वयोवृद्धांना ख्रिस्ती प्रीती दर्शविणे
सॅम्युएल जॉनसन या १८ व्या शतकातील लेखकाने एका तरुणाची गोष्ट सांगितली, जो की मित्रांच्या घरी भेट दिल्यानंतर स्वतःची टोपी कोठे ठेवली हे विसरतो. त्याच्या ह्या निष्काळजीपणाबद्दल कोणीही चर्चा केली नाही. जॉनसन पुढे म्हणतो, “पण हीच गोष्ट एका वृद्धाने केली तर, लोक अगदी त्यांचे खांदे उडवून म्हणतील, ‘त्याची स्मरणशक्ती कमी होत आहे.’!”
जॉनसनच्या गोष्टीचा मथितार्थ हाच आहे की, वयोवृद्धांबद्दल कदाचित क्षुल्लक बाबतीतही अन्यायी दृष्टिकोन बाळगला जातो. वृद्धांच्या गरजेकडे लक्ष पुरविणे हे एक आव्हानच आहे तरीही, यामध्ये समाविष्ट असणाऱ्यांना यामुळे लाभ मिळतात. आव्हाने व प्रतिफळे कोणती आहेत, आणि हा विषय अधिकाधिक लोकांवर का परिणाम करतो?
आकडेवारी शास्त्राद्वारे, जागतिक लोकसंख्येपैकी ६ टक्के लोक हे ६५ किंवा त्यापेक्षा अधिक वयोमर्यादेचे आहेत आणि विकसनशील देशांमध्ये ही टक्केवारी दोन पटींपेक्षा अधिक आहे. युरोपियन समाजाने १९९३ या वर्षाला, “वृद्धांचे व पिढ्यातील ऐक्याचे युरोपिय वर्ष” ठरवले तेव्हा ३ पैकी १ व्यक्ती ही पन्नाशीपेक्षा अधिक वयाची होती. तेथील, अन्य औद्योगिक क्षेत्रामध्ये, जन्म प्रमाण हे कमी होत आहे आणि जीवनकाल क्षमतेमध्ये वाढ होत आहे, त्यामुळे लोकसंख्येचा मुख्य भाग वयस्करवर्ग हा आहे. स्पष्टतः, अशा प्रकारच्या परिस्थिती वृद्धांची काळजी घेणे हे एक प्रचंड काम आहे. पौर्वात्यांच्या मागील काळात किती वेगळ्या गोष्ट होत्या!
“ज्ञानाची ठेव”
हँडवॉरटर्बच देस् बिब्लिस्केन् अलर्टम्स् फ्युर जिबिलडेटे (पवित्र शास्त्राच्या सुशिक्षित वाचकांसाठी पवित्र शास्त्रीय प्राचीन काळातील पत्रिका) स्पष्ट करते की, “बुद्धी तसेच उच्च ज्ञान याच्या सांप्रदायिक मूल्यांचे संरक्षणकर्ते म्हणून वडिलांकडे पाहिले जात असे, या कारणामुळे युवकांना त्यांच्याबरोबर सहवास ठेवण्यासाठी आणि शिक्षण घेण्यासाठी सांगितले जात असे. स्मिथ यांचा पवित्र शास्त्र शब्दकोश वर्णन करतो: “खाजगी जीवनात [वृद्धांकडे] ज्ञानाची ठेव या अर्थाने पाहिले जाई. . .[तरुण] त्यांना प्रथम आपले मत सांगण्याची मुभा देत.”
लेवीय १९:३२ मधील मोशेच्या नियमात वृद्धांबद्दलचा आदर प्रदर्शित होत होता: “पिकल्या केसासमोर उठून उभा राहा; वृद्धाला मान दे” त्यामुळे वृद्धांना समाजात विशेषाधिकाराची जागा होती आणि समाजाचा एक मौल्यवान घटक या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहिले जात असे. मवाबी रूथने तिच्या इस्त्राएली सासू नामी, हिच्याबद्दल असाच दृष्टिकोन बाळगला होता हे उघड आहे.
मवाब ते इस्त्राएलपर्यंतच्या प्रवासात नामीबरोबर राहण्याचा रूथने निर्धार केला, त्यानंतर तिने नामीच्या सल्ल्याचे काळजीपूर्वक पालन देखील केले. ते एकदा बेथलेहेममध्ये असताना, त्यांच्या कार्यास यहोवा मार्गदर्शन करतो हे नामीला कळाले आणि तिने योग्य वर्तणूक कशी असावी यासाठी रूथला सूचना दिल्या. (रूथ २:२०; ३:३, ४, १८) अनुभवी नामीपासून शिकल्यामुळे रूथचे जीवन ईश्वरशासित पद्धतीने घडविले गेले. तिच्या सासूने स्वतःस ज्ञानाची ठेव असे सिद्ध केले.
त्याचप्रमाणे, आजही मंडळीतील वृद्ध स्त्रियांशी सहवास ठेवल्याने तरुण स्त्रिया लाभ मिळवू शकतात. कदाचित, एक बहीण विवाहाचा विचार करत असेल किंवा ती दूरगामी समस्येचा सामना करत असेल. त्या विषयात अनुभवी असलेल्या प्रौढ वयस्कर बहिणीचा सल्ला आणि सहयोग घेणे हे किती योग्य होईल!
मंडळीतील वडील या वयोवृद्धांच्या अनुभवाद्वारे स्वतःस लाभ मिळवू शकतात. हे करण्यास अपयशी झालेला लोट यापासून आपण शिकू शकतो. अब्राहाम आणि लोट यांच्या गुराख्यांमध्ये झालेल्या तंट्यावरून जो निर्णय घेण्यात आला त्याचा सर्वांवर परिणाम झाला. लोटाने मूर्खपणाने निवड केली. प्रथम अब्राहामाचे सल्ला-मार्गदर्शन घेतले असते तर किती उत्तम झाले असते! लोटास प्रौढ मार्गदर्शन मिळाले असते आणि उतावीळपणे निर्णय घेतल्यामुळे त्याच्या परिवारावर आलेल्या संकटास तो टाळू शकला असता. (उत्पत्ती १३:७-१३; १४:१२; १९:४, ५, ९, २६, २९) एखाद्या प्रश्नाबद्दलचे तुमचे मत निश्चित करण्यापूर्वी तुम्ही प्रौढ वडिलांचा सल्ला काळजीपूर्वक ऐकता का?
पहिल्या शतकातील शिमोन आणि हन्ना यांच्याप्रमाणे, आजही अनेक वयोवृद्ध यहोवाच्या कामासाठी कायम स्वरुपाचा उत्साह प्रदर्शित करत आहेत. (लूक २:२५, ३६, ३७) वृद्धांना, त्यांच्या उतारवयात देखील शक्य होईल अशा मंडळीतील कार्यभागात सामील होण्यास मदत करणे हे आदर आणि काळजी घेण्याच्या मनोवृत्तीचे चिन्ह आहे. कदाचित तरुणास ईश्वरशासित सेवा प्रशालेतील त्याची नियुक्ती तयार करण्यास त्यांची गरज भासेल. एक वडील अशा प्रकारचे मत व्यक्त करेल की, मंडळीचा अनुभवी सल्लागार हा एक वृद्ध असू शकतो, जो परिपक्व बुद्धी, परोपकारी प्रवृत्ती, आणि योग्य वेळी उपलब्ध असा आहे.
तथापि, वृद्धांच्या खास गरजांकडे लक्ष पुरविण्यामध्ये आणखी काही समाविष्ट आहे. पुष्कळ एकाकीपणा, गुन्हेगारीची भीती, आर्थिक समस्या यामुळे पीडित आहेत. वार्धक्यामुळे वृद्ध दुर्बल झाल्यानंतर, ह्या समस्या आरोग्य ढासळल्याने आणि शक्ती कमी होते या भावनेने अधिक तीव्र स्वरूप धारण करतात. त्यावेळेस त्यांच्याकडे खास लक्ष देण्याची गरज असते. वैयक्तिकरित्या आणि मंडळी या संदर्भात कशी प्रतिक्रिया दाखवू शकते?
“ईश्वरीय भक्ती आचरा”
पहिल्या शतकामध्ये, पौलाने प्रेरित होऊन १ तीमथ्य ५:४, १६ मध्ये लिहिले: “कोणा विधवेला मुले किंवा नातवंडे असली तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांबरोबर सुभक्त्यानुसार वागून [“ईश्वरी भक्ती आचरून,”NW]आपल्या वडीलधाऱ्या माणसांचे उपकार फेडावयास शिकावे, कारण हे देवाच्या दृष्टीने मान्य आहे. जर कोणा विश्वास ठेवणाऱ्या स्त्रीच्या येथे विधवा असल्या तर तिने त्यांची तरतूद करावी, मंडळीवर त्यांचा भार पडू देऊ नये; म्हणजे ज्या खरोखरीच्या विधवा आहेत त्यांची मंडळीला तरतूद करिता येईल.” वयोवृद्धांची काळजी घेणे ही कुटुंबाची जबाबदारी आहे. कुटुंबातील सदस्य ही जबाबदारी पूर्ण करण्यास असमर्थ असल्यास त्यांचे उत्तरदायित्व मंडळीवर येते. या तत्वांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
ख्रिस्ती लोकांना त्यांच्या स्वत:च्या घरात ईश्वरी भक्तीचा वापर करुन वृद्धांबद्दल ख्रिस्ती प्रेम प्रकट करण्यास कशामुळे मदत मिळाली? वयस्करांची काळजी घेत असताना काही साक्षीदारांच्या अनुभवावरील खालील विवेचनांचे निरीक्षण करा.
आध्यात्मिक गरजांकडे नियमित लक्ष
आईवडिलांची काळजी घेणाऱ्या पत्नीला, मदत करणाऱ्या फेलिक्स याने म्हटले, “दैनंदिन वचनाचा एकत्रित विचारविनिमय यामुळे अमूल्य मदत मिळाली. व्यक्तिगत अनुभव आणि आकांक्षा यहोवाच्या तत्वांशी एकत्र गुंफल्या गेल्या.” खरोखरच, वृद्ध नातलगांची काळजी घेणे हे एक आव्हानच आहे विशेषतः, त्यांच्या आध्यात्मिक बाबतीत लक्ष देणे. हे येशूच्या शब्दाच्या तर्कसंगततेत आहे, मत्तय ५:३ [NW] म्हणते: “आध्यात्मिक गरजांची जाणीव असलेले धन्य.” दैनंदिन वचनामध्ये पवित्र शास्त्र वाचन कार्यक्रम, पवित्र शास्त्रावर आधारित प्रकाशनांची चर्चा आणि प्रार्थना याद्वारे भर पडू शकते. पीटर म्हणतो, “यामुळे वृद्धांना नियमितपणा आवडतो असे दिसते.”
होय, आध्यात्मिक गोष्टींमध्ये नियमितपणा फार आवश्यक आहे. केवळ आध्यात्मिक बाबतीतच नव्हे तर, वृद्धांना दैनंदिन जीवनात नित्याची कामे मोलाची वाटतात. उर्रसूला म्हणते की, थोडीफार दुर्बळता असणाऱ्यांना “पलंगातून बाहेर येणे व दर दिवशी आपले कपडे नीट घालण्याचे” प्रेमळ उत्तेजन देऊ शकतो. अर्थातच, वृद्धावर हुकुमशाहीपणा करीत असल्याची छाप पाडण्याचे टाळणे जरुरीचे आहे. डॉरीस कबूल करते की, अनेकदा तिच्या हितकर प्रयत्नांची पराकाष्ठा व्यर्थ ठरली. “मी पुष्कळ प्रकारे चूका केल्या. एके दिवशी मी माझ्या वडिलांना दररोज शर्ट बदलण्यासाठी सांगितले. तेव्हा माझ्या आईने मला स्पष्ट सांगितले: ‘ते अजूनही माझे पती आहेत!’”
काही काळापूर्वी वृद्धजण हे तरुण होते परंतु, तरुणांना वृद्धांच्या जागी ठेवणे हे फार कठीण आहे. म्हणूनच त्यांच्या खास गरजा जाणून घेण्यासाठी ही एक गुरूकिल्लीच आहे. वाढते वय अधिक चिंता निर्माण करते. गर्हार्ट स्पष्टीकरण करतो: “माझे सासरे स्वतःवरच क्रोधीत झाले कारण काही काळापूर्वी ज्या गोष्टी ते करु शकत होते त्या आता करु शकत नव्हते. त्यांच्यासाठी वास्तविकतेचा स्वीकार करणे अतिशय दुःखदायक होते. त्यांचे व्यक्तित्व बदलले होते.”
बदलत्या परिस्थितींमध्ये वृद्धांनी आपल्या मनात साठवून ठेवलेल्या निराशेचा उद्रेक हा त्यांची काळजी घेणाऱ्यांची टिका केल्याद्वारे होतो. कारण सोपे आहे. त्यांच्याशी दाखवलेली सहानुभूतीची वागणूक त्यांना लाचारीपणाची आठवण करून देते. अशाप्रकारच्या तक्रारीस किंवा टीकेस तुम्ही कशी प्रतिक्रिया दाखवावी?
लक्षात ठेवा, तुमच्या प्रयत्नात अशाप्रकारचे नकारात्मक विचार यहोवाच्या दृष्टिकोनास परावर्तित करत नाहीत. तुमच्या विषयी टीकात्मक भाष्य केले तरीही, चांगले ते करण्याचा आणि शुद्ध विवेक विकसित करण्याचा सतत प्रयत्न करा. (पडताळा १ पेत्र २:१९.) स्थानिक मंडळी आणखी मदत करु शकते.
मंडळी काय करु शकते
वृद्ध बंधू आणि भगिनी यांनी भूतकाळात केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक मंडळ्यांना त्यांचे मनःपूर्वक आभार प्रदर्शन करण्यासाठी अनेक कारणे आहेत. कदाचित त्यांनी मंडळीचा पाया घातला असेल, काही दशकापूर्वी त्यांनी अगदी थोड्या प्रचारकांपासून वृद्धी घडविली असेल. भूतकाळातील उत्साही कार्यवाही आणि कदाचित, वर्तमान आर्थिक सहयोगाशिवाय मंडळी कोठे अस्तित्वात असेल?
जेव्हा वृद्ध प्रचारकांच्या अत्यावश्यक गरजा वाढत आहेत, तेव्हा त्या पुरविणे हे केवळ नातेवाईकांचेच कर्तव्य नाही. इतरही, वृद्धांसाठी काही करण्यात जसे, स्वयंपाक करण्यात, स्वच्छता राखण्यात, फिरायला नेण्यात, सभांना जाण्यासाठी वाहनाची सोय करण्यात किंवा राज्य सभागृहामध्ये त्यांच्यशी केवळ संभाषण करण्याद्वारे मदत करु शकतात. सर्वांनी योग्य आराखडा केल्यामुळे कर्तृत्व आणि नित्यकर्म यात ते यशस्वी होऊ शकतात.
मेंढपाळकत्वाच्या भेटींची तयारी करताना वडिलांनी संयोजन लक्षात ठेवावे. या संदर्भात काही मंडळ्या उदाहरणीय आहेत. त्यांच्या कुटुंबाकडून योग्य देखभाल होत असतानाही, मंडळीचे वडील वृद्ध आणि अशक्त यास मेंढपाळकत्वाच्या नियमित भेटी देण्यात तत्पर आहेत. तथापि इतर मंडळ्यांनी वृद्धांसंबंधाने असणाऱ्या कर्तृत्वाबद्दल अधिक जागृत असण्याची आवश्यकता आहे.
एका विश्वासू बंधूची ८० वर्षांचा असताना त्याच्या मुलगी आणि जावई यांच्याद्वारे काळजी घेण्यात आली, हे करण्यासाठी ते बेथेल सोडून आले होते. तरीसुद्धा, मंडळीतील इतर सदस्यांच्या भेटी अजूनही त्याच्यासाठी महत्वाच्या होत्या. “जेव्हा मी आजारी लोकांना भेटी देत असे,” बंधू दुःखाने म्हणतो, “मी त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या. पण माझ्यासाठी कोणीही प्रार्थना केली नाही.” वृद्धांची काळजी त्यांचे नातलग घेत असले तरी वडिलांना ‘तुम्हामधील देवाच्या कळपाचे पालन करा’ या कर्तव्यापासून अलिप्त राहण्याची सबब मिळत नाही. (१ पेत्र ५:२) वृद्धांची काळजी घेणाऱ्यांना या उत्तम कामात टिकून राहण्यासाठी उभारणीकारक आणि प्रोत्साहक मनोवृत्ती बाळगण्याची आवश्यकता आहे.
“वृद्धापकाळ आणि समाधान”
१९व्या शतकातील ॲलेक्झांडर व्हॉन् हमबोल्ट, हा जर्मन शास्त्रज्ञ त्याच्या वृद्धापकाळात असताना एका तरुण स्त्रीने त्याला विचारले की, त्याच्या आयुष्यातील वाढ त्याला कंटाळवाणी वाटली नाही का? त्या विद्वानाने म्हटले, “तुमचे उत्तर अगदी योग्य आहे; दीर्घ काळ जगण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.” त्याप्रमाणेच, आजही अनेक बंधू आणि भगिनी अधिक काळ जगण्याखातर वार्धक्याच्या प्रतिकूल परिस्थितीचा स्वीकार करून उत्तम उदाहरण मांडतात. या बाबतीत ते अब्राहाम, इसहाक, दावीद व ईयोब या ‘म्हाताऱ्या आणि पूर्ण वयाच्या’ लोकांच्या मनोवृत्तीस प्रकट करतात. —उत्पत्ती २५:८; ३५:२९; १ इतिहास २३:१; ईयोब ४२:१७.
आभार प्रदर्शनासह मदत स्वीकारणे आणि त्याबद्दल प्रामाणिक मनोवृत्ती प्रकट करणे हे वृद्धापकाळातील एक आव्हानच आहे. प्रत्येकाने स्वतःच्या शक्ती क्षमतेचे परीक्षण करणे हे आवश्यक आहे. तथापि, यामुळे वृद्ध व्यक्तीच्या निष्क्रियतेवर दोष लावता येत नाही. मरीया ही ९० पेक्षा अधिक वर्षांची आहे, परंतु अजूनही ती सभांना उपस्थित राहते आणि तेथे अभिप्राय मांडते. हे ती कसे करते? “मी आता वाचन करू शकत नाही; पण मी टेहळणी बुरुज कॅसेटच्या साह्याने ऐकते. त्यातील मी पुष्कळसे विसरते; परंतु सामान्यतः अभिप्राय मांडण्यास मी तयार असते.” मरीयाप्रमाणे, उभारणीकारक गोष्टीत स्वतःला व्यग्र ठेवल्यामुळे एखाद्या व्यक्तीस क्रियाशील राहण्यास आणि ख्रिस्ती व्यक्तिमत्व कायम राखण्यास मदत करते.
देवाच्या राज्यामध्ये, वार्धक्य अस्तित्वात नसेल. आताच्या व्यवस्थेत वृद्ध झालेले कदाचित मृत पावलेले त्यावेळी त्यांच्या प्रीत्यर्थ घेण्यात आलेली काळजी आणि पूरविण्यात आलेले लक्ष यांच्या फक्त गोड आठवणी असतील. अशाप्रकारचे वयोवृद्ध पुन्हा जीवन आणि सामर्थ्य प्राप्त करतील; ते यहोवासाठी तीव्र प्रेमाचा अनुभव करतील आणि सध्याच्या जुन्या व्यवस्थेतील परीक्षेत जे त्यांच्याशी निगडित होते; त्यांना ते सखोल आभारप्रदर्शन दाखवतील.—पडताळा लूक २२:—२८.
सध्या जे वृद्धांची काळजी घेतात त्यांच्याबद्दल काय? फार लवकरच, जेव्हा देवाचे राज्य संपूर्ण पृथ्वीवर ताबा मिळवेल, तेव्हा भूतकाळातील कर्तव्याकडे दुर्लक्ष न करता वृद्धांसाठी ख्रिस्ती प्रेम दाखवून ईश्वरी भक्ती आचरल्याने जो आनंद व समाधान त्यांना मिळाले त्याकडे पाहतील.—१ तीमथ्य ५:४.
[३० पानांवरील चौकट]
तुमच्या भेटींची वृद्धजन गुणग्राहकता दाखवतील
भेटीच्या पूर्वयोजनेद्वारे पुष्कळ काही साध्य होऊ शकते, कदाचित ही भेट प्रचार कार्यानंतर केवळ १५ मिनिटांची असू शकेल. खालील अनुभव हेच दाखवून देतो की, अशाप्रकारच्या भेटी योगायोगाने होणे हे उचित नाही.
ब्रीगीटे आणि हॅनोइलोअर या प्रचार करत होत्या आणि एकदा एका वृद्ध गृहस्थाशी त्याच्या दरवाजात उभे राहून त्यांचे संभाषण चालू होते. भगिनी त्याच्याबरोबर पाच मिनिटे संभाषण केल्यानंतर त्यांना कळाले की, तो सुद्धा यहोवाचा साक्षीदार असून त्याच मंडळीचा एक सदस्य आहे. किती मोठा हा पेच प्रसंग! परंतु अनुभवाचा शेवट हा सकारात्मक झाला. हॅनीलोअर हीने तात्काळ त्या बांधवाला भेट देण्यासाठी आणि मंडळीतील सभांना उपस्थित राहण्यास मदत करण्यासाठी पूर्वयोजना केली.
तुम्ही प्रचार करत असलेल्या क्षेत्रातील प्रत्येक वृद्ध प्रचारकाचे नाव आणि पत्ता तुम्हास ठाऊक आहे का? तुम्ही संक्षिप्त भेटीची व्यवस्था करू शकता का? याची फारच गुणग्राहकता बाळगली जाईल.