संपूर्ण जगभरातील यहोवाचे साक्षीदार कोलंबिया
कोलंबिया, हा एक अद्वितीय दक्षिण अमेरिकी प्रदेश आहे. अटलांटिक आणि पॅसेफिक महासागराने या ज्वालामुखीजन्य राष्ट्राच्या किनारपट्टीला कवटाळले आहे. सखल प्रदेशाच्या उष्ण कटिबंधातील व अँडीज पर्वंतांच्या हिमाच्छादित शिखरांवरील थंड हवामानात फरक आहे.a
कोलंबिया, सोने आणि पाचू यासाठी नावाजलेले असले तरी, तेथील लोक सर्वात बहुमूल्य ठेवा आहेत. आज, यहोवा त्याचे आध्यात्मिक घर वैभवाने भरवत आहे. तेथे, सुशोभित, इष्ट उपासक पृथ्वीच्या सर्व भागातून, ज्यात कोलंबियाचा देखील समावेश आहे, येत आहेत.—हाग्गय २:७.
व्यापारी व्यवस्थापक प्रभावित
बोगोटाच्या वायव्येकडील २६ मैलावर असलेल्या फॉकॉटॉटिवॉ येथील वॉचटावर संस्थेचे नवे शाखा कार्यालय आणि छपाई सुविधांचे समर्पण, रविवार, नोव्हेंबर १, १९९२, रोजी पार पडले. मार्गदर्शकाद्वारे केलेल्या शाखा दप्तराच्या पाहणीमुळे अभ्यागतांवर खूप मोठा प्रभाव पडला आहे. एका अभ्यागताने, त्याच्या स्वतःच्या कारखान्यात पुन्हा गेल्यावर, त्याच्या व्यवस्थापकांना उत्साहाने गळ घातली की, त्यांनी जाऊन त्या संघटनेला भेट द्यावी जेथे ‘कार्यक्षमता, व्यवस्था आणि कामगारांचे मानसिक धैर्य याबद्दलचे आश्चर्य’ पाहावयास मिळेल. व्यवस्थापकांच्या त्यानंतरच्या भेटीदरम्यान, त्यांनी सखोल आस्था दाखवली आणि अनेक प्रश्न विचारले.
या व्यवस्थापकांची, त्यांच्या सर्व अधीक्षकांना, पर्यवेक्षकांना आणि कार्यदेशकांना—वास्तविक पाहता त्यांच्या सर्व कामकऱ्यांना भेट देण्यासाठी पाठवण्याची इच्छा होती. प्रत्येक आठवड्यात ते, १५ ते २५ कामगारांना भेट देण्याची व्यवस्था करत जेणेकरून, त्यांच्या कारखान्यातील एकूण १,३०० कामगार अशा प्रकारच्या संघटनात्मक कार्यक्षमेतेचे निरिक्षण करू शकतील.
त्यांच्या शेकडो कामगारांनी शाखा सुविधांना भेट दिली आणि जेहोवाज विटनेसेस—द ऑरग्नायजेशन बिहाईन्ड द नेम ही व्हिडिओ फिल्म पाहिली. संघटनेचा विस्तार आणि राज्य प्रचार कार्याची जगभरातील व्याप्तीने प्रभावित होऊन, संस्थेच्या कार्यात वापरण्यात येणारे उच्च प्रतीचे तंत्रज्ञान पाहून ते अचंबित झाले. निघताना, अनेक जणांना असे म्हटल्याचे ऐकण्यात आले की, ते, जणू काही ‘नंदनवन सोडून, विसंघटित जगात पुन्हा जात आहेत.’
सर्वांकडे सत्य पोंहचते
सर्व प्रकारच्या लोकांपर्यंत सुवार्ता पोंहचवली जात आहे. (१ तीमथ्य २:३, ४) उदाहरणार्थ, पूर्वी हेवी मेटल रॉक बँडचा रचनाकार व नेता असलेल्या एका व्यक्तीने पवित्र शास्त्रीय सत्याचा स्वीकार केला, त्याच्या जीवनात बदल केले, आणि लवकरच एक नियमित पायनियर बनला. पुढे त्याला सेवा-सेवक म्हणून नियुक्त केले गेले. घातपात करणाऱ्या गटातील सदस्य असलेले अनेक जण, यहोवाच्या राज्यावर विश्वास आणि आशा ठेवण्यास शिकले आहेत. ते आता सक्रियतेने एका शांतीपूर्ण नव्या जगाच्या संदेशाचा प्रचार करण्यात गोवलेले आहेत.
मादक पदार्थांच्या व्यसनाधीन आणि त्यांचा व्यापार करणारे हे देखील सत्याकडे वळाले आहेत. एक तरुण जो आता साक्षीदार आहे तो, या प्रकारची जीवनशैली बदलण्यापूर्वी, जंगलामध्ये पाच वर्षांपर्यंत पूर्वी मादक पदार्थांची लागवड व कोकेनच्या प्रयोगशाळेचा कारभार पाहत होता. त्याला पवित्र शास्त्रीय तत्त्व शिकण्यात आणि आचरण्यात आनंद मिळाला आहे. एका गुन्हेगारांच्या सुधारणागृहात, हत्या करणारे गुन्हेगार, पवित्र शास्त्राचा प्रामाणिकपणे अभ्यास केल्यावर यहोवाकडे अगदी कळकळीने प्रार्थना करीत आहेत की, त्याने त्यांची पापे क्षमा करावीत व त्यांना त्याचे सेवक म्हणून स्वीकारावे.
तर, ते या प्रकारचे लोक आहेत जे राज्याच्या संदेशाला प्रतिसाद देतात. इतर ठिकाणाप्रमाणेच, कोलंबियात यहोवा त्याचे घर वैभवाने भरवत आहे.
[तळटीपा]
a जास्त माहितीसाठी, यहोवाच्या साक्षीदारांची १९९४ दिनदर्शिका पहा.
[८ पानांवरील चौकट]
राष्ट्राचे पार्श्वचित्र १९९३ सेवा वर्ष
साक्ष देणाऱ्यांचा उच्चांक: ६०,८५४
प्रमाण: ५५८ जणांसाठी १ साक्षीदार
स्मारक विधीची उपस्थिती: २,४९,२७१
पायनियर प्रचारकांची सरासरी: ८,४८७
पवित्र शास्त्राभ्यासांची सरासरी: १,००,९२७
बाप्तिस्मा घेतलेल्यांची संख्या: ५,१८३
मंडळ्यांची संख्या: ७५१
शाखा दप्तर: फॉकॉटॉटिवॉ
[९ पानांवरील चित्रं]
१९५६ मध्ये, शाखा कार्यालयाचा कर्मचारीवर्ग आणि मिशनरी
[९ पानांवरील चित्रं]
शाखा दप्तराचे विमानातून घेतलेले दृश्य