वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ९/१ पृ. २७-२८
  • निर्बंध तुम्हाला नाउमेद करतात का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • निर्बंध तुम्हाला नाउमेद करतात का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • शास्त्रवचनीय मस्तकपद
  • युवकांवरील निर्बंध
  • अंतःकरणापासून आदर मिळवणारा पती
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
  • मुक्‍त पण जबाबदार लोक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • तुमच्या घरात शांती राखा
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
  • पती व वडील—या जबाबदाऱ्‍यांमध्ये संतुलन राखणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ९/१ पृ. २७-२८

निर्बंध तुम्हाला नाउमेद करतात का?

निर्बंध! जे कोणासही आवडत नाहीत; तरीही काही मर्यादेपर्यंत आपल्या सर्वांना ते निमूटपणे सहन करावे लागतात. तुमचे जीवन फार कमी मर्यादेचे आहे हे पाहून तुम्ही कधी नाउमेद झाला आहात का? तुमचा दृष्टिकोन बदलला, तर कदाचित तुम्हाला बरे वाटेल. तुम्ही जे करु शकत नाही त्याविषयी खेद करत बसण्यापेक्षा, ज्या काही स्वातंत्र्याचा आनंद आपण घेत आहोत; त्याचा पूर्ण उपभोग का घेऊ नये?

उदाहरणार्थ, आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्‍या अनेकांना, आपण श्रीमंत झालो असतो तर किती बरे झाले असते! असे वाटते. तथापि, या सद्य व्यवस्थीकरणात आपण जे काही करु शकतो, यावर दारिद्र्‌यामुळे मर्यादा येते; तरीही जीवनातील महत्वांच्या गोष्टी सर्वांना उपलब्ध आहेत. गरीब तसेच श्रीमंत लोक प्रेमात पडतात, लग्न करतात, मुलांचे संगोपन करतात, उत्तम मित्रत्वाचा आनंद घेतात आणि इतरही गोष्टी करतात. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, गरीब तसेच श्रीमंत लोक यहोवास ओळखतात आणि त्याने अभिवचन दिलेल्या नवीन जगाची वाट पाहतात. गरीब तसेच श्रीमंत लोक ख्रिस्ती बुद्धीत आणि ज्ञानात प्रगती करतात जे संपत्तीपेक्षा उत्तम आहे. (नीतीसूत्रे २:१-९; उपदेशक ७:१२) सर्व—गरीब आणि श्रीमंत—स्वतःसाठी यहोवाबरोबर अत्युत्तम नाव कमावू शकतात. (उपदेशक ७:१) पौलाच्या दिवसामध्ये मंडळी ही सामान्यपणे समाजातील खालच्या स्तरातील लोकांनी बनलेली होती—त्यापैकी काही चाकर होते—ज्यांनी त्यांच्या परीस्थितीस शक्य होईल; त्या स्वातंत्र्याचा सुज्ञतेने उपयोग केला.—१ करिंथकर १:२६-२९.

शास्त्रवचनीय मस्तकपद

ख्रिस्ती विवाहामध्ये पत्नी पतीच्या अधीन असते—संपूर्ण कुटुंबाला लाभ मिळावा म्हणून ही व्यवस्था केलेली आहे. (इफिसकर ५:२२-२४) यामुळे पत्नीला कमीपणा वाटावा का? निश्‍चितच नाही. पती आणि पत्नी हे एकसंघ आहेत. पौरुषीय मस्तकपद जेव्हा ख्रिस्ती पद्धतीने हाताळले जाते, तेव्हा तुलनात्मकदृष्ट्या पत्नीवर काही बंधने येतात आणि कौशल्य किंवा क्षमता ओळखण्यासाठी संधी मिळतात. (इफिसकर ५:२५, ३१) नीतीसूत्रे ३१ मध्ये उद्धृत केलेल्या “सद्‌गुणी” स्त्रीकडे अनेक आवडणारी तसेच आव्हानात्मक कामे होती. स्पष्टत:, पतीच्या अधीन राहणे हे तिच्यासाठी निराशेचे नव्हते.—नीतीसूत्रे ३१:१०-२९.

त्याचप्रमाणे, ख्रिस्ती मंडळीतील योग्य पुरुषांवर नेतृत्व करण्यास स्त्रीसाठी कोणतीही योजना नाही. (१ करिंथकर १४:३४; १ तीमथ्य २:११, १२) ख्रिस्ती स्त्रीने या निर्बंधतेमुळे निराश होण्याची गरज आहे का? नाही. ईश्‍वरशासित पद्धतीने ख्रिस्ती सेवेच्या पैलूकडे लक्ष दिले जात आहे, हे पाहिल्यामुळे पुष्कळजण त्याबाबत ऋणी आहेत. नियुक्‍त वडिलांचे मेंढपाळकत्त्व व शिकवणीने लाभ घेण्यात तसेच, प्रचार आणि शिष्य बनविण्याच्या अत्यावश्‍यक कार्यातील सहभागीतेमुळे ते आनंदी आहेत. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) या क्षेत्रात ख्रिस्ती स्त्रिया यशस्वीरित्या कार्य पार पाडत आहेत आणि यामुळे त्या यहोवा देवाच्या दृष्टिने आदरणीय आहेत.—स्तोत्र ६८:११; नीतीसूत्रे ३:३५.

युवकांवरील निर्बंध

युवक सामान्यपणे त्यांच्या पालकांच्या अधिकाराधीन असल्याने; त्यांचे जीवन हे फारच निर्बंधित असते; अशाप्रकारची तक्रार ते नेहमी करतात. तरीही हे सुद्धा शास्त्रवचनीय आहे. (इफिसकर ६:१) सुज्ञ ख्रिस्ती युवाजन त्यांच्या पालकांकडून लादल्या जाणाऱ्‍या निर्बंधामुळे हताश होण्याऐवजी, त्यांच्याजवळ असणाऱ्‍या स्वातंत्र्याचा आनंद घेण्यावर अधिक लक्ष केंद्रीत करतात. सामान्यतः यामध्ये गहन जबाबदाऱ्‍यांपासून मुक्‍तता याचाही समावेश होतो. अशाप्रकारे प्रौढ जीवनाची तयारी करण्यासाठी ते त्यांच्या युवाशक्‍तीचा आणि परिस्थितींचा पूर्ण लाभ घेऊ शकतात.

ब्राझील येथील एका भूतपूर्व विभागीय पर्यवेक्षकांना एका लहान एकाकी गटातील १२ वर्षीय मुलाला तो जे काही करु शकत होता त्यावर निर्बंध घालण्यात आले होते, हे चांगले आठवते. अहवालाची देखरेख करणारा ऐहिक कार्यात व्यग्र असल्यामुळे मंडळीच्या गटाकडे तो पुरेसे लक्ष देऊ शकत नव्हता; परंतु त्याला मदत करण्यासाठी त्याने या युवकाची व्यवस्था केली. मंडळीचे सर्व फॉर्म्स कोठे आहेत हे त्याने जाणून घेतले आणि तो मदतीसाठी नेहमीच उपलब्ध असा होता. त्याची आस्था उत्साहवर्धक होती आणि क्षेत्र कार्यात तो विश्‍वासू सोबती होता. तो युवक आता एक नियुक्‍त वडील आहे.

एखाद्या व्यक्‍तीच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालणाऱ्‍या अनेक परिस्थिती असू शकतील. आजारामुळे काहींवर निर्बंध येतात. काहीजण विभाजित घरात वास्तव्य करतात आणि अविश्‍वासू सोबत्याच्या मागण्यांमुळे त्यांचे जीवन मर्यादित असल्याची जाणीव त्यांना होते. सर्व गोष्टी वेगळ्या असावयास हव्या होत्या अशी जरी त्यांची मनीषा असली तरी, ते अद्यापही समाधानी जीवन जगू शकतात. अशाप्रकारच्या अनेक व्यक्‍तींच्या अहवालांना या नियतकालिकेमध्ये उद्धृत केले आहे. त्यांनी यहोवावर भाव ठेवला; परिस्थितीचा जास्तीत जास्त लाभ घेतला यामुळे हे अहवाल फारच उत्साहवर्धक आहेत.

प्रेषित पौलाने त्याच्या काळातील सामान्य परिस्थितीबद्दल कळवताना म्हटले: “तू गुलाम असता तुला पाचारण झाले काय? त्याची चिंता करु नको; पण तुला मोकळे होता येत असेल तर खुशाल मोकळा हो.” (१ करिंथकर ७:२१) किती समतोल दृष्टिकोन! काही परिस्थिती बदलतात. युवाजन प्रौढ होतात. विरोध करणारे सोबती काहीवेळा सत्याचा स्वीकार करतात. आर्थिक परिस्थितींमध्ये सुधारणा होत असल्याचे वाटत असेल. आजारी लोक पुन्हा आरोग्य प्राप्त करतात. इतर बाबतीत, देवाचे नवीन राज्य येईपर्यंत बदलणार नाहीत. तथापि, इतरजण करत असलेल्या गोष्टी एखादा करु शकत नाही; यामुळे चिंताक्रांत होण्याने काय प्राप्त होऊ शकते?

तुम्ही कधी पक्षांना आकाशात विहार करताना पाहिले आहे का आणि त्यांच्या हालचालींची मनोरमता व मनमोकळेपणा यांचे तुम्हाला कौतुक वाटले का? कदाचित, तुम्हालाही त्यांच्याप्रमाणे भरारी मारण्याची इच्छा झाली असेल. तरीही तुम्ही पक्ष्यांसारखे उडू शकत नाही आणि तुम्हाला ते कधीही शक्य होणार नाही; म्हणून तुम्ही तक्रार करत बसत नाही. तर, देवाने प्रदान केलेल्या क्षमतेबद्दल तुम्ही आनंदी आहात. तुम्ही पृथ्वीवर राहात असताना देखील यशस्वीरित्या जीवन जगता. त्याप्रमाणेच, आमची परिस्थिती कोणतीही असो आपण जे करु शकत नाही याविषयी चिंताक्रांत होण्याऐवजी जे आपण करु शकतो यावर एकाग्र झालो तर जीवन समाधानी होईल आणि यहोवाच्या सेवेत आपल्याला आनंद मिळेल.—स्तोत्र १२६:५, ६.

[२८ पानांवरील चित्रं]

तुमचे पालक तुम्हाला कोंडीत ठेवतात असे वाटते का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा