मातीपासून घडविले असतानाही निश्चयाने पुढे जा!
“तो आमची प्रकृति जाणतो; आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो.”—स्तोत्र १०३:१४.
१. मानवांना मातीपासून घडविले आहे असे म्हणण्यात पवित्र शास्त्र वैज्ञानिकदृष्ट्या अचूक आहे का? स्पष्ट करा.
शरीराने आम्ही माती आहोत. “परमेश्वर [यहोवा, NW] देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला व त्याच्या नाकपुड्यांत जीवनाचा श्वास फुंकिला; तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला.” (उत्पत्ती २:७) मनुष्याच्या निर्मितीविषयी हे सोपे वर्णन वैज्ञानिक सत्याच्या एकवाक्यतेत आहे. ज्या ९० पेक्षा अधिक घटकांनी मानवी शरीर बनले आहे ते ‘जमिनीतील मातीत’ सापडतात. एका रसायनशास्त्रज्ञाने एकदा दावा केला की, प्रौढ मानवी शरीरात ६५ टक्के ऑक्सीजन, १८ टक्के कार्बन, १० टक्के हायड्रोजन, ३ टक्के नायट्रोजन, १.५ टक्के कॅल्शियम, व १ टक्का फॉस्फरस व उरलेले शरीर इतर घटकांपासून बनले आहे. हा अंदाज पूर्णपणे अचूक आहे का हे महत्त्वाचे नाही. वास्तविकता हीच राहते की, “आम्ही माती आहोत”!
२. देवाने मानवाला ज्याप्रकारे निर्माण केले त्याविषयी तुम्हामध्ये कोणती प्रतिक्रिया उत्पन्न होते, व का?
२ केवळ मातीपासून अशा गुंतागुंतीच्या प्राण्यांना, यहोवा देवाशिवाय आणखी कोण निर्माण करील बरे? देवाचे कार्य परिपूर्ण व निष्कलंक असल्यामुळे, मनुष्याला अशाप्रकारे घडविण्याचे निवडल्याने ते निश्चितच तक्रारीसाठी कारण नाही. महान निर्माणकर्ता मनुष्याला जमिनीच्या मातीपासून भयप्रद व अद्भुत रीतीने घडविण्यास समर्थ ठरल्यामुळे, त्याच्या अमर्यादित सामर्थ्य, कुशलता, व व्यावहारिक बुद्धीबद्दलची आमची कृतज्ञता वाढते.—अनुवाद ३२:४, NW तळटीप; स्तोत्र १३९:१४.
परिस्थितींमध्ये बदल
३, ४. (अ) मनुष्याला मातीपासून घडविताना, देवाचा हेतू काय नव्हता? (ब) स्तोत्र १०३:१४ मध्ये दावीद कशाचा उल्लेख करीत होता, व संदर्भ आम्हाला या समाप्तीप्रत पोहंचण्यास कशी मदत करतो?
३ मातीपासून घडविलेल्या प्राण्यांना मर्यादा आहेत. तथापि, त्या मर्यादा कठीण किंवा निर्बंधकारक असाव्यात असा देवाचा हेतू कधीही नव्हता. या मर्यादा निराशाजनक किंवा त्यांचे पर्यवसान दुःखात होण्यासाठी नव्हत्या. तरीही, स्तोत्र १०३:१४ मधील दाविदाच्या शब्दांचा संदर्भ दाखवतो की, मानवाला ज्या मर्यादा दिलेल्या आहेत त्या निराशा आणू शकतात व त्याचा परिणाम दुःखात होतो. का बरे? आदाम व हव्वेने देवाची अवज्ञा केली तेव्हा त्यांनी त्यांच्या भावी कुटुंबासाठी परिस्थितीत बदल घडवून आणला. मातीचे घडलेले असणे याने नवीन सूचित अर्थ घेतला.a
४ दावीद स्वाभाविक मर्यादांविषयी बोलत नव्हता, कारण त्या मर्यादा मातीपासून घडविलेल्या परिपूर्ण मानवांठायी देखील असल्या असत्या. परंतु, तो वारसाने मिळालेल्या अपरिपूर्णतेमुळे आणलेल्या मानवी अशक्तपणाबद्दल बोलत होता. नाही तर यहोवाविषयी त्याने असे म्हटले नसते की: “तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करितो; तो तुझे सर्व रोग बरे करितो; तो तुझा जीव विनाशगर्तेंतून उद्धरितो, . . . आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही.” (स्तोत्र १०३:२-४, १०) मातीपासून घडविले असतानाही, परिपूर्ण मानव विश्वासू राहिले असते तर त्यांनी क्षमा मिळावी अशी चूक व पाप कधीही केले नसते; अथवा बरे करण्याची आवश्यकता असणारे रोगही त्यांना झाले नसते. त्याहूनही अधिक म्हणजे, त्यांना, केवळ पुनरूत्थानाद्वारे परत येऊ शकतील अशा मृत्युच्या विनाशगर्तेंत कधीही जावे लागले नसते.
५. दाविदाच्या शब्दांना समजणे आम्हासाठी कठीण का नाही?
५ अपरिपूर्ण असल्यामुळे, दाविदाने सांगितलेल्या गोष्टींना आम्ही सर्वांनी अनुभवले आहे. अपरिपूर्णतेमुळे असलेल्या आमच्या मर्यादांची जाणीव आम्हाला नेहमीच असते. त्या मर्यादा यहोवासोबत व आमच्या ख्रिस्ती बांधवासोबत असलेल्या आपल्या नातेसंबंधाला कधी कधी दुर्बळ करतात तेव्हा आम्हाला दुःख होते. आमच्या अपरिपूर्णता व सैतानाच्या जगाकडील दबाव मधून मधून आम्हाला नैराश्येत बुडवतात तेव्हा वाईट वाटते. सैतानाच्या अधिपत्याची समाप्ती वेगाने जवळ येत असल्यामुळे, त्याचे जग सामान्यपणे लोकांवर व खासपणे ख्रिश्चनांवर अधिक दबाव टाकत आहे.—प्रकटीकरण १२:१२.
६. काही ख्रिश्चन नाउमेद का होतात, व सैतान अशा भावनांचा फायदा कसा घेऊ शकतो?
६ ख्रिस्ती जीवन जगणे अधिक कठीण होत असल्याचे तुम्हाला वाटते का? काही ख्रिश्चनांनी असे बोलल्याचे ऐकण्यात आले आहे की, ते सत्यात जितक्या अधिक काळापासून आहेत तितके अधिक अपरिपूर्ण होत असल्याचे त्यांना वाटते. तथापि, अधिक संभाव्यपणे म्हणजे, ही गोष्ट त्यांना स्वतःच्या अपरिपूर्णतेची वाढत असलेली जाणीव व हवे त्याप्रमाणे यहोवाच्या परिपूर्ण दर्जांबरोबर जुळवून घेण्याची असमर्थता यामुळे घडते. असे असले तरी, ज्ञानात वाढत जाण्याचा व यहोवाच्या नीतीमान आवश्यकतांबद्दल गुणग्राहकता बाळगण्याचा हा एक संभवनीय परिणाम असेल. अशा कोणत्याही जाणीवेमुळे निराश होऊन दियाबल आमच्याकडून जे करवून घेण्याची इच्छा करतो त्याप्रत पोहंचू नये हे महत्त्वाचे आहे. त्याने यहोवाच्या सेवकांनी खऱ्या उपासनेचा त्याग करावा म्हणून शतकांपासून वारंवार निराशेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही, देवावरील अस्सल प्रीती, तसेच दियाबलाबद्दल ‘पूर्ण द्वेष’ यामुळे असे करण्यापासून अनेकांचे रक्षण झाले आहे.—स्तोत्र १३९:२१, २२; नीतीसूत्रे २७:११.
७. कोणत्या बाबतीत आम्ही कधी कधी ईयोबासारखे होऊ शकतो?
७ असे असले तरी, यहोवाचे सेवक कोणत्या ना कोणत्या प्रसंगी नाउमेद होतात. स्वतः साध्य केलेल्या गोष्टींबद्दल असमाधान, हे देखील त्याचे एक कारण असू शकते. यामध्ये शारीरिक कारणे किंवा कौटुंबिक सदस्य, मित्र किंवा सहकर्मचारी यांच्याबाबत गृहीत धरलेल्या मनोवृत्तीचा समावेश होतो. विश्वासू ईयोब इतका नाउमेद झाला की, त्याने देवाला विनंती केली: “तू मला अधोलोकांत लपविशील, तुझा क्रोध शमेपर्यंत मला दृष्टिआड ठेविशील, माझी मदत नियमित करुन मग माझी आठवण करिशील. तर किती बरे होईल!” आता, कठीण परिस्थितीने “सात्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा” ईयोब, याला कधी कधी नाउमेद राहू दिले तर, आमच्याही बाबतीत हीच गोष्ट होऊ शकते यात काही आश्चर्य नाही.—ईयोब १:८, १३-१९; २:७-९, ११-१३; १४:१३.
८. नैमित्तिक नाउमेद सकारात्मक चिन्ह का असू शकते?
८ यहोवा अंतःकरणात पाहतो व चांगल्या मनोगताकडे दुर्लक्ष करीत नाही हे जाणणे किती सांत्वनदायक आहे! प्रामाणिकपणे त्याला खूष करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना तो कधीही नाकारणार नाही. वस्तुतः, नैमित्तिक नाउमेदी एक सकारात्मक चिन्ह असू शकते. ते, आम्ही यहोवाच्या सेवेकडे दुर्लक्ष करत नसल्याचे सूचित करते. या दृष्टिकोनातून पाहिल्यास, नाउमेदीमुळे ज्याला कधीही झगडावे लागत नाही अशा व्यक्तीला, इतर लोकांना वाटते त्याच्या आध्यात्मिक कमतरतांची जाणीव जशी वाटते तशी कदाचित स्वतःला वाटत नसेल. लक्षात घ्या: “आपण उभे आहो असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून संभाळावे.”—१ करिंथकर १०:१२; १ शमुवेल १६:७; १ राजे ८:३९; १ इतिहास २८:९.
त्यांनाही मातीचे घडविले होते
९, १०. (अ) ख्रिश्चनांनी कोणाच्या विश्वासाचे अनुकरण केले पाहिजे? (ब) मोशेने त्याच्या नेमणूकीबद्दल कोणती प्रतिक्रिया दाखवली?
९ इब्रीयांस ११ वा अध्याय, दृढ विश्वास दाखवलेल्या यहोवाच्या अनेक ख्रिस्तपूर्व साक्षीदारांची यादी देतो. पहिल्या शतकातील तसेच आधुनिक काळातील ख्रिश्चनांनी असेच कार्य केले. त्यांच्यापासून शिकण्यासारखे बहुमोलाचे धडे आहेत. (पडताळा इब्रीयांस १३:७.) उदाहरणार्थ, ख्रिस्ती लोक, मोशेपेक्षा आणखी कोणाच्या विश्वासाचे उत्तम अनुकरण करु शकतात? त्याला त्याच्या काळातील सर्वात सामर्थ्यशाली जागतिक शासक, इजिप्तच्या फारोकडे जाऊन न्यायाचा संदेश घोषित करण्यासाठी पाचारण केले होते. आज यहोवाच्या साक्षीदारांना, खोटा धर्म व स्थापित झालेल्या ख्रिस्ताच्या राज्याच्या विरोधात असलेल्या इतर संघटनांविरुद्ध अशाच प्रकारचा न्यायाचा संदेश घोषित करावयाचा आहे.—प्रकटीकरण १६:१-१५.
१० मोशेने दाखविल्याप्रमाणे, ही कामगिरी पूर्ण करणे सोपे नाही. त्याने विचारले, “फारोकडे जाऊन इस्राएलवंशजांस मिसरातून [इजिप्त] काढून आणणारा असा मी कोण?” आम्ही त्याच्या अपुरेपणाच्या भावनांना समजू शकतो. सहइस्राएली कशी प्रतिक्रिया दाखवतील याची देखील त्याला काळजी वाटत होती: ‘समजा त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही व माझे म्हणणे ऐकले नाही तर?’ तेव्हा यहोवाने त्याच्या अधिकाराला कसे शाबीत करु शकतो याची स्पष्टता केली, पण मोशेची आणखी एक समस्या होती. त्याने म्हटले: “हे यहोवा मी बोलका नाही, पूर्वीही नव्हतो व तू आपल्या दासापाशी बोललास तेव्हापासूनही नाही, मी तर मुखाचा जड आहे.”—निर्गम ३:११ NW; ४:१, १०.
११. मोशेप्रमाणे आम्ही, ईश्वरशासित जबाबदाऱ्यांच्या बाबतीत कशी प्रतिक्रिया दाखवू शकतो, परंतु विश्वास दाखवून आपल्याला कशाविषयीची खातरी मिळू शकते?
११ कधी कधी, मोशेप्रमाणे आम्हाला देखील वाटू लागेल. तथापि, आमच्या ईश्वरशासित जबाबदाऱ्या ओळखल्यावर आम्ही त्या कशा पूर्ण करू शकतो याचा विचार करु. ‘सामाजिक, आर्थिक, किंवा शैक्षणिक स्तरातील काही उच्च लोकांकडे जाऊन त्यांना देवाच्या मार्गांनी शिक्षित करण्याचे गृहीत धरणारा मी कोण? मी ख्रिस्ती सभेत विवेचने मांडतो किंवा ईश्वरशासित सेवा प्रशालेत व्यासपीठावरुन प्रस्तुती करतो तेव्हा माझे आध्यात्मिक बांधव कशी प्रतिक्रिया दाखवतील? त्यांना माझी दुर्बळता दिसणार नाही का?’ परंतु लक्षात ठेवा, यहोवा मोशेबरोबर होता व मोशेने विश्वास दाखविल्यामुळे त्याने त्याला त्याच्या नियुक्तीसाठी सुसज्ज केले. (निर्गम ३:१२; ४:२-५, ११, १२) आम्ही मोशेच्या विश्वासाचे अनुकरण केल्यास, यहोवा आमच्यासोबत राहील व आमच्या कार्यासाठी आम्हाला देखील सुसज्ज करील.
१२. पाप किंवा चुकांमुळे झालेल्या नाउमेदीचा सामना करताना दाविदाचा विश्वास आम्हाला कसे उत्तेजन देऊ शकतो?
१२ पाप किंवा चुकांमुळे ज्याला निराश व नाउमेद झाल्याचे वाटते त्याने दाविदाने म्हटल्याप्रमाणे प्रतिक्रिया दाखवावी: “मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे.” यहोवाला विनंती करताना दाविदाने हेही म्हटले: “माझ्या पापांपासून तू आपले तोंड फिरीव; माझे सर्व अपराध काढून टाक.” तथापि, त्याने यहोवाची सेवा करण्याच्या त्याच्या इच्छेला हिरावून घेण्यासाठी, नाउमेदीला कधीही अनुमती दिली नाही. “तू मला आपल्यापुढून घालवून देऊ नको; आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको.” दावीद “माती” असताना देखील, त्याने “भग्न व अनुतप्त हृदय” तुच्छ न मानणाऱ्या यहोवाच्या अभिवचनांवर विश्वास प्रदर्शित केल्यामुळे, यहोवा त्याच्यापासून दूर गेला नाही.—स्तोत्र ३८:१-९; ५१:३, ९, ११, १७.
१३, १४. (अ) आम्ही मनुष्यांचे अनुयायी का होऊ नये? (ब) पौल आणि पेत्राची उदाहरणे, त्यांना देखील मातीपासून घडविले असल्याचे कशाप्रकारे दाखवतात?
१३ तथापि, आम्ही या ‘मोठ्या साक्षीरुपी मेघाला . . . आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरुन धीराने धावण्याचे’ उत्तेजन म्हणून पाहत आहोत, तरीपण त्यांचे अनुसरण करण्यास आम्हाला सांगितले नाही. आम्हाला अपरिपूर्ण मानवांचे—पहिल्या शतकातील विश्वासू प्रेषितांचे देखील—नव्हे, तर “आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू” याच्या पावलांचे अनुसरण करावयास सांगितले आहे.—इब्रीयांस १२:१, २; १ पेत्र २:२१.
१४ ख्रिस्ती मंडळीचे स्तंभ, पौल व पेत्र, हे प्रेषित अनेकदा अडखळले. पौलाने लिहिले: “जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही; तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करितो.” “किती मी कष्टी माणूस!” (रोमकर ७:१९, २४) शिवाय पेत्राने फाजील आत्मविश्वासामुळे एकदा येशूला म्हटले: “आपणाविषयी सर्व अडखळले तरी मी कधीहि अडखळणार नाही.” तो येशूला तीन वेळा नाकारील असा येशूने त्याला इशारा दिला तेव्हा, पेत्राने उद्दामपणे त्याच्या स्वामीचे खंडन करुन अभिमानाने म्हटले: “आपणांबरोबर मला मरावे लागले तरी मी आपणांला नाकारणार नाही.” तथापि, येशूला त्याने नाकारले, या चुकीमुळे मोठ्या दुःखाने तो रडला. होय, पौल व पेत्र हे मातीने घडिले होते.—मत्तय २६:३३-३५.
१५. आमची घडण मातीपासून झाली असली तरी, पुढे जात राहण्यासाठी कोणती गोष्ट आम्हाला प्रेरणा देते?
१५ तथापि, मोशे, दावीद, पौल, पेत्र, व त्यांच्यासारखे इतर जण दुर्बळ असताना देखील विजयी झाले. का बरे? कारण त्यांनी यहोवावर दृढ विश्वास प्रदर्शित केला, त्याच्यावर पूर्णपणे भाव ठेवला, व चढउतार असताना देखील त्याला जडून राहिले. “सामर्थ्याची पराकोटी” मिळण्यासाठी ते त्याच्यावर विसंबून राहिले. त्याने सामर्थ्य दिले, बरे होऊ शकणार नाहीत अशा परिस्थितीत त्याने त्यांना कधीही सोडले नाही. आम्ही विश्वास प्रदर्शित करीत राहिलो व आमच्या बाबतीत न्याय केला तर, तो पुढे दिलेल्या शब्दांशी सुसंगत असेल अशी खातरी आपण बाळगू शकतो: “तुमचे कार्य . . . आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.” आमची मातीपासून घडण झालेली असताना देखील निश्चयाने पुढे जाण्यासाठी ही किती प्रेरक गोष्ट!—२ करिंथकर ४:७; इब्रीयांस ६:१०.
आम्हा वैयक्तिकांसाठी मातीने घडविल्याचा काय अर्थ होतो?
१६, १७. न्यायाविषयी, यहोवा देव गलतीकर ६:४ मध्ये स्पष्ट केलेल्या तत्त्वाचा अवलंब कसा करतो?
१६ अनेक पालकांना व शिक्षकांना, मुलांचा किंवा विद्यार्थ्यांचा प्रत्येकाच्या योग्यतेनुसार न्याय करताना आपल्या इतर मुलांसोबत किंवा सहविद्यार्थ्यांबरोबरील तुलनेच्या आधारावर नव्हे, तर त्यासाठी बुद्धी लागते हे अनुभवांनी शिकवले आहे. हीच गोष्ट ख्रिश्चनांना अनुकरण करण्यासाठी सांगितलेल्या पवित्र शास्त्रीय तत्त्वाशी जुळणारी आहे: “प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसऱ्यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल.”—गलतीकर ६:४.
१७ ह्या तत्त्वाच्या अनुषंगाने, यहोवा त्याच्या लोकांसोबत एक संघटित गट या नात्याने व्यवहार करीत असला तरी, तो प्रत्येकाचा न्याय करतो. रोमकर १४:१२ म्हणते: “आपणांतील प्रत्येक जण आपआपल्यासंबंधी [देवाला] हिशेब देईल.” यहोवा त्याच्या सर्व सेवकांच्या आनुवंशिक रचनेला चांगल्याप्रकारे जाणतो. त्यांची शारीरिक व मानसिक रचना, त्यांची योग्यता, वारसाने मिळालेले बळ व अशक्तपणा, त्यांच्याजवळ असलेली क्षमता तसेच ख्रिस्ती फळांना उत्पादित करण्यासाठी ते या क्षमतांचा किती लाभ घेतात याची माहिती त्याला आहे. येशूचे विवेचन मंदिराच्या खजिन्यात अल्प किंमतीचे दोन नाणे टाकलेल्या विधवेविषयी आहे. तसेच येशूने चांगल्या जमिनीत बी पेरणाऱ्याचा दिलेला दाखला, निर्बुद्धपणे स्वतःची तुलना इतरांबरोबर केल्यामुळे निराश झालेल्या ख्रिश्चनांसाठी प्रोत्साहनदायक आहे.—मार्क ४:२०; १२:४२-४४.
१८. (अ) आम्हा वैयक्तिकांसाठी माती असण्याचा अर्थ काय होतो हे आम्ही का ठरवले पाहिजे? (ब) मोकळेपणाने केलेल्या स्वःपरीक्षणाने आम्हाला निराश का करू नये?
१८ आम्ही सर्वतोपरी सेवा करू शकतो त्यासाठी आम्हा वैयक्तिकांच्या बाबतीत, माती असण्याचा अर्थ काय होतो हे जाणणे महत्त्वाचे आहे. (नीतीसूत्रे १०:४; १२:२४; १८:९; रोमकर १२:१) आमच्या वैयक्तिक दुर्बळतेची व अशक्तपणाची चांगल्याप्रकारे जाणीव राखली, तरच सुधारणा करण्याविषयीची गरज व शक्यतांविषयी आम्ही जागृत राहू शकतो. स्वतःचे परीक्षण करताना, आमच्यात सुधारणा करण्यास मदत करण्यासाठी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याकडे आपण दुर्लक्ष करु नये. कारण त्यायोगे विश्व निर्माण केले गेले, पवित्र शास्त्र लिहिले गेले, व मरत असलेल्या जगामध्ये, शांतीदायक नवीन जगाचा समाज अस्तित्वात आणला आहे. यास्तव देवाचा पवित्र आत्मा, सचोटी राखण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धी व सामर्थ्याची मागणी करणाऱ्यांना ते देण्यात तो निश्चितच सामर्थ्यशाली आहे.—मीखा ३:८; रोमकर १५:१३; इफिसकर ३:१६.
१९. आमची मातीपासून घडण झाली आहे ही गोष्ट कशासाठी एक सबब नाही?
१९ आम्ही केवळ माती असल्याचे यहोवा जाणतो हे माहीत असणे किती सांत्वनदायक आहे! तथापि, कमी परिश्रम घेण्यासाठी किंवा कदाचित चूक करण्यासाठी ही कायदेशीर सबब आहे असा तर्क आम्ही कधीही करता कामा नये. कदापि नाही! यहोवा आम्ही माती असल्याचे जाणतो, हे त्याच्या अपात्री दयेचे वक्तव्य आहे. परंतु आम्ही “अभक्तीने वागणारी माणसे आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करुन तिला कामातुरपणाचे स्वरुप आणतात; आणि आपला एकच स्वामी व प्रभु येशू ख्रिस्त ह्याला ते नाकारतात,” असे होण्याची इच्छा बाळगू नये. (यहूदा ४) आम्ही मातीपासून घडविले आहोत ही भक्तीहीन होण्यासाठी सबब नाही. एखादा ख्रिस्ती, “देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न” करण्याचे टाळण्यासाठी चुकीच्या प्रवृत्त्यांसोबत लढत देण्याचा प्रयत्न करतो, स्वतःचे शरीर कुदलतो व त्याला दास करुन ठेवतो.—इफिसकर ४:३०; १ करिंथकर ९:२७.
२०. (अ) कोणत्या दोन पैलूत “प्रभूमध्ये आपल्याला करण्यासारखे पुष्कळ” आहे? (ब) आम्हाजवळ आशावादी असण्याचे कारण का आहे?
२० आता, सैतानी जागतिक व्यवस्थिकरणाच्या समाप्तीच्या वर्षांदरम्यान, ही वेळ राज्य प्रचारकार्यात तसेच देवाच्या आत्म्याच्या फळांत वाढ करण्याच्या बाबतीत मंद होण्याची नाही. आमच्याजवळ या दोन्ही क्षेत्रात करण्यासारखे “पुष्कळ आहे.” आता निश्चयाने पुढे जात राहण्याची वेळ आहे कारण, आमचे “श्रम व्यर्थ नाहीत” हे आम्हाला माहीत आहे. (१ करिंथकर १५:५८, NW) यहोवा आमचे पोषण करील, त्याच्याविषयी दाविदाने म्हटले: “नीतिमानाला तो कधीहि ढळू देणार नाही.” (स्तोत्र ५५:२२) आम्ही मातीपासून घडलेलो असताना देखील यहोवा आम्हाला वैयक्तिकपणे अपरिपूर्ण मानव प्राण्यांना नेमून दिलेल्या सर्वात महान कार्यात सहभाग घेण्याची अनुमती देतो हे जाणणे किती आनंदाचे आहे बरे!
[तळटीपा]
a पवित्र शास्त्राचे भाष्य हर्डर्स् बायबलकॉमेन्टर, स्तोत्र १०३:१४ वर विवेचन मांडताना निरीक्षते: “त्याने मानवाला जमिनीतील मातीपासून घडविल्याचे तो जाणतो, त्याला मूळ पापापासून त्यांच्यावर आलेल्या कमतरता व त्यांच्या जीवनाच्या स्वभावाची क्षणभंगुरता माहीत आहेत.”—तिरपी अक्षरे आमची.
तुम्ही स्पष्ट कराल का?
▫ मानवांना मातीपासून घडविण्याचा उल्लेख करण्याच्या बाबतीत उत्पत्ती २:७ व स्तोत्र १०३:१४ कशाप्रकारे भिन्न आहेत?
▫ आज ख्रिश्चनांसाठी इब्रीयांस ११ वा अध्याय उत्तेजनाचा स्रोत का आहे?
▫ आम्ही गलतीकर ६:४ मध्ये दिलेल्या तत्त्वाचा अवलंब करण्यामध्ये सुज्ञ का आहोत?
▫ इब्रीयांस ६:१० व १ करिंथकर १५:५८ आम्हाला नाउमेदीला टाळण्यास कशी मदत करतात?
[१० पानांवरील चित्रं]
ख्रिश्चन सहउपासकांच्या विश्वासाचे अनुकरण करतात, परंतु ते त्यांचा विश्वास परिपूर्ण करणाऱ्या येशूला अनुसरतात