राज्य घोषकांचा वृत्तांत
“सहकार्याच्या आत्म्याचे स्मारक”
स्पेनच्या दक्षिणेकडील निमुळत्या टोकाच्या जवळपास उंचावर प्रचंड असा जो चुनखडीचा अखंड दगडी खांब उभा आहे. त्याला जिब्राल्टर खडक असे म्हणतात. हा खडक शेकडो वर्षांपर्यंत, राजकीयवाद व आंतरराष्ट्रीय मतभेद याच्यासाठी एक शांत असा साक्ष होता. याच्याविरुद्ध, अलिकडे जिब्राल्टर खडक, आज जगामध्ये क्वचितच दिसणारे सहकार्य व ऐक्य याच्या प्रकटीकरणाची पार्श्वभूमी ठरला.
त्या खडकापासून फक्त तीन किलोमीटर दूरवर ला लैनिया, स्पेन हे गाव आहे. त्या ठिकाणी यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहाच्या बांधकामाने शेकडो स्वयंसेवक कामगारांना एकत्र आणले, जे त्यांचा वेळ व शक्ती खर्च करण्यास उत्सुक होते. जसे ते निर्माणकर्ता यहोवा याच्या उपासनेचे योग्य ठिकाण उभारण्याचे श्रम घेत होते तसे कामाच्या तुलनेत, जिब्राल्टर खडकाची पार्श्वभूमी निस्तेज होत आहे असे दिसले.
जगाच्या त्या भागातील राज्य घोषकांनी खालील अहवाल पाठविला:
“२४ सप्टेंबर १९९३ शुक्रवार दुपारी सुरवात करुन नऊशे आवेशी स्वयंसेवकांनी संपूर्ण रात्रंदिवस काम केले. रविवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत, त्या नवीन इमारतीचे चिन्ह म्हणजे ‘यहोवाच्या साक्षीदारांचे राज्य सभागृह’ हे नाव उभारण्यात आले होते व त्या आकर्षक नव्या इमारतीचा पहिल्या जाहीर सभेसाठी उपयोग करण्यात आला होता.
“जिब्राल्टरच्या जवळील पुष्कळ साक्षीदारांनी स्पेनमधील बांधवांना मदत करण्यास ती हद्द ओलांडली. जिब्राल्टरच्या स्थानिक स्वयंसेवक कामगाराने स्पष्टीकरण दिले की: ‘अंतरराष्ट्रीय बंधुत्वाला राजकीय मतभेदांनी नाउमेद केले नाही’. त्याने भर घातली: ‘अनेक वर्षांपूर्वी, जिब्राल्टर येथे आमचे सभागृह बांधण्यास ला लैनिया येथून बांधव मदतीस आले होते, तर आता त्याच दयाळुपणाची परतफेड करण्यास आम्ही आनंदित आहोत’.
“यहोवाच्या साक्षीदारांच्या दोन मंडळ्यांमधील उदार प्रयत्नांच्या व आडुलुसियन प्रदेशांतील कुशल मदतनीस असणाऱ्यांची उणीव भरुन काढण्यास ला लैनिया या शहराने उपयुक्त जागेचा भाग दान देण्याचे ठरविले. ‘परंपरागतपणे, स्पेनच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी नेहमी कॅथलिक चर्च बांधण्यास जागा पुरविली आहे,’ असे स्पष्टीकरण ला लैनिया येथील महापौर यांनी बांधकामाच्या भेटीच्या दरम्यान दिले. त्यांनी म्हटले, ‘इतर धार्मिक गटांनाही तसेच का करु नये? त्या नि:स्वार्थी स्वयंसेवकांमुळे मी खूपच प्रभावित झालो आहे, व मला वाटते की त्यांना आमच्या पाठिंब्याची गरज आहे. आजच्या विभाजित जगामध्ये अशाच प्रकारच्या आत्म्याची गरज आहे.’
“त्यांनी राज्य सभागृहाला सहकार्याच्या, आत्म्याचे स्मारक असा उल्लेख केला. तरीदेखील, सर्वात प्रभावकारी दृष्टिकोन हा ना बांधणीचा होता किंवा इमारतीच्या आकाराचा होता. तर उलट, त्या समाजातील अनेकांना ते पूर्णपणे स्वयंसेवकांद्वारे बांधण्यात आले व ४८ तासात उभारण्यात आले या गोष्टीने खूपच प्रभावित केले!”
तर, पुरावा हा आहे की, ला लैनिया आणि आजूबाजूच्या क्षेत्रातील लोक हे गलतीकर ६:१० या शब्दांना विश्वासूपणा प्रदर्शित करत आहेत. त्या ठिकाणी प्रेषित पौल सहविश्वासूंना ताकीद देत आहे: “तर मग जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषत: विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.”