वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ९/१ पृ. २९-३१
  • तुमच्या पवित्र सेवेची गुणग्राहकता बाळगा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमच्या पवित्र सेवेची गुणग्राहकता बाळगा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आम्ही देवाबद्दल पहिल्यांदा शिकतो तेव्हा
  • ते खरोखर त्याग आहेत का?
  • प्रतिफळांचा विचार करा
  • समर्पणाचे पाऊल
  • विश्‍वासू सेवेसाठी इतर प्रतिफळे
  • आपल्या बायबल विद्यार्थ्यांना बाप्तिस्मा घ्यायला मदत करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • बायबल विद्यार्थ्याला प्रगती करायला आणि बाप्तिस्मा घ्यायला आपण मदत कशी करू शकतो?—भाग २
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • ईश्‍वरी जीवन जगणे का आनंद देते
    सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
  • ‘स्वतःचे व ऐकणाऱ्‍यांचेही तारण’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ९/१ पृ. २९-३१

तुमच्या पवित्र सेवेची गुणग्राहकता बाळगा

कोणतेही ध्येय संपादन करण्यास, आम्ही त्याग करण्याची तयारी दर्शवावी. एखाद्यास वैद्य होण्यास अनेक वर्षांचा अभ्यास आणि निश्‍चय त्याचप्रमाणे पैशाची आवश्‍यकता असते. एका यशस्वी व्यायामपटुने, परिपूर्णतेच्या अथक प्रयत्नात त्याच्या तारुण्याचा बहुतेक काळ अधिकाधिक कठीण परिपाठांवर प्रगतीशीलपणे कार्य करण्यात घालविला आहे. त्याचप्रमाणे, एक कुशल पियानो वाजविणारा काही वर्षांच्या समर्पित सरावाकडे सिंहावलोकन करू शकतो.

तथापि, असे एक ध्येय आहे जे इतर कोणत्याही गोष्टीसाठी कराव्या लागणाऱ्‍या त्यागापेक्षाही अधिक प्रमाणात मोबदला मिळवून देते. ते काय आहे? ते ध्येय सर्वोच्च देव यहोवा याचे सेवक असण्याचा विशेष हक्क आहे. आपण वेळ, पैसा, व शक्‍ती या प्रकारे जे त्यागतो त्यामुळे निर्माणकर्त्याला पवित्र सेवा देण्याच्या सुहक्काद्वारे अतुल्य मोबदले प्राप्त होतात. प्रेषित पौलाचे शब्द खरे आहेत: “सुभक्‍ति तर सर्व बाबतीत उपयोगी आहे; तिला आताच्या व पुढच्याहि जीवनाचे अभिवचन मिळाले आहे.” (१ तीमथ्य ४:८) ते कसे सत्य आहे हे आपण पाहूया.

आम्ही देवाबद्दल पहिल्यांदा शिकतो तेव्हा

अनेकजन जे अनुकूल रीतीने सुवार्तेला प्रतिसाद देतात व पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करतात त्यांना त्यांच्या जीवनामध्ये जो मोठा बदल होणार याची जाणीव नसते. पहिल्यांदा, नवोदित पवित्र शास्त्र विद्यार्थ्याला आपले मित्र गमवावे लागतील. देवाला अनादर करणाऱ्‍या गोष्टींची त्याला आता जाणीव झाल्यामुळे तो त्यांचा पाठलाग का करत नाही हे त्याच्या त्या मित्रांना समजत नाही. (१ पेत्र ४:४) काहींना कौटुंबिक विरोधाचा अनुभव घ्यावा लागत असेल व त्यांचे प्रियजन आता त्यांना नापसंत करतात तसेच यहोवाचाही द्वेष करतात हे पाहून दुःख वाटत असेल. (मत्तय १०:३६) तो त्याग करणे अवघड असेल.

कामाच्या ठिकाणी किंवा शाळेत देखील त्याग करावा लागेल. नवोदित पवित्र शास्त्र विद्यार्थी कालांतरांने जगिक पार्ट्या व उत्सव यामध्ये भाग घेण्याचे थांबवील. तो यापुढे त्याच्या सहकामगार किंवा शाळकरी मित्रांचे अश्‍लील भाष्य ऐकणार नाही किंवा अश्‍लील विनोदाची देवाणघेवाणही करणार नाही. तर उलट, इफिसकर ५:३, ४ मध्ये नमुदित सूचना तो आचरण्याचा प्रयत्न करील, “परंतु पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे, जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्‍यांचे तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये; तसेच अमंगळपण बाष्कळ गोष्टी व टवाळी ह्‍यांचाहि उच्चार न होवो, ती उचित नाहीत; तर त्यापेक्षा उपकारस्तुति होवो.”

अशाप्रकारचा बदल पवित्र शास्त्र विद्यार्थ्यास परकीय बनवू शकेल. ते विशेषतः शाळेत असणाऱ्‍या युवकासाठी अवघड असेल. एकापाठोपाठ येणाऱ्‍या सुटीच्या दिवसांना तोंड देणे, त्याचप्रमाणे उत्क्रांतीवादासारख्या देवविरुद्धतेतील शिकवणी आणि समुहाबरोबर जाण्यास सतत दबाव, यामुळे तरुण ख्रिस्ती युवकांनी विश्‍वासासाठी कायम लढा दिलाच पाहिजे. देवाच्या मार्गांचे अनुकरण केल्याने ते वेगळे होतील त्यामुळे वर्गमित्र व शिक्षकांद्वारे छळ होईल. हे विशेषतः संवेदनाशील युवकावस्थेच्या दरम्यान स्वीकारण्यास अवघड असेल, पण देवाची मान्यता मिळविण्यासाठी करावा लागणारा त्याग यथार्थ आहे

ते खरोखर त्याग आहेत का?

इतर गोष्टी, ज्या पहिल्यांदा त्याग असल्याचे आढळतील पण त्याचा शेवट आशीर्वादात होतो. काहींना तंबाखुची सवय सोडून द्यावी लागेल. (२ करिंथकर ७:१) तो एक प्रयास असेल, पण सरतेशेवटी किळसविणाऱ्‍या व्यसनावर मात केल्यावर तो किती आशीर्वाद असेल! मादक पदार्थांच्या व दारुच्या व्यसनावर मात करण्याबद्दल देखील हेच म्हटले जाऊ शकते. अशा नाशकारक सवयांविना जीवन किती चांगले आहे! इतरांना त्यांच्या वैवाहिक गोष्टींमधील गैरसमज दूर करावा लागत असेल. विवाहाचा फायदा न घेता जे एकत्र राहतात त्यांनी एकतर लग्न करावे किंवा एकत्र राहणे सोडून द्यावे. (इब्रीयास १३:४) जे अनेक स्त्रियांबरोबर राहत होते त्यांनी त्याच्या युवकावस्थेतील स्त्रीबरोबरच राहीले पाहिजे. (नीतीसूत्रे ५:१८) अशाप्रकारच्या बदलात त्याग गोवलेला आहे, पण ते घरामध्ये शांती आणविते.

प्रतिफळांचा विचार करा

खरोखरच, जे कोणी यहोवाचे नियम पाळतात त्यांना निश्‍चितच फायदे होतात. पवित्र शास्त्र विद्यार्थी त्याच्या जीवनामध्ये, प्रथमच निर्माणकर्त्याला यहोवा या त्याच्या नावाने संबोधण्यास सुरवात करतो. (स्तोत्र ८३:१८) मानवजातीसाठी यहोवाने जे काही केले आहे व भवितव्यामध्ये जे करणार आहे हे शिकल्याने विद्यार्थी त्याच्यावर प्रीती करु लागतो. ज्या देशांमध्ये मृतांबद्दलचे भय सर्वसामान्य आहे तेथे तो या अंधश्रद्धेच्या भीतीपासून मुक्‍त होतो कारण मृत झोपलेले आहेत व पुनरुत्थानाची वाट पाहत आहे हे त्याला माहीत आहे. (उपदेशक ९:५, १०) त्याचप्रमाणे यहोवा मानवांना नरकात सर्वदा पीडा देत नाही हे जाणणे किती समाधानकारक आहे! होय, सत्यच त्याला खरोखर स्वतंत्र करते.—योहान ८:३२.

विद्यार्थी त्याचे जीवन यहोवाच्या दर्जांशी जसजसे अधिक जुळवून घेतो तसे तो शुद्ध विवेक व स्व-आदर प्राप्त करतो. खरे ख्रिस्ती या नात्याने जीवन व्यतीत करण्याचे शिकल्याने त्याच्या कुटुंबाची चांगली काळजी घेण्यास त्याला मदत मिळते, ज्यामुळे त्याला मोठे समाधान व आनंद प्राप्त होतो. मग राज्य सभागृहामध्ये सभेला उपस्थित राहण्याबदलही आहे. किती आनंददायक अनुभव! देवाचे लोक ज्या उबदार प्रीतीद्वारे ओळखले जातात असे पवित्र शास्त्र म्हणते तिचा अवलंब करणारे लोक येथे आहेत. (स्तोत्र १३३:१; योहान १३:३५) “देवाची महत्कृत्ये” सांगताना त्यांची भाषा शुद्ध व उभारणीकारक असते. (प्रेषितांची कृत्ये २:११) होय, “संपूर्ण बंधुवर्गाच्या संपर्कात” येणे आनंदाचा स्रोत आहे. (१ पेत्र २:१७) अशाप्रकारचा चांगला सहवास पवित्र शास्त्र विद्यार्थ्यास, “सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता ह्‍यांनी युक्‍त असा देवसदृश्‍य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण” करण्यासाठी मदत होते.—इफिसकर ४:२४.

समर्पणाचे पाऊल

एखादा, व्यक्‍तिगत ज्ञानामध्ये वाढ करत जातो तसे सरतेशेवटी यहोवाची प्रीती त्याला त्याचे जीवन समर्पित करण्यास व त्या समर्पणाला पाण्याच्या बाप्तिम्याद्वारे चिन्हांकित करण्यास प्रवृत्त करते. (मत्तय २८:१९, २०) हे पाऊल उचलण्याअगोदर त्या व्यक्‍तीला त्याग करावा लागतो असा येशूचा सल्ला आहे. (लुक १४:२८) लक्षात ठेवा, एक समर्पित ख्रिस्ती यहोवाच्या इच्छेला प्रथम स्थानी ठेवतो व देहाच्या कर्मांना नाकारतो. “देहाची कर्मे” सोडून ‘आत्म्याची फळे’ उत्पन्‍न करण्यासाठी तो खूप परिश्रम घेतो. (गलतीकर ५:१९-२४) रोमकर १२:२ मध्ये दिलेला सल्ला आता त्याच्या जीवनामध्ये अधिक महत्त्वाची भूमिका पार पाडतो: “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्‍या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.” याप्रकारे, एक समर्पित ख्रिस्ती उद्देशाची जाणीव राखून त्याचे जीवन व्यतीत करतो.

तथापि, त्याला जे प्राप्त होते, त्याचा विचार करा. एक गोष्ट म्हणजे, तो आता विश्‍वाचा निर्माणकर्ता याच्या व्यक्‍तिगत नातेसंबधात आहे. देवाचा मित्र झाल्याने त्याला नीतिमान असे गणण्यात आले आहे! (याकोब २:२३) अधिक गहन अर्थाने तो, “हे आमच्या स्वर्गातील पित्या” असे देवाला संबोधतो. (मत्तय ६:९) नव्याने समर्पित झालेल्यास, जीवनामध्ये खरोखर उद्देश आहे व तो त्याचे जीवन त्या उद्देशानुरुप व्यतीत करत आहे हे जाणणे आणखी एक आशीर्वाद ठरते. (उपदेशक १२:१३) येशूचे मार्गदर्शन अनुसरल्याने तो विश्‍वासू राहून सैतानाला खोटे शाबीत करू शकतो. हेच यहोवाच्या हृदयाला किती आनंदित करते!—नीतीसूत्रे २७:११.

अर्थातच, एक ख्रिस्ती त्याच्या विश्‍वासाच्या मार्गात टिकून राहतो त्याप्रमाणे पुढेही त्याला त्याग करावयाचे असतात. देवाच्या वचनाच्या व्यक्‍तिगत व मंडळीच्या अर्थपूर्ण अभ्यासात गुंतण्यास वेळेची आवश्‍यकता असते. (स्तोत्र १:१-३; इब्रीयांस १०:२५) इतर उद्योगातून क्षेत्र सेवेसाठी वेळ काढला पाहिजे. (इफिसकर ५:१६) यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना उपस्थित राहण्यासाठी तसेच संमेलने व अधिवेशनांच्या प्रवासासाठी देखील वेळ व परिश्रमाची आवश्‍यकता आहे. राज्य सभागृह व जागतिक प्रचारकार्याला आर्थिक सहाय्य देण्यामध्ये स्व-त्याग करावा लागेल. तथापि, लाखो ख्रिस्ती याचा पुरावा देऊ शकतात त्याप्रमाणे, अशा प्रकारच्या गाष्टींमधील सहभागातेमुळे आनंद मिळतो. येशूने म्हटले: “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.”—प्रेषितांची कृत्ये २०:३५.

यहोवाच्या कामाला पाठिंबा दिल्याची प्रतिफळे त्यागापेक्षा अधिक मोलाची असतात. आम्ही प्रौढतेत वाढ करतो तशी आमची सेवा अधिक फलदायक व आनंददायक होते. खरेच, इतरांना पवित्र शास्त्राचे सत्य शिकविणे व ती व्यक्‍ती यहोवाची भक्‍ती करू लागते हे पाहण्याव्यतिरिक्‍त आणखी कोणतीच गोष्ट आपल्याला समाधान देणारी नाही. उपासना करणारी नवीन व्यक्‍ती ही कौटुंबिक सदस्य असेल, कदाचित अशी व्यक्‍ती जिला, “प्रभुच्या शिस्तीत व शिक्षणात” तालीम मिळाली असेल, त्यामुळे एक विशेष आनंद प्राप्त होतो. (इफिसकर ६:४) आम्ही देवाचे “सहकारी” असल्याने आमच्या कामावर त्याचा आशीर्वाद पाहू शकतो.—१ करिंथकर ३:९.

विश्‍वासू सेवेसाठी इतर प्रतिफळे

हे खरे आहे की, सद्य व्यवस्थीकरणाच्या गोष्टी अस्तित्वात आहेत, तोपर्यंत आम्हाला समस्या असतीलच. कदाचित, सैतानाची वेळ कमी होत असल्याने समस्या अधिक तीव्र होतील. आम्हाला त्रास भोगावा लागेल किंवा परीक्षांमध्ये टिकून राहावे लागेल. परंतु, देव आमच्या बरोबर आहे हे ज्ञान आम्हाला सांत्वन देते व टिकून राहण्यास शक्‍ती देते. (१ करिंथकर १०:१३; २ तीमथ्य ३:१२) काही सहख्रिश्‍चनांनी वर्षानुवर्षे कटू वागवणूक सहन केली, परंतु देवावरील प्रीतीने ते टिकून राहिले. वेगवेगळ्या प्रकारच्या परिक्षेत जे यशस्वीपणे टिकून राहतात त्यांना, मारण्यात आलेल्या व नतंर सोडून दिलेल्या प्रेषितांप्रमाणे वाटते. प्रेषितांची कृत्ये ५:४१ कथन करते: “ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यात आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले.”

धीराचा मोबदला, आता देखील, कराव्या लागणाऱ्‍या त्यागापेक्षा अधिक मोलाचा आहे. पण लक्षात ठेवा की, ईश्‍वरी भक्‍ति “आताच्याच जीवनाबद्दल” नाही तर ते “पुढच्याही जीवनाचे” अभिवचन देते (१ तीमथ्य ४:८) टिकून राहणाऱ्‍यांसाठी किती मौल्यवान भवितव्य! तुम्ही जर विश्‍वासू असाल, तर सद्य व्यवस्थीकरणाला चिन्हांकित करणाऱ्‍या मोठ्या संकटातून तुम्ही बचावू शकता. अथवा या महत्त्वपूर्ण घटनेच्या अगोदर तुमचा मृत्यू झाला, तरीही येणाऱ्‍या नवीन व्यवस्थेमध्ये तुमचे पुनरुत्थान होईल. (दानीएल १२:१; योहान ११:२३-२५) मग अत्यानंदाच्या भावनेचा विचार केल्याने तुम्ही म्हणू शकाल: “यहोवाच्या मदतीने मी हे प्राप्त केले आहे!” ‘सागर जसा जलपूर्ण आहे तसे परमेश्‍वराच्या ज्ञानाने परिपूर्ण झालेल्या पृथ्वीवर’ सहभाग प्राप्त करणे किती रोमांचकारी असेल.—यशया ११:९.

होय, यहोवाची सेवा करण्यास काहीतरी त्याग करावा लागतो. परंतु प्रतिफळांशी तुलना केल्यास तो त्याग क्षुल्लक आहे. (फिलिप्पैकर ३:७, ८) देव त्याच्या सेवकांसाठी आता व भवितव्यात जे काही करणार आहे याचा विचार करता, आम्ही स्तोत्रकर्त्याच्या शब्दांची पुनरूक्‍ती करतो की: “परमश्‍वराने [यहोवा, NW] माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याचा कसा उतराई होऊ?”—स्तोत्र ११६:१२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा