आण्विक धमकी सरतेशेवटी मिटली का?
“पृथ्वीवर शांती प्रस्थापित होण्याची शक्यता, दुसऱ्या महायुद्धापासूनच्या कोणत्याही काळापेक्षा आता अधिक आहे.” एका बातमीदाराने १९८० च्या दशकाच्या समाप्तीस लावलेला असा आशावादी अंदाज, निशस्त्रीकरणाच्या उल्लेखनीय करारांनी आणि अनपेक्षित राजकीय क्रांत्यांनी सरतेशेवटी शीत युद्धाचा अंत केला या वास्तविकतेवर आधारित होता. परंतु, पूर्वीच्या शक्तिशाली राष्ट्रांच्या संघर्षाची गुणलक्षणे असणारी आण्विक धमकी सुद्धा समाप्त झाली आहे का? चिरकालासाठी शांती आणि सुरक्षितता खरोखर लवकरच साध्य करता येणार होती का?
अण्वस्त्रे वाढण्याचे धोके
शीत युद्धादरम्यान, शक्तिशाली रा शांती कायम ठेवण्यासाठी सैनिकी शक्तिच्या दहशतीच्या समतोलपणावर विसंबून राहिले. त्यांनी शांतीपूर्ण उद्देशांचा पाठलाग करताना आण्विक नैपुण्यात वाढ करण्यासाठी परवानगी दिली. परंतु अण्वस्त्रे तयार करण्यावर बंदी घातली. १९७० मध्ये, न्युक्लियर नॉनप्रोलिफरेशन ट्रिटी, म्हणजेच ज्यांच्याकडे अण्वस्त्रे नाहीत त्यांना ती देऊ नयेत यासाठी असलेला करार परिणामकारक ठरला. या कराराला नंतर जवळजवळ १४० राष्ट्रांनी मंजूरी दिली. तरीही, अण्वस्त्रे तयार करणारी संभाव्य राष्ट्रे, जसे की, अर्जेंटिना, ब्राझील, भारत, आणि इस्त्राएल यांनी आजपर्यंत, त्या करारावर सही करण्यास नकार दिला आहे.
परंतु, १९८५ मध्ये आणखी एक संभाव्य आण्विक शक्तीचे राष्ट्र, उत्तर कोरियाने सही केली. यास्तव, मार्च १२, १९९३ रोजी जेव्हा या राष्ट्राने त्या करारातून स्वतःचे अंग काढून घेतले तेव्हा जगात स्वाभाविकपणे बैचेनीची छाया पसरली. डेर स्फीजेल या जर्मन वार्तापत्रकाने अशी नोंद केली: “न्युक्लियर नॉनप्रोलिफरेशन ट्रिटी, म्हणजेच ज्यांच्याकडे अण्वस्त्रे नाहीत त्यांना ती देऊ नयेत यासाठी असलेल्या करारातून निघण्याची सूचना, एक पूर्वदाखला निर्माण करते: आशियामध्ये देखील आण्विक शर्यतीची सुरवात होण्याचा धोका आहे. ही शर्यत, शक्तिशाली राष्ट्रांमध्ये जी बाँबनिर्माण स्पर्धा होती त्यापेक्षाही कैकपटीने घातक होऊ शकते.”
राष्ट्रीयतेमुळे नव्या राष्ट्रांचा आश्चर्यजनक प्रमाणावर उदय होत असल्यामुळे, आण्विक शक्तींची संख्या कदाचित वाढू शकते. (चौकोन पहा) पत्रकार चार्ल्स क्राऊटहॅमर ताकीद देतात: “सोव्हिएत धमकीचा अंत झाला, म्हणजे आण्विक धोक्याचाही अंत झाला असे नाही. खरोखरचा धोका म्हणजे आण्विक शक्तींमध्ये वाढ, आणि या वाढीला नुकतीच सुरवात झाली आहे.”
विक्रीसाठी बाँब
संभाव्य आण्विक शक्ती, शस्त्रे जी प्रतिष्ठा व शक्ती त्यांना सादर करत आहे ती प्राप्त करण्यास हपापलेले आहेत. असे म्हटले जाते की एका राष्ट्राने, पुढचा भाग स्फोटक द्रव्याने भरलेली दोन आण्विक क्षेपणास्त्र खझाकस्तान येथून विकत घेतली. हे पूर्वीचे सोव्हिएत प्रजासत्ताक राष्ट्र, त्या क्षेपणास्त्रांना अधिकृतपणे “बेपत्ता” असल्याची नोंद करते.
ऑक्टोबर १९९२ मध्ये, फ्रँकफुर्ट, जर्मनी येथे पुष्कळ पुरूषांना अटक करण्यात आली होती. कारण त्यांच्याजवळ २०० ग्रॅम अतिकिरणोत्सारी सिझियम हे मूलद्रव्य होते. ते, एका संपूर्ण शहराच्या पाणी पुरवठ्याला विषबाधीत करण्यास पुरेसे होते. एका आठवड्यानंतर, चोरटा माल नेणाऱ्या सात जणांना म्युनिक येथे पकडण्यात आले. त्यांच्याजवळ २.२ किलोग्रॅम युरेनियम सापडले. फक्त दोन आठवड्यातच अणु चोरून नेणाऱ्या दोन टोळ्यांना अटक झाल्यामुळे अधिकारी घाबरून गेले कारण, मागच्या संपूर्ण वर्षात, जगभरात अशा प्रकारच्या केवळ पाच घटनांची बातमी दिली होती.
आता ह्या लोकांचा, त्यांनी चोरून आणलेला माल दहशतवादी टोळ्यांना किंवा राष्ट्रीय सरकारांना विकण्याचा हेतू होता हे अजूनही अज्ञात आहे. तरी देखील, आण्विक दहशतीची शक्यता वाढत आहे. युरोपियन प्रोलिफरेशन इन्फॉरमेशन सेंटरचे डॉ. डेवीड लोरी या धोक्याचे असे स्पष्टीकरण देतात की: “एखाद्या दहशतवाद्याला इतकेच करणे जरूरीचे आहे की, सन्मान्य अधिकाऱ्यांना चाचणीसाठी युरेनियमचा नमूना पाठवावा, व म्हणावे की, आमच्याकडे अमुक प्रमाणात युरेनियम आहे आणि हा त्याचा पुरावा. असे करणे म्हणजे, त्या पळवून नेणाऱ्या व्यक्तीप्रमाणे होईल ज्याने पळवून नेलेल्याचा कान कापून हे सांगण्यासाठी पाठवला आहे की पळवून नेलेली व्यक्ती आमच्या ताब्यात आहे.”
शांतीकारक “टाईम बाँब” आणि “मृत्यूचे सापळे”
१९९२ हे वर्ष सुरू झाले तेव्हा, ४२० अणुभट्ट्या वीज निर्माण करण्याच्या शांतीकारक उद्योगात गुंतल्या होत्या; आणि दुसऱ्या ७६ अणुभट्ट्यांचे बांधकाम चालू होते. परंतु, इतक्या वर्षांपासून, अणुभट्ट्यांच्या अपघातामुळे, रोगांचे प्रमाण, गर्भपात आणि जन्मतःच दोष असलेल्या बालकांच्या जन्माच्या बातम्या ऐकायला मिळतात. एक अहवाल सांगतो की, १९६७ पर्यंत, एका सोव्हिएत प्लोटोनियम केंद्रात घडलेल्या घटनांमुळे, चर्नोबल महासंकटात जितक्या किरणोत्सारितेचा उत्सर्ग झाला होता त्याच्या तीन पटीने उत्सर्ग झाला.
अर्थात, एप्रिल १९८६ मध्ये चर्नोबल, युक्रेन येथे नंतर झालेल्या घटनेला प्रचार माध्यमाद्वारे खूप प्रसिद्धी मिळाली. १९७० च्या दशकादरम्यान, चर्नोबल केंद्राचे मुख्य आण्विक उपअभियंता ग्रीगोरी मेडवीडेफ स्पष्टीकरण देतात की, “अधिक काळासाठी टिकणाऱ्या किरणोत्सारीतेचे” वातावरणात मिळसलेले प्रचंड प्रमाण, “दीर्घकालिन परिणामांचा विचार केला तर, हिरोशिमा येथे टाकलेल्या दहा बाँबच्या बरोबरीचे आहे.”
मेडवीडेफ, त्यांच्या चर्नोबेलस्काया क्रोनिका या पुस्तकात, पूर्वीच्या सोव्हिएत युनियन येथे, १९८० च्या दशकाच्या मध्यात, अणुभट्ट्यांच्या घडलेल्या ११ गंभीर घटना आणि अमेरिकेतील आणखी १२ घटनांची यादी देतात. अमेरिकेत झालेल्या घटनांतील एक घटना, १९७९ मध्ये थ्री माईल आयलंड येथे घडलेली धक्कादायक घटना होती. त्या घटनेविषयी मेडवीडेफ अशी नोंद करतात की, “ही सर्वात पहिली घटना होती जिने केंद्रकीय ऊर्जेच्या लौकिकतेला गंभीरपणे कलंकित केले, आणि सर्वांच्याच मनात नव्हे तर, अनेकांच्या मनात केंद्रकीय उर्जा केंद्राच्या सुरक्षिततेबद्दल असलेल्या भ्रमांना उधळून टाकले.”
यावरून हे समजते की, अजूनही दुर्घटना का होतात. १९९२ च्या दरम्यान, अशा प्रकारच्या दुर्घटना रशियात जवळजवळ २० टक्क्यांनी वाढल्या. या घटनातील एका घटनेनंतर, सेंट. पिट्सबर्ग, रशियातील सॉसनॉवी बॉर शक्ती केंद्र येथे, त्याच वर्षी मार्चमध्ये, उत्सर्जनाची पातळी ईशान्येकडील इंग्लंडमध्ये ५० टक्क्यांनी वाढली आणि एस्टोनिया व दक्षिणेकडील फिनलंड येथे किमान पातळीपेक्षा दुपटीने वाढली. न्युकॅसल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक जॉन अर्कट कबूल करतात: “सॉसनॉवी बॉरमुळे ही पातळी इतकी वाढली आहे असे मी शाबीत करू शकत नाही—परंतु जर ते सॉसनॉवी बॉर नाही तर मग काय होते?”
काही अधिकारी असा दावा करतात की, चर्नोबल-पद्धतीतील अणुभट्ट्यांच्या रचनेत दोष आहे आणि त्या चालवण्यातच खरा धोका आहे. असे असूनही, प्रचंड वीज मागणी पूर्ण करण्यासाठी डजनापेक्षा अधिक अणुभट्ट्यांचा उपगोय अजूनही केला जात आहे. अणुभट्ट्यांना चालवणाऱ्या काही चालकांनी, विद्युत शक्ती निपजण्यासाठी मदत करणाऱ्या सुरक्षित ओव्हरराईड यंत्रांना बंद करण्याचा प्रयत्न केला होता, असा त्यांच्यावर दोष लावण्यात आला आहे. ७० टक्के वीज निर्माण करण्यासाठी आण्विक केंद्रांचा उपयोग केला जाणाऱ्या फ्रान्ससारख्या राष्ट्रांना अशा प्रकारचे अहवाल भयभीत करतात. चर्नोबलसारख्या इतर घटना घडल्या तर फ्रान्समधील अनेक केंद्रांना कायमचे बंद करण्यास भाग पाडले जाईल.
एकेकाळी “सुरक्षित” असणाऱ्या अणुभट्ट्या जुन्या झाल्यावर असुरक्षित होतात. १९९३ च्या सुरवातीला, ब्रुन्सबुट्टेल येथील जर्मनीच्या सर्वात जुन्या अणुभट्टीच्या नित्यक्रमाच्या सुरक्षा तपासणीच्या दरम्यान, स्टीलच्या नळ्यांमध्ये पुष्कळ ठिकाणी शंभरापेक्षा अधिक चीरा आढळल्या. त्याचप्रकारच्या चीरा, फ्रान्स आणि स्वित्झर्लंड येथील अणुभट्ट्यांमध्ये देखील सापडल्या आहेत. सर्वात पहिला गंभीर अपघात, अणुभट्टी जुनी असल्यामुळे १९९१ मध्ये जपानच्या अणुशक्ती केंद्रात झाला होता. यावरून हे सूचित होते की, अशाचप्रकारचे अपघात अमेरिकेतही होण्याची शक्यता आहे जेथे अंदाजे, दोन तृतीयांश व्यापारी अणुभट्ट्या एका दशकापेक्षा अधिक जुन्या आहेत.
अणुभट्ट्यांचा अपघात कोठेही व कोणत्याही वेळेला घडू शकतो. जितक्या अधिक अणुभट्ट्या, तितकी अधिक भीती; जितकी जुनी अणुभट्टी, तितका मोठा धोका. यास्तव, एका वर्तमानपत्राने त्यांना, चालू असलेले टाईम बाँब आणि किरणोत्सारी मृत्युचे सापळे असे टोपण नाव कारणाशिवाय दिले नाही.
त्यांनी आण्विक कचऱ्याला कोठे टाकावे?
अलिकडेच अनेक लोकांना, फ्रेंच ॲल्पस् येथे एका नदीकाठी असलेल्या सहलीच्या ठिकाणाला कुंपण लावून मोहोरबंद केलेले आणि पोलिसांनी दिलेला पहारा पाहून अतिशय आश्चर्य वाटले. द युरोपियन या वर्तमानपत्राने विवरण दिले: “बेरिलिअम या मूलद्रव्याची विषबाधा झाल्यामुळे दोन महिन्याआधी एका स्थानिक स्त्रीचा मृत्यू झाला. किरणोत्सारीतेच्या तपासणीवरून असे कळून आले की, त्या सहलीच्या स्थळी, किरणोत्सारीतेची पातळी, आजूबाजूच्या परिसरापेक्षा १०० पटीने अधिक होती.”
बेरिलिअम हा, विविध प्रक्रियेने बनवलेला विलक्षण हलका धातू आहे. तो विमानाच्या कारखान्यात वापरला जातो, व क्षकिरण पाडल्यावर तो अणुशक्ती केंद्रांमध्ये वापरला जातो. उपलब्ध असलेल्या पुराव्याआधारे असे सांगितले जाते की, बेरिलिअम बनवणाऱ्या एका कारखान्याने, प्रकाश देण्याच्या घातक प्रक्रियेनंतर जो कचरा निघाला तो, आजूबाजूला किंवा त्या सहलीच्या ठिकाणी जवळपास टाकून दिला. द युरोपियन म्हणते की, “प्रकाश देण्याची प्रक्रिया झाली नसली तरी बेरिलिअमचा कचरा, औद्योगिक घाणीच्या सर्वात विषजन्य प्रकारातील एक आहे.”
मध्यंतरी, एका अहवालानुसार, सुमारे ३० वर्षांपर्यंत, किरणोत्सारीतेची घाण असलेले १७,००० डबे नोवाया झेमल्याच्या किनारपट्टीच्या पाण्यात टाकले गेले. १९५० च्या दशकाच्या सुरवातीच्या दरम्यान, पूर्वीचे सोव्हिएत युनियन राष्ट्र त्या किनारपट्टीचा, आण्विक चाचणीचे ठिकाण म्हणून वापरत होते. यासोबत, आण्विक पाणबुड्यांचे किरणोत्सारी भाग व जवळजवळ १२ अणुभट्ट्यांचे भाग या सोईस्कर कचराकुंडीत टाकले जात होते.
आण्विक प्रदुषण, उद्देशपूर्वक असो वा नसोत घातकच आहे. १९८९ मध्ये नॉर्वेजियन किनाऱ्याजवळ बुडालेल्या पाणबुडीबद्दल, टाईमने ताकीद दिली की: “फुटलेल्या पाणबुडीतून आधीच, कारसीनोजेनिक इसोटोप म्हणजेच, कॅन्सरला चिथवणाऱ्या पदार्थाची सिस्यम-१३७ गळती होत आहे. आतापर्यंत, ज्या मूलद्रव्याची गळती होते ते, जल सृष्टीवर किंवा मानवी आरोग्यावर कमी परिणाम करील असा विचार केला जात होता. परंतु कोमसोमोलेटस् नावाच्या पाणबुडीत, १३ किलो प्लुटोनियमचे दोन आण्विक पाणसुरुंग होते ज्यांचे अर्धे आयुष्य २४,००० वर्षांचे होते व त्याचा विषारीपणा इतका उच्च होता की, डागाने सुद्धा माणूस मरू शकतो. रशियन तज्ज्ञांनी ताकीद दिली आहे की, प्लुटोनियम पाण्यात सांडू शकते व ते १९९४ पूर्ण होण्याच्या आतच महासागराला दूषित करील.”
किरणोत्सारी कचऱ्याचा विनियोग करणे ही फ्रान्स आणि रशियाची एकच समस्या नाही, हे निश्चित. अमेरिकेत “किरणोत्सारी कचऱ्याचे ढिग लागले आहेत आणि त्यांना साठवण्यासाठी कायमस्वरूपी जागा नाही,” असा अहवाल टाईम देते. ते म्हणते की, घातक वस्तुंचे लाखो पिंप तात्पुरते साठवून ठेवले आहेत व “जर त्याचा दुरूपयोग केला तर हानी, चोरी किंवा पर्यावरणाचे नुकसान होण्याचा धोका” नेहमीच आहे.
या धोक्याचे उदाहरण द्यायचे झाले तर, एप्रिल १९९३ मध्ये टॉमस्क, सायबेरिया येथे पूर्वी शस्त्रे बनवण्याच्या केंद्रात आण्विक घाण साठवून ठेवलेल्या एका टाकीचा स्फोट झाला. यामुळे, चर्नोबल सारखाच अपघात होतो की काय अशा भीतीचे चित्र लोकांच्या मनात उमटले आहे.
स्पष्टपणे मग, आण्विक धमकीचा कल्पित अंत यावर आधारित शांती आणि सुरक्षिततेसाठी करत असलेल्या घोषणा भक्कम पायावर नाहीत. तरीही शांती आणि सुरक्षितता जवळ आहे. ते आम्हाला कसे कळते?
[४ पानांवरील चौकट]
आण्विक शक्ती
१२ राष्ट्रे व संख्या अजूनही वाढत आहे
घोषित केले किंवा प्रत्यक्षात आहेत: बेलॉरॉस, ब्रिटन, चीन, फ्रान्स, भारत, इस्त्राएल, खझाकस्तान, पाकिस्तान, रशिया, दक्षिण आफ्रिका, युक्रेन, अमेरिका
संभाव्य: अल्जेरिया, अर्जेंटिना, ब्राझील, इराण, इराक, लिबिया, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, सिरिया, तायवान
[५ पानांवरील चित्रं]
आण्विक शक्तीचा शांतीकारक वापरसुद्धा घातक ठरू शकतो