वाचकांचे प्रश्न
“टेहळणी बुरुज” यामधील दानीएलाच्या भविष्यवादांचे स्पष्टीकरण यांचा अभ्यास करण्याचा आम्ही आनंद घेतला. पण, प्रकटीकरण ११:३ मधील तीन आणि अर्धाकाळ यांच्या तारखा “प्रकटीकरणाचा कळस” या पुस्तकांपेक्षा वेगळ्या का आहेत?
होय, नोव्हेंबर १, १९९३, वॉचटावर या नियतकालिकेने प्रकटीकरण ११:३ याची आधुनिक पूर्णता याच्या दृष्टीने तारखांमध्ये काही प्रमाणात सुधारणा प्रस्तुत केलेली आहे. पण का?
आम्ही प्रथम प्रकटीकरण ११:२ पाहू या, त्या वचनाच्या शेवटी “बेचाळीस महिने” असा उल्लेख केला आहे. ३ ऱ्या वचनामध्ये आम्ही पुढे वाचतो: “माझे दोन साक्षी ह्यास मी अधिकार देईन आणि ते तरट पांघरुन एक हजार दोनशे साठ दिवस संदेश सांगतील.” ते कधी लागू होते?
होय, यहोवाच्या साक्षीदारांनी अगोदरच ओळखले आहे की, याची पूर्णता आत्म्याने-अभिषिक्त असणाऱ्या ख्रिश्चनांबरोबर झाली. ती पूर्णता “परराष्ट्रीयांची सद्दी संपल्यानंतर” (विदेश्यांचे काळ) १९१४ मध्ये झाली. (लूक २१:२४; २ करिंथकर १:२१, २२) यावर अभिप्राय मांडताना, प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!a (१९८८) पृष्ठ १६४ म्हणते: “साडे तीन वर्ष देवाच्या लोकांना कठीण काळ अनुभवण्यास मिळाला, हा अनुभव येथे भाकीत करण्यात आलेल्या घटनांशी जुळणारा होता—तो १९१४ च्या उत्तरार्धात सुरु झालेल्या पहिल्या महायुध्दापासून ते १९१८ च्या सुरवातीच्या काळापर्यंत होता.”
लक्षात घ्या, तेथे तारखांचा उल्लेख “१९१४ च्या उत्तरार्धात सुरु झालेल्या पहिल्या महायुध्दापासून ते १९१८ च्या आरंभीच्या काळापर्यत” होता. “तेव्हा देवाचे गूज संपते” (इंग्रजी) पृष्ठ २६१-४, (१९६९)* मध्ये हे सादर केलेल्या तारखांबरोबर जुळते.
तरी देखील, टेहळणी बुरुज हे दानीएलाच्या भविष्यवादावर लक्ष केंद्रीत करते. ह्या पुस्तकामध्ये दोन वेगळ्या कालावधींचा उल्लेख केलेला आहे, ज्याची तुलना नंतर प्रकटीकरण या पुस्तकामध्ये ३ १/२ वर्ष किंवा ४२ महिने अशी केली आहे. स्पष्ट म्हणायचे तर, दानीएल ७:२५ देवाच्या पवित्र जनांना “एक काळ, दोन काळ, अर्धा काळ,” किंवा ३ १/२ काळ दु:खित केले जाईल असे म्हणते. नंतर, दानीएल १२:७ भाकीत करते “एक समय, दोन समय, व अर्धा समय,” किंवा ३ १/२ काळ, ज्यांचा कळस हा “पवित्र प्रजेच्या बलाचा चुराडा करण्याचे संपेल” ह्याच्या बरोबर आहे.
तर आमच्याकडे, दानीएल ७:२५, दानीएल १२:७, व प्रकटीकरण ११:२, ३, त्याचप्रमाणे प्रकटीकरण १३:५ मध्ये भविष्यवादांच्या काळाची तुलना करणारा कालावधी आहेत. आमच्या प्रकाशनांनी हे दाखविले आहे की, या सर्वांची पूर्णता १९१४-१८ च्या कालावधीमध्ये झाली आहे. परंतु, या प्रत्येक भविष्यवादांना वेगळे करुन विचारात घेतले, तर सुरवातीच्या व शेवटच्या तारखांमध्ये थोडा फरक झालेला दिसतो.
तथापि, नोव्हेंबर १, १९९३ च्या वॉचटावर या नियतकालिकाने विचारले: “या समांतर असणाऱ्या भविष्यवाण्यांची पूर्णता कशी झाली?” होय, दानीएल ७:२५, दानीएल १२:७, व प्रकटीकरण ११:३ मधील ३ १/२ काळाच्या भविष्यवाण्यांना “समांतर भविष्यवाण्या” असे ओळखले जाते. म्हणूनच त्यांची सुरवात व शेवट हे जुळणारे असू शकतील.
त्याच्या शेवटाबद्दल, त्या नियतकालिकेने जून १९१८ मध्ये देवाच्या अभिषिक्त जणांनी (दानीएल ७:२५) दु:खाचा कळस कसा गाठला हे दाखवले. त्यावेळेस जे. एफ. रदरफोर्ड व वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रक्ट सोसायटीच्या इतर अधिकारी यांना “खोटा आरोप लावून त्यांना दीर्घ काळासाठी तुरुंगात डांबण्यात आले.” दानीएल १२:७ मध्ये उल्लेखित असणारी ती घटना खरोखर “पवित्र प्रजेच्या बलाचा चुराडा करण्याची” होती.
जून १९१८ च्या पाठीमागे मोजण्यास सुरवात केल्यास ते आम्हाला डिसेंबर १९१४ कडे म्हणजे ३ १/२ काळाच्या सुरवातीला निरवते. १९१४ च्या शेवटच्या महिन्याच्या समाप्तीला, येणाऱ्या वर्षासाठी देवाच्या पृथ्वीवरील अभिषिक्त लोकांनी शीर्षक वचन शिकून घेतले: “‘माझा प्याला तुम्हाला पिता येईल का’—मतय २०२०-२३.” त्याची घोषणा करणाऱ्या लेखाने ताकीद दिली: “१९१५ च्या दरम्यान कोकऱ्याच्या निष्ठावंत शिष्यांना काही खास परीक्षा, अतिशय दु:खाचा प्याला किंवा त्रास सहन करावा लागेल, हे कोणास ठाऊक!” जसे दानीएल ७:२५ ने ३ १/२ काळाच्या कालावधीबद्दल पूर्वभाकीत केले की, ‘जेर उत्पन्न झाला व तो देवाच्या पवित्र जनांवर चालू राहिला.’ पहिल्या महायुध्दात रा भांडणात गोवली होती, ज्यामुळे ते अन्यायी छळ सहज पुढे नेऊ शकत होते. समारोप असा आहे: तिन्ही समांतरीत भविष्यवाद—दानीएल ७:२५, १२:७, व प्रकटीकरण ११:३—यांनी ३ १/२ वर्ष, किंवा ४२ महिने ही पूर्णता डिसेंबर १९१४ ते जून १९१८ पर्यंत झाली.
हे स्पष्टीकरण दाखविते की, प्रकटीकरण ११:३ ची पूर्णता यामध्ये थोड्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. भवितव्यामध्ये प्रकटीकरणाचा कळस ह्या पुस्तकाचा अभ्यास करत असताना आम्ही काहीतरी लक्षात ठेवू अशी ही सुधारणूक आहे.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित झालेले.