भयातून मुक्तता, अगदी जवळ!
मानव जरी जन्मापासून मृत्युपर्यंत भयात जगत असला तरी, आम्ही अगदी आत्मविश्वासाने नजिकच्या भवितव्यातील एका अशा समयाची वाट पाहू शकतो जेव्हा, येशू ख्रिस्ताकरवी देवाचे राज्य अनंतकाळासाठी, आजार आणि मृत्युचा समावेश असलेल्या सर्व दुःखाचे उच्चाटन करील. या नियतकालिकाने, देवाच्या या प्रेमळ तरतूदींचा फायदा घेण्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे ते दाखवले आहे. तुम्हाला याविषयीची जास्त माहिती हवी असेल, किंवा तुमच्या घरी कोणी येऊन तुमच्यासोबत मोफत गृह पवित्र शास्त्राभ्यास करण्याची तुमची इच्छा असेल तर, कृपया Watch Tower, H-58 Old Khandala Road, Lonavla 410 401, Mah., India, किंवा पृष्ठ २ वर दिलेल्या योग्य पत्त्यावर लिहा.