोकांना “सार्वकालिक शिक्षा” भोगण्यासाठी किंवा “सार्वकालिक जीवन” भोगण्यासाठी वेगळे केले जातात. (मत्तय २४:१४; २५:३१-४६; यहेज्केल ३३:१-९; १ तीमथ्य २:३, ४) आमचे प्रचाराचे काम अभूतपूर्व बचावाचे कार्य आहे. या पृथ्वीवर अधिक विस्तारित व मोठ्या प्रमाणावर घोषणा केले जात असणारे आहे!
१५. साक्ष देत असलेल्या आमच्या क्षेत्रातील संभवनीय लायक असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी काय केले जाऊ शकते?
१५ यहोवाचे आधुनिक दिवसातील साक्षीदार या नात्याने, आम्ही हर्षाने व आज्ञांकितपणे आमच्या स्वर्गीय पित्याची सेवा करतो. (रोमकर १२:११) यास्तव, आम्ही जाहीरपणे व घरोघरच्या सुवार्ता प्रचारकार्यात नियमितपणे भाग घेण्यासाठी वेळ बाजूला काढून ठेवण्यात आनंदी असतो. (प्रेषितांची कृत्ये ५:४२; २०:२०) जगभरातील अहवाल, आमच्या क्षेत्रात अजूनही काही लायक लोक असल्याचे दाखवतो. जगातील परिस्थिती बदलतात तसे लोकांवर विविध मार्गांनी प्रभाव पडत असतो. अनेक जण परदेशात अनपेक्षितपणे शरणार्थी व उपरे झाले आहेत. कदाचित असे काही लोक आमच्या साक्ष द्यावयाच्या क्षेत्रात असतील. असल्यास, आम्ही “सुवार्तेचे पवित्र कार्य” चालू ठेवू तसे त्यांना आध्यात्मिकरित्या मदत करण्यासाठी शक्य ते करु शकतो. (रोमकर १५:१६) अशा लोकांना राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्यासाठी काही ख्रिश्चन इतर भाषा शिकले आहेत.
१६. यहोवाच्या नावाची घोषणा करण्यात निरंतर राहण्यासाठी आम्हाला काय मदत करु शकते?
१६ देवाच्या अनेक संदेष्ट्यांना अधिक कठीण नेमणूकी होत्या. अनादर करणाऱ्या लोकांना ईश्वरी संदेश सांगणे त्यांच्याकरता सहजसोपे नव्हते. अशाचप्रकारे, यहोवाला समर्पित असलेल्या प्रत्येकाला, खासपणे प्रतिसाद न देणाऱ्या मोठ्या क्षेत्रात त्याच्या नावाची जाहीर घोषणा करणे सोपे वाटत नाही. तथापि, देवाच्या वचनाच्या प्रार्थनापूर्वक अभ्यासाने व यहोवा पुरवत असलेल्या सामर्थ्याने मिळालेला आत्मविश्वास ठेवून राज्य संदेशाची घोषणा करण्याचे आपण चालू ठेवू शकतो. (फिलिप्पैकर ४:१३; प्रकटीकरण १४:६) या बाबतीत यहोवाच्या संदेष्ट्यांकडून तसेच त्याच्या प्राचीन काळातील इतर सेवकांकडून आम्ही आणखी काय शिकू शकतो?
क्षेत्र सेवेतील सोबत
१७. देवाच्या सेवेत लाभदायक सोबतीची कोणती शास्त्रवचनीय उदाहरणे आहेत?
१७ देवाचा संदेष्टा मोशे त्याच्या नेमणूकीला पूर्ण करताना, सुरवातीला त्याचा थोरला भाऊ, अहरोन याचे साहाय्य त्याला होते. यहोवाने मोशेला सांगितले: “[अहरोन] तुझ्यातर्फे लोकांशी बोलेल; तो तुझे मुख होईल.” (निर्गम ४:१६) एलीया व अलीशा संदेष्ट्यांच्या दिवसात ‘संदेष्ट्यांच्या पुत्रांची’ झालेली भरभराट याचाही विचार करा. हे, एकत्र कार्य केलेल्या व एकमेकांसोबत सुखावह सोबतीचा आनंद घेतलेल्या देवाच्या सेवकांच्या गटावरून निसंशये दिसते. (२ राजे २:३-५; ४:३८; पडताळा १ शमुवेल १०:५, १०.) अर्थातच, मोशे व अहरोन आणि ‘संदेष्ट्यांचे पुत्र’ राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्यात गुंतलेले नव्हते. तरीपण, त्यांची संगत सर्वांसाठी लाभदायक होती. शतकांनंतर येशू ख्रिस्ताने “दोघे दोघे” असे ७० शिष्यांना सेवेत पाठविले. याद्वारे त्यांना मिळालेल्या सोबतीचा लाभ झाला यात काही शंकाच नाही.—लूक १०:१-१६; पडताळा प्रेषितांची कृत्ये १७:१०, ११; २०:२०.
१८. सेवेतील सोबतीने आज उपयुक्त उद्देश कसा साध्य केला आहे?
१८ राज्य उद्घोषकांनी क्षेत्र सेवेत एकत्र सेवा करण्यासाठी १९५३ मध्ये यहोवाच्या साक्षीदारांनी एक कार्यक्रम हाती घेतला. अर्थातच, तो केवळ सोबत असावी या उद्देशास्तव राबवला गेला नाही. या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाची रचना, देवाच्या सेवकांना सुवार्तेचे अधिक प्रभावशाली शिक्षक व प्रचारक बनविण्यासाठी केली. हा उद्देश लक्षात ठेवून, सेवेमध्ये अधिक अनुभवी राज्य प्रचारकांनी नवोदितांसोबत सहभाग घेतला. घरोघरच्या प्रशिक्षणाचा हा कार्यक्रम अतिशय लाभदायक ठरला व त्याने यहोवाच्या नावाची जाहीर घोषणा करण्यासाठी सुधारणा करण्यात त्याच्या लोकांना मदत केली. (१ तीमथ्य ४:१६) आज, ख्रिश्चनांनी सेवेमध्ये विशेषपणे काही क्षेत्रात “दोघे दोघे” असा भाग घेतल्यामुळे सुरक्षितता लाभते हे याचे दुसरे कारण आहे.
१९. सेवेतील वैयक्तिक ध्येयांच्या बाबतीत काय लक्षात ठेवले पाहिजे?
१९ तुम्ही सहविश्वासूबरोबर सेवेत कार्य करताना किंवा घरोघरी एकटे कार्य करताना वैयक्तिक ध्येयांना किंवा उद्देशांना गाठण्यासाठी परिश्रम करा. ते व्यवहारी व मिळवता येण्याजोगे असले पाहिजेत. तुमच्या क्षेत्रातील लोकांची आस्था वाढविण्यासाठी तुमच्या प्रस्तावनेला जुळणारी बनविण्यासाठी तुम्हाला मदतीची गरज आहे का? असल्यास, कदाचित तुम्ही चांगल्या प्रस्तावनांचा वापर करत असेल, अशा खास प्रभावशाली असलेल्या पायनियरासोबत, पूर्ण वेळेच्या राज्य उद्घोषकासोबत किंवा एखाद्या प्रचारकासोबत जाऊ शकता. तुमचा सोबती, तयारी करण्यात व आमची राज्य सेवा यातील किंवा शास्त्रवचनातून युक्तिवाद (इंग्रजी) यात दिलेल्या प्रस्तावनांचा वापर करण्यात तुमची मदत करु शकतो. काही प्रसंगी, तुम्ही एकत्र घरोघरचे कार्य करताना, तुमच्या सोबत्यांची प्रस्तावना काळजीपूर्वक ऐका. मग सेवेच्या या पैलूत जुळते होईपर्यंत त्यासारखीच प्रस्तावना वापरण्याचा स्वतः प्रयत्न करा.
२०, २१. क्षेत्र सेवेतील सोबतीला खास मदतदायक काय बनवू शकते?
२० गृह पवित्र शास्त्राभ्यास मिळवण्याच्या उद्देशाने प्रभावकारी पुनःर्भट करण्यासाठी तुम्हाला मदतीची गरज असल्यास काय? पवित्र शास्त्राभ्यास प्रभावकारी रीतीने सुरू करणाऱ्या राज्य प्रचारकांसोबत क्षेत्रसेवेत कार्य करण्यासाठी कदाचित तुमच्या मंडळीच्या पुस्तक अभ्यास संचालकाद्वारे योजना केल्या जाऊ शकतात. तुम्ही एकत्र पुनःर्भेटी करता तेव्हा निःशब्द सोबती असू नका. उलटपक्षी, तुमच्या सोबती तो किंवा ती कशाप्रकारे गोष्टी हाताळते हे दाखविल्यावर तुमच्या पुढील पुनःर्भेटीत त्याप्रमाणेच प्रस्तुती करणे, तुम्हाला लाभदायक दिसून येईल. तुमचा सोबती नंतर सल्ला देण्यासाठी व आवश्यक ती मदत करण्यासाठी तुमच्याबरोबर असेल.—पडताळा गलतीकर ६:६.
२१ क्षेत्रसेवेत सोबत्याकडील अशी प्रेमळ मदत सेवेतील उद्देशांना पूर्ण करण्यात तुम्हाला साहाय्य करु शकते. विशेषाधिकाराचे हे कार्य करण्यासाठी ही मदत व यहोवाच्या प्रेमळ दयेबद्दलची तुमची सखोल कृतज्ञता राज्य प्रचारकार्य अधिक प्रभावशाली रीतीने करण्यासाठी देखील तुम्हाला साहाय्य करील. यहोवाबद्दल सर्वदा बोलत राहून व त्याच्या नावाची जाहीर घोषणा नियमित करीत राहून त्याच्या आशीर्वादाच्या विशेषाधिकाराची प्रेमाने काळजी घ्या.—स्तोत्र १४५:१, २, ९-१३.
२२. आमचा पुढील लेख कोणत्या प्रश्नांची उत्तरे देण्यास आमची मदत करील?
२२ यहोवाचे साक्षीदार या नात्याने, आमच्या घरोघरच्या सेवेत आम्ही वारंवार भेटी देत असतो. अनेक लोक सखोल कृतज्ञतेने सुवार्ता ऐकतात. तथापि, काही लोक राज्याचा संदेश ऐकण्यास नाखुश असतील. अशा परिस्थितींमध्ये आम्ही काय केले पाहिजे? यहोवाने त्याच्या लोकांना नेमून दिलेले कार्य आम्ही कसे चालू ठेवू शकतो? आम्हाला कोणती शास्त्रवचनीय उदाहरणे मदत किंवा मार्गदर्शन करु शकतात? या प्रश्नांची उत्तरे पुढील लेखात दिली जातील.
तुम्हाला हे मुद्दे समजले का?
▫ देवाला द्यावयाच्या बलिदानाविषयी होशेय व प्रेषित पौल यांनी काय म्हटले?
▫ यहेज्केल व आमोस यांना भविष्यवाणी करण्यासाठी कशाने प्रवृत्त केले?
▫ आम्ही आमच्या राज्य प्रचारकार्याकडे कोणत्या दृष्टीने पाहिले पाहिजे?
▫ क्षेत्र सेवेतील सोबत यापासून कोणते लाभ आम्हाला मिळवता येऊ शकतील?
[१३ पानांवरील चित्रं]
उद्देशयुक्त सोबत, सेवेत सुधारणा करण्यास आमची मदत करु शकते