वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ९/१ पृ. १३-१८
  • यहोवामध्ये आनंद करा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवामध्ये आनंद करा!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आनंद करा—का व कसा?
  • आनंद करण्यासाठी अगणित कारणे
  • प्रचारकार्य—ओझे की आनंद?
  • आपण सर्व एकत्र मिळून आनंद करू या!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • उल्लसित अंतःकरणाने यहोवाची सेवा करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • यहोवाविषयीचा आनंद आपला आश्रयदुर्ग आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • यहोवाची सेवा आनंदाने करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ९/१ पृ. १३-१८

यहोवामध्ये आनंद करा!

“प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा एकदा मी म्हणेन, आनंद करा.”—फिलिप्पैकर ४:४.

१. ख्रिश्‍चनांनी सर्वदा आनंद केला पाहिजे असे पौलाने म्हटले तेव्हा त्याच्या बोलण्याचा अर्थ काय होता याबद्दल आम्हाला आश्‍चर्य का वाटते?

आनंद करण्याची कारणे अलिकडे फारच तुरळक दिसतील. मातीपासून घडविलेला मनुष्य, खरे ख्रिस्ती देखील बेरोजगारी, आजारपण, प्रियजनांचा मृत्यू, व्यक्‍तिमत्त्वाच्या समस्या, किंवा ख्रिस्ती विश्‍वासात नसणाऱ्‍या कौटुंबिक सदस्यांकडून किंवा पूर्वीच्या मित्रांकडून दबाव, अशा दुःखित करणाऱ्‍या परिस्थितींचा सामना करतात. यास्तव, “सर्वदा आनंद करा” हा पौलाचा सल्ला आम्ही कसा समजला पाहिजे? आम्हाला सर्वांना सामना कराव्या लागणाऱ्‍या असुखावह व कसोटीच्या परिस्थितींना विचारात घेतले पाहिजे, हे शक्य आहे का? आम्हाला या शब्दांच्या संदर्भावरील चर्चा या विषयाला स्पष्ट करण्यास मदत करील.

आनंद करा—का व कसा?

२, ३. येशू व प्राचीन इस्राएलांच्या बाबतीत दाखविल्याप्रमाणे, आनंदाविषयी महत्त्वाचे काय आहे?

२ “प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा एकदा मी म्हणेन, आनंद करा.” यामुळे आम्हाला २४ शतकांआधी इस्राएलांना सांगितलेल्या शब्दांची आठवण होऊ शकते: “परमेश्‍वराविषयीचा [यहोवा, NW] जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग आहे,” किंवा मोफॅट भाषांतरानुसार: “अनंतकाळापासून असणाऱ्‍यातील आनंद तुमचे बळ आहे.” (नहेम्या ८:१०) आनंद बळ पुरवतो व तो आश्रयदुर्गासारखा आहे ज्यात एखादी व्यक्‍ती सांत्वन व रक्षणासाठी जाऊ शकते. आनंद, परिपूर्ण मनुष्य येशू याला धीराने सहन करण्यासाठी साहाय्य करणारा ठरला. “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.” (इब्रीयांस १२:२) समस्यांचा सामना करताना आनंद करणे तारणासाठी महत्त्वाचे आहे, हे स्पष्टच आहे.

३ वाग्दत्त देशात प्रवेश करण्याअगोदर, इस्राएलांना आज्ञा दिली होती: “तुझा देव परमेश्‍वर [यहोवा, NW] ह्‍याने तुला व तुझ्या घराण्याला जे जे चांगले दिले आहे त्या सर्वांबद्दल आनंद कर; तुझ्याबरोबरचा लेवी व तुझ्याबरोबरचा उपरी ह्‍यांनीहि त्यांचा आनंदाने उपभोग घ्यावा.” यहोवाची सेवा आनंदाने करण्यात उणे पडण्याचे परिणाम गंभीर असू शकतील. “हे सर्व शाप तुला लागतील, तुझा पिच्छा पुरवितील, तुला गाठतील व शेवटी तुझा नाश करतील, . . . कारण सर्व गोष्टींची समृद्धि असताना तू आनंदाने व उल्हासित मनाने आपला देव परमेश्‍वर [यहोवा, NW] ह्‍याची सेवा केली नाही.”—अनुवाद २६:११; २८:४५-४७.

४. आम्ही आनंद करण्यात अपयशी का ठरु शकतो?

४ यास्तव, आजचे अभिषिक्‍त शेष व त्यांच्या “दुसरी मेंढरे” या सहकाऱ्‍यांनी आनंद करणे जरुरीचे आहे! (योहान १०:१६) पौलाने त्याचा सल्ला, “पुन्हा एकदा मी म्हणेन,” हे परत एकदा सांगण्याद्वारे यहोवाने आमच्यासाठी जे काही चांगले केले आहे त्याबद्दल आनंद करण्याच्या महत्त्वावर जोर दिला. आम्ही तसे करतो का? अथवा आम्ही दैनंदिन जीवनातील कामकाजात इतके बुडतो की ज्यामुळे आनंदासाठी असलेली अनेक कारणे विसरुन जातो? राज्य व त्याच्या आशीर्वादांविषयी आमच्या दृष्टिकोनांना बंद करण्याइतक्या समस्या वाढलेल्या आहेत का? आम्ही आमचा आनंद—देवाच्या नियमांचा आज्ञाभंग करणे, ईश्‍वरी तत्त्वांकडे दुर्लक्ष करणे, किंवा ख्रिस्ती कर्तव्यांकडे दुर्लक्ष करणे—या गोष्टींना हिरावून घेण्यास अनुमती देतो का?

५. असमंजस व्यक्‍तीला आनंद करणे कठीण का जाते?

५ “तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभु समीप आहे.” (फिलिप्पैकर ४:५) असमंजस व्यक्‍तीठायी संतुलितपणाची उणीव असते. तो स्वतःच्या आरोग्याची चांगली काळजी घेत नसेल, अनावश्‍यकपणे तो त्याच्या शरीराला बेसुमार तणाव किंवा चिंता भोगावयास लावत असेल. कदाचित तो स्वतःच्या मर्यादांचा स्वीकार करण्यास व त्याप्रमाणे राहण्यास शिकला नसेल. तो उच्च ध्येये ठेवत असेल व कोणत्याही किंमतीवर त्यांना गाठण्याचा प्रयत्न करत असेल. किंवा मंद होण्यासाठी व कमी प्रयत्नशील असण्यासाठी तो त्याच्या मर्यादांचा सबब म्हणून वापर करीत असेल. समतोलाच्या उणीवेमुळे व असमंजस असल्यामुळे, त्याला आनंद करण्यास कठीण वाटते.

६. (अ) सहख्रिश्‍चन आमच्यात काय पाहू शकतात, व ही गोष्ट केवळ केव्हा होऊ शकेल? (ब) समंजस असण्यासाठी, पौलाचे २ करिंथकर १:२४ व रोमकर १४:४ मधील शब्द आम्हाला कशी मदत करतात?

६ विरोधक आपणाकडे धर्मवेडे अशा दृष्टीने पाहत असले, तरी सहख्रिश्‍चनांना आमचा समंजसपणा नेहमीच दिसला पाहिजे. आम्ही समतोल राखल्यास व स्वतःकडून किंवा इतरांकडून परिपूर्णतेची अपेक्षा न केल्यास ते आम्हाकडे असेच पाहत राहतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, देवाचे वचन ज्याची मागणी करते त्यापेक्षाही अधिक बोजा इतरांवर लादण्यापासून आम्ही स्वतःला आवरले पाहिजे. प्रेषित पौलाने म्हटले: “आम्ही तुमच्या विश्‍वासावर सत्ता गाजवितो असे नाही, तर तुमच्या आनंदात साहाय्यकारी आहो.” (२ करिंथकर १:२४) पौल पूर्वी परुशी असल्यामुळे, अधिकारावर असणाऱ्‍यांनी कडक नियम बनवून त्यांना लादले तर ते आनंदाला दाबून टाकतात, पण सहकाऱ्‍यांनी सांगितलेले साहाय्यकारी सल्ले आनंद वाढवतात हे त्याला चांगल्याप्रकारे माहीत होते. “प्रभु समीप आहे” या वस्तुस्थितीने, समंजस व्यक्‍तीला ‘दुसऱ्‍याच्या चाकराला दोष लावू नये’ याची आठवण करून दिली पाहिजे. ‘तो स्थिर राहिला काय किंवा त्याचे पतन झाले काय तो त्याच्या धन्याचा प्रश्‍न आहे.’—रोमकर १४:४.

७, ८. ख्रिश्‍चनांनी समस्यांची अपेक्षा का केली पाहिजे, तरीही त्यांना नेहमी आनंद करणे कसे शक्य आहे?

७ “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करुन आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.” (फिलिप्पैकर ४:६) आम्ही पौलाने लिहिल्याप्रमाणे “कठीण दिवस” अनुभवीत आहोत. (२ तीमथ्य ३:१-५) यास्तव ख्रिश्‍चनांनी समस्यांचा सामना करण्याची अपेक्षा केली पाहिजे. “सर्वदा आनंद करा,” हे पौलाचे शब्द निष्ठावंत ख्रिश्‍चनाची निराशा किंवा जी नाउमेदीची नैमित्तिक चढाओढ होऊ शकते या शक्यतेला सोडून देत नाही. पौलाने स्वतःच्या बाबतीत खरेपणाने कबूल केले: “आम्हांवर चोहोकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही; आम्ही घोटाळ्यांत पडलो तरी निराश झालो नाही; आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही; आम्ही खाली पडलेले आहो तरी आमचा नाश झाला नाही.” (२ करिंथकर ४:८, ९) तथापि ख्रिश्‍चनांचा आनंद, चिंतेच्या व दुःखाच्या तात्पुरत्या काळाला सौम्य करतो व शेवटी वरचढ होतो. तो पुढे जात राहण्यासाठी आवश्‍यक बळ पुरवतो, आनंदासाठी असलेल्या अनेक कारणांकडे तो कधीही दुर्लक्ष करीत नाही.

८ समस्या उद्‌भवतात तेव्हा, त्या कोणत्याही प्रकारच्या असल्या तरी, एखादा आनंदी ख्रिस्ती प्रार्थनेद्वारे नम्रपणे यहोवाची मदत मागतो. तो पराकाष्ठेच्या चिंतेसाठी नमते घेत नाही. समस्या सोडविण्यासाठी समंजसपणे स्वतः शक्य ते केल्यावर, दिलेल्या आमंत्रणानुसार त्याचा अंतिम परिणाम तो यहोवावर सोपवतो: “तू आपला भार परमेश्‍वरावर [यहोवा, NW] टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल.” या दरम्यान, एखादा ख्रिस्ती यहोवाच्या चांगुलपणाबद्दल त्याची कृतज्ञता व्यक्‍त करीत राहतो.—स्तोत्र ५५:२२; मत्तय ६:२५-३४ हेही पाहा.

९. सत्याचे ज्ञान मनाची शांती कसे देते, व त्याचा एखाद्या ख्रिश्‍चनावर कोणता चांगला परिणाम होतो?

९ “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” (फिलिप्पैकर ४:७) पवित्र शास्त्राच्या सत्याचे ज्ञान एखाद्या ख्रिश्‍चनाचे मन लबाडीपासून मुक्‍त करते व हितकर विचारसरणीचा आदर्श वाढविण्यास त्याला मदत करते. (२ तीमथ्य १:१३) यास्तव, त्याला इतरांबरोबरच्या शांतीदायक नातेसंबंधाला धोक्यात घालणाऱ्‍या चुकीच्या किंवा निर्बुद्धीपणाच्या वागणूकीला टाळण्याची मदत मिळते. अन्याय व दुष्टता यामुळे निराश होण्याऐवजी, मानवजातीच्या समस्या, राज्याद्वारे सोडविण्यासाठी तो यहोवावर आपला भाव ठेवतो. अशी मनाची शांती त्याच्या हृदयाचे संरक्षण करते, त्याच्या प्रवृत्तीला शुद्ध ठेवते, व त्याच्या विचारसरणीला धार्मिकतेच्या मार्गाने मार्गदर्शित करते. शुद्ध प्रवृत्ती व योग्य विचारसरणी, गोंधळलेल्या जगाने समस्या व दबाव आणले तरी याच्या परिणामात, आनंद करण्यासाठी अगणित कारणे पुरवते.

१०. खरा आनंद केवळ कशाविषयी बोलल्याने किंवा विचार केल्याने अनुभवता येतो?

१० “बंधूनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्‌गुण, जी काही स्तुति, त्यांचे मनन करा.” (फिलिप्पैकर ४:८) एखादा ख्रिस्ती वाईट गोष्टी बोलण्यात किंवा विचार करण्यात रस घेत नाही. यामुळे जग पुरवत असलेल्या मनोरंजनाला आपोआप वगळले जाते. स्वतःचे मन व हृदय लबाडी, व बाष्कळ गोष्टी, अनीतिमान गोष्टी, अनैतिक, सद्‌गुण नसलेल्या, द्वेषयुक्‍त, व घृणास्पद गोष्टींनी भरवले तर ख्रिस्ती आनंद कोणीही राखू शकणार नाही. स्पष्ट सांगावयाचे झाल्यास, स्वतःचे मन व हृदय अशुद्ध गोष्टींनी भरवल्यास कोणालाही खरा आनंद मिळू शकणार नाही. सैतानाच्या भ्रष्ट जगात, ख्रिश्‍चनांना विचार करण्यासाठी व त्यावर चर्चा करण्यासाठी किती तरी चांगल्या गोष्टी आहेत हे जाणणे किती उभारणीकारक आहे!

आनंद करण्यासाठी अगणित कारणे

११. (अ) कोणती गोष्ट क्षुल्लक समजू नये, व का? (ब) आंतरराष्ट्रीय अधिवेशनातील उपस्थितीने एक प्रतिनिधी व त्यांच्या पत्नीवर काय परिणाम केला?

११ आनंदाच्या कारणाविषयी बोलताना, आमच्या आंतरराष्ट्रीय बंधुत्त्वाला आपण विसरू नये. (१ पेत्र २:१७) जगीक रा व जातीय गट एकमेकांविरुद्ध तीव्र घृणा दाखवित असताना, देवाचे लोक प्रीतीमध्ये एकमेकांच्या जवळ येतात. त्यांची एकता आंतरराष्ट्रीय अधिवेशनात विशेषपणे दिसून येते. किव, युक्रेन येथे १९९३ मध्ये भरलेल्या अधिवेशनाविषयी अमेरिकेतील एका प्रतिनिधीने लिहिले: “आनंदाश्रू, आनंदी डोळे, कुटुंबासमान सतत होणारे आलिंगन, व खेळाच्या मैदानापलीकडून रंगीबेरंगी छत्र्या व हातरुमाल हालवत असलेल्या समुदायाने पाठविलेल्या शुभेच्छा हा सर्व ईश्‍वरशासित एकतेचा पुरावा होता. यहोवाने जगभरातील बंधुत्त्वात चमत्कारिकपणे जे साध्य केले आहे त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. याचा माझ्यावर व माझ्या पत्नीवर अधिक परिणाम झाला व त्याने आमच्या विश्‍वासात नवीन अर्थाने भर घातली.”

१२. आमच्या डोळ्यांसमोर यशया ६०:२२ ची पूर्णता कशी होत आहे?

१२ आज, ख्रिश्‍चनांसाठी पवित्र शास्त्रातील भविष्यवादांची पूर्णता प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यांसमोर पाहणे किती विश्‍वासवर्धक आहे! उदाहरणार्थ, यशया ६०:२२ मधील शब्दांचा विचार करा: “जो सर्वांत लहान त्याचे सहस्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल; मी परमेश्‍वर [यहोवा, NW] हे योग्य समयी त्वरित घडवून आणीन.” राज्याचा जन्म १९१४ मध्ये झाला तेव्हा, सर्वांत लहान—केवळ ५,१०० जण प्रचार करण्यात क्रियाशील होते. परंतु मागील पाच वर्षांदरम्यान जगभरातील बंधुत्त्वाची संख्या प्रत्येक आठवड्याला नवीन बाप्तिस्मा घेतलेल्या साक्षीदारांच्या सरासरी ५,६२८ या प्रमाणात वाढत आहे! १९९३ मध्ये ४७,०९,८८९ क्रियाशील सेवकांचे शिखर गाठले गेले. याची कल्पना करा! याचा अर्थ १९१४ मध्ये “सर्वांत लहान” असलेले, “सहस्र” होण्याच्या जवळ आहेत!

१३. (अ) १९१४ पासून काय घडत आहे? (ब) यहोवाचे साक्षीदार २ करिंथकर ९:७ मधील पौलाच्या शब्दांच्या तत्त्वाचे पालन कसे करतात?

१३ मशीही राजा १९१४ पासून त्याच्या शत्रूंमध्ये ताबा घेण्यासाठी गेला. त्याच्या अधिकाराला, इच्छुक मानवी अनुयायांनी जगभरातील प्रचाराचे कार्य चालू ठेवण्यासाठी त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय बांधणी मोहीम यामध्ये त्यांचा वेळ, शक्‍ती, व पैसा देण्याद्वारे पाठिंबा दिला आहे. (स्तोत्र ११०:२, ३) यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांमध्ये पैशाचा क्वचित उल्लेख केला जात असला, तरी या कार्यांना पूर्ण करण्यासाठी येत असलेल्या पैशाच्या वर्गण्यांमुळे त्यांना आनंद होतो.a (पडताळा १ इतिहास २९:९.) देण्यासाठी खऱ्‍या ख्रिश्‍चनांमागे टुमणे लावावे लागत नाही; त्यांची परिस्थिती अनुमती देते त्यानुसार “प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये” या रीतीने त्यांच्या राजाला सहयोग देण्याला ते सुहक्क समजतात.—२ करिंथकर ९:७.

१४. देवाच्या लोकांमध्ये १९१९ पासून कोणती परिस्थिती दिसत आहे, व आनंदासाठी ती कोणते कारण देते?

१४ देवाच्या लोकांमध्ये भाकीत केलेल्या खऱ्‍या भक्‍तीच्या पुनर्वसनाचा परिणाम आध्यात्मिक नंदनवनाच्या निर्मितीत झाला आहे. त्याच्या सीमा १९१९ पासून प्रगतीशीलपणे विस्तृत झाल्या आहेत. (स्तोत्र १४:७; यशया ५२:९, १०) याचा परिणाम? खरे ख्रिस्ती “आनंद व उल्हास” याचा अनुभव घेत आहेत. (यशया ५१:११) देवाचा पवित्र आत्मा, अपरिपूर्ण मानवांकरवी काय साध्य करण्यास कार्यक्षम आहे ते चांगल्या फळांवरून दिसून येते. सर्व श्रेय व सन्मान यहोवाला मिळतो, परंतु देवाचे सहकारी होण्यापेक्षा अधिक मोठा विशेषाधिकार कोणता असू शकतो? (१ करिंथकर ३:९) गरज भासल्यास, यहोवा दगडांना देखील सत्याचा संदेश बोलायला लावण्यासाठी सामर्थ्यशाली आहे. तरीपण, त्याने या पद्धतीचा अवलंब केला नाही परंतु त्याऐवजी, त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मातीपासून घडविलेल्या इच्छुक प्राण्यांना प्रवृत्त करण्याची निवड केली.—लूक १९:४०.

१५. (अ) आम्ही कोणत्या आधुनिक घटनांवर आस्थेने नजर ठेवतो? (ब) आम्ही आनंदाने पुढील कोणत्या घटनेकडे पाहतो?

१५ पवित्र शास्त्रातील उल्लेखनीय भविष्यवाण्यांचा संबंध जागतिक घटनांशी असल्यामुळे यहोवाचे सेवक संपूर्ण सादर भयाने त्यावर आता नजर ठेवतात. स्थिर शांती साध्य करण्यासाठी रा अधिक प्रयत्न करीत आहेत परंतु ते व्यर्थ ठरत आहे. त्या घटना, संयुक्‍त राष्ट्राला अराजक परिस्थिती माजलेल्या जगाच्या ठिकाणी कार्य करण्यासाठी सक्‍ती करीत आहेत. (प्रकटीकरण १३:१५-१७) परंतु, देवाचे लोक दिवसेंदिवस जवळ येत असलेल्या सर्वात आनंदी घटनांतील एका घटनेची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. “आपण आनंद व उल्लास करु व त्याचे गौरव करु; कारण कोकऱ्‍याचे लग्न निघाले आहे, आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे.”—प्रकटीकरण १९:७.

प्रचारकार्य—ओझे की आनंद?

१६. एखादा ख्रिस्ती, शिकलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यात अपशयी ठरल्यास त्याचा आनंद कसा गमावू शकतो हे स्पष्ट करा.

१६ “माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले, व माझे जे ऐकले, पाहिले ते आचरीत राहा; म्हणजे शांतिदाता देव तुमच्याबरोबर राहील.” (फिलिप्पैकर ४:९) ख्रिस्ती लोक शिकलेल्या गोष्टींचा अवलंब करण्याद्वारे, देवाच्या आशीर्वादांची अपेक्षा करु शकतात. इतरांना सुवार्तेचा प्रचार करण्याची आवश्‍यकता, ही सर्वात महत्त्वाच्या गोष्टींमधील एक असल्याचे ते शिकले आहेत. वस्तुतः, प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांचे जीवन ऐकण्यावर अवलंबून असल्यास, त्यांना ती माहिती सांगितली नाही तर, मनाच्या शांतीचा किंवा आनंदाचा उपभोग कोण घेऊ शकतील बरे?—यहेज्केल ३:१७-२१; १ करिंथकर ९:१६; १ तीमथ्य ४:१६.

१७. आमचे प्रचार कार्य सर्वदा आनंदाचा स्रोत का ठरले पाहिजे?

१७ यहोवाबद्दल शिकण्यासाठी इच्छुक असणारे मेंढरासमान लोक भेटणे किती आनंदाचे आहे! अर्थात, योग्य मनोवृत्तीने सेवा करणाऱ्‍यांसाठी राज्य सेवा नेहमीच आनंदाचा स्रोत असेल. यहोवाचा एक साक्षीदार होण्याचे प्रमुख कारण, त्याच्या नावाची स्तुती करणे व सार्वभौम शासक समजून त्याच्या अधिकाराला उंचावणे हे आहे. (१ इतिहास १६:३१) वास्तविकता ओळखणारी व्यक्‍ती, तिने आणलेल्या सुवार्तेला लोकांनी निर्बुद्धीपणामुळे नाकारले, तरी खरे पाहता तिला आनंद वाटेल. अविश्‍वासू लोकांना प्रचार करण्याचे एके दिवशी बंद होईल हे त्याला माहीत आहे; यहोवाच्या नावाची स्तुती करणे सर्वकाळापर्यंत चालेल.

१८. एखाद्या ख्रिश्‍चनाला यहोवाची इच्छा करण्यासाठी काय प्रवृत्त करते?

१८ खरा धर्म यहोवा ज्याची अपेक्षा करतो त्या गोष्टींचे आचरण करणाऱ्‍यांना करावे लागते म्हणून नव्हे, तर ते करण्याची त्यांची इच्छा असल्यामुळे प्रेरणा देतो. (स्तोत्र ४०:८; योहान ४:३४) पुष्कळ लोकांना हे समजणे कठीण वाटते. एका विवाहित स्त्रीने तिच्या घरी भेट देत असलेल्या साक्षीदार बहिणीला एकदा सांगितले: “मी तुमची प्रशंसा केली पाहिजे. तुम्ही करत आहात त्याप्रमाणे घरोघरी जाऊन माझ्या धर्माचा प्रचार मी निश्‍चितच कधीही करु शकले नसते.” स्मित हास्य करुन साक्षीदार बहिणीने उत्तर दिले: “तुम्हाला काय वाटते ते मी समजते. यहोवाची साक्षीदार होण्यापूर्वी, इतर लोकांकडे जाऊन धर्माविषयी बोलण्यासाठी तुम्ही मला पाठवू शकल्या नसत्या. पण आता तसे करण्याची माझी इच्छा आहे.” त्या स्त्रीने क्षणभर विचार केला व मग बोलली: “निश्‍चितच तुमच्या धर्माकडे सादर करण्याजोगे काही आहे, जे माझ्या धर्माकडे नाही. कदाचित मी याचा शोध केला पाहिजे.”

१९. आता ही वेळ आम्ही पूर्वीपेक्षा अधिक आनंद करण्याची का आहे?

१९ राज्य सभागृहात मोक्याच्या ठिकाणी लावलेले १९९४ चे वार्षिक वचन, नियमितपणे आम्हाला आठवण देते: “तू आपल्या अगदी हृदयापासून यहोवावर भाव ठेव.” (नीतीसूत्रे ३:५, NW) आनंद करण्यासाठी आमचा आश्रयदुर्ग यहोवा याजवर भरवसा ठेवणे यापेक्षा अधिक हर्षाचे कोणते कारण असू शकेल? स्तोत्र ६४:१० खुलासा करते: “परमेश्‍वराच्या [यहोवा, NW] ठायी नीतिमान मनुष्य हर्ष पावेल व त्याचा आश्रय करील.” ही वेळ खचून जाण्याची किंवा सोडून देण्याची नाही. जाणारा प्रत्येक महिना, हाबेलाच्या दिवसांपासून यहोवाचे सेवक वाट पाहून असलेल्या वास्तविकतेच्या समीप आणत असतो. आनंद करण्यासाठी यापूर्वी आमच्याकडे इतकी कारणे कधीही नव्हती हे जाणून, आता ही वेळ आमच्या संपूर्ण अंतःकरणाने यहोवावर भरवसा ठेवण्याची आहे!

[तळटीपा]

a अधिवेशनात व मंडळीत महिन्यातून एकदा मिळालेल्या ऐच्छिक दानाची त्याचप्रमाणे झालेल्या खर्चाची संक्षिप्त घोषणा केली जाते. या दानाचा वापर कसा केला जात आहे, याविषयी अधून मधून पत्राने कळवले जाते. अशाप्रकारे यहोवाच्या साक्षीदारांच्या जगभरातील कार्याच्या आर्थिक परिस्थितीची आठवण सर्वांना करुन दिली जाते.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

▫ नहेम्या ८:१० नुसार आम्ही आनंद का केला पाहिजे?

▫ अनुवाद २६:११ व २८:४५-४७ आनंदाचे महत्त्व कसे दाखवते?

▫ सर्वदा आनंद करण्यासाठी फिलिप्पैकर ४:४-९ आम्हाला कशी मदत करते?

▫ आनंद करण्यासाठी १९९४ चे वार्षिक वचन कोणते कारण देते?

[१६ पानांवरील चित्रं]

रशिया व जर्मनीतील साक्षीदार आंतरराष्ट्रीय बंधुत्त्वाचा भाग असण्यामध्ये आनंदित आहेत

[१७ पानांवरील चित्रं]

इतरांसोबत सत्याची सहभागिता करणे आनंद करण्यासाठी कारण आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा