“ईश्वरी भय” या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहा!
तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांच्या १९९४ च्या “ईश्वरी भय” या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याची योजना अद्यापि केली आहे का? तिन्ही दिवस उपस्थित राहिल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल! केवळ भारतात १६ अधिवेशनांची योजना केलेली आहे, बहुधा एखादे अधिवेशन तुमच्या राहण्याच्या ठिकाणा जवळच भरविले जाईल.
विशिष्ट प्रकारचे भय, धैर्याला क्षीण करून आशा नष्ट करु शकते; तथापि, शुक्रवार सकाळचे मुख्य भाषण ईश्वरी भयाची व्याख्या देईल, व त्याच्या अनेक लाभांचे वर्णन करील. खरोखर, अधिवेशनाचा संपूर्ण कार्यक्रम या लाभांना स्पष्ट मांडेल.
शुक्रवारी दुपारी ईश्वरी भय, विवाह आणि कौटुंबिक जीवनाला कसे बळकट करील याविषयी तसेच, तरुण लोक यहोवाला त्यांचा निष्ठावानपणा टिकवण्यात कसे दृढ राहू शकतात हे तुम्हाला ऐकावयास मिळेल. दुपारच्या कार्यक्रमाचा समारोप, “मृत्युमुळे हानी झालेल्या लोकांसाठी सांत्वन” या अंतःकरणास उबविणाऱ्या सादरतेने होईल. ज्यांनी आपल्या प्रियजनांना मृत्युत गमावले अशांसाठी, पुरवलेल्या व्यावहारिक माहितीची तुम्ही गुणग्राहकता बाळगाल.
शनिवारचा कार्यक्रम, मंडळी तसेच आमच्या सेवेविषयी यहोवाच्या मार्गदर्शनाला जडून राहण्यासाठी ईश्वरी भय कसे मजबूत करू शकते ते दाखवील. “देवाचे वचन, पवित्र शास्त्र रोज वाचा” या भाषणात, प्रतिनिधींना पवित्र शास्त्राचे वाचन व अभ्यास करण्याविषयी व्यावहारिक सल्ले मिळतील. शनिवारच्या कार्यक्रमाचा समारोप, “यहोवाचा भयप्रेरित दिवस जवळ आहे” या आस्था वाढविणाऱ्या भाषणाने केला जाईल.
रविवारच्या कार्यक्रमाचे वैशिट्य, “धार्मिकांचे पुनरूत्थान होईल” हे भाषण असेल. त्यानंतरचे भाषण, “मोठ्या संकटातून जिवंत असे बचावलेले,” यात, कधीही मरणार नाही, या येशूने दिलेल्या अद्भुत अभिवचनाचा खुलासा केला जाईल.—योहान ११:२६.
रविवारी सकाळच्या कार्यक्रमाची समाप्ती, विचाराला प्रेरणा देणाऱ्या ४० मिनिटाच्या, तुम्हापुढे असलेल्या निवडी नाटकाने होईल. श्रोत्यांना मागे यहोशवाच्या काळाची आठवण करुन यहोवाची सेवा करण्याच्या त्याच्या दृढ निश्चयाचे हुबेहुब वर्णन दिले जाईल. एलीयाच्या दिवसातील अग्नीच्या परीक्षेची देखील सादरता केली जाईल, आणि या दोन्ही घटनांमधून मिळणारा धडा ईश्वरी भय आज प्रदर्शित करण्यास, प्रतिनिधींना मदत मिळू शकेल. दुपारचे जाहीर व्याख्यान, “खऱ्या देवाचे भय आता का बाळगले पाहिजे,” हे अधिवेशनाचे मुख्य आकर्षण असेल.
आताच उपस्थित राहण्याची योजना करा. तुमच्या जवळ असलेले ठिकाण शोधण्यासाठी, यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक राज्य सभागृहाशी संपर्क साधा किंवा या मासिकाच्या प्रकाशकाला लिहा.