“ईश्वरी भय” या प्रांतीय अधिवेशनासाठी स्वागत असो!
होय, यहोवाच्या साक्षीदारांच्या १९९४ च्या प्रांतीय अधिवेशनाची वेळ जवळ येत आहे. जून १९९४ ते जानेवारी १९९५ पर्यंत, तीन दिवसांचा अधिवेशनाचा कार्यक्रम जगभरातील शेकडो शहरांमध्ये ऐकवण्यात येणार आहे. त्याची सुरवात प्रथम, उत्तर अमेरिकेत होऊन, मग पूर्व आणि पश्चिम युरोप, आशिया, मध्य आणि दक्षिण अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, व समुद्राच्या बेटावर होणार आहे.
त्याचा, “ईश्वरी भय” हा विषय विचाराला किती चालना देणारा आहे! एखाद्याचे जीवन धोक्यात असल्यावर वाटत असलेले हे दहशतीचे भय नव्हे, तर मनाची शांती व आनंद देणारे देवाचे भय आहे. पवित्र शास्त्रातील नीतीसूत्र म्हणते: “नम्रता व परमेश्वराचे [यहोवा, NW] भय यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय.” (नीतीसूत्रे २२:४) देवाचे भय बाळगण्याचा परिणाम, “धन, सन्मान आणि जीवन” यात कसा होऊ शकतो? तीन दिवसांच्या दरम्यान अधिवेशनाचे शीर्षक, भाषणे, चर्चा, प्रात्यक्षिके, आणि नाटक यांचा जसा विस्तार होत जाईल त्याद्वारे हे स्पष्टपणे दिसून येईल.
आम्ही ‘एकत्र मिळणे सोडू नये,’ असे प्रेषित पौलाने लिहिले. (इब्रीयांस १०:२५) यहोवाचे साक्षीदार, आठवड्यातून तीन वेळा मंडळीच्या अभ्यासासाठी आणि उपासनेसाठी एकत्र येऊन या गोष्टीतील गांभीर्य समजतात. तथापि, वार्षिक प्रांतीय अधिवेशन विशेष आहे. ते याकडे उत्कंठेने पाहतात आणि त्यानंतर महिन्यांपर्यंत याविषयी बोलत असतात. आम्ही तुमचे हार्दिक स्वागत करतो, तुमचा धर्म कोणताही असो, त्यांच्या अधिवेशनात सामील व्हा आणि उबदार ख्रिस्ती संगतीचा तसेच महत्त्वपूर्ण आध्यात्मिक माहितीचा आनंद लुटा. यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक मंडळीतील सदस्य, तुम्हाला जवळ असणारे अधिवेशन कोठे आणि केव्हा होणार आहे हे सांगण्यास आनंदी असतील.