ते एका संयुक्त बंधुत्वात सामील होतात
ते ऑगस्ट ७, १९९३ रोजी, किव, युक्रेन येथील रिपब्लिकन स्टेडियम येथे घडले. ६४,००० पेक्षा अधिक उपस्थित असलेले, त्या क्षणाची अपेक्षा करीत बसले होते. मग दोन अर्थपूर्ण प्रश्नांना उत्तरे देताना हजारोंनी “डा!,” (“होय!”) असे म्हटले. अशाप्रकारे, त्यांनी त्यांच्या विश्वासाची जाहीर घोषणा केली, आणि मग यहोवा देवाला त्यांचे समर्पण करण्यासाठी, स्टेडियममधील सहा टक्क्यांमधील एकात बाप्तिस्मा घेण्यासाठी गेले.—मत्तय २८:१९.
अशाप्रकारे, यहोवाच्या साक्षीदारांच्या, “ईश्वरी शिक्षण” या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी, श्रोत्यांनी, विलक्षणीय घटना पाहिली: ७,४०२ जणांचा बाप्तिस्मा झाला होता. ते आता एका विभाजित चर्चचे नव्हे तर एका संयुक्त जगव्याप्त ख्रिस्ती मंडळीचे भाग बनले.
तुम्हाला खऱ्या ख्रिस्ती ऐक्यतेविषयी आणखीन शिकून घ्यायची इच्छा असेल तर कृपया Watch Tower, H-58 Old Khandala Road, Lonavla 410 401, Mah., India, किंवा पृष्ठ २ वर दिलेल्या योग्य पत्त्यावर लिहा.