वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ७/१५ पृ. ३-४
  • भयाने जगावर पकड बसवली आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • भयाने जगावर पकड बसवली आहे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आण्विक भय हेका धरून आहे
  • हिंसा भय वाढवते
  • एड्‌सचे भय
  • आण्विक धमकी सरतेशेवटी मिटली का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • अणुयुद्धाबद्दल बायबल काय म्हणतं?
    आणखी विषय
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ७/१५ पृ. ३-४

भयाने जगावर पकड बसवली आहे

फेब्रुवारी २६, १९९३ रोजी, एका प्रचंड कारबाँम्ब स्फोटाने, न्यू यॉर्क शहरातील, ११० मजल्यांच्या जागतिक व्यापार केंद्राला हादरून टाकले. हजारो कामगार लिफ्टमध्ये अडकून राहिले, किंवा त्यांना धुराच्या लोटातून जीव मुठीत धरून जिना उतरावा लागला. त्यांना, या हिंसात्मक जगात आता भरमसाट वाढलेल्या भयाची जाणीव झाली.

अनेक देशातील लोकांना, बाँम्बची दहशत बसली आहे. आयर्लंड आणि लेबननसारख्या देशात ती एक सामान्य गोष्ट बनली आहे. अहो, मार्च १२, १९९३ रोजी भारतातील मुंबई या ठिकाणी तर, एकाच दिवशी १३ स्फोट झाले ज्यामध्ये २०० लोक मृत्युमुखी पडले! एका निरीक्षकाने म्हटले की: “अख्ख्या मुंबईत भीतीचे वातावरण पसरले आहे.” न्यूजवीक नियतकालिकानुसार, कारबाँम्बची घटना, “साधारण गोष्ट बनल्यामुळे, अचानक होणारा हा स्फोटच आणखी घाबरून टाकतो.”

आण्विक भय हेका धरून आहे

अणुभट्ट्या, बाँम्बला भेद्य आहेत असे अनेकांना भय वाटते. अणुशक्‍ती केंद्रावर सफलतापूर्वक केलेला हल्ला, अपरिमित हानी आणि दुःखाला कारणीभूत ठरू शकतो. एका मनुष्याने, अमेरिकेतील थ्री माईल आयलंड नावाच्या एका अणुशक्‍ती केंद्राच्या सुरक्षा फाटकातून त्याची कार घुसवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही गोष्ट शाबीत झाली.

अनेक जणांना भीती वाटते की, दहशतवादी आणि सत्तेसाठी बुभुक्षित शासक, आण्विक शस्त्रांचा उपयोग करतील. काहीं तर, हजारो रिकामटेकडे सोव्हिएत आण्विक शास्त्रज्ज्ञ त्यांच्या कलेला विकतील असा विचार करूनच गर्भगळीत होतात. शिवाय, पूर्वीच्या सोव्हिएत प्रजासत्ताक राज्यात इतरत्र विखुरलेल्या अल्प पल्ल्याच्या आण्विक शस्त्रांविषयी काय? एसटीएआरटी (START) आणि इतर करार, लष्करी माऱ्‍याच्या अण्वस्त्रांची मोठी कपात करण्याची मागणी करत असले तरी, अशाप्रकारच्या करारांची कार्यवाही पुष्कळ वर्षांसाठी अंमलात आणता येणारच नाही.

हिंसा भय वाढवते

हिंसक गुन्हेगारीत झालेली विस्तीर्ण वाढ, लोकांना त्यांच्या घरात राहताना आणि रस्त्यावरून जाण्यासही भयभीत करते. अंदाज लावल्याप्रमाणे १९९० मध्ये, २३,२०० अमेरिकन लोकांचा खून झाला. उदाहरणार्थ, शिकागो शहरात, धुम्रपानासाठी वापरण्यात येणाऱ्‍या उच्च प्रतीच्या कोकेनचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यामुळे, एका वर्षात ७०० खून झाले. काही शहरांतील विशिष्ट भाग रणक्षेत्रे झाली आहेत. चहूकडून केलेल्या भडिमारात वाटसरू लोक तसेच, मुले देखील ठार झाली. एक मासिक म्हणते, “मध्यम आकाराच्या शहरांमध्ये हिंसा अगदी जलद गतीने तीव्र होत चालली आहे. . . . यातून कोणीही वाचू शकणार नाही कारण, [अमेरिकेतील] समाजात, अंमली पदार्थ व तरुण गुंडांचा सुळसुळाट ओथंबून वाहत आहे. प्रत्येक वर्षी अमेरिकेच्या प्रत्येक ४ कुटुंबातील १, हिंसक गुन्हेगारी किंवा चोरीचा अनुभव घेतात.”—यु. एस. न्यूज ॲण्ड वर्ल्ड रिपोर्ट, ऑक्टोबर ७, १९९१.

बलात्काराचे भय स्त्रियांना भयभीत करते. फ्रान्समध्ये पोलिसांना कळवलेल्या बलात्काराचे प्रकार १९८५ पासून १९९० पर्यंत ६२ टक्क्यांनी वाढले. कॅनडा येथे, सहा वर्षांच्या आत, लैंगिक हल्ले दुप्पट होऊन २७,००० पर्यंत गेले. जर्मनीने, प्रत्येक सात मिनिटांना एका स्त्रीवर झालेल्या लैंगिक हल्ल्याचा अहवाल दिला.

मुले देखील त्यांच्या सुरक्षिततेसाठी घाबरतात. न्यूजवीक अहवाल देते की अमेरिकेमध्ये, “चौथीत आणि पाचवीत शिकणारी लहान मुले, शस्त्रे जवळ बाळगतात, आणि शिक्षक व शाळेच्या अधिकाऱ्‍यांची घाबरगुंडी होते.” ही परिस्थिती इतकी गंभीर आहे की, जिल्ह्यातील एक चतुर्थांश मोठ्या नागरी शाळा, धातु शोधक यंत्रे वापरतात. परंतु, हे हट्टी तरुण धातु शोधक यंत्रे असूनही कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांच्या साथीदारांना खिडक्यांतून बंदुका सरकवतात.

एड्‌सचे भय

अधिकाधिक लोकांना, एड्‌स जडण्याची भीती वाटते. फक्‍त अमेरिकेतच, २,३०,००० अशा घटना झाल्या आहेत. एड्‌स हा रोग, १५ ते २४ वयोगटाच्या तरुणांमध्ये मृत्युचे सहावे अग्रेसर कारण बनला आहे. न्यूजवीक म्हणते, “भविष्य, सर्वात अधिक फैलावलेल्या आजाराची भयजनक आशा बाळगून आहे.”

एड्‌समुळे होणारा मृत्यू बहुधा, नृत्य, रंगभूमी, चित्रपट, संगीत, फॅशन, दूरदर्शन, कला आणि त्याचप्रकारच्या इतर क्षेत्रांत काम करणाऱ्‍यांमध्ये अधिक आहे. एका अहवालाने म्हटले की, पॅरिस, फ्रान्स येथील वृत्तपत्र व्यवसाय, कला आणि मनोरंजनाच्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्‍या २५ ते ४४ वयोगटातील ६० टक्के पुरूषांचा मृत्यू एड्‌समुळे झाला. जागतिक आरोग्य संघटना (WHO) कळवते की, संपूर्ण जगभरात, आठ ते दहा लक्ष लोकांना एचआयव्ही विषाणूचा संसर्ग झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे एक व्यवस्थापक, डॉ. मायकल मर्सन, म्हणतात: “संपूर्ण भूमंडलावर, विशेषकरून विकास झालेल्या राष्ट्रांमध्ये, एचआयव्हीच्या संसर्गामुळे बळी पडणाऱ्‍या मृतांची संख्या जलदगतीने वाढत आहे हे आता स्पष्ट आहे.”

अर्थातच, यासोबत पर्यावरण आणि इतर भयजनक गोष्टी देखील आहेत. निश्‍चित. तरीही, फक्‍त पूर्वगामी अहवालच हे स्पष्ट दाखवतात की, भयाने जगावर पकड बसवली आहे. याबद्दल काही खास अशी विलक्षण गोष्ट आहे का? आम्ही भयातून मुक्‍ततेच्या आनंदाची कधी अपेक्षा करू शकतो का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा