यहोवाची सेवा करण्याचा दृढनिश्चय केला!
“तू प्रचाराला जायचं नाहीस!” “तुझ्या लोकांना इथं आणायच नाहीस!” अनेक ख्रिस्ती स्त्रिया, त्यांच्या विरोध करणाऱ्या पतींकडून अशा किंवा याचप्रकारच्या अभिव्यक्त्या ऐकतात. परंतु हे विरोध करणारे पती जर का सशस्त्र बलात काम करणारे असले तर, त्यांच्या पत्नींना त्यांच्या विश्वासासाठी, खास आव्हानाला तोंड द्यावे लागते. (यशया २:४; योहान १७:१६) तर मग, ह्या ख्रिस्ती पत्नी राज्य सेवेतील त्यांची आध्यात्मिकता दृढ व सक्रियरीतीने कशा टिकवून ठेवतात?
यहोवा देवाठायी त्यांची निष्ठा, शिवाय व्यक्तिगत दृढनिश्चय त्यांना टिकाव धरून राहण्यास मदत करतो. “मला वाटते की तो केवळ माझा दृढनिश्चय होता. माझ्या पतीच्या विरोधावर मात करण्याचे अनेक मार्ग असतील हे मला माहीत होते,” असे इवोन नावाच्या एका सैनिकाच्या पत्नीने म्हटले. नक्कीच, अनेक मार्ग होते.
एका सेना अधिकाऱ्यासोबत विवाह झालेली आणखी एक ख्रिस्ती स्त्री, तिच्या दृढनिश्चयी भूमिकेमुळे तिच्या पतीचे जीवन देखील सुकर बनवले याबद्दल कथन करते. ती स्पष्टीकरण देते, “त्यांना, माझा आणि त्यांचा स्वतःचा नित्यक्रम माहीत आहे, आणि सैन्यातील लोकांना याविषयी कृतज्ञता वाटते.” तरीही, यहोवासाठी तिची नित्य सेवा सोपी नाही.
एकाकीपणावर मात करणे
सैन्यदलात काम करणाऱ्या पतीची घरापासून दूर अशा जागी नेमणूक होते, तेव्हा त्यांच्या पत्नींना पतीसोबत जावे लागते. त्यानंतर, अनोळखी परिसरात स्थायिक झाल्यावर, एकाकीपणा सहज रीतीने भासतो. परंतु असे होऊ नये. यहोवाची सेवा करणाऱ्यांना याचा फायदा होतो. कोणता फायदा? ख्रिस्ती प्रेषित पेत्रानुसार, तो “बंधुवर्ग” आहे. आता लाखोंच्या घरात जमा होणारे यहोवाचे साक्षीदार, २३१ राष्ट्रांमध्ये एका मोठ्या ख्रिस्ती कुटुंबाप्रमाणे “बंधुत्वात” राहतात. वास्तविक पाहता, तुम्हाला ते सर्वत्र आढळतील.—१ पेत्र २:१७, NW, तळटीप.
सूझन, अचानक तिच्या गावातील राहत्या ठिकाणाहून तिच्या पतीची नेमणूक झाली त्या वायुसेनाच्या सैन्यतळावर स्थलांतरीत झाली. विश्वासात नवी, शिवाय खऱ्या विश्वासात नसणाऱ्या तिच्या पतीकडून ख्रिस्ती सेवा सोडून देण्याच्या दबावाखाली असताना देखील ती सांगते की, “मी लगेच स्थानिक सभांना उपस्थित राहिले, आणि तेथे मी इतर बहिणींसोबत बसू व बोलू शकले. केवळ याच संगतीने मला टिकवून ठेवले आहे हे मी खरोखर सांगू शकते.”
काही वेळा निराशेला एकाकीपणा कारणीभूत ठरू शकतो. असे असतानाही सुवार्ता, स्वागतार्ह उभारणी करते. इंग्लंड येथील, ग्लेनिस नावाची एक बहिण, तिच्या पतीची परदेशात बदली झाली तेव्हा त्याच्या सोबत गेली. ती कथन करते: “मी निराशेमुळे खचून गेल्यावर अनपेक्षितपणे, फार वर्षांपूर्वी सैन्यदलातील मी ओळखत असलेल्या कोणीतरी, मला पत्र लिहून सांगितले की, तिचा अलिकडेच यहोवाचा साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा झाला. मला उत्तेजन देणारी हीच ती योग्य वेळ होती.”
केनियाला तिच्या पतीसोबत प्रवास करताना जेनला दिसून आले की, ख्रिस्ती सभा तिला समजत नसणाऱ्या वेगवेगळ्या भाषांमध्ये होत असल्या तरी, जीवन रेषा शाबीत झाल्या. ती स्पष्टीकरण देते, “मी येथेच असावे अशी यहोवाची इच्छा होती, मी माझ्या आध्यात्मिक बांधवांसोबत होते, आणि ते शक्तिवर्धकासारखे होते. त्यांनी माझे स्वागत केले आणि आम्ही एकाच कुटुंबाचे असल्यासारखे मला वाटले.”
या सर्व परिस्थितींमधली जेन ही केवळ एकच व्यक्ति आहे जिला इतके आध्यत्मिक नातलग हे कळून आले. आधी तिला हे माहीत देखील नव्हते!—मार्क १०:२९, ३०.
विरोधाच्या समोर असतानाही अचल
“मी पृथ्वीवर शांतता आणावयास आलो असे समजू नका; मी शांतता आणावयास नव्हे तर तरवार घालावयास आलो आहे,” असा येशूने इशारा दिला. (मत्तय १०:३४) त्याचा बोलण्याचा काय अर्थ होता? शांततेची अपेक्षा जेथे केली जाऊ शकते त्या कुटुंबातही “अचानक तरवार फेकली जाऊ शकते” असे विवेचन, ए. टी रॉबर्टसन यांनी नव्या करारातील शाब्दिक चित्र (इंग्रजी) या पुस्तकात मांडले. “आणि, मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील,” अशी येशूने नोंद केली. (मत्तय १०:३६) एखादा विवाहीत सोबती सत्यासाठी प्रतिकूल मनोवृत्ती दाखवत असेल तर हे शब्द किती खरे ठरतात बरे!
डाईन जेव्हा यहोवाच्या साक्षीदारांसोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास करू लागली तेव्हा, वायुसेनेत अधिकारी असलेला तिचा पती अतिशय नाराज झाला. त्यांच्या विवाहावर याचा काय परिणाम झाला? डाईन स्पष्टीकरण देते, “आमच्या दोघांमध्ये जणू काय बर्फाचा ठोकळा येत आहे असे वाटले. आमचा विवाह अतिशय आनंदाने पार पडला होता. परंतु आता, आम्ही दोघे एका घरात नुसते जगत होतो.” तिने याचा सामना कसा केला? ती पुढे म्हणते, “व्यक्तिगत खात्री आणि दृढनिश्चय तसेच यहोवा आणि त्याच्या आत्म्याची मदत या गोष्टी जमेच्या बाजू होत्या.” डाईनने, दानीएल संदेष्ट्याचे उदाहरण अनुसरले.
बाबेलमध्ये कैद करून व देवाच्या सेवकाला इष्ट नसणारे अन्न खावयास दिल्यावर, दानीएलाने, ‘राजा खात असे ते मिष्टान्न याचा आपणास विटाळ होऊ देऊ नये असा त्याने मनाचा [दृढनिश्चय, NW] निश्चय केला.” होय, दानीएलने जाणीवपूर्वक निर्णय घेतला. ते अन्न खाण्याद्वारे स्वतःला विटाळू न देण्याचा त्याने अंतःकरणात निश्चय केला. “खोजांच्या सरदारास विनंती केली की मला यांचा विटाळ नसावा” असे करून त्याने किती दृढ मानसिकता प्रकट केली! याचा परिणाम काय झाला? यहोवाने त्याच्या दृढनिश्चयी भूमिकेवर आशीर्वाद दिला.—दानीएल १:८, ९, १७.
त्याचप्रमाणे आज विरोध करणारा पती, त्याच्या पत्नीला सभांना न जाण्याची आज्ञा करू शकतो. याला तिने कशी प्रतिक्रिया करावी? जेन याच परिस्थितीत अडकली होती. ती स्पष्टीकरण देते: “माझ्यावर दबाव आल्यावर मी कधीही दबून गेले नाही. मला हे ठाऊक होते की या बाबतीत हातमिळवणी करता येणार नाही. त्या सभा माझ्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहेत हे मला प्रदर्शित करायचेच होते.” ती जसजशी उपस्थित राहत गेली तसे यहोवाने तिच्या ठाम निश्चयावर आशीर्वाद दिला.
ग्लेनिस सांगते, “माझ्या पतीने मला सभांना जाण्यापासून रोखून ठेवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो अधिक काळ टिकला नाही. मी जात राहिले. सभांवरून घरी आल्यावर, काही वेळा तो मला मारहाण करत असे, आणि मला निःशब्द अवस्थेत घरात घेत जाई.” तरीही, तिने हे सर्व काही सहन केले आणि निरंतर प्रार्थना केली. शिवाय, मंडळीचे दोन वडील तिच्यासोबत सतत प्रार्थना करत असत, ज्यामुळे नियमितरीत्या उपस्थित राहण्यासाठी तिला खूपच उत्तेजन मिळाले.—याकोब ५:१३-१५; १ पेत्र २:२३.
कधीकधी पतीचे वरिष्ठ अधिकारी, त्याच्या पत्नीला सुवार्तेचा प्रचार करण्यापासून निरूत्साहीत करण्यासाठी पतीवर दबाव आणू शकतात. डाईनला असे दिसून आले की, तिच्या प्राथमिक गोष्टी कोणत्या आहेत यांची स्पष्टता तिला तिच्या पतीला द्यावी लागेल. ती म्हणाली, “माझ्या नियमित प्रचारकार्याचे होणारे परिणाम मी सहन करावयास तयार होते.” ही प्रेषितांसारखीच कशी भूमिका होती! (प्रे. कृत्ये ४:२९, ३१) तरीही, ती तिच्या प्रचार कार्यात सर्वदक्ष होती. ती कथन करते: “मी चहापाण्यासाठी लोकांना घरी बोलवत असे आणि सर्वांना सत्य पुस्तक सादर करत असे.”—मत्तय १०:१६; २४:१४.
हातमिळवणी न करता अधीनता
वैवाहिक तणावामुळे त्रस्त असूनही, ख्रिस्ती पत्नी भवितव्याकडे पाहतात आणि यहोवावर विसंबून राहतात. असे केल्याने समतोल दृष्टिकोन ठेवण्यास त्यांना मदत होते. त्यांच्या विश्वासाची कोणतीही हातमिळवणी न करता ते त्यांच्या पतींना त्यांना हवा असलेला पाठिंबा देतात. असे केल्याने त्या, पेत्राने दिलेल्या प्रेरित सल्ल्याला अनुसरतात: “पत्नींनो, तुम्हीही आपआपल्या पतीच्या अधीन असा.” (१ पेत्र ३:१, NW) द ॲम्प्लीफाईड न्यू टेस्टमेंट, यात ही प्रेषितीय सूचना अशी वाचली जाते: “दुय्यम व त्यांच्यावर अवलंबून असल्यासारखे तुम्ही स्वतःला त्यांच्या अधीन करा, व त्यांच्या योजनांशी समरस व्हा.” जेनने हा सल्ला कसा अनुसरला ते पाहा. तिने स्पष्टता दिली, “माझ्या पतीने मला सांगितले की, मी ज्या गोष्टी करू इच्छिते त्या गोष्टींनी, त्याच्या कर्तृत्वात हस्तक्षेप करू नये. याकारणास्तव, त्यांना मदत करणाऱ्या मार्गांना शोधण्याचा मी प्रयत्न करू लागले.”
काही ख्रिस्ती पत्नी, त्यांच्या पतींना आमंत्रण मिळालेल्या सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास तयार झाल्या. परंतु तरीही, त्यांच्या विश्वासासोबत हातमिळवणी न करण्याचा त्यांचा ठामनिश्चय आहे. जेनने याविषयाबद्दल तिच्या पतीसोबत बोलण्यासाठी वेळ काढला. तिने नम्रपणे तिच्या पतीला स्पष्टीकरण दिले की, ती त्या कार्यक्रमांना उपस्थित राहू इच्छित होती परंतु, तिच्यामुळे त्याला लाजिरवाणे वाटू नये अशी तिची इच्छा होती. मला माहीत होते की उपस्थित असलेल्यांकडून अधूनमधून, टोस्ट नावाच्या कार्यक्रमात (या कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांना उभे राहून आदर दर्शविण्यासाठी दारूचे पेले उंच करून दारू प्यावी लागते.) भाग घेण्याची अपेक्षा केली जाते. मी हे शिकले होते की, निष्ठा केवळ यहोवालाच दाखवली पाहिजे, आणि टोस्टींगमध्ये केवळ आदरभावापेक्षा जास्त समाविष्ट आहे. तो प्रसंग किती विचित्र असेल याची माझ्या पतीला जाणीव झाली, आणि ते म्हणाले: ‘तू येऊ नकोस!’ आणि मी त्यांचे ऐकले.”
दुसऱ्या बाजूला पाहता, ग्लेनिस अशा कार्यक्रमांना तिच्या पतीसोबत गेली खरी, परंतु पुढाकार घेणाऱ्या अधिकाऱ्यांना ती केवळ न्याहाळत होती. ते, टोस्टच्या कार्यक्रमाची तयारी करत आहेत असे तिला दिसून आल्यावर, अगदी चतुराईने ती विश्राम गृहाकडे जात असे! होय, या स्त्रियांनी स्वतःला त्या परिस्थितीशी जुळवून घेतले, परंतु हातमिळवणी कधीच केली नाही.
‘वचनावाचून मिळवून घेणे’
“पत्नी म्हणून मी माझ्या स्वत:च्या क्षमतेत सुधार केला तर सत्य माझ्यामध्ये परिवर्तन करीत आहे हे माझे पती पाहतील,” असा तर्क इवोनने केला. याचकारणास्तव, तिने कौटुंबिक जीवन या पुस्तकातील, “अतिशय प्रिय असलेली पत्नी” हा धडा वारंवार वाचला.a “त्या धड्याच्या ‘रडणाऱ्या व हट्टी स्त्रिया’ या उपशीर्षकाखालील माहितीकडे मी खास लक्ष दिले! परंतु मला असे दिसून आले की, मी माझ्या पतीसोबत जितक्यांदा बोलण्याचा प्रयत्न केला तितक्यांदा परिस्थिती अधिक बिकट झाली.” तरीही, शेवटी, तिच्या पतीला यहोवाची सेवा करण्यास मदत करून तिने यश मिळवले. ते कसे बरे? १ पेत्र ३:१ मध्ये लिखित तत्त्व, पतींना ‘वचनावाचून वर्तनाने मिळवून घेणे’ हे लागू केल्याने.
ख्रिस्ती स्त्रिया त्यांच्या कुटुंबांची काळजी ज्या मार्गाने घेतात त्यामुळे अधिक प्रमाणात इतरांना ख्रिश्चनत्वाकडे आकर्षवून घेता येते. डाईन स्पष्टता देते, “मी सत्याला होता होईल तितके आकर्षक बनवण्याचा प्रयत्न केला. मी सभांना गेल्यावर माझ्या पतीला एकाकी वाटत होते, यास्तव आम्ही घरी आल्यावर, मुलांनी खासपणे योग्य वर्तन दाखवावे म्हणून, त्यांना सूचना देण्याची मी दक्षता घेत असे. घरी परतल्यावर मी माझ्या पतीकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न केला.” आमच्या कुटुंबाच्या दयाळू वृत्तीला ते प्रतिसाद दाखवत गेले तसतसे त्यांची प्रवृत्ती हळूवारपणे बदलत गेली.
यहोवाचे सहसेवक देखील मदत पुरवू शकतात. जेन सांगते की, तिच्या पतीला केनियामध्ये भेटलेल्या मिशनरी साक्षीदारांचा सहवास फार आवडला. “त्यांनी त्यांच्यासोबत मैत्री केली आणि फुटबॉल विषयी खूप गप्पा मारल्या, शिवाय त्यांनी आदरातिथ्य दाखवले. अनेक वेळा, आम्हाला वेगवेगळ्या मिशनरी गृहांमध्ये भोजनासाठी आमंत्रण दिले गेले.” तिच्या पतीने नंतर स्पष्टीकरण दिले: “मी जेनच्या विश्वासाकडे पूर्णपणे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागलो. तिचे मित्र आणि मैत्रिणी हुशार होते कारण ते विविध विषयांवर बोलू शकत होते.” याचप्रमाणे, डाईनच्या पतीने सत्याकडे असलेल्या त्याच्या दृष्टिकोनात बदल केला. एकदा तो चालवत असलेल्या कारमध्ये यांत्रिक बिघाड झाला तेव्हा, एक तरूण साक्षीदार त्याच्या मदतीला धावून आला. “यामुळे माझ्यावर खरोखरच प्रभाव पडला,” तो म्हणतो.
सर्वच विवाहित सोबती सत्याकडे आणले जात नाहीत हे निश्चित. तेव्हा काय? विश्वासू जणांना सहन करण्यासाठी यहोवा मदत पुरवतो. (१ करिंथकर १०:१३) ग्लेनिस सारख्याच परिस्थितीत असणाऱ्यांना तिने दिलेल्या उत्तेजनाकडे जरा लक्ष द्या: “यहोवा हाच विवाहाचा जनक आहे आणि विवाहीत जोडप्यांनी एकत्र राहावे अशीच त्याची इच्छा आहे, याविषयी कधीही शंका बाळगू नका. यास्तव, पतीने काहीही केले तरी किंवा तुमच्या सभोवार असलेल्यांकडून कोणताही विरोध आला तरी, यहोवा तुम्हाला कधीच डळमळू देणार नाही.” तिचा पती अजूनही यहोवाची भक्ती करणारा नसला तरी, तिच्याकडे आणि सत्याकडे पाहण्याची त्याची मनोवृत्ती मृदू झाली आहे.
‘अश्रूंनी पेरणी करा; आनंदाने कापणी करा’
खरेच, ह्या ख्रिस्ती स्त्रिया यहोवाची सेवा करण्यासाठी दृढनिश्चयी आहेत. तुम्ही देखील अशाचप्रकारच्या परिस्थितीत असला तर, हा तुमचा ठाम निश्चय करा. या आग्रहाकडे नीट लक्ष द्या: “आपला देव [यहोवा, NW] याचे भय बाळग, त्याची सेवा कर, त्याला धरून राहा.”—अनुवाद १०:२०.
“जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन येईल,” अशी घोषणा स्तोत्रकर्ता करतो. (स्तोत्रसंहिता १२६:६) एक साक्षीदार कबूल करते की, “तुमच्या सोबत्याला सत्याची ओळख, निःशब्द किंवा शाब्दिक रूपाने करून देण्याचा प्रयत्न करत असताना तुम्ही नक्की अश्रू ढाळता, परंतु शेवटी तुम्ही आनंदाने बागडता कारण त्याने सत्य स्वीकारले नसले तरी, यहोवा तुम्ही केलेल्या प्रयत्नांवर आशीर्वाद देतो.”
घरांमध्ये कट्टर विरोध असतानाही यहोवाची सेवा विश्वासूपणे करणारे सर्व, खऱ्या प्रशंसेच्या पात्रतेचे आहेत. ते, पाठिंबा आणि प्रीती मिळण्याच्या योग्यतेचे आहेत. यहोवाची सेवा करण्याचा दृढनिश्चय करून, बिनतडजोडीची त्यांनी त्यांची भूमिका राखावी!
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रक्ट सोसायटी ऑफ न्युयॉर्क, इंक. (१९७८) ने प्रकाशित केलेले तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे हे पुस्तक.
[२८ पानांवरील चित्रं]
प्रार्थनापूर्वक अभ्यास ख्रिस्ती दृढनिश्चयाला बळकट करतो