तुम्ही मतभेदांना कसे मिटवता?
विचित्र हालचाल—दर्शनी फळीवरील ओळीने लावलेल्या चिनी मातीच्या पाच हत्तीतील तिसरा हत्ती खाली पडला. तो तुटलेला हत्ती परत जोडावा लागेल. नाहीतर, संपूर्ण संचाचा सुसंगतपणा नाहीसा होईल. परंतु, त्याला जोडण्याची क्रिया फारच नाजूक आहे, व ते करण्यासाठी तुम्ही स्वतः पात्र नाही असे वाटते. यासाठी, तुम्हाला एखाद्या कुशल कारागिराचा सल्ला घ्यावा लागेल किंवा त्याच्याकडून काम करुन घ्यावे लागेल.
आध्यात्मिक बंधू आणि बहिणीसोबतचे ऐक्य एखाद्या अलंकारापेक्षा अधिक मौल्यवान आहे. स्तोत्रकर्त्याने उचितपणे हे गायिले: “पाहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे!” (स्तोत्र १३३:१) सहख्रिश्चनासोबत एखादा मतभेद मिटवणे ही गोष्ट कधी कधी नाजूक वाटू शकते. शिवाय, काही जण योग्य मार्गाने हे करीत नाहीत. अनेकदा, असे “जोडणे” अनावश्यक दुःखाचे असू शकते किंवा ते सबळ नसते आणि कुरूप चिन्ह मागे ठेवते.
काही ख्रिस्ती स्वतःला हाताळता येऊ शकतील अशा गोष्टीत, नेमलेल्या वडिलांना अनावश्यकपणे सामील करतात. काय करावे याची त्यांना खात्री नसल्यामुळे कदाचित असे असू शकते. पवित्र शास्त्राचा सल्ला देण्यात अनुभवी असणाऱ्या एका बांधवाने म्हटले, “आमच्या अनेक बांधवांना, मतभेदांना मिटवण्यासाठी पवित्र शास्त्राच्या सल्ल्याचे अनुकरण कसे करावे हे माहीत नाही.” त्यांनी पुढे म्हटले, “येशू ज्याप्रकारे काही गोष्टींना हाताळत होता त्याचे अनुकरण अनेकदा ते करीत नाही.” यास्तव, ख्रिश्चनाने त्याच्या बांधवासोबतच्या मतभेदाला कसे मिटवावे याविषयी येशू नक्की काय म्हणत होता? या सल्ल्याशी चांगले परिचित होणे व त्याचा कसा अवलंब करावा हे शिकून घेणे महत्त्वाचे का आहे?
क्षुल्लक मतभेद
“ह्यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर.”—मत्तय ५:२३, २४.
येशू हे बोलला तेव्हा यहूदी, संप्रदायाप्रमाणे अर्पणे वाहत, किंवा यरूशलेमाच्या मंदिरातील वेदीवर दाने देत होते. एखाद्या यहूद्याने सहइस्राएल व्यक्तीविरुद्ध काही चूक केली असल्यास, चूक करणाऱ्याने पूर्ण होमार्पण किंवा पापार्पण करावयाचे होते. येशूने सांगितलेले उदाहरण निर्णायक वेळी घडले. एखादी व्यक्ती वेदीजवळ आहे, व त्याचे दान देवाला अर्पण करण्याच्या बेतास आहे, तेव्हाच त्या व्यक्तीला आठवते की, त्याच्या बांधवाच्या मनात त्याच्याविरूद्ध काही आहे. होय, इस्राएल मनुष्याने त्याच्या बांधवाबरोबर समेट करणे ही गोष्ट धार्मिक कर्तव्य पार पाडण्यापेक्षा आधी विचारात घ्यावयाची होती.
मोशेच्या नियमशास्त्रात अशा अर्पणांची आवश्यकता असली तरी, देवाच्या दृष्टीने त्या वस्तुंना अधिक अर्थ नव्हता. शमुवेल संदेष्ट्याने अविश्वासू राजा शौल याला म्हटले: “परमेश्वराचा [यहोवा, NW] शब्द पाळिल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे; एडक्यांच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे.”—१ शमुवेल १५:२२.
येशूने डोंगरावरील त्याच्या प्रवचनात, प्राथमिकतेची यादी दिली व अर्पणे वाहण्याआधी शिष्यांनी त्यांच्या मतभेदांना सोडविले पाहिजे हे दाखवले. आज ख्रिश्चनांकडून आध्यात्मिक प्रकारच्या अर्पणांची—“त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ” याची अपेक्षा केली जाते. (इब्रीयांस १३:१५) तथापि, या तत्त्वाला अजूनही महत्त्व आहे. अशाचप्रकारे प्रेषित योहानाने दाखवले की, देवावर प्रेम करण्याचा दावा करुन कोणी आपल्या बंधूचा द्वेष करीत असल्यास ते व्यर्थ आहे.—१ योहान ४:२०, २१.
चित्तवेधकपणे, एखाद्या व्यक्तीला, बांधवाच्या मनात त्याच्याविरुद्ध काही आहे असे आठवले तर त्याने पहिले पाऊल उचलले पाहिजे. त्याने प्रदर्शित केलेल्या लीनतेमुळे याचे चांगले फळ मिळते. मन दुखावले गेलेल्या व्यक्तीकडे एखादा स्वतःची चूक कबूल करण्यासाठी येतो, तेव्हा तो त्याला सहकार्य देण्याचे शक्यतो नाकारणार नाही. मोशेच्या नियमशास्त्रात, कोणी एखाद्या वस्तुचा अपहार केल्यास तिची पूर्ण भरपाई करुन वर आणखी एक पंचमांश देण्याची अट होती. (लेवीय ६:५) अशाचप्रकारे, दुखावणारा व्यक्ती ज्याची अपेक्षा केली जाते त्यापेक्षाही पुढे जाण्याची इच्छा दाखवत असल्यास, शांतीदायक, सलोख्याचे संबंध पूर्ववत करण्यास सोपे करील. याचा स्पष्ट अर्थ, त्याने केलेल्या कोणत्याही नुकसानीला सुधारण्यासाठी ते अगदी बरोबर असेल.
तथापि, शांतीदायक संबंध पूर्ववत आणण्याच्या प्रयत्नांना नेहमीच यश मिळत नाही. नीतीसूत्राचे पुस्तक आम्हाला आठवण करुन देते की, प्रतिसाद देण्यास कठीण वाटणाऱ्यांसोबत मतभेदांना मिटवणे कठीण असते. नीतीसूत्रे १८:१९ म्हणते: “दुखविलेल्या भावाची समजूत घालणे मजबूत शहर जिंकण्यापेक्षा अवघड आहे; कलह म्हटले म्हणजे ते दुर्गाच्या अडसरांसारखे होत.” दुसरे एक भाषांतर असे म्हणते: “रूष्ट झालेल्या भावाला शांत करणे हे बळकट नगर जिंकण्यापेक्षा अवघड आहे, आणि असले विवाद कोटाच्या अडसरांसारखे आहेत.” (पंडिता रमाबाई भाषांतर) तथापि, देवाला संतुष्ट करण्याची इच्छा असलेल्या सहविश्वासूंच्या प्रामाणिक व लीनतेने केलेल्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता असते. पण गंभीर पापाचा आरोप लावला असल्यास, मत्तयाच्या १८ व्या अध्यायात नमूद केलेल्या येशूच्या सल्ल्याचा अवलंब होऊ शकतो.
गंभीर मतभेदांना मिटवणे
“तुझ्या भावाने तुझा अपराध केला, तर त्याच्याकडे जा, तुम्ही दोघे एकांती असतांना त्याचा अपराध त्याला दाखीव; त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळविलास असे होईल. परंतु त्याने जर न ऐकले तर तू आणखी एका-दोघास आपणाबरोबर घे; अशासाठी की, दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द शाबीत व्हावा; आणि जर त्याने त्यांचे न ऐकले तर मंडळीला कळीव आणि जर त्याने मंडळीचेहि न ऐकले तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार ह्यांच्यासारखा होवो.”—मत्तय १८:१५-१७.
एखादी यहुदी व्यक्ती (किंवा नंतर ख्रिस्ती झालेल्या) व्यक्तीला यहोवाच्या सहउपासकासोबत गंभीर समस्यांचा सामना करावा लागला तर काय? आपल्याविरूद्ध पाप करण्यात आले आहे असे वाटणाऱ्याने पहिले पाऊल उचलले पाहिजे. त्याने दुखवणाऱ्यासोबत प्रथम या गोष्टीची खाजगीत चर्चा करावयाची होती. आपली बाजू अधिक जोरदार मांडण्याचा प्रयत्न न केल्यामुळे त्याला आपल्या भावाला परत मिळवून घेण्याची अधिक शक्यता होती. खासपणे केवळ गैरसमज घडला आहे व तो लगेच दूर करता येत असला तर, हे अधिक चांगलेपणाने साध्य होऊ शकत होते. थेटपणे गोवलेले असलेल्यांनाच फक्त त्या गोष्टीची माहिती आहे तर, हे सर्वकाही सोप्या रितीने मिटवता येऊ शकते.
परंतु, पहिले पाऊल उचलणे कदाचित पुरेसे ठरणार नाही. ती परिस्थिती हाताळण्यासाठी येशूने म्हटले: “एका-दोघास आपणाबरोबर घे.” हे चांगल्याप्रकारे प्रत्यक्ष साक्षीदार असतील. कदाचित त्यांनी एका व्यक्तीने दुसऱ्याची नालस्ती केल्याचे ऐकले असेल, किंवा ज्याबद्दल आता दोन्ही पक्षात दुमत झाले आहे, त्या लेखी करारासाठी साक्षीदार म्हणून त्यांना नेले असेल. दुसऱ्या बाजुला पाहता, समस्याचे कारण सिद्ध करण्यासाठी कोणत्याही लेखी किंवा तोंडी कारणीभूत गोष्टी बनवल्या जातात तेव्हा, सोबत नेलेल्या व्यक्ती साक्षीदार होऊ शकतात. येथेही, शक्यतो कमी लोकांस—“एक-दोघास”—ही गोष्ट माहीत असावी. हे, एखादी गोष्ट केवळ गैरसमजुतीमुळे झाली असल्यास ती वाईट होण्याच्या पराकाष्ठेला टाळू शकेल.
मन दुःखावलेल्या व्यक्तीची काय प्रवृत्ती असली पाहिजे? त्याने सहख्रिश्चनाची मानहानी करुन व त्याला लज्जित करण्याचा प्रयत्न करावा का? येशूच्या सल्ल्याच्या दृष्टिकोनातून पाहता, ख्रिश्चनांनी त्यांच्या बांधवांचे लगेच खंडन करु नये. पापी व्यक्तीला तिची चूक कळते, क्षमा मागते व ती गोष्ट सुधारण्याचा प्रयत्न करते तेव्हा, याद्वारे ज्याच्याविरुद्ध पाप केले आहे त्याला तो बांधव ‘परत मिळवत असतो.’—मत्तय १८:१५.
ती गोष्ट मिटवता येत नसल्यास, ती मंडळीकडे नेण्यास हवी होती. सुरवातीला याचा अर्थ यहुद्यांचे वडीलजन असा होतो पण नंतर, त्याचा अर्थ ख्रिस्ती मंडळीतील वडिलांना लागू होतो. पश्चात्ताप न करणाऱ्या अपराध्याला मंडळीतून बहिष्कृत केले जाऊ शकते. त्या व्यक्तीला “परराष्ट्रीय किंवा जकातदार” समजण्याचा हाच अर्थ होतो. कारण, यहुदी लोक अशा लोकांपासून दूर राहत असत. हे गंभीर पाऊल कोणताही ख्रिस्ती वैयक्तिकपणे घेऊ शकत नव्हता. हे कार्य करण्याचा अधिकार मंडळीचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या नेमस्त वडिलांनाच आहे.—पडताळा १ करिंथकर ५:१३.
पश्चात्ताप न केलेल्या अपराध्याला बहिष्कृत करण्याची शक्यता दाखवते की, मत्तय १८:१५-१७ क्षुल्लक मतभेदांशी संबंधित नाही. अपराधात गोवलेल्या दोन व्यक्तीमध्ये मिटवता येतील अशा प्रकारच्या गंभीर अपराधांचा उल्लेख येशू करीत होता. उदाहरणार्थ, हा अपराध कदाचित निंदानालस्तीचा असू शकतो, ज्यात ज्याची निंदा केली जाते त्याच्या ख्यातिवर गंभीर परिणाम होतो. किंवा त्याचा संबंध आर्थिक बाबींशी असू शकतो कारण, पुढील वचनांत येशूचा, मोठे कर्ज असणाऱ्या क्षमा केलेल्या दयाहीन दासाचा दाखला आढळतो. (मत्तय १८:२३-३५) ठरलेल्या वेळी कर्ज न फेडणे ही प्रासंगिक समस्या दोन व्यक्तींमध्ये सहजपणे मिटवता येऊ शकते. परंतु, एखाद्या व्यक्तीने, उसने घेतलेले कर्ज फेडण्याचे हटवादीपणे नाकारले तर ते चोरी करण्याइतके गंभीर पाप देखील होऊ शकते.
इतर पापे दोन ख्रिश्चनांमध्ये सहजपणे मिटवता येऊ शकत नाहीत. मोशेच्या नियमशास्त्रात गंभीर पापांना कळवावे लागत होते. (लेवीय ५:१; नीतीसूत्रे २९:२४) अशाचप्रकारे, ज्यात मंडळीची शुद्धता गोवलेली असते, अशा गंभीर पापांना ख्रिस्ती वडिलांना कळविले गेलेच पाहिजे.
तथापि, यात ख्रिश्चनांमध्ये उडणाऱ्या खटक्यांच्या, बहुतेक बाबी येत नाहीत.
तुम्हाला केवळ क्षमा करणे जमेल का?
येशूने गंभीर मतभेदांना कसे मिटवता येऊ शकते हे सांगितल्यावर लगेच, त्याने आणखी एक महत्त्वाचा धडा शिकवला. आपण वाचतो: “तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, ‘प्रभुजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? सात वेळा काय?’ येशू त्याला म्हणाला: ‘सात वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर साताच्या सत्तर वेळा.’” (मत्तय १८:२१, २२) येशूने आणखी एके प्रसंगी त्याच्या शिष्यांना “दिवसातून सात वेळा” क्षमा करण्याचे सांगितले. (लूक १७:३, ४) यास्तव, ख्रिस्ताच्या अनुयायांना मुक्तपणे एकदुसऱ्यांना क्षमा करुन मतभेदांना मिटवण्याचे आर्जवले हे स्पष्टच आहे.
पुष्कळ प्रयत्नांची गरज असणारे हे क्षेत्र आहे. “काही बांधवांना, क्षमा कशी करावी हे अजिबात माहीत नाही,” असे सुरवातीला उद्धृत केलेल्या व्यक्तीने म्हटले. त्यांनी आणखी असे म्हटले: “ख्रिस्ती मंडळीत शांती टिकवण्यासाठी त्यांनी क्षमा करण्याचे धोरण, प्रथम व प्रामुख्यत्वे निवडावे असे कोणी सांगत असल्यास त्याचे त्यांना आश्चर्य वाटते असे दिसते.”
प्रेषित पौलाने लिहिले: “एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे काही गाऱ्हाणे असल्यास आपसांत क्षमा करा; प्रभूने [यहोवा, NW] तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीहि करा.” (कलस्सैकर ३:१३) या कारणास्तव, ज्या बांधवाने आम्हाला दुखावले असेल त्याच्याकडे जाण्याआधी, पुढील प्रश्नांचा विचार करणे चांगले असेल: हा अपराध खरोखर त्याच्याशी बोलण्याच्या योग्यतेचा आहे का? मला, खऱ्या ख्रिश्चनत्त्वाच्या आत्म्यात, झाले गेले ते विसरुन जाणे खरेच अशक्य आहे का? मीच जर त्या जागी असलो असतो तर, मला क्षमा केली जावी असे वाटले नसते का? मी क्षमा न करण्याची निवड केल्यास, देवाने माझ्या प्रार्थनांची उत्तरे द्यावी आणि मला क्षमा करावी अशी अपेक्षा करु शकतो का? (मत्तय ६:१२, १४, १५) हे प्रश्न क्षमाशील राहण्यासाठी आमची चांगल्याप्रकारे मदत करु शकतात.
ख्रिश्चन या नात्याने आमची प्रमुख जबाबदारी, यहोवाच्या लोकांच्या मंडळीतील शांती टिकवणे ही होय. या कारणास्तव, येशूच्या सल्ल्याला अंमलात आणू या. हे आम्हाला मुक्तपणे क्षमा करण्यास मदत करील. असा क्षमा करणारा आत्मा, येशूच्या शिष्यांचे ओळखचिन्ह असणाऱ्या बंधूप्रीतीत वाढ करील.—योहान १३:३४, ३५.
[२३ पानांवरील चित्रं]
येशूच्या सल्ल्याचा अवलंब करून ख्रिस्ती, मतभेदांना टाळू शकतात