आण्विक धमकी कायमचीच काढण्यात आली!
आजच्या मानसिक भयप्रद काळात मानवाने जीवन जगने ही देवाची इच्छा नाही. कारण, तो “धन्यवादित देव” आहे आणि त्यांनी शांतीत आनंदाने व निर्भयतेने जगावे—थोडक्यात आनंदी असावे अशी त्याची इच्छा आहे. (१ तीमथ्य १:११) अणुशस्त्रांच्या भीतीने ओतप्रोत भरलेल्या जगात हे अगदीच अशक्य आहे.
“शांती आणि निर्भयता”—एक विरोधाभास
हे स्पष्ट आहे की, अणुशस्त्रांची भीती पूर्णपणे नाहीशी झालेली नाही. तरीही, राजकीय, आर्थिक व सामाजिक अशांतता असताना देखील, रा या संदर्भात आशावादी आहेत असे दिसते. संयुक्त राष्ट्राच्या १९८६ या आंतरराष्ट्रीय शांती वर्षापासून हा धोका कमी करण्यासाठी निरंतर प्रयत्न केले जात आहेत.
आण्विक शास्त्रज्ञांचे बातमी पत्रक, (इंग्रजी) याने गेल्या दशकात, जगाचा अंत होण्याची वेळ दर्शविणाऱ्या—अण्वस्त्र युद्धाच्या शक्यतेची मोजमाप करण्याची पद्धत—घडाळ्यातील अवधी मध्यरात्री पूर्वी ३ मिनिटांपासून ते १७ मिनिटांपर्यंत मागे आणला आहे. १९८९ मध्ये, स्टॉकहोल्म आंतरराष्ट्रीय शांती संशोधन संघटनेने अशी नोंद केली की, “दुसऱ्या महायुद्धानंतरच्या इतर कोणत्याही वर्षांपेक्षा आता, झगड्यासंबंधाने शांतीने ठराव मांडण्यासाठी आशा अधिक चांगली बळावलेली आहे.”
अलिकडील वर्षात संयुक्त राष्ट्राला त्रासाच्या आंतरराष्ट्रीय ठिकाणांची हाताळणी करण्यासाठी बळकटी देण्यात आली. त्याला पूर्णतः यश मिळाले नसले तरीही, आशावादाचा सामान्य आत्मा निर्माण करण्यास ते पुरेसे आहे. भविष्यामध्ये आणखी यशोवृद्धी होईल, किंबहुना “शांति आणि निर्भय” यांची ओरड विस्तीर्ण आणि तीव्र होईल. त्यांना याची विश्वसनीयता सुद्धा मिळेल.
पण सावधान! पवित्र शास्त्र धोक्याची सूचना देते, “शांति आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात,’! तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत.” अशाप्रकारे “शांति आणि निर्भय” यांची ओरड ही, “पृथ्वीची नासाडी करणाऱ्यांचा नाश करण्याची” देवाच्या वेळेची पूर्वसूचना होईल.—१ थेस्सलनीकाकर ५:३, ४; प्रकटीकरण ११:१८.
राष्ट्रे “शांति आणि निर्भय” यामध्ये यश संपादन करतील असे वक्तव्य पवित्र शास्त्र करत नाही याची नोंद घ्या. स्पष्टपणे, पूर्वीपेक्षा अधिक संघटितरीत्या ते आशावाद आणि खात्री याविषयी दावा करतील. शांती आणि सुरक्षितता प्राप्त होणाऱ्या शक्यतेमध्ये पूर्वी कधीही झाली नव्हती ऐवढी वाढ झालेली दिसेल. अणुशस्त्रांची कायम भीती असताना देखील; रा निर्भयतेच्या भ्रमात असतील.
तथापि, खरे ख्रिस्ती फसले जाणार नाहीत. उत्सुक आस्थेमुळे काहीतरी उत्तम प्राप्त करण्यासाठी ते मानवी शांती आणि निर्भयता या पलिकडे पाहतात!
वास्तविक— शांती आणि निर्भयता
स्तोत्र ४:८ प्रमाणे, शांती आणि निर्भयता केवळ यहोवा देवाच्या व्यवस्थेमध्ये आढळून येते: “मी स्वस्थपणे पडून लागलीच झोपी जातो, कारण, हे परमेश्वरा (यहोवा, NW) तूच मला एकांतात निर्भय ठेवतोस.” यहोवाच्या राज्य व्यवस्थे व्यतिरिक्त “शांति आणि निर्भय” यांची ओरड ही केवळ भ्रामक आहे. ती कोणतीही अक्षय गोष्ट साध्य करू शकणार नाही.
अर्धवटपणे समस्या सोडविण्यात देवाचे राज्य समाधान मानत नाही. ईश्वरी राज्य केवळ अणुशस्त्रांत कपात करण्यापेक्षा अधिक करील; अणुशस्त्रांना आणि इतर युद्धसंबंधी शस्त्रांना पूर्णपणे काढून टाकील. स्तोत्र ४६:९ हमी पुरविते: “तो दिगंतापर्यंत लढाया बंद करितो; तो धनुष्य मोडितो, भाला तोडून टाकितो; रथ अग्नीत जाळून टाकितो.”
अशाप्रकारे, अणुभट्टीचा वापर बंद केल्यामुळे किंवा किरणोत्सर्जी टाकाऊ पदार्थ नसल्यामुळे अणुशस्त्रांची भीती गतकाळातील ठरेल. नाहीतर हे शब्द खोटे ठरले असते: “ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यास घाबरविणार नाही; कारण सेनाधीश परमेश्वराच्या तोंडची ही वाणी आहे.” देव खोटे बोलू शकत नाही. त्याच्या वचनावर संशय बाळगण्यासाठी आपल्याजवळ कोणतेही कारण नाही.—मीखा ४:४; तीत १:२.
अणुशस्त्रांची भीती समूळ नष्ट केलेल्या भावी जगात जगण्यास तुम्हाला आवडेल का? तुम्ही ते प्राप्त करु शकता, त्यासाठी आवश्यक गोष्टीविषयीच्या गरजा देवाचे वचन स्पष्टपणे सामोरे मांडते. त्याविषयी जाणून घेण्याद्वारे आणि त्याप्रमाणे जीवन व्यतीत करण्याद्वारे, तुम्ही एके दिवशी सुटकेचा निःश्वास टाकून आनंदाने म्हणाल: “अणुशस्त्राच्या भीतीचा शेवटी अस्त झाला!”
[७ पानांवरील चित्रं]
कोणत्याही अणुशस्त्राच्या भीतीपासून मुक्त अशी शांती देवाच्या नवीन जगामध्ये राज्य करील