वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ७/१५ पृ. १०-१५
  • तुमच्या विवाहास टिकाऊ बंधन बनवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमच्या विवाहास टिकाऊ बंधन बनवा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • विवाहाचा स्थायीपणा
  • मस्तकपद व अधीनता
  • दळणवळण—विवाहाचे जीवनीरक्‍त
  • मतभेदांना हाताळणे
  • एकमेकांना विश्‍वासू राहा
  • ख्रिस्ती विवाह यशस्वी कसा बनवाल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • देवाने जे जोडले आहे ते तोडू नका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • टिकाऊ विवाहाकरता दोन गुरुकिल्ल्या
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
  • तुमचं वैवाहिक नातं मजबूत आणि आनंदी बनवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ७/१५ पृ. १०-१५

तुमच्या विवाहास टिकाऊ बंधन बनवा

“देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.”—मत्तय १९:६.

१. आज खऱ्‍या ख्रिश्‍चनांमध्ये वैवाहिक यशाचा कोणता आधार आहे?

यहोवाच्या लोकांमधील हजारो जण आज समाधानी तसेच, धीराने टिकणाऱ्‍या विवाहांचा आनंद लुटत आहेत. तथापि, अशाप्रकारातील विस्तृत प्रमाणाचे यश ही काही आकस्मिक घटना नव्हे. दोन्ही सोबती (१) विवाहासंबंधी असलेल्या देवाच्या दृष्टिकोनांचा आदर करतात तसेच, (२) त्याच्या वचनातील तत्त्वांनुरूप राहण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ख्रिस्ती विवाह उत्कर्ष पावतात. शेवटी, देवानेच स्वतः वैवाहिक व्यवस्थेची स्थापना केली आहे. तोच असा आहे ज्याला ‘पृथ्वीवरील प्रत्येक वंशास त्यावरून नाव देण्यात येते.’ (इफिसकर ३:१४, १५) विवाहाला यशस्वी बनविण्यासाठी कशाची जरुरी असते हे यहोवाला माहीत असल्यामुळे, त्याच्या मार्गदर्शनाचे अवलंबन करण्यामुळे आम्हा स्वतःला लाभ मिळतो.—यशया ४८:१७.

२. विवाहात पवित्र शास्त्रातील तत्त्वांचा अवलंब करण्यात मागे पडल्यामुळे कोणते परिणाम घडतात?

२ याउलट, पवित्र शास्त्राच्या तत्त्वांचा अवलंब करण्यात अपयशी होण्याचे पर्यवसान वैवाहिक दुर्दशेत होऊ शकते. काही तज्ज्ञ असा विश्‍वास बाळगतात की, आज अमेरिकेत विवाहित होणारे जास्तीत जास्त दोन तृतीयांश लोक सरतेशेवटी घटस्फोट घेतील. ख्रिस्ती देखील या ‘शेवटल्या काळाच्या कठीण दिवसात’ दबाव व ताण यापासून मुक्‍त नाहीत. (२ तीमथ्य ३:१) आर्थिक तणाव व नोकरीवरील दबावाचा घातक परिणाम कोणत्याही विवाहावर होऊ शकतो. काही ख्रिश्‍चनांना, त्यांचे सोबती पवित्र शास्त्रीय तत्त्वांचा अवलंब करण्यात मागे पडल्यामुळे, घोर निराशा मिळाली आहे. एक ख्रिस्ती पत्नी म्हणते, “मी यहोवावर प्रीती करते परंतु, २० वर्षांपासून माझा विवाह पुष्कळ समस्यांनी ग्रासलेला आहे. माझे पती स्वार्थी आहेत व कोणताही बदल करण्याची त्यांची इच्छा नाही. मला पेचात पडल्याचे वाटते.” अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया बहुतेक ख्रिश्‍चन पती व पत्नीं यांनी व्यक्‍त केल्या आहेत. काय चुकत आहे? विवाहाला भावशून्य बेपर्वाई किंवा उघड वैर यामध्ये वाहवत जाण्यापासून काय परावृत्त करु शकते?

विवाहाचा स्थायीपणा

३, ४. (अ) विवाहासाठी देवाचा स्तर कोणता आहे? (ब) विवाहाचा स्थायीपणा न्याय्य व लाभदायक का आहे?

३ कितीही चांगल्या परिस्थिती असल्या तरी, विवाह अपरिपूर्ण व्यक्‍तींचे एक बंधन आहे. (अनुवाद ३२:५) यामुळेच, प्रेषित पौलाने म्हटले की, “अशांना [जे लग्न करतात] हालअपेष्टा भोगाव्या लागतील.” (१ करिंथकर ७:२८) काही पराकाष्टेच्या परिस्थितीचे देखील विभक्‍तता किंवा घटस्फोटात पर्यवसान होऊ शकते. (मत्तय १९:९; १ करिंथकर ७:१२-१५) तरीपण, अनेक बाबतीत ख्रिस्ती लोक पौलाच्या सल्ल्याचा अवलंब करतात: “पत्नीने पतीपासून वेगळे होऊ नये . . . पतीनेही पत्नीला सोडू नये.” (१ करिंथकर ७:१०, ११) खरे म्हणजे, विवाहाचा अर्थ, कायमचे बंधन असा होता कारण, येशू ख्रिस्ताने म्हटले: “देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.”—मत्तय १९:६.

४ एखाद्याला प्रतिकूल किंवा प्रेमरहित विवाहात अडकल्यासारखे वाटत असल्यास, त्याला यहोवाचे दर्जे निष्ठुर व अव्यवहारिक वाटू शकतात. पण ते तसे नाही. देवभीरू जोडप्याला वैवाहिक बंधनातील स्थायीपणा, त्रासाचे पहिले चिन्ह दिसते तेव्हा आपली जबाबदारी सोडून देण्याऐवजी समस्यांना तोंड देण्यासाठी तसेच, त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देतो. विवाहाला २० पेक्षा अधिक वर्षे झालेल्या गृहस्थाने अशाप्रकारे म्हटले: “तणाव तुम्ही टाळू शकत नाही. तुम्ही एकदुसऱ्‍यांसोबत सर्वदाच आनंदी राहू शकणार नाही. त्यावेळी वचनबद्धता खरोखर महत्त्वाची असते.” अर्थातच, ख्रिस्ती वैवाहिक जोडप्यांना, विवाहाचा जनक यहोवा देव याविषयी त्यांची प्रमुख जबाबदारी वाटते.—पडताळा उपदेशक ५:४.

मस्तकपद व अधीनता

५. पौलाचा, पती आणि पत्नींसाठी कोणता सल्ला आहे?

५ या कारणास्तव, समस्या उद्धभवतात तेव्हा, ती वेळ त्यापासून दूर जाण्याचा शोध करण्याची नसून, देवाच्या वचनातील सल्ल्याचा चांगल्याप्रकारे अवलंब करण्याची असते. उदाहरणार्थ, इफिसकर ५:२२-२५, २८, २९ मधील पौलाच्या शब्दांचा जरा विचार करा: “स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपआपल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे, तसा पति पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, तसे स्त्रियांनीहि सर्व गोष्टीत आपल्या पतीच्या अधीन असावे. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली तशी तुम्हीहि आपआपल्या पत्नीवर प्रीति करा; ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले. त्याचप्रमाणे, पतींनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीति करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीति करितो तो स्वतःवरच प्रीति करितो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही; तर तो त्याचे पालनपोषण करितो; तसे ख्रिस्त देखील मंडळीचे करितो.”

६. ख्रिस्ती पतींनी जगीक पुरूषांपासून कशाप्रकारे वेगळे असले पाहिजे?

६ पुरुषांनी अनेकदा पतीच्या अधिकाराचा दुरूपयोग केला व त्यांच्या पत्नींना कह्‍यात ठेवले. (उत्पत्ती ३:१६) तथापि, पौलाने ख्रिस्ती पतींना आर्जवले की, त्यांनी जगातील पुरूषांपेक्षा वेगळे असले पाहिजे. पत्नीच्या जीवनातील प्रत्येक हालचालीवर नियंत्रण ठेवणारे जुलमी नसावे, तर त्याने ख्रिस्ताप्रमाणे असावे. निश्‍चितच, येशू ख्रिस्त हा पुरूष कठोर व हुकुमशहा कधीच नव्हता. त्याने त्याच्या अनुयायांना, “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जूं आपणांवर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवांस विसावा मिळेल,” असे म्हणून सन्मानाने व आदराने वागवले.—मत्तय ११:२८, २९.

७. पत्नीला प्रापंचिक नोकरी करावी लागते तेव्हा पुरूष तिला कशारितीने सन्मान देऊ शकतात?

७ ख्रिस्ती पती त्याच्या पत्नीला नाजूक पात्र समजून सन्मान देतो. (१ पेत्र ३:७) उदाहरणार्थ, समजा, तिला प्रापंचिक कामाला जावे लागते. तेव्हा तो या गोष्टीला विचारात घेऊन शक्यतो साहाय्यकारी व विचारशील राहील. स्त्रियांनी घटस्फोटाचे सांगितलेले प्रमुख कारण, त्यांच्या पतींनी मुलांकडे व घराकडे दुर्लक्ष केले, हे आहे. यामुळे, ख्रिस्ती पती संपूर्ण कुटुंबाच्या लाभासाठी घरामध्ये अर्थपूर्ण मार्गांनी मदत देण्याचा प्रयत्न करतो.

८. अधीनता ख्रिस्ती पत्नींना काय करण्यास भाग पाडते?

८ ख्रिस्ती पत्नींना सन्मानाने वागविल्यामुळे पतींच्या अधीन राहण्यास त्यांना अधिक सोपे जाते. तथापि, याचा अर्थ निंद्य गुलामगिरी नव्हे. देवाने हे जाहीर केले की, पत्नीने दास नव्हे, तर “अनुरूप” (“समरूप असणारी,” NW तळटीप) पुरूषासाठी योग्य असे काही व्हावयाचे होते. (उत्पत्ती २:१८) मलाखी २:१४ मध्ये पत्नीला पुरूषाची “सहकारिणी” म्हटले आहे. या कारणामुळे, पवित्र शास्त्रीय काळातील पत्नींनी पुष्कळशा स्वतंत्रतेचा व मोकळेपणाचा आनंद घेतला. “सद्‌गुणी स्त्री” विषयी पवित्र शास्त्र सांगते: “तिच्या पतीचे मन तिजवर भरवसा ठेवते.” खरोखर, तिजवर घरचा सर्वसाधारण कारभार पाहणे, अन्‍नसामग्रीच्या खरेदीवर देखरेख ठेवणे, स्थावर मालमत्तेच्या व्यवहाराची बोलणी करणे, तसेच छोटासा उद्योग सांभाळण्याच्या काही बाबी तिजवर सोपवल्या होत्या.—नीतीसूत्रे ३१:१०-३१.

९. (अ) पवित्र शास्त्रीय काळात देवभीरू स्त्रियांनी कशाप्रकारे खरी अधीनता दाखवली? (ब) ख्रिस्ती पत्नीला आज अधीन राहण्यासाठी काय मदत करु शकते?

९ तरीसुद्धा, देवभीरू स्त्रीने तिच्या पतीचा अधिकार ओळखला. उदाहरणार्थ, सारा “अब्राहामाच्या आज्ञेचे पालन करीत होती. ती त्याला धनी म्हणत असे.” हा काही सभ्यतेचा शिष्टाचार नव्हता परंतु, ते तिच्या अधीनतेच्या प्रामाणिकतेचे प्रतिबिंब होते. (१ पेत्र ३:६; उत्पत्ती १८:१२) तिने तिच्या पतीसोबत तंबूत वास्तव्य करण्यासाठी सुखसोयींनी युक्‍त असलेले ऊर नगर स्वेच्छेने सोडले. (इब्रीयांस ११:८, ९) परंतु, अधीनतेचा अर्थ जरुरीचे असेल तेव्हा, पत्नी काही जबाबदारीपणाचे कार्य करु शकत नाही, असा होत नाही. मोशे, सुंतेविषयी देवाच्या नियमाचे पालन करण्यात मागे पडल्यावर त्याची पत्नी, सिप्पोराने निर्णायकपणे कार्य केल्याने संकट टळले. (निर्गम ४:२४-२६) अपरिपूर्ण पुरूषाला खूष करण्यापेक्षा अधिक यात समाविष्ट आहे. पत्नींनी “प्रभूसाठी आपआपल्या पतीच्या अधीन” असले पाहिजे. (इफिसकर ५:२२, NW) ख्रिस्ती पत्नी, देवासोबत असणाऱ्‍या तिच्या नातेसंबंधाच्या अनुषंगाने विचार करते तेव्हा, हे तिच्या पतीच्या क्षुल्लक चुकांकडे तसेच कमीपणाकडे दुर्लक्ष करण्यास तिला मदत करते. हीच गोष्ट पतीने तिच्यासोबत वागताना करण्याची गरज असते.

दळणवळण—विवाहाचे जीवनीरक्‍त

१०. विवाहासाठी दळणवळण किती महत्त्वपूर्ण आहे?

१० जोडपे एकमेकांपासून दूर होण्याचे कोणते एक प्रमुख कारण आहे असे विचारले तेव्हा, घटस्फोटाचे खटले हाताळणाऱ्‍या वकीलाने उत्तर दिले: “एकदुसऱ्‍यांसोबत प्रामाणिकपणे बोलण्याची, त्यांच्या आंतरिक भावना प्रकट करण्याची व एकमेकांना जिवलग मित्राप्रमाणे वागणूक देण्याची असमर्थता” या गोष्टी आहेत. होय, दळणवळण हे मजबूत विवाहाचे जीवनीरक्‍त आहे. पवित्र शास्त्र सांगते की, “मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात.” (नीतीसूत्रे १५:२२) उत्साही, सलगीच्या नातेसंबंधाचा आनंद घेत पती पत्नींनी ‘जिवलग मित्र’ असले पाहिजे. (नीतीसूत्रे २:१७) तरीही, दळणवळणाचा विषय येतो तेव्हा, अनेक जोडप्यांना हे कठीण वाटते. यामुळे संताप निर्माण करणारी चीड येते व शेवटी घातक क्रोधाचा उद्रेक होतो. किंवा वैवाहिक सोबती, शिष्टाचाराचा वरवरचा भपका दाखवून आतून मात्र भावनात्मकरित्या एकमेकांना दूर राखत असतील.

११. पती पत्नी मधील दळणवळण कसे सुधारता येऊ शकते?

११ समस्येचा एक भाग म्हणजे, पुरूष आणि स्त्रियांच्या दळणवळणाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. बहुतेक स्त्रियांना भावनांवर चर्चा करताना मोकळेपणा वाटतो, परंतु सामान्यपणे पुरूष वास्तविकतेवर चर्चा करण्याचे पसंत करतात. स्त्रियांचा कल, समभावना दाखविण्याकडे तसेच, भावनात्मक पाठबळ देण्याकडे अधिक असतो; तर पुरूषांचा, उपाय शोधण्याकडे व इलाज सांगण्याकडे कल असतो. तथापि, चांगले दळणवळण टिकवण्याच्या संभवनियतेसाठी, दोन्ही सोबत्यांनी “ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद” असण्याचा निश्‍चय करण्यास हवा. (याकोब १:१९) बोलताना नजरेला नजर भिडवा, व खरेपणाने लक्ष द्या. सहानुभूतीपूर्वक प्रश्‍न विचारून एकमेकांना बोलके करा. (पडताळा १ शमुवेल १:८; नीतीसूत्रे २०:५.) तुमचा सोबती समस्या सांगत असताना लगेच त्यावर उपाय सांगण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, त्या कशा सोडवता येतील याबद्दल मार्ग तयार करीत असताना काळजीपूर्वक ऐका; आणि नम्रपणे एकत्र मिळून प्रार्थना करुन ईश्‍वरी मार्गदर्शनाचा शोध घ्या.—स्तोत्र ६५:२; रोमकर १२:१२.

१२. ख्रिस्ती विवाहित सोबती एकमेकांकरता वेळ कसा काढू शकतात?

१२ कधीकधी जीवनातील दबाव व तणाव इतके असतात की, वैवाहिक सोबत्याला अर्थभरीत बोलण्यासाठी थोडासाही वेळ किंवा शक्‍ती राहत नाही. तथापि, ख्रिश्‍चनांनी त्यांच्या विवाहाला डागळण्यापासून आदरणीय व सुरक्षित ठेवण्यासाठी एकदुसऱ्‍यांच्या समीप असले पाहिजे. त्यांनी त्यांच्या बंधनाला महत्त्वपूर्ण, मोलवान समजण्याची गरज आहे, आणि हे करण्यास एकदुसऱ्‍यांसाठी वेळ काढला पाहिजे. (पडताळा कलस्सैकर ४:५.) काही बाबतीत पाहता, हितकारी गोष्टी बोलण्यास वेळ काढण्यासाठी अगदी सोपा उपाय म्हणजे, केवळ टीव्ही बंद करणे हा आहे. वैवाहिक सोबती, नियमितपणे चहा किंवा कॉफी घेण्यासाठी एकत्र बसल्याने भावनात्मकरित्या एकदुसऱ्‍यांसोबत दळणवळण करण्याची मदत त्यांना मिळू शकते. त्यामुळे अशा प्रसंगी ते कुटुंबाच्या विविध विषयावर ‘एकमेकांची मसलत’ घेऊ शकतात. (नीतीसूत्रे १३:१०) तसेच, चीड आणणाऱ्‍या क्षुल्लक गोष्टी व गैरसमज अधिक तणावाचे स्त्रोत बनण्याआधीच त्यावर बोलण्याची सवय जडवून घेणे किती सुज्ञतेचे आहे बरे!—पडताळा मत्तय ५:२३, २४; इफिसकर ४:२६.

१३. (अ) येशूने मोकळेपणा व प्रामाणिकपणाचे कोणते उदाहरण मांडले? (ब) विवाहित सोबती एकमेकांच्या जवळ येण्याचे कोणते काही मार्ग आहेत?

१३ एका गृहस्थाने कबूल केले: “अनेकदा, माझे दृष्टिकोन मोकळेपणाने व्यक्‍त करण्यासाठी व मला नेमके काय वाटते हे [माझ्या पत्नीला] सांगणे कठीण जातात.” तथापि, सलोखा विकसित करण्यासाठी स्वतःला उघड करणे, ही महत्त्वाची गुरूकिल्ली आहे. येशू त्याच्या भावी वधू वर्गाच्या बाबतीत किती स्पष्ट व प्रामाणिक होता, याकडे लक्ष द्या. त्याने म्हटले: “मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही; कारण धनी काय करितो ते दासाला ठाऊक नसते; परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे; कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे.” (योहान १५:१५) यास्तव, तुमच्या सोबत्याला मित्राप्रमाणे समजा. तुमच्या सोबत्यावर भावनांद्वारे भरवसा ठेवा. साधे, प्रामाणिक ‘प्रीतीचे आविर्भाव’ करण्याचा प्रयत्न करा. (गीतरत्न १:२, NW) मुक्‍तपणे केलेले दळणवळण कधी कधी विचित्रपणाचे वाटेल, पण दोन्ही वैवाहिक सोबत्यांनी पुरेसा प्रयत्न केल्यास त्यांच्या विवाहाला टिकाऊ बंधन बनवण्याच्या दृष्टीने अधिक साध्य केले जाऊ शकते.

मतभेदांना हाताळणे

१४, १५. झगडे कसे टाळता येऊ शकतात?

१४ वेळोवेळी खरोखरचे मतभेद नक्कीच उद्‌भवू शकतात. पण तुमच्या घराचा ‘कलहाच्या घरात’ ऱ्‍हास होऊ देऊ नका. (नीतीसूत्रे १७:१) मुलांना ऐकू जाऊ शकेल अशारितीने संवेदनाक्षम गोष्टींची चर्चा न करण्याची सावधानी बाळगा, आणि तुमच्या सोबत्यांच्या भावनांचा विचार करा. राहेलने तिच्या वांझपणाबद्दल तिचे दुःख व्यक्‍त करुन तिला मूल व्हावे याविषयी याकोबाला विचारले तेव्हा, त्याने रागाने म्हटले: “मी काय देवाच्या ठिकाणी आहे? त्याने तुझ्या पोटी फळ निपजू दिले नाही.” (उत्पत्ती ३०:१, २) घरगुती समस्या उद्‌भवतात तेव्हा, व्यक्‍तीवर कटू शब्दांचा हल्ला करु नका, तर समस्येला हाणून पाडा. खाजगी चर्चेच्या वेळी, “अविचाराचे भाषण” किंवा एकदुसऱ्‍यांना अनावश्‍यकपणे व्यत्यय आणून बोलण्याचे टाळा.—नीतीसूत्रे १२:१८.

१५ हे खरे आहे की, तुमच्या दृष्टिकोनाबद्दल तुमच्या अधिक दृढ भावना असतील, पण ह्‍या गोष्टी “सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा” यांच्याविना असाव्यात. (इफिसकर ४:३१) “तुमच्या समस्यांची सामान्य आवाजात चर्चा करा,” असे एका पतीने म्हटले. “आवाज वाढल्यास, चर्चा करण्याचे थांबवा. थोड्या वेळानंतर पुन्हा सुरू करा.” नीतीसूत्रे १७:१४ हा चांगला सल्ला देते: “भांडण पेटण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्यावी.” दोघांचाही राग शांत झाल्यावर पुन्हा त्या गोष्टीची चर्चा करण्याचा प्रयत्न करा.

एकमेकांना विश्‍वासू राहा

१६. व्यभिचार इतकी गंभीर बाब का आहे?

१६ इब्रीयांस १३:४ म्हणते: “लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्‍यांचा न्याय देव करील.” व्यभिचार देवाविरुद्ध पाप आहे. तसेच, ते विवाहाला बिघडवते. (उत्पत्ती ३९:९) विवाहाचे एक सल्लागार लिहितात: “व्यभिचार केल्याचे एकदा उघड झाले की, त्याचा आघात संपूर्ण कुटुंबावर एखाद्या प्रचंड चक्रीवादळाप्रमाणे होतो. त्यामुळे घराण्याची नासधूस होते, भरवसा व स्वतःविषयीच्या चांगल्या मताचे तुकडे तुकडे होतात, तरुणांना इजा पोहंचवली जाते.” गरोदरपण किंवा लैंगिक संक्रमणाद्वारे होणाऱ्‍या आजारातही त्याचे पर्यवसान होऊ शकते.

१७. व्यभिचारी ओढा कसा टाळला किंवा नाकारला जाऊ शकतो?

१७ काही लोक, पुस्तके, दूरदर्शन, व सिनेमात दाखवलेल्या लैंगिकतेबद्दल जगाच्या भ्रष्ट दृष्टिकोनाला बारकाईने पाहत असल्यामुळे ते व्यभिचारी मनोवृत्ती बाळगतात. (गलतीकर ६:८) संशोधक म्हणतात की, सामान्यपणे, व्यभिचार हा केवळ लैंगिक इच्छेमुळे घडत नसून, एखादी व्यक्‍ती दिसण्यात अजूनही आकर्षक आहे, हे शाबीत करण्यासाठी किंवा तिच्यावर अधिक प्रेम केले जावे या इच्छेमुळे होत असतो. (पडताळा नीतीसूत्रे ७:१८.) कोणतेही कारण असले तरी, ख्रिश्‍चनाने अनैतिक विलक्षण कल्पनांना नाकारले पाहिजे. सोबत्यासोबत तुमच्या भावनांची प्रामाणिकपणे चर्चा करा. आवश्‍यक असल्यास मंडळीच्या वडिलांची मदत घ्या. ज्यामुळे तुम्ही पापात पडण्याचे चांगल्याप्रकारे टाळू शकाल. शिवाय, ख्रिश्‍चनांनी विरुद्ध लिंगी सदस्यांबरोबर वागताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. एका व्यक्‍तीसोबत विवाहित असणे पण दुसऱ्‍या व्यक्‍तीकडे कामुकतेच्या भावनेने पाहणे हे शास्त्रवचनाच्या विरुद्धतेतील असेल. (ईयोब ३१:१; मत्तय ५:२८) ख्रिश्‍चनांनी सहकर्मचाऱ्‍यांसोबत भावनात्मक जवळीक वाढविण्याच्या बाबतीत खबरदारी घेतली पाहिजे. असे संबंध सलोख्याचे पण व्यवहारदक्ष ठेवा.

१८. विवाहात अनेकदा लैंगिक समस्याचे कोणते मूळ असते, व त्या कशा रीतीने मिटवता येऊ शकतात?

१८ यापेक्षा अधिक सुरक्षितता म्हणजे, स्वतःच्या सोबत्याबरोबर उत्साही व मोकळेपणाचा नातेसंबंध ठेवणे होय. अनेक संशोधकांचे मत आहे की, विवाहातील लैंगिक समस्यांचे स्वरुप काहीअंशी शारीरिक असले तरी, ती नेहमीच कमी दळणवळणाची निष्पत्ती असते. जोडपे जेव्हा स्पष्टपणे दळणवळण ठेवते व वैवाहिक हक्काला एक कर्तव्य समजण्याऐवजी ते प्रीतीचे वक्‍तव्य समजून पूर्ण करतात तेव्हा या संबंधीच्या समस्या फार कमी असतात.a अशा उचित परिस्थितीत, वैवाहिक बंधनाला बळकट करण्यासाठी सलगीचे संबंध मदत करु शकतात.—१ करिंथकर ७:२-५; १०:२४.

१९. “पूर्णता करणारे बंधन” काय आहे, व याचा विवाहावर काय परिणाम होऊ शकतो?

१९ ख्रिस्ती मंडळीत प्रीती, “पूर्णता करणारे बंधन” आहे. प्रीतीला विकसित करुन ईश्‍वरी वैवाहिक जोडपे ‘नेहमीच एकमेकांचे सहन व आपसांत क्षमा’ करू शकतात. (कलस्सैकर ३:१३, १४) तत्त्वावर आधारित असलेली प्रीती इतरांचे हित पाहत असते. (१ करिंथकर १३:४-८) अशा प्रकारची प्रीती विकसित करा. ही तुमच्या वैवाहिक बंधनाला बळकट बनवण्यास तुम्हाला मदत करील. तुमच्या वैवाहिक जीवनात पवित्र शास्त्रीय तत्त्वांचा अवलंब करा. यामुळे तुमचा विवाह टिकाऊ बंधनाप्रमाणे शाबीत होईल व त्यामुळे यहोवा देवाला महिमा व सन्मान आणला जाईल.

[तळटीपा]

a “दळणवळण—केवळ बोलण्यापेक्षा अधिक,” ऑगस्ट १, १९९३ च्या द वॉचटावर मध्ये आलेल्या लेखात, जोडपे या बाबतीत असणाऱ्‍या समस्यांवर कशी मात करु शकतात हे दाखवले आहे.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

▫ विवाह हे कायमचे बंधन का असले पाहिजे?

▫ मस्तकपद व अधीनतेबद्दल पवित्र शास्त्राचा काय दृष्टिकोन आहे?

▫ विवाहित जोडपे दळणवळणात कशी सुधारणा करु शकतात?

▫ जोडपे मतभेदांना ख्रिस्ती पद्धतीने कशाप्रकारे हाताळू शकतात?

▫ वैवाहिक बंधनाला बळकट बनवण्यासाठी काय मदत करील?

[१२ पानांवरील चित्रं]

पत्नीला प्रापंचिक नोकरी करावी लागल्यास, ख्रिस्ती पती तिच्यावर अधिक बोजा लादू देणार नाही

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा